त्या पांढर्याशुभ्र धुक्यातुन वाट काढताना मनाच्या पटलावर आनंदाची झुळुक उमटत होती. थंडगार वातावरणात मेघातुन बरसणार्या धारा अंग अंग रोमांचित करत होत्या. सर्व परिसर हिरवागार होता. सौदर्याला हापापलेले डोळे ते विलोभनीय दृश्य अधाश्यासारखे टिपुन घेत होते.लांब कुठेतरी कोसळणारा धबधबा मनाला आकर्षित करत होता.
ऐनवेळी पाण्याचा शिडकावा जरी अंगावर झाला तरी पाय निवार्याकडे धाव घ्यायचे, पण आजची गोष्टच निराळी होती.मेघातून अंगावर बरसणाऱ्या धारा अपुर्याच वाटायच्या.मनाची एकच इच्छा होती ' बरस,कोसळ मेघराजा आज माझी तहान काही भागायची नाही.'
पावसाच्या ठेंबानी झाडाच्या पानावर पडून तयार होणार्या संगीताला झर्यातील झुळझुळ पाण्याची साथ मिळाल्याने एक वेगळीच लय बनत होती.
माझ्या सभोवताली होते ते फक्त पाण्याचे साम्राज्य.मेघातून बेभान बरसणारे, झर्यातून झुळझुळणारे , उंच धबधब्यातून कोसळणारे,दूरवर त्या जलाशयात विसावलेले फक्त पाणी आणि पाणीच.
क्षणभर वाटले व्हावे आपणही पाणी. बरसावे गर्जत त्या काळ्याकुट मेघातून या झाडांच्या इवल्याश्या पानावर,त्यावरून निसटून पडाव खळखळणार्या झर्यात आणि जाव वाहत होऊन सैरभैर,नंतर कोसळाव उंच त्या धबधब्यावरून आणि व्हावा त्या विसावलेल्या जलाशयाचा एक थेंब कशाचीही भीती, कशाचीही हाव नसलेला आणि प्रत्तेक सजीवाचे जीवन असणारा एक थेंब.
एक थेंब.
Submitted by अभिजित चोथे on 22 August, 2015 - 12:02
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलय. शुद्धलेखनाकडे
छान लिहिलय.
शुद्धलेखनाकडे जरा लक्ष द्या.
Thanks for suggestion but I
Thanks for suggestion but I think its font problem.
.
.
लोणावळ्यातील अनुभव आहे.
लोणावळ्यातील अनुभव आहे.