सर्वात चांगला रोटी मेकर सुचवा

Submitted by कूटस्थ on 2 May, 2016 - 09:31

अमेरिकेत राहून विकतच्या पोळ्या खाउन कंटाळा आलाय. माझ्यासारख्या bachelor मुलांसाठी घरच्या घरी उत्तम रोटी बनवून देणारा एखादा automatic रोटी मेकर आहे का? तो कणकेचे गोळे ठेवून दाबतंत्राचा वापर करून रोटी बनवणारा रोटी मेकर नको. कणीक मळून त्याचे गोळे करून रोटी मेकर मध्ये ठेवल्यावर दाब देवून रोटी बनवण्याचे यंत्र वापरून झालेय. त्याहीपेक्षा automatic असेल तर उत्तम.
तो Rotimatic चा रोटी मेकर पाहिला जाहिरातीत. अजूनही बाजारात आलेला नाहीये आणि त्याची waiting list पण ३५ लाखात पोहोचली आहे.
याक्षणी तो option बाजूला ठेवून एखादा automatic किंवा semi-automatic रोटी मेकर आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णा ब्रॅन्डच्या रेफ्रिजरेटेड होल व्हीट पोळ्या (फ्रोझन नव्हे) >> ++१११ . फार सोप्पे काम होते त्या पोळ्या घरात असल्या की.
krishna whole wheat roti असा इमेज सर्च करा. म्हणजे कळेल कोणत्या ते.

@ कुटस्थ, मी गेली ६ वर्ष टॉर्टिला कंपनीचा रोटी मेकर वापरतेय. पोळ्या करण्यासाठी कणिक थोडी सैल मळावी लागते. आणि ही कणिक लगेच वापरुन संपवावी. रोटी मेकर आणि तव्यावरील पोळी करण्याचं तंत्र पुर्णपणे वेगळं आहे, त्यामुळे तव्यावरच्या पोळीची सर रोटी मेकरच्या पोळीला नाही, हे आधीच स्पष्ट करते. पण या पोळ्या करुन लगेच खायच्या असतील तर चांगल्या लागतात. कणकेचा गोळा किती मोठा घ्यायचा, पोळी कधी उलटायची या गोष्टी सरावाने जमतील. मी रोज ऑफिसला याच पोळया घेऊन जाते.
आता मी त्यात एक प्रयोग केला आहे. मी फक्त रोटी मेकर वर कणकेचा गोळा ठेऊन पोळी लाटून घेते. मग ती पसरलेली पोळी तव्यावर नेहमीच्या पद्धतीनं भाजते. अशा पद्धतीनं केलेल्या पोळ्या अधिक चांगल्या होतात.
या रोटीमेकरवर डोसे, उत्तपे, टॉमेटो ऑम्लेट, थालीपीठही करते. खूप वेळ वाचतो. तेलही कमी लागते.निवला की टिशू ने पुसते.

रोटी मेकर वाप्रून चांगल्या पोळ्या करु शकणार्‍या व्यक्तींबद्दल मला विशेष आदर आहे. Happy
९९.९९% माणसे रो मे ला शिव्या घालतात.

माझ्याकडेही हा टोर्टिलाचा रोटीमेकर आहे. तो कसा वापरायचा हे तंत्र एकदा शिकुन घेतले की अगदी व्यवस्थित पोळ्या होतात, डब्यात घेऊनही जाता येतात. फक्त त्याचे तंत्र शिकावे लागते, दाब किती द्यावा हे शिकावे लागते, नाहीतर सगळे ऑमफस.... आणि टॉर्टिला वाले घरी येऊन शिकवतात.

मी अमी, शिव्या घालतात कारण कसे वापरावे कळत नाही. मी सुद्धा चुकीच्या पद्धतीने वापरुन शिव्या घालत होते. दोन तिनदा करताना नीट पाहिले तेव्हा कळले तंत्र. पिठ नहमीपेक्षा थोडे सैल भिजवावे, प्रेस केल्यावर रोमे उघडुन चपाती उलटायची आणि उलटलेली चपाती नीट तव्यावर जशी शेकतो तशीच त्या रोमेवरही शेकायची. नंतर ती परत उलटाअयची आणि मगच रोमेचा वरचा पार्ट बंद करायचा, मग चपाती फुगुन येते. मला जेव्हा हे माहित नव्हते तेव्हा मी चपाती प्रेस करायचे आणि उलटुन परत वरचा पार्ट बंद करायचे. त्यामुळॅ चपाती पापडासारखी कडक व्ह्यायची. मला त्या बाब्याने जसे तंत्र दाखवले तसे केले तर कुठल्याही रोमेवर चपात्या चांगल्या होतील असे मला तरी वाटते.

हाताने केलेल्या चपात्यांची सर रोटीला येणार नाही, पण जर हाताने नीट करता येत नसतील तर काय करणार? मी हाताने करते तेव्हा मला नीट सगळीकडे सारखाच दाब देऊन लाटता येत नाही. मला टॉर्टिलाच्या चपात्या त्या मानाने ब-या वाटतत कारण सगळीकडे एकसारखी जाडी येते. आणि खरेच सांङते, तंत्र जमले की खुप मऊसुत, सुगरणीने केल्यासारख्या होतात चपात्या. वाशीच्या बीग बजारात एक कायमचा स्टॉल आहे याचा. मी तिथे जाऊन जाऊन निरिक्षण करत राहिले आणि शिकले. तो बाबा त्याच्या चपात्या तिथल्या स्टाफला विकतो. मी त्याने आधी करुन ठेवलेल्यापैकी एक चपाती खाऊनही बघितलेली. Happy मला अजुन तेवढ्या सुंदर जमत नाहीत. Happy

http://tortillaindia.com/information.php?info_id=21

याहीपेक्षा चांगले पापड लाटायचं मशीन वापरून पाहा
यात दोन प्लास्टिक पेपरमध्ये पापडाची लाटी ठेवतात वरती खरोखरचा रोलर फिरून दोन सेकंदांत पापड होतो. रोटिमेकरमध्ये कणिक फक्त दाबली जिते.
पोळ्याच्या मशीनात चार एमेम जाड रोडगा पंजाबी श्टाइल मैद्याचा होतो तो आपण खाऊ शकत नाही.पंजाबी लोक घडीच्या पोळ्या खायला बसले तर शंभर लागतील.

आपल्याला रोटि मेकर घ्यायचा आहे असे दिसते. पण माझा अनुभव वाईट आहे. मी अडिच ते तीन
हजार रुपये त्यात घालवुन बसलो आहे. घेतलेल्या रोटी मेकर पेक्षा हाताने बनवलेल्या पोळ्य फारच छान लागतात आणि लागतही होत्या. तुम्हाला पैसे घालवायचे असतील तर अवश्य घालवा. त्या फुगलेल्या पोळ्या फक्त
टीव्ही चॅनेलवर बघण्यातच गंमत आहे. आपल्यासारखी मी जर आधी मायबोलीवर चौकशी केली असती तर माझे पसे फुकट गेले नसते.

रोटीमेकर सध्याचे बाजारातले पण "कणिक टाका, दाबा आणि पोळी तयार" असे जादूचे नाहीत.त्यातही पोळी एका बाजूने थोडी शेकून उलटून दुसर्‍या बाजूने शेकून मग तो बंद करुन फूटबॉल बाहेर येतो.
कणिक मळणे,पोळी एकदा टाकणे,मग उलटणे इतके व्याप वाचत नसतील आणि तरीही जाड पोळ्या मिळत असतील तर त्यापेक्षा पोळ्या लाटणे आणि साध्या तव्यावर भाजणे शिका, थोड्या चांगल्या मिळतील.
पोळ्या लाटणे भाजणे कंटाळवाणे होत असल्यास कणकेची धिरडी सदृष कणकेचा डोसा रेसिपी आहे ती नॉनस्टिक वर करत जा..
http://www.manogat.com/node/7578
आम्हाला पोळ्यांचा किंवा पोळ्यांना इतर काही करण्याचा कंटाळा आला तर हे करतो.

मिरिंडा, तुम्ही मी दिलेल्या लिण्कप्रमाणे पोळ्या करता का ते पाहा. मीही तुमच्याप्रमाणेच निष्कर्ष काढलेला पण २२०० रुपये दिलेले म्हणुन चिकाटी सोडली नाही. रोमेत सुरवातीला माझ्या खुप पोळ्या फाटक्या आणि वातड झालेल्या आहेत. रोमे इतक्या जोरात प्रेस करायचे की पोळी तिथेच तुकड्यात भाजुन निघायची Happy आता थोड्याफार जमतात. इतके पैसे घातलेत तर चिकाटी अज्जाबात सोडायची नाही. Happy

सोपे काहीच नाही, पण रोटीमेकरमध्ये पोळी लाटणे वाचते. Happy हात नीट बसला की पोळी व्यवस्थित गोलही होते.

रच्याकने, याचा उप्योग करुन पापड मस्त भाजले जातात, अगदी पातळ खाकरेही छान बनतात.

रोटीमेकर सध्याचे बाजारातले पण "कणिक टाका, दाबा आणि पोळी तयार" असे जादूचे नाहीत

ही जादु फक्त सिंगापोरवाली बाईचे मशिन करणार आहे. फक्त त्याची किंमत ऐकुन आपण पोळी खायचे सोडून देऊ. Happy

>>आता थोड्याफार जमतात. इतके पैसे घातलेत तर चिकाटी अज्जाबात सोडायची नाही.
कणिक किती चिकट असावी त्या साठी ? Happy

रच्याकने, ती सिंगापोरवाली (छे सिंगापूरच बरे वाटत आहे नाव) बाई मराठी आहे बर का, नगरकर !!!

त्या सिंगापूर बाई चे मशिन २ वर्षापूर्वी येणार होते ना? आले का? कोणी विकत घेतले का?
खरंच 'पीठ टाका आणि पोळी तयार' असे असेल तर महाग असले तरी घेऊ.

Pages