फ्रिज कुठल्या कंपनीचा घ्यावा?

Submitted by चैत्रगंधा on 2 May, 2014 - 07:28

गोदरेजचा ७ वर्षापूर्वी घेतलेला डबलडोअर फ्रिज निकालात निघाला आहे. डबलडोअर फ्रिजच्या किंमती ३०-४०,००० रेंज मध्ये असल्याने जो घेऊ तो टिकणारा हवाय. सद्ध्या सॅमसंग/ L.G. जास्त चालतात असे ऐकून आहे.
प्लिज सुचवा. Whirlpool बद्दल काय मत आहे?
असा कुठला धागा असेल तर प्लिज लिंक द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@अंजली - फ्रीज घेतलात तर चालु ठेवायला लागेल, नाहीतर आतुन खराब होईल.

खरे तर - फ्रॉस्ट्फ्री फ्रीज म्हणजे मुर्ख पणा आहे. पण तोच सध्या विकला जातो साधा फ्रीज मिळत पण नाही.

आधी वीज वापरुन गार करायचा आणि मग जास्त गार झाला म्हणुन वीज वापरुन पुन्हा गरम करायचा. असा शेख चिल्ली प्रकार आहे. पुन्हा जिथे जास्त वेळ वीज जाते तिथे आत थंडावा रहात नाही.

साध्या फ्रीझ मधे बर्फ साठुन चीलसिंक सारखे काम करतो. त्यामुळे ८-१० तास वीज गेली तरी काही फरक पडत नाही.

अन्जलि,
इतक्या कमी कालावधीकरिता फ्रीज वापरायचा असेल तर साधा फ्रीज वापरा.वापर झाल्यावर सर्व पाणी पुसून काढा.दमटपणा राहू देऊ नका.त्यानंतर ट्रेवर कपडा अंथरा.व्यवस्थित रहातो. गोदरेज ,hair चे फ्रीज मस्त आहे.

साध्या फ्रीझ मधे बर्फ साठुन चीलसिंक सारखे काम करतो. >>> सायबानु हा कन्सेप्ट जरासा चुकिचा आहे. त्या कॉइलवर बर्फ स्साठले कि हिट ट्रान्स्फर रेट कमी होतो बर्फ उष्णतेचा दुर्वाहक असलेने. त्यामुळे कॉम्प्रेसरची कुलिंग इफिसिएन्सी कमी होते. म्हणुन वेळच्या वेळी ते डीफ्रॉस्ट केलेले चांगले असते.

फ्रिज जास्त वेळ थंड (आतुन Happy ) ठेवणेस्साठी जास्त उघडझाप न करणे, नविन जास्त पदार्थ न ठेवणे आणि त्याचे असलेले इन्सुलेशन याच गोष्ती महत्वाचय्य असतात (लाइट गेलेनंतर).

आईकडे ८५साली घेतलेला कॅलिव्हेनेटर अजुनही व्यवस्थित चालतोय. पण फ्रॉस्ट्फ्री फ्रीज हवा आहे म्हणुन नवीन घ्यायचा विचार करतोय.

म्हणुन वेळच्या वेळी ते डीफ्रॉस्ट केलेले चांगले असते. >>> वेळच्या वेळी डीफ्रॉस्ट करणे हा वेगळा भाग आहे.

फ्रॉस्ट फ्री फ्रीझ त्यांच्यात बर्फ साठवुन ठेवत नाहीत त्यामुळे वीज जास्त वेळ गेली ( काही तास ) तर तपमान वाढते.

तसेच फ्रॉस्ट फ्री सतत थंड करणे आणि पुन्हा गरम करणे असे करत असल्यामुळे वीज जास्त लागते.

आमच्याकडे हिताचीचा डबल डोअर आहे. ३ वर्षात कधी कुठला प्रॉब्लेम नाही. कोथरूडच्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स मधून घेतलाय. त्यांनीच सुचवला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे (जे आम्हालाही पटले) फ्रीजचा सगळ्यात महत्त्वाचा भाग काँप्रेसर असतो आणि हिताचीचा काँप्रेसर सगळ्यात चांगला आहे, बाकिच्या बर्‍याच कंपन्यासुध्दा हिताचीचाच काँप्रेसर वापरतात.

<< डबलडोअर फ्रिजच्या किंमती ३०-४०,००० रेंज मध्ये >>

असंच काही नाही अगदी. तुम्हाला किती आकारमान असलेला हवाय? आम्ही दोन वर्षांपूर्वी २३० लिटर चा डबलडोअर (याला फ्रॉस्ट फ्री म्हणतात) वीडिओकॉन केवळ ११,५००/- त घेतलाय.

वीडिओकॉन विषयीचा अनुभव सुखद आहे. ते अनेक वर्षांपासून एअरकंडीशनींग आणि रेफ्रीजरेशन उद्योगात आहेत.

केल्वीनेटर ला वाईत दिवस आलेत! काहीच सर्वीसींग नाही!
आइकडचं तर चक्क कपाट झालंय केल्वीनेटर चं.. ९५-९८ मधे घेतलेला!

माझीही पहीली पसंती गोदरेज!

कालच एल जी चा २४० लीटर चा घेतला. २२,९०० किंमत होती. पण डीलर ओळखीची असल्याने १८,७०० ला दिला.

आमचा जुना फ्रिझ जळाल्याने आता नवीन घ्यायचा आहे. किमान ३००+ लीटरचा.

आम्ही सॅमसंगचा हा डबल डोरचा फ्रिझ पसंत केला आहे. कोणी वापरत आहे का ऑलरेडी? काँप्रेसरची १० वर्षांची वॉरंटी आहे. आणि इन-बिल्ट स्टॅबिलायझर आहे.

व्हर्लपूल Whirlpool _ डबल डोअर

जन्म - २६ जानेवारी १९९९
मृत्यु - _________

वय वर्षे - १५ नाबाद *

मेनटेनंस - काहीच आठवत नाहीये फारसा ..

लूक - आजच्या तारखेलाही चकाचक Happy

पियु : ..माझ्याकडे असाच पण दारावर फुलांचे चित्र असलेले मॉडेल आहे..
काहिही तक्रर नाही.. भाज्या वगैरे छान रहातात.. फार वर्ष झाली नाहीत अजुन त्यामुळे मेन्टेनन्स ची काही वेळ आली नाही

पियु, आम्ही ५-६ महिन्यापुर्वी घेतला असाच फ्रिज. ठीक ठाक वाटतोय. आमच्याकडे फ्रिजरचा उपयोग रेअरली होतो. त्यामुळे विनाकारण ती जागा वाया जातेय असं वाटतं, अन मेन फ्रिज ची जागा अपुरी पडतेय. तुमच्या गरजेप्रमाने ठरवा.

आमचा जुना फ्रीज व्हर्लपूल चा होता सिंगल डोरचा. तो बरीच वर्ष मस्त टिकला . एकदाही दुरुस्ती करण्याची वेळ आली नाही. त्यानंतर डबल डोर चा पाहिजेच म्हणून २००९ मध्ये व्हिडीयोकोन घेतला आणि २०-२५ वेळा तरी दुरुस्ती झाली दर ३-४-६ महिन्यांनी बोलवायला लागत . ते सुद्धा एका फटक्यात झाल अस नाही. एकदा दुरुस्ती करून गेला कि लगेच दोन दिवसांनी बोलवायला लागतो अस चार /पाच वेळा तरी( दर दोन/दोन दिवसांनी ) Happy

मेक्यानिक म्हणतो एकदम भंगार पीस लागलाय तुम्हाला.
मी आयुष्यात इतक्या वेळा दुरुस्ती कोणाचीच केली नाही Lol

मी सॅमसंगचा डबल डोअरचा फ्रिझ २००७ साली घेतला आहे. अजुन तरि मस्त चालतोय. काहिहि प्रोब्लेम आलेला नाहि. तरि २०० किंवा ३०० रु. जास्त भरुन warranty extend करुन घ्या.

मला डबल डोअर मधे फ्रीजर खाली ही कन्सेप्ट खूप आवड्ली. कारण फ्रीजर जास्त लागत नाही. आणि आम्हाला फक्त Panasonic चा तसा मिळाला. वर्ष होत आलं. अजून तर काही त्रास नाही.

मला डबल डोअर मधे फ्रीजर खाली ही कन्सेप्ट खूप आवड्ली. कारण फ्रीजर जास्त लागत नाही>>>>>>>> घरात लहान मुल असेल तर काहींना अश्या फ्रिजचा त्रास होतो.. लहान मुलांना बर्फ आवडत असेल तर.. असा एकांकडुन मिळालेला रिपोर्ट

लहान मुलांनाच कशाला . मोठ्यांना पण आवडतो . मी कोलेज मध्ये असताना असा बर्फ काढून / अगदी चमच्या ने खरवडून वाटीत घेऊन खाल्लेला आठवतोय Happy

माझा एलजी चा गेली कित्येक वर्षे व्यवस्थित चालू आहे निदान १०-११ वर्ष तरी नो मेटेनंस टील डेट.

>>मला घ्यायचा आहे फ्रिज, पण वर्षातुन जवळ जवळ १० महिने बंद असणार, आणि उरलेले २ महिने हि सलग नाहि वापरला जाणार. तर कुठला फ्रिज घ्यावा? आणि काळजी कशी घ्यावी. कि फ्रिज घेवुच नये>><<
+१

तेव्हा कुठला फ्रीज घ्यावा सुचवाल ला?

२ फ्रिज आवडले आहेत.
Samsung:
http://www.samsung.com/in/consumer/home-appliances/refrigerators/top-mou...

whripool:
http://www.whirlpoolindia.com/refrigerators/multi-door/fp-313d-royal

कोणता घेउ?
सद्ध्या घरी whripool चा आहे, २००७ साली घेतलेला. गेली २-३ वर्ष सतत काही ना काही दुरुस्ती येत आहे. पण माझ्या ओळखित बर्याच जणांकडे whripool च आहे. म्हणुन असं वाटतं की बहुतेक माझा पिस खराब निघला असेल.
Samsung बद्दल सांगणारं असं कोणीच ओळखित नाही.

कल थोडा Samsung कडेच आहे. features ही Samsung चे जास्त आवडले आहेत. whripool च पुर्वानुभव चांगला नाही. please सांगा कुठला घेउ?

शामसुन्गच घ्या म्या तोच घेटलाय. याक वरीस झालय काय बी प्राब्लेम नाय. शक्यतो विजय सेल्समधून घ्या डिस्काऊंटला फसू नका. ३७५ लिटरांचा डब्बल डोअर हाय. तळाला फ्रीझर असलेले एक मॉडेल आहे. शामसुन्गमदी हाय का नाय माहीत नाय . पण खरेच त्याची उपयुक्तता पटते आहे. वाकावे लागत नाही. डीप फ्रीझरलाच वाकावे लागते ते फार क्वचित वापरतो आपण.

रॉबीनहूड, म्हणुनच Samsung Convertible घ्यवासा वाटतो आहे. त्या feature बद्दल कोणाला अनुभव आहे का?

PracheeS, आम्ही सॅमसंगचा हा घेतला. ६ महिनेच झालेत त्यामुळे जास्त अनुभव नाही पण अजून तरी चांगला चाललाय. तेव्हा ४२ ला पडला, क्रोमातून.

नवीन फ्रिज घेणे आहे. किती लिटरचा घ्यावा इथपासून तयारी आहे. अडीच माणसे. सासरच्या घरात डबलडोअर मोठा फ्रिज आहे, ४-५ वर्षं झालीत. काहीही तक्रार नाही. पण माझ्या घरी एवढा लागेल असं वाटत नाही. आम्ही कधीही २-३ दिवसांसाठी या वेळी चक्क २ आठवडे!! Proud ) सासरच्या घरी येऊन-जाऊन असतो, त्यामुळे फ्रिज त्या वेळी बंद ठेवावा का हाही उपसल्ला हवा आहे.

मुख्य वापर दूध-दही-ताक-लोणी वगैरे. अन्न उरलंच तर ते ठेवायला. बाकी पाभा-बिर्याणी वगैरे मसाले, जॅम-सॉस-मुरांबे-सरबतं, चटण्या, भाज्या वगैरे रोजचं सामान. पिठं-मैदे-पोहे-रवे फ्रिजात ठेवायला बिग नो नो!! डीप फ्रिजमधे बटर-चीज छोटे पॅक्स, सीझनला मटार-कॉर्न, बर्फ अर्थातच. एकुणात अगदी भरमसाठ सामान कोंबायला नकोय. मला एकटीला आवरायला-पुसायला जमेल असं सुटसुटीत प्रकरण हवंय. लेक चांगली उपद्व्यापी आहे, वय आता सव्वादोन होईल. भिंतीजवळच्या फटीत हात घालून वायर वगैरे ओढायची इच्छा असते. आज सासरी असताना फ्रिज पुसायला कप्पे काढले तर रिकाम्या फ्रिजात जाऊन बसली. Uhoh

९, कुठलाही नामांकित कुंपणीचा फ्रीज धावेल पण घेताना फ्रॉस्ट फ्री आणि स्टॅबिलायझर फ्री असेल असा घे. आताशा सगळेच फ्रीज बहुतेक करून फ्रॉस्ट फ्री असतातच म्हणा.

Pages