नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते राहु देत. पण श्या. सेल्फ स्टार्ट देऊन एन्फिल्ड वाल्यांनी कचराच केला राव. आता पोरीबाळी बुलेटा फिरवाया लागतील.

बुलेटच अजुन किती अवमुल्यन करणारे देव जाणे.
Sad

वय झाले तरी परिपक्व होत नसलेल्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे.
>>

तुम्हालापण कोण अडवतंय? ठोका केस.

तात्या ज्जे बात ! Happy
कमी वयात वाहन चालविणे हा दंडनिय अपराध आहे, पण जास्त वयात अपरिपक्व असणे हा अपराध / गुन्हा नाही. Wink

तात्या, कायदेशीर कारवाई ची एकच पोस्ट आगाऊ सल्ला देण्याजोगी वाटलेली दिसते. टुण्टुणीत व्हायचे ना तुम्हाला ?

येरवडा, ठाणे आणि आग्रा येथे सरकारी खर्चाने विश्रामगृह चालविण्यात येतात. गरजूंची नावे कळविली की विश्राम सेवक येउन घेउन जातात.

एकाला एखादी गोष्ट कळत नाही हे समजू शकते, पण दोघांना तीच गोष्ट समजत नाही हे काही समजत नाही असे मास्तर म्हणत.

9821080522. नितिन गडकरी यांचा भ्रमणध्वनी क्रमांक

महेश राव करा तक्रार. नुसते तोंडाने बोलू नका. कृती करून दाखवा पाहू.

हा सुर्य हा जयद्रथ. घा बरं वेध Wink

मायबाप,

माझे काय आयडी शोधायच्या फंदात पडु नकोस! हा सोडला तं ईतर कोणताही सापडणार नाहीच Wink
(येकवेळ देव सापडेल पण माह्या दुसरा आयडी नैच सापडणार ... Proud )

तुम्हीच करा आणि दाखवून द्या की तुम्हाला कायदे मान्य आहेत.
तुमच्या कोणत्याही आव्हानाला मी बळी पडणार नाही. Happy

बळी? क्षत्रीय हे मरण पावलेल्यांना ठार करत नाही Wink
नुसते तोंडात दम आहे तुमच्या. हिम्मत असेल तर चित्रपटात अमुक तमुक दाखवले कारवाई करा म्हणून तक्रार तर करुन दाखवा. डायरेक्ट ईमेल देऊ. नाही म्हणजे फोन करायला हिम्मत होत नसेल तर इमेल करा. Biggrin

Lol केवढी ती तगमग !
तुमच्या सांगण्यावरून आम्ही काही का करावे ? Wink
असो, जास्त त्रास करून घेऊ नका. बीपी वाढेल.

किमान तुम्ही नुसत्याच "फुशारक्या" मारणारे आहे हे कळले.
थोड्या कमी मारत जावा. तब्येतीला चांगले असते.

जाग्यावर पलटी. मारली ? Rofl

सस्मित "कायदेशीर कारवाई व्हावी" म्हणणार्‍यांना संबंधित व्यक्तींचे फोन नंबर दिले.
मग कळले हे तर निव्वळ बोलबच्चन निघाले.

सस्मित,
यांचा फालतू अरेरावीपणा चालू आहे आणि स्वतः किती योग्य आहे ते दाखविण्याची धडपड.
माझ्याकडून नो मोअर प्रतिसाद.

तेच रसप
बिपिन चंद्र आणि महेश यांनीच विषयांतर मुद्दामुन केले.

चला रे सगळे चित्रपटाबद्दल बोला. या लोकांनी कितीही विषयांतर केले तर इग्नोर करा Happy

रसप, माफ करा पण एकतर या माबासारखे आयडी संघटीत अरेरावी करत फिरत आहेत आणि बदनामी मात्र आमची करत आहेत. संयमित काही लिहिताच येत नाही. यामुळे तुमच्या धाग्यावर गोंधळ माजला होता.
मी प्रतिसाद लिहिणार नव्हतो पण यांचा स्वतः चांगले आणि इतर वाईट हा अ‍ॅजेन्डा कधीच कुठेच संपतच नाहीये. भाषेवरून पण लक्षात येत असेलच.
असो, हा.मा.शे.प्र.

महेश थोडीतरी बाळगा
एक तर सुरुवात तुम्ही आणि बिपिनचंद्र यांनी केली त्याला केस करा म्हणून तात्या बोलले मी तुम्हाला गडकरींचा नंबर दिला फक्त
त्यानंतर तुम्हीच गोंधळ घातला प्रतिसाद निट वाचा. मग बोला. करून सवरून नंतर कातडीबचाव धोरण तुमचे पुर्वीपासून आहे.

रसप तुमचे पण परीक्षण छान आहे. पण मला वाटत की नागराज मंजुळे कडुन तुम्ही जी अपेक्षा ठेवताय ती वेगळी आहे. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की नागराज हा ( सॉरी एकेरी उल्लेखाबद्दल) नसीरुद्दीन शहा आहे, आणी त्याने या वेळेस उत्तम दर्जाची आर्ट फिल्म ( उदा. स्पर्श, आक्रोश वगैरे) करण्याऐवजी चक्क त्रिदेव मध्ये जान ओतली आहे?

Pages