Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04
'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुळात १०००० रु प्रतिदिन असा
मुळात १०००० रु प्रतिदिन असा रेट आहे रोजगाराचा तरी तो जागामालक चकरा घालतोय. कहर पीळ सिरीयल आहे.
आशुडे अगदी अगदी.
वैभवकडे ड्युएल सीम मोबाईल आहे
वैभवकडे ड्युएल सीम मोबाईल आहे ज्यामधल दुसर सीमकार्ड हे फोनसकट भंडारीने त्याला म्हणजे तिला (वैभवलक्ष्मीला) दिल आहे.
वैभवचे आई-वडिल आवडले. पक्याही
वैभवचे आई-वडिल आवडले. पक्याही छान. बाकी वैभव ला स्त्री म्हणून आणि ते ही सौंदर्यवती सहनशक्तीपलिकडचे आहे.
मुळात १०००० रु प्रतिदिन असा
मुळात १०००० रु प्रतिदिन असा रेट आहे रोजगाराचा तरी तो जागामालक चकरा घालतोय.>> रु. १५,००० प्रतिदिन आहे ना??
आणि आधी १५०० रु परडे मध्ये बरं चाल्ल होतं त्यांच. ते ही रोज काम नसताना.
आधी १५०० रु पर डे ही नव्हते.
आधी १५०० रु पर डे ही नव्हते.
हो हो १५०००. च्यामायला ४.५
हो हो १५०००. च्यामायला ४.५ लाख महिन्याला. ५४ लाख सीटीसी. एका वर्षात घर घेऊ शकेल हा. निदान एक आणखी भाड्याची खोली घेऊन तिथे नाही कपडे बदलत येत. उगाच त्या बाईकडे जाऊन संशयकल्लोळ वाढवायला खतपाणी. बिनडोक कुठले. (बघणारे)
बिनडोक कुठले. (बघणारे)>> मी
बिनडोक कुठले. (बघणारे)>> मी नाही बघत.
आणि आधी १५०० रु परडे मध्ये
आणि आधी १५०० रु परडे मध्ये बरं चाल्ल होतं त्यांच. >>>> १५०० रु महिना ना? इथेच कुठेतरी वाचल्याच आठवतय, लक्ष्मीची आई वैभवला बोल बोल बोलते त्या एपिची चिरफाड चालु असताना.
मुग्धा, १५०० रु परडेच. (मी
मुग्धा, १५०० रु परडेच. (मी तेव्हा पहायची.) ते पण जेव्हा काम मिळेल तेव्हा.
हो का? असेल ब्वा. पण हे खर
हो का? असेल ब्वा. पण हे खर जेव्हा वैभवलक्ष्मीला सौभाग्यवती शिरेलीतल्या तिच्या रोलसाठी भंडारी १०,००० परडे की १५,००० परडे कोट करतो तेव्हा मला वाटल होत की आता एका झटक्यात याची सगळी देणी फिटतील किंवा हा फेडुन येईल आणि बायको विचारेल हे अस कस झाल... (भाबडी आशा, अजुन काय.) पण यातल काहीही झाल नाही.
अगं मला पण तसंच वाटलेलं.. पण
अगं मला पण तसंच वाटलेलं.. पण इतक्या दिवसांनंतरही यांची फरपट चालूच आहे. ते २५,००० अॅडव्हान्स घेतो ते पण बायकोला काय सांगायचं कुठुन आणले एवढे पैसे म्हणून सुहासकडे थोडे ठेवायला देतो. पण आता किमान गरजेपुरते पैसे मिळतायत असं बायकोला पटवून देता येऊ नये याला.
पूर्वी एक एपी बघितला तेव्हा
पूर्वी एक एपी बघितला तेव्हा १५०० पर डे काम मिळणार आहे, दहा पंधरा दिवस तरी असेल महिन्यातून असं वैभव बायकोला सांगतो.
एक एपी बघितला तेव्हा १५०० पर
एक एपी बघितला तेव्हा १५०० पर डे काम मिळणार आहे, दहा पंधरा दिवस तरी असेल महिन्यातून असं वैभव बायकोला सांगतो.>> ते भंडारीला गुंडाळण्यापूर्वीच्या कामांचे.
पण हे खर जेव्हा वैभवलक्ष्मीला
पण हे खर जेव्हा वैभवलक्ष्मीला सौभाग्यवती शिरेलीतल्या तिच्या रोलसाठी भंडारी १०,००० परडे की १५,००० परडे कोट करतो तेव्हा मला वाटल होत की आता एका झटक्यात याची सगळी देणी फिटतील किंवा हा फेडुन येईल आणि बायको विचारेल हे अस कस झाल >>>>
दोन कमावणारी माणसं असताना , जय-अदिती ला रिक्शा परवडत नव्हती. विसरलात ???
कयच्या काय पाचकळपणा चालु आहे.
कयच्या काय पाचकळपणा चालु आहे. हॉस्पिटलात कपडे बदलुन बाई व्हायचे लगेच कपडे बदलुन बाप्या.
आणि तो भला मोठा विग, सलवार सुट विथ ओढणी, अॅक्सेसरीज, चप्पल आणि महत्वाचं म्हणजे ब्रेस्ट म्हणुन जे काही वापरत असेल ते, एवढ्याश्या पिशवीतुन आणते ती सुरेखा?
कौतुक वाटतं मला, ज्या स्पीडने
कौतुक वाटतं मला, ज्या स्पीडने वैभवालक्ष्मी नेलकलर्स लावते/तो आणि लगेच काढते/तो.
एखाद्या दिवशीच पार्टीसाठी केला तरी तो eye make up उतरवताना कंटाळा येतो. शिवाय बेस्ट ऑफ द मेकअप रिमुवर्स वापरले तरी डोळे किंचीत काळे दिसतात किंवा थोडेसे कोल कलर्स उरतातच. वैभवला बरं जमतं पटापट false eyelashes आणि eye make up उतरवणं. ( आणि सुईमधे दोरा ओवणं यासारखं no skill required काम करायला मात्र जमत नव्हतं. स्पेशल ट्रेनिंग लागलं त्यासाठी. )
ब्रेस्ट म्हणुन जे काही वापरत
ब्रेस्ट म्हणुन जे काही वापरत असेल ते, एवढ्याश्या पिशवीतुन आणते ती सुरेखा?>>> आईगं!!
आनि ते सगळे कपडे , सुरेखाच्या
आनि ते सगळे कपडे , सुरेखाच्या घरिच असतात का?
घरात असतील तर लक्श्मीला कधीच सापडले नाहीत का?
सुरेखाच्या नवर्याला कधीच वैभव घरातून बाहेर पडताना दिसला नाही का>?
आजूबाजूच्या लोकाना पण नाही दिसला ?
पूरूष जर रोज दाढी करत असेल तर चेहर्याची त्वचा वेगळी नाही का होत?? ती वैल रोज मेकप ने लपवते का ??
मनिमाउ, मेकप रीमुव्हर कुठल्या
मनिमाउ, मेकप रीमुव्हर कुठल्या ब्रॅन्डचं वापरतो ते विचारा.
स्वत:चं घरभाडं थकलंय तर कपडे
स्वत:चं घरभाडं थकलंय तर कपडे बदलण्यासाठी दुसरं घर कसलं घेतोय तो भाड्याने?
दोन कमावणारी माणसं असताना ,
दोन कमावणारी माणसं असताना , जय-अदिती ला रिक्शा परवडत नव्हती. विसरलात ??? >>>> रिक्षा काय स्वस्ति, त्यांच्या खोटेपणा काकांसमोर उघड झाल्यावर काकांनी घरातुन बाहेर काढल्यानंतर यांच्याकडे जेवायला सुद्धा पैसे नव्हते, म्हणुन भजी पाव खाल्ला दोघांनी.. हे ही लक्षात आहे. पण इथे बायकोपासुन सगळी गोष्ट लपवली आहे ना त्यामुळे कालपर्यंत आपल्या खाण्याचे सुद्धा वांदे होते आणि आज अचानक येवढे पैसे कुठुन आले अशी शंका बायकोला यावी ही आपली माझी माफक अपेक्षा हो..
ती लक्ष्मी माठ आहे. आणी
ती लक्ष्मी माठ आहे. आणी वैभव्लक्ष्मी घडा.
रांजण आणी सुरई
रांजण आणी सुरई
तुम्हालाही वैभवलक्ष्मी सुरई
तुम्हालाही वैभवलक्ष्मी सुरई वाटते का?
विकृतीची परिसीमा आहे उदय
विकृतीची परिसीमा आहे
उदय सबनीस सुंदर अभिनय करतो पण अगदी सहज
अभिनय सगळेच चांगला करतात. खरं
अभिनय सगळेच चांगला करतात. खरं तर सगळे चांगले कलाकार घेतले आहेत.
पण बेसिकमेच राडा ना भौ.
बिनडोक लोक . बाकी अडाणी पण तो
बिनडोक लोक . बाकी अडाणी पण तो सॅण्डी तर हुशार आहे ना
उगाचच आपले स्मार्ट फोन आणि चान्गले कपडे घाउन शाईन मारतो .
त्याला डॉ च्या बाबतित काहिच संशय येत नाही.
आणि भण्डारी , रिशेप्शन वर येउन - लक्ष्मीच्या आईंना अॅडमिट केलय अस म्हणतो .
एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये येउन हा प्रकार .
ते सगळ जाउदे. हे शिरेलीतले
ते सगळ जाउदे. हे शिरेलीतले लोक्स असुन हॉस्पिटलमध्ये त्यांना कोणी ओळखत नाही? सौभाग्यवतीच्या लाँचची प्रेस कॉन्फरन्स, पहिल्या एपिचा प्रिमिअर स्टाईल शो ऑर्गनाईज करुन खर्च केलेला पैसा पाण्यात गेला की भंडारीचा. नाही म्हणायला एक म्हातारी नर्स वैभवलक्ष्मीकडे संशयाने बघत होती....
अभिनय सगळेच चांगला करतात. खरं
अभिनय सगळेच चांगला करतात. खरं तर सगळे चांगले कलाकार घेतले आहेत. पण बेसिकमेच राडा ना भौ. >>>
लॉजिकच नाही काही स्टोरीला. इतकं बिनडोक कसं लिहिलं आहे कळत नाही. चुका काढायच्या म्हटल्या तर रोजच्या एपिसोडमधे १० मिळतील. सुरुवातीचे उत्साहाचे ५-७ आणि नंतर घरी आलेल्या एखाद्या आजी-काकु-मावशीमुळे पाहिलेल्या मजबुरीचे ५-७..... एवढेच भाग पाहुन, कथा लिहिणारा किती पाट्या टाकतो आहे / किंवा बघणार्यांना अगदीच मुर्ख गृहित धरतो आहे हे कळतो.
वैभव सुंदर बाई कोणत्याही अँगलने वाटत नाही. 'छक' जास्त वाटतो. ( खरं तर प्रोमोज पाहिले तेव्हा झी मराठीने 'छ्क' लोकांवर सिरियल कशी काढली आणि एवढा बोल्ड टॉपिक कसा हाताळणार आहेत या उत्सुकतेने सिरियल पहायला सुरुवात केली होती. तेव्हाच बहुतेक सिरियल फ्लॉप झाली. )
वैभव सुंदर बाई कोणत्याही
वैभव सुंदर बाई कोणत्याही अँगलने वाटत नाही. 'छक' जास्त वाटतो. ( खरं तर प्रोमोज पाहिले तेव्हा झी मराठीने 'छ्क' लोकांवर सिरियल कशी काढली आणि एवढा बोल्ड टॉपिक कसा हाताळणार आहेत या उत्सुकतेने सिरियल पहायला सुरुवात केली होती. तेव्हाच बहुतेक सिरियल फ्लॉप झाली. )
+११११११११११११११११११११११११११११११११११११११
Pages