तुम्हाला विद्रोही/दलित वा सबगोलंकारी कवी व्हायचे आहे काय ?
तर ते सोपे आहे .
साहित्य :
१) सर्वप्रथम एक फेसबुक अकौंट.
२) आपल्याशिवाय इतर कुणी मांयडेड असूच शकत नाही हा दुर्दम्य हलकट आत्मविश्वास.
३) मान्यता पावलेल्या दलित/विद्रोही कवीचे दोन चार कवितासंग्रह , समाजवादी चोपडी व मार्क्सवादी ठोकळा (हे कायम हाताशी असावेत.)
४) कविता टाकल्याबरोबर तिची लिंक मेसेजमध्ये पाठवली का लगेच लाईक कॉमेंट्स साठी धावणारे पाच पंचवीस मित्र
५) आभासी जगात मानलेले (पत्रकार , लेखकू असलेले) आई बाप .
तर मित्रहो आता पाहू या थेट कृती . पण त्याआधी पुन्हा थोडी पार्श्वभूमी ! तुम्ही कायम चोवीस तास फेसबुक वर पडीक राह्यला हवे , जे की अतिशय सोपे आहे . मग तुम्ही तिथल्या अनेक वादात भाग घेऊन , तिथे अजिबातच परखड भूमिका न घेता निव्वळ शब्दबंबाळ , गोल गोल बोलत राहायचे ज्यायोगे तुमची अजिबातच अस्सल नसलेली अस्सल (?) भूमिका नक्कल असल्याचे लोकांना लौकर कळत नाही . व तुम्ही पुढे हाळजलेल्या कवितेला अगदी सहज कौतुकाची लाल शाबासकी आणि समाजवादी गालगुच्चा मिळतो . शिवाय तुमच्या सबगोलंकारी बडबडीने, कवितेतील शिवी गाळीने आंबेडकरवादी विद्रोह चिमटीत धरल्याचे भास स्वयंघोषित विद्वानांना होतात. जे तुमच्या खूपच फायद्याचे ठरते . आता तुम्ही थेट कागुद जवळ ओढून , रमचे तीन प्याग लावून हाताशी असलेल्या , मान्यता पावलेल्या , जीवित वा मृत कवीच्या काव्यसंग्रहातील विविध कवितेतील काही शब्द कागदावर लिहून घ्यावेत . रांडकी पुनव , पाणचट गवशी , डिंगडांग धतींग , डेडाळे , सतीसावित्री टिंगम टोल , डल्ली सल्ली , बोटी गुड्से ,रायरंदी हाडूक , छप्पनटिकली बहुचकपणा , मेन स्ट्रीम , फायर , माशिदीतला आवाज ,थानातून , मांडीतून , इत्यादी . आता तुम्ही थेट कविता पाडायच्या नादाला लागावे . वरील शब्दातून उत्तम कविता कशी आकार घेते ते पहा .
व्यवस्थेचा गुड्सा फोडून रांडकी पुनव थयथय नाचते
पाणचट गवशी खुदकन हसून डिंगडांग धतींग गाणे गाते
मेन स्ट्रीममधले ३६ नखरे सतीसावित्री टिंगम टोल
छप्पनटिकली बहुचकपणा थानातून जन्म घेतो
रायरंदी हाडूक डल्ली सल्ली तगडी भूक मार्क्सचा डोळा
नेहरूचा गुलाब घटनेचे हक्क फायर फायर फायर
मी व्यवस्थेची गांड मारतो .
तर मित्रहो ही झाली विद्रोही दलित कविता ! अशा प्रकारे कितीही कशाही विद्रोही कविता पाडता येतात .मग त्या फेसबुकवर टाकून मेसेज बॉक्सात लिंका देऊन तुम्ही मान्यता प्राप्त होऊ शकता .
(आमच्या एका ताज्या किश्यास , अनुकरणाचे आरोपी लेबल लावल्याने अनुकरण ,चोरीमारी ,प्रभाव इ . गोष्टीन्वये विद्रोही मजा उलगडून दाखविणे भाग पडले. होतकरूंनी लाभ घ्यावा .)..
हसून हसून डोळ्यासमोर अंधेरी
हसून हसून डोळ्यासमोर अंधेरी आली.
कविता अगम्य वाटली ! पण लेखात
कविता अगम्य वाटली !
पण लेखात नेहमीसारखी मज्जा नाय आली !
धमाल.
धमाल.