१. मटण खिमा १/२ किलो
२. ४ मोठे कांदे बारीक चिरुन
३. २ मध्यम टॉमाटो बारीक चिरुन
४. आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट (आवडीप्रमाणे)
५. २ तमालपत्र
६. ५-६ मिरी दाणे
७. तेल
८. हळद
९. लाल तिखट
१०. गरम मसाला
११. मिट मसाला (मी सुहानाचा वापरला)
१२. मीठ
१३. बारीक चिरलेली कोथिंबिर
१. प्रथम खिमा थोडी हळ्द आणी आल-लसुन पेस्ट(१/२ चमचा) टाकुन शिजवुन घ्या. (मी छोट्या कुकरमध्ये ५ शिट्यात शिजवुन घेतला.)
२. आता खिमा थंड झाला की कढईत तेल घेउन गरम करा. (तेल जरा सढळहस्तेच घ्यायच बरं).यात मिरी दाणे आणि तमालपत्र टाका. आता कांदा परतुन घ्या. छान गुलाबीसर झाला कि टोमाटो परतुन घ्या.
३. टोमाटो मऊ झाला कि यात आवडीप्रमाणे आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट, हळद, आणि लाल तिखट घालुन छान परतुन घ्या. मग यात १ चमचा मिट मसाला घाला.
४. आता खिमा अॅड करा. परतुन घ्या. अगदी थोड पाणी घाला आणि वरुन १ चमचा गरम मसाला घाला. छान मिक्स करुन घ्या. मीठ घाला. ग्रेव्ही हवी असेल तर त्याप्रमाणे पाणी वाढवा. (खिमा आधिच शिजवल्यामुळे फार वेळ नाही लागत). ५ मिनिटे मंद आचेवर शिजु द्या. आच बंद करुन वरुन कोथिंबिर भुरभुरावी.
गरम गरम भाकरीबरोबर गट्ट्म करायला तयार.
(No subject)
ओक्के! मी नॉन व्हेज खात नाही,
ओक्के! मी नॉन व्हेज खात नाही, पण तू पाककृती मस्त टाकली आहेस.:स्मित: ताट पण मस्त दिसतयं.
हायला मस्तच. ताटात काय काय
हायला मस्तच. ताटात काय काय आहे?
मला खिमा फक्त नी फक्त ऑलिम्पियाचाच आवडतो.
धन्स रश्मी ताई...... ताटात
धन्स रश्मी ताई......
ताटात भात, भाकरी, कांदा, काकडी, सुकटीची चटणी, वाटीत मटणाचा रस्सा, डीशमध्ये खिमा आणि डाळ................
ताट बघुन गावची आठवण येतेय
ताट बघुन गावची आठवण येतेय
मटण खिमा बरोबर वरण भात काँबो,
मटण खिमा बरोबर वरण भात काँबो, पहिल्यांदाच पाहतोय
मटण खिमा बरोबर वरण भात काँबो,
मटण खिमा बरोबर वरण भात काँबो, पहिल्यांदाच पाहतोय <<< ते आपलं असंच, मी मट्णाच कालवण खात नाही म्हणुन फक्त माझ्यासाठीच....
ओ ताई ते मी असंच लिवलंय वो
ओ ताई ते मी असंच लिवलंय वो
द्यायचं राहिलं त्या पोस्टीत
ओके......... आणि ताई नका
ओके......... आणि ताई नका म्हणु ओ. प्लिझच.
मस्त लिहिलीय कृती..!
मस्त लिहिलीय कृती..!
सहिच, पण शाकाहारी असल्याने
सहिच,
पण शाकाहारी असल्याने हिच रेसिपी वापरुन 'मटण खिमा' ऐवजी 'पनिर खिमा' टाकून करुन पाहिन.
छान रेसिपी ! [ एखाद-दुसरी
छान रेसिपी !
[ एखाद-दुसरी लवंग व वर अख्खी हिरवी मिरची चालेल का ट्राय केली तर !]
जा आणि गुपचूप वरण-भात ठेवलाय तो जेवा ! मुद्दाम रेसिपिनुसार खिमा केला,
तर म्हणे, " पण ताट त्या फोटोतल्यासारखं कां नाही ?" !!
छान दिसतंय ताट भाऊ
छान दिसतंय ताट
भाऊ
प्रसाद, मी हाच विचार करत
प्रसाद, मी हाच विचार करत होतो. फक्त पनीर ऐवजी सोयाबीन खिमा किंवा भाजून स्मॅश केलेले वांगे.
रच्याकने मटन मसाला पण नॉन्वेज असतो का ?
भाऊ काका मस्त चित्र..... मटण
भाऊ काका मस्त चित्र.....
मटण मसाला नॉनवेज नसतो.......
धन्स स्वरा !
धन्स स्वरा !
<< पण शाकाहारी असल्याने हिच
<< पण शाकाहारी असल्याने हिच रेसिपी वापरुन 'मटण खिमा' ऐवजी 'पनिर खिमा' टाकून करुन पाहिन.>> खुशाल करून पहा. पण तुमचं बघून आम्ही कांहीं पापलेटला जीरं- मोहरीची फोडणी किंवा ताकातली कोलंबी असं कांहीं मात्र नाहीं करणार !!!
भाऊ चित्र आणि कमेंट
भाऊ चित्र आणि कमेंट
अॅक्च्युअली मी सर्वात पहिल्यांदा पापलेट्ला चुकून मोहरीची फोडणी दिली होती. मग काहीतरी वेगळं दिसतंय आणि लागतंय हे लक्षात आल्यावर आईकडून खुलासा करून घेतला. ताकातली कोलंबी
ओके रेसिपीबद्द्ल, छान आहे फोटो. मी खिमा वेगळा शिजवा वगैरे लाड करत नाही. सरळ कांदा टॉ वगैरे मसाला तळलयावर त्यावर खिमा परतवून झाकण घालून शिजवायचा. तसंही खिमा असल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही.
ताट एकदम तोंपासू दिसतंय. भाऊ
ताट एकदम तोंपासू दिसतंय.
भाऊ ....
मस्त दिसतंय ताट.
मस्त दिसतंय ताट.
धन्स सर्वांना.........
धन्स सर्वांना.........
स्वरा, छान आहे रेसिपी मुलांना
स्वरा, छान आहे रेसिपी मुलांना करुन खाऊ घालणार.
स्वरा, मस्तच दिसतोय खिमा आणि
स्वरा, मस्तच दिसतोय खिमा आणि ताटही.
मी एकदा चिकन खिमा केलेला पण मला तो खाताना रबरासारखा वाटत होता तेव्हापासुन जरा धसकाच घेतलाय खिम्याचा.
मटण खिमा बरोबर वरण भात काँबो, पहिल्यांदाच पाहतोय <<<<<<< आमच्याकडे या आमच्याकडे बारा महिने दोन्ही वेळेस वरण असतेच मगते बिना फोडणीचे का असेना.:फिदी:
माझ्या साबा, साबु आणि नवर्याला मटण, चिकन, मासे, सुकी मच्छी असो वा कोणतीही रस्साभाजी असो अगदी पावभाजी असेल तरी वरण भात लागतोच
तुम्ही कधी भातावर चिकन/मटणचा
तुम्ही कधी भातावर चिकन/मटणचा रस्सा + वरण खाल्लं नाही का? रस्सा खुप तिखट झालाय किंवा पुरवठ्याला कमी पडणार असेल तर अनेक वेळा खाल्लंय. मस्त लागतं. त्या मुळे मला तरी ताट कसं परिपूर्ण वाटतंय.
खिमा वेगळा शिजवा वगैरे लाड करत नाही. सरळ कांदा टॉ वगैरे मसाला तळलयावर त्यावर खिमा परतवून झाकण घालून शिजवायचा. >>+१
भाऊ, ते नारंगी रंगाच्या
भाऊ, ते नारंगी रंगाच्या सदर्यातली असामी म्हणजे कुणी नमसकर आहेत का? आमच्या ओळखीतले.? बिच्यार्याना प्रत्येक कार्टूनमध्ये ओरडाच खावा लागतोय....
व्हेज खिमा पण मिळतो की हॉटेल
व्हेज खिमा पण मिळतो की हॉटेल मध्ये... फार विशेष काही करावे लागणार नाही... सगळ्या भाज्या खिमा करताना मटण/चिकण जसे बारीक कापून तुकडे करुन घेतात तश्याच बारिक करुन घ्यायच्या..
सरळ कांदा टॉ वगैरे मसाला
सरळ कांदा टॉ वगैरे मसाला तळलयावर त्यावर खिमा परतवून झाकण घालून शिजवायचा. >>> + १० मी ही असच करते.
लाल तिखटापेक्षा हिरव्या मिरचीचा खिमा जास्त खमंग लागतो.
छान फोटो स्वरा