Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद.. खारेघाट गल्ल्या हे
धन्यवाद.. खारेघाट गल्ल्या हे नाव माहित नव्हते.
भाऊ, दिनेशदा हे बघा बदललेलं परळ...

सुपर्ब फोटो इन्द्रधनुष्य!
सुपर्ब फोटो इन्द्रधनुष्य! कुठुन काढ्लाय?
हिरा, नेहमीप्रमाणेच मस्त
हिरा, नेहमीप्रमाणेच मस्त माहिती.
मामी, नेहरु प्लॅनिटोरियम सुरु झाले तेव्हा आतमधे मुंबईच्या स्कायलाईनचा कट आऊट होता.
स्टॉक एक्सेंच्ज, एअर इंडीया, ताज, राजाबाई टॉवर, बाबुलनाथ अशी मोजकीच स्थाने होती. आता तीच शोधायला लागतील.
मणिस ची चव नाही राहिली पुर्वीसारखी. गुरुकृपाचा समोसाही आकाराने बराच लहान झालाय. रामा नायक ए. सी. केलय आणि वरचा मजला रिकामा केलाय !
विठ्ठल भेलपुरीवाल्याची दोन दुकाने होती. एक अजून आहे.
इंद्रा, मस्त फोटो. माझ्या
इंद्रा, मस्त फोटो. माझ्या लहानपणी नव्हे तर तरुणपणीही तिथे चिमण्या होत्या ( पक्षी नव्हे, धुराच्या चिमण्या )
श्रीमयी, चर्चगेट जवळ म्हणजे
श्रीमयी, चर्चगेट जवळ म्हणजे समुद्राला फेसिंग काही हॉटेल्स आहेत. ती फार महाग नाहीत. पुर्वी तिथे स्टूडीओ २९ असा क्लब होता. ( बहुतेक छोटु मर्चंट म्हणजे मिस्टर सबीरा मर्चंट चा ) नाना चुडासामा तिथेच कोपर्यावर रहात आणि ते तिथे मार्मिक आणि खोचक बोर्डस पण लावत असत.
>>सुपर्ब फोटो इन्द्रधनुष्य!
>>सुपर्ब फोटो इन्द्रधनुष्य! कुठुन काढ्लाय?<<
शिवडी/वडाळ्यावरुन (पुर्वेकडुन) असावा...
इंद्रधनुष्यजी, अप्रतिम फोटो !
इंद्रधनुष्यजी, अप्रतिम फोटो ! धन्यवाद.
<< नाना चुडासामा तिथेच कोपर्यावर रहात आणि ते तिथे मार्मिक आणि खोचक बोर्डस पण लावत असत.>> हे बोर्ड प्रकरण अजूनही सुरूच आहे !
(No subject)
तर छानच आहे. काही बोर्डस
तर छानच आहे. काही बोर्डस बघायची उत्सुकता असायची त्यापैकी एक ( एअर इंडीया चा महाराजा नरीमन पाँईटजवळचा, दादरचे पोर्तूगीज चर्च, टिळक ब्रिजवरची अमूल बेबी.. हे आणखी काही )
इंद्रा नेहरू
इंद्रा नेहरू प्लॅनेटोरियमच्या शेजारच्या उंच बिल्डिंगवरून काढलाय का? काहिसा जुना आहे का फोटो? म्हणजे एकदम लेटेस्ट नाहीये.
दिनेशदा, ती स्कायलाईन आहे अजून आतल्या घुमटाच्या बाजूनी.
माझ्या लहानपणी नव्हे तर तरुणपणीही तिथे चिमण्या होत्या ( पक्षी नव्हे, धुराच्या चिमण्या ) >>>> या चिमण्या अजूनही आहेत. कारण टॉवर्स बांधले गेले तरी हेरीटेज म्हणून या चिमण्या ठेवाव्या लागतात. फिनिक्स मॉलमध्ये मॅकडोनाल्ड बाहेर एक आहे चिमणी, तसंच पेनिन्सुला बिझिनेस पार्क मध्ये देखिल आहे. बाकीच्याही ठेवल्या असतील.
रेनट्री मिलीबगमुळे मेलीत,
रेनट्री मिलीबगमुळे मेलीत, नव्या मुंबईतील काही रेन
ट्री झाडांवर सुद्धा हा रोग आलाय. झाडे पूर्ण कापून टाकण्यापेक्षा त्यांना चांगले रंगवून छान दिसू शकेल, तेवढी कल्पनाशक्ती हवी. साध्याचे रंगकाम मी पाहिले नाही त्यामुळे बोलू शकत नाही.
<< कोळीवाडीचा संबंध
<< कोळीवाडीचा संबंध समुद्राशीच. पण फणसवाडी हे नेहमी फणसवाडी-कोळीवाडी असे जोडनावच ऐकले आहे.>> हिराजी, थोडं कुतूहल वाढलं म्हणून चौकशी केली. 'कोळीवाडी' हा खरा तर ' कोळ्याची वाडी' याचा शॉर्टफॉर्म असावा; कारण या वाडीचे मालक कोळी समाजाचे होते, असं कळलं. येथील वस्ती पहातां, या वाडीचा कोळी व्यवसायाशीं संबंध असेल असं वाटत नाहीच. [ शिवाय, साधारणपणे कोळीवस्तीला ' कोळीवाडा' म्हटलं जातं, 'कोळीवाडी' नाही; यानेही या शक्यतेला पुष्टीच मिळते ] तरी पण मीं अधिक चौकशी करून निश्चित असं कांहीं हातीं लागलं तर इथं सांगेनच.<< फणसवाडी-कोळीवाडी असे जोडनावच ऐकले आहे>> हें मात्र अचूक आहे; 'पोस्टल अॅड्रेस'ही असाच लिहिला जातो.
[ चुकून दोनदा पोस्ट झालं ]
[ चुकून दोनदा पोस्ट झालं ]
गिरगावातल्या झावबा वाडी, गाय
गिरगावातल्या झावबा वाडी, गाय वाडी ही नावे पण मला वेगळीच वाटतात. मी १९८१ ते १९८४ ठाकूरद्वारात नियमित जात असे. चित्रा पालेकर खुपदा दिसायची. प्रमोद नवलकर पण दिसायचे. साहित्य संघाच्या गल्लीत शिरलो तर थोर नाट्य कलाकार दिसायचे.
परळच्या त्या चिमण्या तश्याही
परळच्या त्या चिमण्या तश्याही १९८२ नंतर थंडच पडल्या होत्या. वडाची झाडे वाढली होती काहींवर.
या चिमण्यांची एक मजा ( नंतर समजली ) कि यात सहसा पावसाचे पाणी शिरत नाही. यातून हवा नेहमीच वरच्या दिशेने खेचली जाते आणि पाऊस परतवला जातो. ते तसे होते का ते बघायला एकदा पावसात गेलोही होतो.
चिमण्यांच्या वरच्या टोकाला
चिमण्यांच्या वरच्या टोकाला जाड पत्र्याचे एक उतरते छ्प्पर थोडे उंचावर असे म्हणजे धुरांडे पूर्ण बंद होणार नाही असे जोडलेले असते. पावसाचे पाणी या छपरामुळे नळकांड्याच्या बाहेर वाहून जाते. नळकांड्यात शिरत नाही. शिवाय खालून येणार्या उष्ण वायूचा ऊर्ध्वगामी दाबही मोठा असतो.एखददुसरा थेंब शिरलाच नळकांड्यात तर एक तर धुरांड्यातल्या उष्णतेमुळे त्याची वाफ होते आणि शिवाय तो वर लोटला जातो.
झावबाची वाडी बद्दल अंदाजाने असे सांगता येईल की ज़ावजी, ज़ावबा ही नावे पूर्वी असायची. निर्णयसागर पंचांगात पहिल्या दोन पानांवर या मालक चौधरींच्या पूर्वजांचे फोटो असायचे. त्यात ज़ावजी धाकजी हे नाव आठवते. कदाचित तेच असतील. पण हे अंदाजाने.
<< गिरगावातल्या झावबा वाडी,
<< गिरगावातल्या झावबा वाडी, गाय वाडी ही नावे पण मला वेगळीच वाटतात.>> आंबेवाडी, भटवाडी, कांदेवाडी... गोरेगांवकर लेन, बनामहॉल लेन, निकदवारी लेन.... या सर्वांचा स्थायीभाव 'चाळ संस्कृति' असला , तरीही या प्रत्येक वाडीची, लेनची स्वतंत्र ओळख असायची. कांहीं वाड्यांत पारंपारिक वैर असायचं तर कांहींत खास आत्मीयता. या गर्दीच्या, गडबड-गोंधळाच्या मुंबईच्या भागात सांस्कृतिक वातावरणही वरच्या दर्जाचं असे. अनेक नांवाजलेले वकील, लेखक, पत्रकार, अभिनेते, चित्रकार , राजकीय पुढारी या वाड्यांमधून विखुरलेले असत. असो, उगीचच नोस्टॅल्जिक होतोय मीं.
परळ चा फोटो भारीच. मला वाटत
परळ चा फोटो भारीच. मला वाटत लोअरपरेल साइडकडुन घेतलाय.
नाना चुडासामा तिथेच कोपर्यावर रहात आणि ते तिथे मार्मिक आणि खोचक बोर्डस पण लावत असत.>> हे बोर्ड प्रकरण अजूनही सुरूच आहे !>>>>>>>>>>>>
पिझ्झा बाय द बे कडे लावतात असे बोर्ड्.
या गर्दीच्या, गडबड-गोंधळाच्या
या गर्दीच्या, गडबड-गोंधळाच्या मुंबईच्या भागात सांस्कृतिक वातावरणही वरच्या दर्जाचं असे. अनेक नांवाजलेले वकील, लेखक, पत्रकार, अभिनेते, चित्रकार , राजकीय पुढारी या वाड्यांमधून विखुरलेले असत. असो, उगीचच नोस्टॅल्जिक होतोय मीं. >> हे आमच्या पिढिने मिस केलं.
नेहरू प्लॅनेटोरियमच्या शेजारच्या उंच बिल्डिंगवरून काढलाय का? >>> नाही... राज म्हणतोय तसं परळच्या स्कायलाईनचा फोटो शिवडीच्या टेकडी वरुन मे २०१५ घेतलेला आहे. फोटोत दिसणारी झाड म्हणजे हाफकीन आणि त्याला लागून पुढे मोनोच्या स्टेशनची शेड दिसत आहे.
परळच्या त्या चिमण्या तश्याही १९८२ नंतर थंडच पडल्या होत्या. वडाची झाडे वाढली होती काहींवर. >> अगदी.. लालबागच्या फ्लायओव्हर वरुन भायखाळा कडे गेलात तर सगळया बदलाला धिराने तोंड देत उभ्या राहिलेल्या चिमण्या आजही दिसतात.
सस्मित, मी पण पिझ्झा बाय द बे
सस्मित, मी पण पिझ्झा बाय द बे च्या कोपर्यावरच्या (मार्मिक) पाट्यांबद्दलच लिहायला आले होते.
नावात काय आहे? मुंबईतलं असेल,
नावात काय आहे? मुंबईतलं असेल, तर एखादं झाड
परेल, दोंताड, भायखळा ही नावं ज्या झाडां(च्या नावां)वरून पडल्याचं म्हटलंय त्या झाडांना मराठीत काय म्हणतात?
दोन ताड ह्या नावात अर्थात
दोन ताड ह्या नावात अर्थात 'ताड' या झाडाचे नाव आहे. 'दोंताड' असे लिहिले तर ते कळत नाही. भायखळा हे नाव 'बहावा' (cassia fistula) अमलताश या झाडावरून पडले असावे असे काही लोक मानतात. पण मुख्य प्रवाह 'भाया कोळ्याचे खळे' ही व्युत्पत्ती मानणाऱ्यांचा आहे. आणखी एक व्युत्पत्ती संभवते. मुंबईची सात बेटे, लगतचे साष्टी बेट, ठाणे कुलाबा हे जिल्हे यात शेततळ्याला 'बावखल' म्हणत. अजूनही म्हणतात. आणि ही बावखले अजूनही आहेत. हे बावखल म्हणजे मध्यभागी एक काठ नसलेली विहीर आणि भोवती दीडेकशे फूट व्यासाचा खड्डा किंवा खोलगट भाग किंवा खळे.. यात पावसाळ्यात पाणी साठे आणि विहिरीमुळे ते खोल झिरपे. जमिनीत मुरे. वर्षभर बऱ्याच मोठ्या जमिनीला ओल राही. हा एक land mark असे. कदाचित यावरूनही भायखळा आले असेल. पडळ या झाडावरून परळ नाव पडले म्हणतात. पण हे पुष्कळांना मान्य नाही. खोलगट परातीसारख्या भांड्याला (bassein) परळ म्हणतात. परळ बेटाचा पूर्वीचा आकार अगदी असाच होता. त्यामुळे परळला पावसाळ्यात सगळ्यात आधी पाणी साठे. अजूनही साठते. हिंदमाता,लालबाग हे भाग साध्याशा पावसानेसुद्धा पूर्वापार पाण्यात बुडतात. आणि ही व्युत्पत्ती बहुमान्य आहे. अलीकडे एक वेगळा मतप्रवाह आहे. यादव राजांनी इकडे आल्यावर परळीच्या वैजनाथाच्या देवळासारखे शिवालय इथे बांधले आणि मूळ प्रदेशाची आठवण म्हणून त्यालाही परळीवैजनाथाचे नाव दिले. म्हणून हा भाग परळ. मला व्यक्तिश: ही व्युत्पत्ती फारच ओढूनताणून आणलेली वाटते. परळ भागात जुन्या शिवालयाचे अवशेष सापडले आहेत हे खरे. पण पुढचा तर्क पटत नाही.
गंमत म्हणजे याचा शोध घेताना काहींचे काही कोळी बायकांशी बोलणे झाले. त्यांना या नावाबद्दल विचारले असता त्यातली एक बाई म्हणाली, 'ती पलतरची वरळी आनी ह्यी परली!'
https://twitter.com
https://twitter.com/mumbaiheritage
इथे मुंबईसंबंधित अनेक जुनी छायाचित्र पाहता येतील.
उदा : गेटवे ऑफ इंडिया बांधण्यापूर्वीचे अपोलो बंदर.
मुंबईत नव्हे पण मुंबईलगतच
मुंबईत नव्हे पण मुंबईलगतच आयरोळी येथे एक सुंदर सागरी क्षेत्र विकसित केले गेले आहे. इतके शांत निवांत की हीच ती ठाणे खाडी असे ओळखताही येणार नाही. दाट कांदळवन, बऱ्यापैकी स्वच्छ निळसर पाणी आणि किनाऱ्यावर हजारो देशी परदेशी ' पर' वाल्यांचा सुखद कलकलाट. फ्लेमिंगो, खंडे, हेरॉंन्स, कोर्मोरंट्स, असंख्य पक्षी. लगतच एक सुंदर माहितीगृह. पक्षीनिरीक्षणासाठी सकाळी नावेची सहलही आहे. जरूर अनुभवावे असे ठिकाण.
नवी मुंबई स्वच्छ मुंबई !
नवी मुंबई स्वच्छ मुंबई !
अशीच एक जागा वाशीचे मिनी सी शोअर.
जलाशय, पांढरे पक्षी, बोटींगची व्यवस्था, जलाशयाभोवती जॉगिंग पार्क, हिरवळ, गार्डन, खाण्यापिण्याची चंगळ, तरुणाईची संगत, तरीही आसमंतात एक शांतता, पावसाळ्यात तर आणखी धमाल वातावरण. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊसाची पहिली सर पडली रे पडली की आम्ही तिथेच पडीक असतो. तिथेच भिजायचं तिथेच सुकायचं
भरत - धन्यवाद. त्याच लिन्क वर
भरत - धन्यवाद. त्याच लिन्क वर "हॉल्ट स्टेशन इण्डिया" नावाच्या पुस्तकाचा उल्लेख आहे. अॅमेझॉन वर त्याची चाळायला काही पाने आहेत. इण्टरेस्टिंग दिसते.
डॅाकयार्ड स्टेशनजवळचे ब्रिटिश
डॅाकयार्ड स्टेशनजवळचे ब्रिटिश काळातले गार्डन छान आहे. दहा ते चार बंद असते.

डॅाकयार्ड स्टेशनजवळचे ब्रिटिश
डॅाकयार्ड स्टेशनजवळचे ब्रिटिश काळातले गार्डन
>>>
याला माझगावचा डोंगर म्हणतात.
माझी दहावी बारावी ईथेच अभ्यास करून झाली आहे.
फुल्ल नाईट फुल्ल दिवस ईथेच पडीक असायचो. खाली चायनीज आणि खीमापावच्या गाड्यांवर खादाडी.
थंडीत वर शेकोटी पेटवायचो. एकदा कांड केले होते.
भल्या पहाटे गवतावर नंगे पाव चालत अभ्यास करायची मजा काही औरच.
संध्याकाळी अभ्यासातून ब्रेक घ्यायचा आणि गार्डनमध्ये पक्षीनिरीक्षण करायचे. संपुर्ण लेखाचा विषय आहे हा.. कित्येक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. भायखळा ते लालबाग परेळ काळाचौकी दादरपर्यंतचे सारे मित्र ईथे अभ्यासाला जमायचो...
वर गावदेवीचे मंदिर आहे. तिथेही एक चक्कर जरूर टाका...
चर्चगेट स्टेशनचा आणि
चर्चगेट स्टेशनचा आणि पर्यायाने पश्चिम रेल्वेचा इतिहास. वेळोवेळचे फोटो.
https://wr.indianrailways.gov.in/cris/uploads/files/1392817958306-articl...
भरत, किती मस्त आहे हे
भरत, किती मस्त आहे हे डॉक्युमेंट. मी आता वरवर पाहिलं नंतर वाचते. धन्यवाद.
किती दिवसांनी हा धागा वर आलाय.
Pages