बर्ड वॉचिन्ग

Submitted by विद्या भुतकर on 9 May, 2016 - 13:47

बॉस्टन भागात आमचं पहिलच वर्ष. आता स्प्रिंग सुरु झाला आणि घराच्या मागच्या झाडीत (झाडी कुठे जंगलच म्हणायचं) पक्षांचा किलबिलाट सुरु झाला. आधी फक्त पहात होते पण यांचे विविध रंग आणि जाती पाहताना मग फोटो काढायचा मोह आवरला नाही. दिसेल तेंव्हा आणि जमेल तसे गेल्या १० दिवसांत हे फोटो काढले. मला कॅमेराची लेन्स पुरेशी पडत नाहीये असं वाटतंय एकदम क्लोज अप घ्यायला. पण जे मिळाले तेही उत्तम म्हणून इथे देत आहे सर्व. यांचे प्रकार, नावं, जाती कुणाला माहित असतील तर नक्की सांगा. माहिती गोल करायला आणि मुलांना सांगायला आवडेल. सध्या मुलगीही मग पक्षी दिसला की पळत येऊन सांगते फोटो काढायला. Happy

आम्हाला तर एकदम खजिनाच मिळाला असं वाटतंय. तुम्हालाही आवडतील अशी अपेक्षा.

विद्या भुतकर.
FullSizeRender(1).jpgFullSizeRender(2).jpgFullSizeRender(3).jpgFullSizeRender(4).jpgFullSizeRender(5).jpgFullSizeRender(6).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. नॉर्दर्न कार्डिनल मादी
४. नॉर्दर्न कार्डिनल नर
३ आणि ६. ब्लू जे
५. अमेरिकन रॉबिन

पहिला लक्षात येत नाही - रंग सुतारासारखे आहेत पण आकार निराळा वाटतो आहे.

वर लिहिलेले सगळे आपल्याला रंगांमुळे अप्रुपाचे वाटले तरी बर्‍यापैकी कॉमन पर्चिंग बर्ड्स आहेत.

पहिला पक्षी Northern Flicker आहे. एक प्राकारचा wood pecker आहे. उडताना त्यांच्या पंखाखाली रंगीत पॅच दिसतो.

मस्त आहेत फोटो.
इथे बर्‍याच बॅकयार्डात सहजी दिसणार्‍या पक्ष्यांची नावं अन फोटो आहेत
http://scottandnix.com/products/sibley-s-backyard-birds-of-eastern-north...

पक्षी निरिक्षणात इंटरेस्ट असेल आणि घराच्या जवळ्पास बर्ड फीडर लावण्यायोग्य जागा असेल तर इथे सोप्या टिप्स आहेत
https://www.audubon.org/news/bird-feeding-tips

पहिल्या फोटोमधे नॉर्दन फ्लीकर फीमेल आहे. प्लीमेल मधे तो रेड पॅच मानेवर पाठच्या बाजूला असतो (red crescent on nape). मेल मधे तो चोचीच्या शेजारी गालावर असतो. मिशांसारखा (red malar)

सुरेख!
मला पहिला हुप्पोचा प्रकार वाटला पण चोच व करून असा हुप्पो पाहात नाही.ब्लु जे खरंच ब्लु मस्त आहे.

इतके पक्षीनिरीक्षक बघून फोटो इथे टाकले ते बरे झाले असे वाटले. आज चेक करते माहिती यावर सगळी.
धन्यवाद. Happy

विद्या.