Submitted by चैत्रगंधा on 2 May, 2014 - 07:28
गोदरेजचा ७ वर्षापूर्वी घेतलेला डबलडोअर फ्रिज निकालात निघाला आहे. डबलडोअर फ्रिजच्या किंमती ३०-४०,००० रेंज मध्ये असल्याने जो घेऊ तो टिकणारा हवाय. सद्ध्या सॅमसंग/ L.G. जास्त चालतात असे ऐकून आहे.
प्लिज सुचवा. Whirlpool बद्दल काय मत आहे?
असा कुठला धागा असेल तर प्लिज लिंक द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठल्याही रेप्युटेड
कुठल्याही रेप्युटेड ब्रॅन्डचा घ्यावा . अर्थात इन्डिविजुएल पीस कसा लागतो त्याव्रच खरे अवलम्बून आहे.काही पीसेस आणल्यापासून कटकटी सुरू करतात आणि भयंकर मनस्ताप देतात. त्यात सर्वच कंपन्यांची अफ्टर सेल सेवा भिकारच आहे. शक्यतो त्याचा 'लाभ'घेण्याची वेळ येउ नये हा नशीबाचा भाग असतो. काही २०-२० वर्शे काहीही त्रास देत नाहीत.
५ स्टार रेटींगच्या फ्रिजने
५ स्टार रेटींगच्या फ्रिजने वीजबिलात खरंच फरक पडतो का? साबांकडचा फ्रिज ५ स्टारवाला आहे, पण बिलात किती फरक पडतो कळत नाही कारण अगोदर किती बिल येत असे आणि फ्रिज कोणत्या कंपनीचा होता माहिती नाही. ५ स्टार + फ्रॉस्ट फ्री फक्त डबरडोअर दिसतायत, ३०-४०००० च्या रेंजमधे.
प्र तुझ्य रिक्वायरमेंटला
प्र तुझ्य रिक्वायरमेंटला सुटेबल फ्रीज कोणत्याही कंपनीचा २५० लीटर पर्यंतचा पुरेसा आहे. सॅमसंग, एलजी सिंगल डोअर चांगले आहेत. डबल डोअर मधे कारण नसता डीपफ्रिझरचा भाग फार मोठा वाटतो.. आणि त्यात तसे पहायला गेलो तर फार काही सामान ठेवले जात नाही..
फार वापर नसणारे सध्या तर
फार वापर नसणारे सध्या तर इकोफ्रेन्डली मिट्टीकूल घे.
http://www.mitticool.in/Mitti-Cool-Refrigerator.php
एक मीडीअम व एक अगदी बारका
एक मीडीअम व एक अगदी बारका कयूब असा फ्रीज पण घेता येइल. बारका बेडरुम मध्ये ठेवायचा. त्यात द्राक्षे, आपली आवडती सॉफ्ट ड्रिंक्स व चॉकोलेट्स, पेस्ट्री ठेवायची. हवी असतील तर दोन बीअरचे कॅनां. म्हणजे बेडरूम मध्ये आराम करताना किंवा झोपेत उठून किचन परेन्त जावे लागत नाही. चिमणीचे दूध ठेवता येइल. फ्रिज वर एक चॉकोजचे पाकीट असले म्हणजे ब्रेकफास्ट इन बेड. लै भारी. नेट फ्लिक्स मॅरेथॉन किंवा सीरीअल बिंज वॉच करताना उपयोगी पडते.
मीडिअम फ्रिज किचन मध्ये कामासाठी.
आजकाल फ्रिज कोणीच बंद करत नाहीत बहुतेक. तसे देखील अजून पाच वर्शे काय गरजा वाढतील त्याचा हिशेब करून घ्या. आज मानो कमी आहेत. पण पुढे वाढतील. लेकीसाठी स्नॅक्स, सलाड ज्यूसेस बनवून ठेवू लागेल. तिला शाळेतून आल्यावर घेता येइल असे.
गोदरेज. एल जी, हायर चे चांगले आहेत फ्रिज. पण फ्रिज मध्ये आत जायचे नाही हे तिला शिकवावे लागेल. लपून बसली म्हणजे हाइट आहे.
आता जरी तुम्हाला तितकई गरज
आता जरी तुम्हाला तितकई गरज वाटत नसली तरी माझं मत डबल डोअरलाच. फ्रीजमधे कितीही जागा असली तरी कमीच पडते असं मला वाटतं.
Whirlpool घेतला मस्त आहे.
Whirlpool घेतला मस्त आहे. coolling फास्ट आहे
प्रज्ञा तुझ्या रिक्वायरमेंटला
प्रज्ञा तुझ्या रिक्वायरमेंटला सुटेबल फ्रीज मी सध्या वापरत आहे.
Godrej Edge Pro २२० L Grey color, single door, outer wiring मी २०१३ मध्ये घेतला, तेव्हा किंमत १८ ह. होती. ५ स्टार रेटिंग आहे.
स्टॅबिलायझर फ्री आहे पण तीन वर्षात एकदा वोल्टेज फ्लक्चुएशनमुळे कॉम्प्रेसर जवळचा फ्युज टाइप पार्ट उडाला, वॉरन्टी मधे असल्याने कंपनीचा माणुस फ्री पार्ट व सर्विस देउन गेला. (पार्टची किंमत ३०० रु. आहे असे त्याने सांगितले) त्याच्या सल्ल्यानुसार आता स्टॅबिलायझर वापरत आहोत. फ्रिजमुळे बिलात फक्त २००-२५० ची वाढ झाली. २-३ माणसांच्या कुटुंबाला बरोब्बर पुरतो, पटकन धुताही येतो.
अजून तरी तो फ्युज सोडून बाकी काहीही प्रॉब्लेम आला नाही. So happy with it!
पिठं-मैदे-पोहे-रवे फ्रिजात
पिठं-मैदे-पोहे-रवे फ्रिजात ठेवायला बिग नो नो >>> का? सहज उत्सुकतेपोटी विचारतेय.
सिंडे, हे अनुभव एका
सिंडे, हे अनुभव एका मैत्रिणीकडे घेतले आहेत. थोडं असंय की मी फारफार गृ.कृ.द. नाही. वेळोवेळी फ्रिज उघडा, काय आहे-नाही बघा, मागचं पुढे काढा, उरलेलं कहर शिळं झालं की मग कशाततरी ढकला किंवा फेकून द्या... हे सगळं मला जमत नाही/पटत नाही/ आवडत नाही. मी कुठलीही गोष्ट वेळीच नाही आवरली की तश्शी पडून रहाते. रवा वगैरे या क्याटेग्रीत नक्की जातील जर मी ते फ्रिजात ठेवले तर.
ज्येना असं करतात ते बघून तिडीक गेलिये डोक्यात हे अजून एक खरं कारण. अनेक महिने जुनं गूळपोळीचं सारण, दगड झालेलं उकडीच्या मोदकांचं सारण असे पदार्थ महिनोनमहिने बघितलेत फ्रिजात. रोज आमटी-भाजीत घालून संपवयचा पर्याय कुणालाही पटला नाही. गुपो/ मोदक वगैरेच करू म्हणून ते माझ्याच गळ्यात पडलं... दूधपोहे खायला म्हणून भिजवलेले पोहेपण खपले नाहीत तर तो लगदा २ दिवस फ्रिजातच. आय नो हे फार कोतबो आहे, पण मी फार धसका घेतला याचा म्हणून मीच ठरवलं हे. माझी शिस्त बिघडेल.
बर्बर. मला वाटलं काही
बर्बर. मला वाटलं काही अपायकारक आहे की काय. तुझं चालू देत.
फ्रिजचं स्टार रेटिंग हे
फ्रिजचं स्टार रेटिंग हे वर्षभर फ्रिज 'रिकामा' ठेवून चालू ठेवला तर किती युनिट्स खातं त्यावर ठरतं, त्यामुळे त्याला फारसं वेटेज देऊ नका असं काल आम्हाला विजय सेल्समधे सांगितलं.
सध्याचा आमचा फ्रिज सिंगल डोअर आहे, पण डीप फिजमधे बर्फ साठतोच. तसंच तिकडे लोणी चांगलं राहतं पण आईसक्रिम वितळतं.
आम्ही काल गोदरेज एऑन डबल डोअर बघून आलोय, २५० लिटर. आवडला आहे, बहुतेक घेऊन टाकू.
मला फ्रिज अगदी प्राथमिक गरजांसाठीच लागतो, त्यात प्रामुख्याने दूध, दही, ताक, लोणी, ओलं खोबरं, पाणी, बर्फ, एखाद-दोन दिवसाच्या कच्च्या भाज्या, सकाळी शिजवलेली भाजी, वरण, गार करण्यासाठी ठेवलेली फळं, इत्यांदीसाठीच लागतो. फ्रिजमधे साठवण करू नये अश्या मताला मी येऊन पोचले आहे. म्हणजे पोहे, रवा, पीठं वगैरे कधीच नसायची, आणि आता लोणची/ मुरांब्यांचा स्टॉकही नसतो. सीझनमध्ये केलं तरी फारतर एखाद महिना पुरेक एवढंच केलं जातं, नंतर खायची आठवणही नसते कोणाला.
डी, हे एनर्जी रेटिंग
डी, हे एनर्जी रेटिंग सांगितल्याबद्दल आभार हो!
आम्ही जवळच्या दुकानात जाऊन आलो. डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवाला फ्रिज सध्या बेस्ट आहे म्हणाले तिथले लोक. सॅमसंग. वीकेंडला जास्त वेळ न मिळल्यामुळे आता येत्या वीकेंडला पुन्हा जाऊ. तोवर डीसिजन झालेला नसेलच
आम्ही मारे दुकानांमधे फिरून
आम्ही मारे दुकानांमधे फिरून कंपॅरिझन केली, मॉडेल ऑलमॉस्ट फायनल केलं. ओएलेक्ष वर टाकायचा म्हणून जुना ( १९० लि.) रिकामा करून साफसूफ केला. मग वाटायला लागले, भरपूर सामान मावते आहे की यात. आणि फ्रीजला काहीही झालेले नाही. फक्त फ्रीजर मोठा आणि जागा जराशीच जास्त यासाठी कशाला नवा फ्रीज घ्यायचा? हा खराब वगैरे झाला तर तेव्हा घेऊ.
आमचा Whirlpool आहे, double
आमचा Whirlpool आहे, double door गेली जवळपास दहा वर्षे वापर्तोय चांग्ला चालु आहे
Freezer मध्ये आम्ही सर्व कडधान्ये, डाळी व. ठेवतो, खुप छान टीकतात अगदी वर्षभर सुद्धा
फ्रीज कुठला घ्यावा हा धागा
फ्रीज कुठला घ्यावा हा धागा रोज दिसतो. नवीन वर क्लिक पण केलं जातं.
पण फ्रीज अमूक कंपनीचा घ्या असं खात्रीने सांगण्याचा जमाना आता गेला. वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाजारात मोजके ब्रॅण्ड्स असत. तंत्रज्ञान स्वतःचं असं नव्हतंच. बहुतेक टीव्ही, फ्रीज हे असेंबल्ड असायचे. त्या काळात स्वतःचा काँप्रेसर असणारी आणि तो निर्यात करणारी कंपनी म्हणून केल्व्हिनेटर प्रसिद्ध होती. हा काँप्रेसर खरोखर उत्कृष्ट होता. त्याखालोखाल व्होल्टास होती. गोदरेज नंतर या क्षेत्रात शिरले. त्यांच्या फ्रीजला सुरुवातीला कुठला काँप्रेसर होता ते लक्षात नाही, पण त्या ब्रॅण्डबद्दल लोकांचं मत तितकंसं चांगलं नव्हतं. अल्विन नावाचा एक रेफ्रिजरेटर होता. बाकीचे रेफ्रिजरेटरच्या तक्रारी असत. त्यामुळे हा घेऊ नका, तो घेऊ नका असं ऐकू यायचं.
आता फ्रीजचं तंत्रज्ञान ही नवलाईची गोष्ट राहीलेली नाही. त्यातून परदेशी कंपन्यांचे फ्रीज सहज उपलब्ध होतात. यातल्या जव्ळजवळ सर्वच कंपन्यांची उत्पादने चांगली आहेत.
आपण एकदा एक फ्रीज घेतला की दुस-या कंपनीच्या फ्रीजची माहिती फारशी आपल्याकडे नसते. सर्व्हे होतात. पण या सर्व्हेंवर एखाद्या कंपनीला वाईट न म्हणण्याचं पथ्य पाळण्याचं बंधन असणार. त्यामुळे ते कितपत विश्वासार्ह हे सांगता येत नाही. त्यामुळे लोकांना वाईट अनुभव आले असतील तर तो पर्याय बाद करणे हा एकमेव पर्याय सिलेक्शन करताना राहतो.
व्हर्लपूल कंपनी सुरूवातीला बाजारात आली तेव्हां केल्व्हिनेटर कंपनी खरेदी केलीय आणि केल्व्हिनेटरचा फ्रीज व्हर्लपूल या नावाने मिळतो या अफवेमुळे प्रसिद्ध झाली. कंपनीने बंद पडलेल्या एका कारखान्यात आपली उत्पादने सुरू केली, ती अतिशय वाईट होती. मला केल्व्हिनेटरच हवा होता, पण त्या काळात जंग जंग पछाडूनही मिलाला नाही. कंपनीत संप होता बहुतेक. अफवेला बळी पडून व्हर्लपूल घेतला पण त्याने खूप त्रास दिला. त्या वेळच्या बहतेक ग्राहकांना हा अनुभव आला होता. त्यानंतर व्हर्लपूलचा फ्रीज घ्यायचाच नाही हे ठरवून टाकलं.
सॅमसंगचे दोन फ्रीज घेतले. दोन्ही चांगले चालले आहेत. त्यांचा काँप्रेसर पाहिला होता. त्याचे टेस्ट रिपोर्ट्स डीलरला मागवायला लावले होते. खूप प्रॉडक्ट्स तुलना करून पहायला वेळ नव्हता. समाधान झाल्यावर तोच सिलेक्ट केला होता.
व्हर्लपूलचा अनुभव चांगला
व्हर्लपूलचा अनुभव चांगला नाही. सध्या सॅमसंग आहे. तो चांगला आहे. त्यात दिजिटल कन्व्हर्टर अशी काहितरी टेक्नोलॉजी आहे.
मी रवा, डाळी, पीठ कधीच ठेवत
मी रवा, डाळी, पीठ कधीच ठेवत नाही. ठेवलं नाही. सगळं पारंपारीक आईच्या पध्धतीप्रमाणे स्टीलच्या डब्यांमधेच.
कारण फक्त एक महिन्याला पुरेल एवढंच सामान भरते एकाच वेळेस. त्यामुळे ते महिनाभरात संपतं आणि खराब होण्याचा प्रश्न येत नाही.
फ्रीजात दुध, दही, २-४ भाज्या, टोमॅटो, एक कोथिंबीरीचा डबा, एक कडीपत्त्यचा डबा, एक हिरवी मिरचीचा डबा, अंडी, बटर, लोणचं - सॉस - जाम च्या बाटल्या, पावभाजी-बिर्याणी इ. मसाले, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, कापुन गार करुन खायची असतील ती फळे, थोडी चॉकलेटं आणि मुलांनी आणलेली फ्रुटी, फान्टा वैगेरे हे खालच्या भागात. भर म्हणुन मी केलेले काही स्पेशल पदार्थ. जसे गुजा, खीर वैगेरे,
आणि बर्फ आणि दर दोन दिवसा आड आइस्क्रीम (हो. दोन दिवसा आड आइसक्रीम असतेच घरी.) हे डीप फ्रीजात. ह्यातच माझं २५० लीटरचं फ्रीज भरुन जातंय.
तुम्ही लोक साठवणीचं सामान कुठे ठेवता लोक्स? ते ही डाळी वैगेरे. मग शिजवताना त्या डाळी लगेच शिजतात का?
सॉस वगलता सस्मित,मी ही तसेच
सॉस वगलता सस्मित,मी ही तसेच करते.फक्त मटकी,मूग,मैदा फ्रीजमधे ठेवते.तरीही फ्रीज अपुरा वाटतो.
सद्ध्या घरी whripool चा आहे,
सद्ध्या घरी whripool चा आहे, २००७ साली घेतलेला. गेली २-३ वर्ष सतत काही ना काही दुरुस्ती येत आहे +++++ अगदि अगदि सालहि हेच. सतत काहितरि बिघाड आहेच. so big no for whirlpool
तुम्ही लोक साठवणीचं सामान
तुम्ही लोक साठवणीचं सामान कुठे ठेवता लोक्स? ते ही डाळी वैगेरे. मग शिजवताना त्या डाळी लगेच शिजतात का? >> आम्ही कडधान्ये, डाळी जास्त खात नाहि, मुग - मटकी वगैरेतर १ किलो आणले तरी ४-५ महिने पुरतात, बाहेर ठेवले स्टीलच्या डब्यात तर खराब होवु शकतात मह्णुन पिशवी बांधुन फ्रीझरमध्येच ठेवतो
१०-१५ मि. बाहेर काढुन ठेवायचे, चांगल्या शिजतात मग
कडधान्ये डाळी वगैरे फ्रीझ
कडधान्ये डाळी वगैरे फ्रीझ मध्ये ठेवले तर माझ्या फ्रिझ मध्ये जागाच उरणार नाही . मी या सर्व गोष्टी कमी प्रमाणात आणून बाहेरच ठेवते आणि लवकर संपवते. खरेतर गरजेप्रमाणेच आणते. स्टॉक करुन ठेवत नाही. फ्रिझ मध्य भाज्या, फळे, दुध, इत्यादि नाशिवंत वस्तूच ठेवते.
कडधान्ये आणि डाळी फ्रिजमध्ये
कडधान्ये आणि डाळी फ्रिजमध्ये ठेवल्या तरी मोड न येणे किंवा शिजायला जास्त वेळ लागणे असं काही होत नाही.
डाळी, पां.वाटाणे,हि.वा. भाजून
डाळी, पां.वाटाणे,हि.वा. भाजून डब्यात,बरणीत ठेवते.संपले नाहीत तरी खराब होत नाही.
भाजुन ठेवल्यास वाटाण्यांना
भाजुन ठेवल्यास वाटाण्यांना मोड येणार नाहीत. अर्थात मोड आणायचे नसल्यास हरकत नाही.
माझा फीज Bosch चा आहे . मी
माझा फीज Bosch चा आहे .
मी फ्रीजर मध्ये खोबरे किसून ,ओले खोबरे खोवून , कड धान्ये , रवा, मैदा, सुका मेवा, मसाले, ह डाळ ठेवते .
मुळात जास्त आणत नाही पण फिजर मध्ये ठेवल्याने लक्ष द्यावे लागत नाही . अगदी काटेकोर plan नसतो माझा. त्यामुळे उरले कि आत अशी सवय झालीये .
खराब झाल कि फेकून द्या, नाहीतर कशात तरी घालून खपवा आणि लागल कि पळत दुकानात जा ह्यापेक्षा हे परवडतंय मला.
खोबरे , सुकामेवा अजिबात खवट नाही होत. रवा भाजून ठेवलेला असतोच पण कच्चा पण लागतो . रवा मैदा डाळ अजिबात किडे , अळी होत नाही.
पीठ नाही ठेवत कधी.
माझ्या कडे कधी २ तर कधी ८ अशी कितीही लोक जेवायला असतात त्यामुळे मला backup ठेवावाच लागतो
फ्रीझमध्ये डाळी पीठं रवा कधीच
फ्रीझमध्ये डाळी पीठं रवा कधीच ठेवत नाही. मद्रासच्या कोरड्या हवेला गरज भासत नाही. मुंबईमधेय मात्र रवाआणि भाजणी फ्रीझमध्ये ठेवावी लागायची. कडधान्ये मी आणतानाच पाव पाव किलोची पाकिटं आनते त्यामूळे लगेच संपतात.
माझा सॅमसंगचा फ्रीझ तीन दिवस पाण्यात तरंगत होता, तरीही व्यवस्थित चालू आहे. त्याचा फक्त एक फ्युज उडाला होता (त्यामुले टेम्परेचर कमी जास्त होत नव्हते) , कंपनीकडे तक्रार केल्यावर दुसर्या दिवशी लगेच माणूस येऊन बदलून गेला.
सॅमसंग डिजिटल इव्हर्टर
सॅमसंग डिजिटल इव्हर्टर कॉम्प्रेसर फायनल व्हायची शक्यता आहे. सिंगल डोअर, बहुतेक १९० किंवा २२० लिटर. भविष्यातल्या वाढत्या गरजा लक्षात घेऊनही डबलडोअर नकोय. कारण त्या गरजाही यात मावतील
मी एकटी सगळे पसारे आवरणार (बाकीच्या दीड मेंब्रांचं रोज प्रबोधन करतेय, पण आवरण्याचा उरक त्यांच्या अनुक्रमे आळस आणि वयामुळे अगदीच कमी आहे त्यामुळे ते दीड विद्यार्थी अगदीच संथ आहेत). त्यात फ्रीजची पसाराभर नकोय हेही एक.
सगळ्यांचे आभार. सल्ले-सूचनांमुळे बर्याच शंका दूर झाल्या.
घेतला फायनली की इथे सांगेनच.
डबलडोअर नकोच अश्या मताची मी
डबलडोअर नकोच अश्या मताची मी होते, पण सिंगल डोअर फ्रिज उघडला की डीप फ्रिजच्या तापमानावरही परीणाम होतो, त्यामुळे पसारा म्हणून नव्हे, तर उपयुक्त टेक्नॉलॉजी म्हणून डबलडोअरच घ्यावा अश्या मताला मी पोचले आहे.
http://m.food.ndtv.com/opinio
http://m.food.ndtv.com/opinions/kitchen-appliance-review-the-best-refrig...
Pages