Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mayekar masta link.
Mayekar masta link.
मस्त लिन्क भरत. ती
मस्त लिन्क भरत. ती "आर्टिक्युलेटेड" गाडी एकदम नॉस्टॅल्जिक करून गेली. लहानपणी पाहिलेली आहे. पुण्यातही आल्या होत्या बहुतेक.
मस्त आहेत ते फोटो
मस्त आहेत ते फोटो
भरत मयेकर, मस्त लिंक
भरत मयेकर, मस्त लिंक आहे.
बेस्टच्या १ नंबर बसचा मार्ग अजूनही तोच आहे
भरत, मस्त लिंक आहे.
भरत, मस्त लिंक आहे.
हे सर्व पुन्हा अनुभवायचे असेल
हे सर्व पुन्हा अनुभवायचे असेल तर बेस्टच्या आणिक डेपोत असलेल्या म्युझीयमला एकदा अवश्य भेट द्या..
भरत मयेकर, मस्त लिंक. माझ्या
भरत मयेकर, मस्त लिंक. माझ्या लहानपणी ७० नंबर बस ही आर्टिक्युलेटेड डबलडेकर बस होती वडिलांसोबत त्यामध्ये प्रवास केलेला आहे आज पुन्हा त्या दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या.
महाराष्ट्र टाईम्सच्या टाईम्स
महाराष्ट्र टाईम्सच्या टाईम्स प्रॉपर्टी पुरवणीत एक छान लेखमाला सुरू झाली आहे.
मुंबईचं सौंदर्य हरवतंय! : भाग पहिला - http://maharashtratimes.indiatimes.com/business/property/articleshow/484...
भरत मयेकर, बेस्ट्ची लिंक
भरत मयेकर, बेस्ट्ची लिंक मस्त आहे.
(No subject)
इंडियन एक्स्प्रेसने नोव्हेंबर
इंडियन एक्स्प्रेसने नोव्हेंबर २०१५ मध्ये मुंबईतल्या गडकोटांवर एक मालिका केली.
शीवचा किल्ला
शिवडी
वरळी
माहीम
वांद्रे
हे व्हाट्स अप वर आलं
हे व्हाट्स अप वर आलं आहे
==============================================
मुंबईचा इतिहास
मुंबईच्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकला तर बॉम्बे सिटी गझेट प्रमाणे ख्रिस्तोत्तर १३०० मध्ये शिलाहार राजवटीतील बिंब नावाचा राजा प्रसिद्ध झाला.त्याने महिकावती (माहीम) शहर वसवले व किल्ला बांधून राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता 'प्रभादेवी' (नायगाव ) ही होती. लोक सुखी होते. जमीन , महसूल, न्याय वगैरे च्या बाबतीत तो न्यायी व आदर्श होता. त्यानंतर या बेटावर गुजरात च्या मुबारकशहाने प्रथम सन १३२३ साली स्वारी करून साष्टी जिंकली. पुन्हा इ.स. १३४७ मध्ये नागरदेव हा साष्टीवर राज्य करू लागला. नंतर मरोळ जवळील प्रतापपूर व वसई येथे निकामालिक याचे लष्करी तळ होते. याच्याच कारकिर्दीत भोगले सरदार (भंडारी) यांचे बंड झाले. अशी घडामोड सतत चालू होती.
सन १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजशाही कमकुवत झाली आहे हे लक्षात घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अति उत्साहाने येथील एत्तदेशीय लोकांना अनेक प्रकारांनी छळले. अनेक देवळे भ्रष्ट केली. वंद्रापासून वसई पर्यंत अनेकांचे ख्रिस्तीकरण झाले होते. पोर्तुगीजांपासून १८ फेब्रुवारी १६६५ मध्ये इंग्रजांचा सेनापती 'हम्प्रे कुक' याने साष्टी बेटे मिळवली.त्यामुळे मुंबई चे गोवा झाले नाही. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा मुत्सद्दी पणाने राजकारण करण्याकडे विशेष दृष्टीकोन होता.
मुंबई ची वस्ती कशी वाढली ?
मुंबईत आरंभी जी वस्ती झाली तिचे विभाग स्वाभाविकपणे पडलेले दिसतात. परळ व शिव येथे कुणबी राहत. माझगाव , परळ , वरळी हा भाग म्हणजे त्या वेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू व साष्टी मधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती.
१६७० मध्ये सुरते हून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनिया वर्ग येथे आला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली असे दिसून येते. १६७२ मध्ये शिवाजींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची सत्ता साष्टी येथे होती, त्यामुळे ही वस्ती वाढत गेली.
जीरोल्ड ओन्गीयर हे मुंबई चे स्वास्थ्यप्रिय गव्हर्नर होते . मुंबई ची वस्ती वाढावी व स्थिर व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचा कल स्वास्थ्य व शांतता प्रिय नागरिक व व्यापारी वर्गाने येथे यावे अगर अशांना स्वास्थ्य मिळावे या हेतूने न्याय व्यवस्था त्याने उत्तम केली. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संरक्षण खाते वाढवले.
इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबई ची लोकसंख्या केवळ दहा हजारांपर्यंत होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली. यामध्ये एत्तदेशीय पळशी , ब्राह्मण , पठारे प्रभू , पाचकळशी, माळी ,ठाकूर ,भोई व आगरी जमातीची मंडळी होती.
मुंबईत ज्या कापडाच्या सुताच्या गिरण्या निघाल्या त्यामुळे मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढण्यास मदत झाली. श्री कावसजी नानाभाई दावर यांनी १८५४ च्या फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे स्पिनिंग and व्हीव्हिंग कंपनी व पायोनियर स्पिनिंग फॅक्टरी येथे निघाली तेंव्हापासून मुंबई च्या लोकसंख्येत सतत वाढ होऊन ती १९२१ ते १९३१ च्या दरम्यान सुमारे ११ लाखांचे वर गेली.
मुंबादेवी - मुंबईचे कुलदैवत
मुंबादेवीचे मंदिर सुरवातीच्या काळात बोरीबंदर स्थानकाजवळ फाणसी तलाव होता त्यालगद होते. इ.स. १७३७ साली जेंव्हा मुंबई भोवतीच्या किल्ल्याचा विस्तार करण्याचे ठरवले गेले तेंव्हा तत्कालीन सरकारने हे मंदिर हलवून ते सध्याच्या काळबादेवी भागात नेण्याचा आदेश दिला . ह्या मंदिराचे बांधकाम सन १७५३ मध्ये पांडू सोनार नावाच्या प्रख्यात मराठी व्यापाऱ्याने केले.
आधुनिक मुंबईचा जन्म :
साधारणपणे १८३० च्या काळात निसर्ग सौन्दर्याने नटलेले केवळ अडीच लाख लोकवस्तीचे टुमदार मुंबई शहर साडेचार चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. किल्ल्याच्या तटबंदिबाहेर एक हजार यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती. त्यावेळी जे काही घडत असे ते या बंदिस्त किल्ल्यातच. पण १८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण परळला हलवण्याचे ठरवले. त्याआधी जवळ जवळ ७० वर्षे मुंबईचा गव्हर्नर अपोलो स्ट्रीट वर राहून मुंबईचा कारभार बघत असे.गव्हर्नर परळ ला गेल्यावर काही श्रीमंत लोकही परळ , माझगाव , भायखळा आणि मलबार हिल या भागात जाऊन राहू लागले.
इ.स. १८३९ मध्ये मुंबईचा ग्रँट रोड बांधला गेला. गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मरणार्थ या रस्त्याचे नावं ग्रँट रोड ठेवण्यात आले.इ.स. १८३८ मध्ये ह्याच्याच आदेशावरून कुलाबा कॉजवे बांधला गेला. त्यामुळे मुंबईहून कुलाब्याला जा ये करताना खाडीत उतरून जीव धोक्यात घालण्याचा धोका टळला. इ.स. १८३५ मध्ये मुंबईत पहिल्यांदाच प्यायचा सोडा मिळू लागला. आणि २ वर्षांनी बर्फ आला.सन १८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल सेवा सुरु झाली.
मुंबईत आगगाडी :
शनिवार दि. १६ एप्रिल १८५३ रोजी संपूर्ण आशिया खंडातली पहिली आगगाडी बोरीबंदर स्टेशनातून धुराची वलये सोडीत दिमाखाने ठाण्याकडे निघाली. बोरीबंदर ते ठाणे हा चोवीस मैलांचा लोहमार्ग टाकण्यासाठी ग्रेट इंडियन पेनिन्शुला या कंपनीने दहा हजार पौंड खर्च केले. जेम्स बर्कले नावाचा इंग्रज इंजिनियर ह्या कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केला गेला होता.
व्ही.टी. चा जन्म :
एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या ३० वर्षांमध्ये मुंबईच्या वैभवात निरनिराळ्या नयनरम्य इमारतींची भर पडली. बोरीबंदर हे त्यातील सर्वोत्कृष्ठ वास्तुशिल्प. ह्या इमारतीच्या शिल्परेखानाचे काम एफ . डब्ल्यू. स्टीव्हन्सन या वस्तू विशारदाने केले. ही इमारत म्हणजे इटालियन वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. २० जुने १८८५ रोजी व्हिक्टोरिया राणीच्या गौरवार्थ या इमारतीला व्हिक्टोरिया टर्मिनस असे नावं देण्यात आले.
मुंबईत ट्राम :
आज पन्नाशीच्या जवळपासचे मुंबईकर एका काळी ट्राम च्या वरच्या मजल्यावर बसून एक आण्यात आख्खी मुंबईची केलेली सफर आठवून म्हणत असतील 'गेले ते दिवस'.
मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर अशा दारात हा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी या ट्राम ने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. घोड्याची ट्राम सुरु होण्यापूर्वी मुंबईत मुख्य वाहतुकीचे साधन म्हणजे मेणे व छकडे होते. घोड्याने चालवलेला टांगा हे वाहन १८८० मध्ये मुंबईत प्रथम आले. मुंबईकर याला टांगा म्हणण्यापेक्षा 'व्हिक्टोरिया' हे भारदस्त इंग्रजी नावं देत असे.
मुंबईत ट्राम ही प्रथम मुंबईच्या व्यापारी विभागामध्ये सुरु केली गेली. कुलाबा क्रॉफर्ड मार्केट, पायधुणी आणि बोरीबंदर , काळबादेवी आणि पायधुणी अशा २ मार्गांवरून ती सुरु झाली. सन १९०७ साली ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्राम चे शेवटचे ठिकाण दादर चे खोदादाद सर्कल होते. म्हणूनच ट्राम संपुष्टात येऊन इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही कानावर येते.
७ मे १९०७ रोजी सुरु झालेली विजेवर चालणारी ट्राम तारीख ३१ मार्च १९६४ पासून बंद करण्यात आली आणि जलद वाहतुकीसाठी बस गाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले. बस वाहतूक १५ जुलै १९२६ पासून सुरु झाली होती. पहिली बस कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर सुरु झाली. हे अंतर पार करायला बसला फक्त १० मिनिटे लागत. तोपर्यंत मुंबईत टॅक्सी हे भाड्याचे वाहन रूढ झाले होते. १९३७ साली दुमजली बसगाड्या सुरु झाल्या. मुंबई ती मुंबई तिची सर भारतातील एकही शहराला नाही हा लौकिक मुंबई ला मिळवून देण्यात मुंबईच्या रेल्वे प्रमाणे बस वाहतुकीचा ही मोठा वाटा आहे.
मुंबईच्या उपनगरांचा उगम :
मुंबईतील कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बी. आय. टी. ने ( बॉम्बे सिटी इम्रूव्हमेट ट्रस्ट ) चाळी बांधण्यास सुरुवात केली. आणि मुंबईकरांच्या जीवनात चाळकरी संस्कृती जन्माला आली. सन १९२० मध्ये महार लोकांसाठी पहिली चाल भायखळ्याच्या क्लार्क रोडवर बांधली गेली. बी. आय. टी. ने बांधलेल्या ह्या खोल्या चांगल्या हवेशीर व सिमेंट कॉंक्रीटच्या असत. मासिक भाडे ५ रुपयांच्या वर जाणार नाही अशा बेताने आकारले जाई. सन १९२४ साली १६५४४ बिऱ्हाडांची सोय करणाऱ्या २०७ चाळी बांधल्या गेल्या. त्यानंतर साल सेटे बेटामध्ये उपनगरे वसवण्याची भव्य योजना या विकास मंडळाने आखली. त्यावेळी जी उपनगरे तयार झाली त्यात तुर्भे , दांडा, खार , चॅपल रोड , वांद्रे आणि सहार ही उपनगरे होती.
मुंबईतल्या पश्चिम विभागातल्या इतर उपनगरांचा विकास हा या मंडळाकडे न सोपवता त्यासाठी एक निराळे मंडळ स्थापन केले गेले. त्याचे नावं 'बॉम्बे टाऊन प्लॅनिंग स्कीम' असे होते. या योजनेसाठी लागणारा पैसा मालकांनीच उभा केला. यात वांद्रे ते बोरीवली या भागासाठी आखलेल्या एकंदर सत्तावीस योजनांपैकी एकोणीस योजना पुऱ्या झाल्या. यातील ५ योजना वांद्रे व सांताक्रूझ येथे , ६ विलेपार्ले व ५ अंधेरी येथे झाल्या. १९३० साली वांद्रे , खार, सांताक्रूझ , चेंबूर येथे काही छोटेखानी गावेही तयार करण्यात आली.
मुंबईच्या लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या गेल्या ३० वर्षांत बाहेरून आलेल्या लोकांनी वाढवली आहे. या सर्वाना औद्योगिकीकरणामुळे नोकऱ्या उपलब्ध झाल्या. १९५० नंतर लोकसंख्या फोफावली तसा मुंबईचा विस्तार आणि व्याप अफाट वाढला , भारत कुमार राउत यांनी लिहिलेले आहे त्याप्रमाणे दुख: एकाच गोष्टीचे वाटते की या मुंबईने करोडोना भरभरून दिले आहे तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेण्यास मात्र कोणी पुढे येत नाही. कारण या शहराला सर्वानीच केवळ आश्रय स्थान मानलं. ते माझ घर आहे असं मानणार फारस कोणीच नाही . शहराच्या वेगाने होण्याऱ्या -हासाच हेच तर मूळ कारण आहे. मुंबई टिकावी आणि संपन्न राहावी हीच प्रार्थना!!
कोणी लिहिलेय ते मात्र ठाऊक
कोणी लिहिलेय ते मात्र ठाऊक नाही . कोणाला माहीत असल्यास जरूर सांगा
जाई, मुंबईचा इतिहास
जाई, मुंबईचा इतिहास इंटरेस्टिंग.
यावेळेस जरा मुंबईत निवांत
यावेळेस जरा मुंबईत निवांत फिरता आले,.... पण आठवणीतील बर्याच जागा हरवल्या असे वाटले.
हाजी अलिला मोठे सर्कल होते ( त्याचा फोटो आमच्या शाळेच्या वहीवर असायचा ) ते नष्ट झाले, त्याला बरीच वर्षे झाली, तरी ते विसरु शकत नाही. नष्ट होण्यापुर्व तिथे नव्याने एक रॉक गार्डन तयार केले होते.
समोव्हर बंद पडले तसेच र्हिदम हाऊसही. तिथला गुडबाय सेल बघून कसेसेच झाले. रसराज आणि वैभव ( फोर्टमधली ) दिसली नाहीत. के. रुस्तम मात्र अजून आहे.
विठ्ठल भेलपुरीवाला बंद पडला. एक्सेलसियर जवळचे कामत बंद पडले. माटुंग्याचे मणिस कसेबसे चालू आहे. दादरचे प्रकाश अजूनही मूळ जागी आले नाही.
प्लाझा थिएटर च्या बाहेरचे यक्ष आणि अप्सरांचे पुतळे जाऊन लोखंडाच्या जाळ्या आल्यात. शिवाजी मंदिरला तिकिटांचे काऊंटर आत गेले आणि एकेकाळी तिथपर्यंत असणारे नाटकाचे बोर्डस ( ते पुर्वी हाताने लिहिलेले असत ) आता फार कमी असतात. तात्या तपकिरवाले ( हे अनेक नाट्यकलाकारांचे संपर्क अधिकारी होते ) अजून आहेत.
प्लाझासमोर सावंत यांचे स्टेशनरीचे दुकान होते, ते दिसले नाही. कुर्ल्याचा नवीन फ्लायओव्हर झाल्यापासून तिथे कायम कोंडी होतेय, दिवसाचे फ्लाईट असेल तर मला तो वापरता येत नाही.
दादरलाच नाईक वॉच कंपनीच्या ( हे दुकान आहे अजून ) एक फळवाले जोडपे असायचे. त्यांच्याकडची फळे दर्जेदार असत पण ते फळांना अजिबात हात लावू देत नसत. तेही नाही दिसले.
माटुंग्याला स्टेशनसमोर महावीर बूक डेपो ( का मधु बूक डेपो ) असायचा. आमची कॉलेजची आयकार्डस तो स्पॉन्सर करायचा. तोही नाही दिसला.
भाववाढीत काही घरबंदच राहिलेला नाही. साध्याश्या हॉटेलात साधासा नाश्ता केला तर १०० च्या खाली बिल क्वचितच होते.
पुर्वी बहुतेक रेल्वे स्टेशन क्रॉस करायला म्यूनिसिपलीटीचे पूल होते ( म्हणजे रेल्वेचे तिकिट न काढता तो क्रॉस करता येत असे. ) यावेळेस सहज शिवाजी पार्क व्हाया सिटीलाईट मार्केट करत माटूंगा झेड ब्रिजला आलो. पण त्याचे काम चालू होते. म्हणजे रेल्वे स्टेशनमधे उतरण्याशिवाय पर्याय नाही. प्लॅटफॉर्म तिकिट १० रुपये तर माटुंगा कुर्ला रेल्वे तिकिट ५ रुपये !!!
पण बरेच चांगले बदलही झालेत. बसच्या रांगा कमी दिसतात. वाहतुकीचा वेळही कमी झालाय. टॅक्सीज सहज मिळायला लागल्यात. त्यातही प्रियदर्शिनी हि केवळ बायकांनी चालवलेली टॅक्सीसेवा दिसली. डोमेस्टीक एअरपोर्टवरून ती घेतली, तिची चालक फार बडबडी होती. खुप छान वाटले.
मुंबईत पुर्वी नव्हती तेवढी कैलाशपति, गुलाबी टॅबेबुयिया, कदंब अशी झाडे दिसायला लागलीत. ती छान बहरतातही. पोद्दार कॉलेजसमोरची पर्जन्यवृक्षांची झाडे गेली ( त्यांच्या सावलीमूळे आमच्या कॉलेजवर कधीच उन पडत नसे ) रुईयाच्या आवारातली शिरिष, मुचकुंद, वाकेरी, कनकचंपा कधीच गेली पण नवीन वेली आणि झाडे
आलीत. ( रुईयात पुर्वीप्रमाणेअजूनही सुंदर युवती असाव्यात, कारण तिथला खरा अशोक बहरू लागलाय. )
एल आय सी च्या योगक्षेम जवळ पुर्वी ताम्हणीची झाडे होती, ती नाही दिसली पण एक मोठा कॅशिया दिसला आणि अत्यंत देखणी खर्या अशोकाची झाडे दिसली..
सगळ्या आठवणींचा छान कोलाज मनात तयार झालाय..
येताना एमिरेटसच्या फ्लाईटमधे बॉम्बे व्हेलवेट बघित्य, त्यातले अनेक उल्लेख मात्र खटकले.. पण तो वेगळा विषय आहे.
जाई... तू टाकलेली मुंबईची
जाई... तू टाकलेली मुंबईची माहिती या लिंक वर आहे
http://www.mumbaipuneonline.com/index.php?option=com_content&view=articl...
तसच माहिम बद्दल गैरसमज झालेला दिसतो तो ही लिंक वाचून दूर होईल..
http://granthalayat.blogspot.in/2015/03/definition.html
दिनेशदा.. मुंबई इतकी बदलली आहे की ती आता आपलीशी वाटतंच नाही.
दिनेशदा, विठ्ठल भेलपुरीवाला
दिनेशदा, विठ्ठल भेलपुरीवाला बंद नाही झालाय, सुरूच आहे. उलट आता तर त्याला मुंबईतील बेस्ट भेलपुरीवाला असा अवॉर्ड देखील मिळाला आहे..
पोद्दार-रुईया समोरची झाडे
पोद्दार-रुईया समोरची झाडे मुद्दाम वाळवून तिथे पेंटींग केलेले दिसते. जे सद्ध्या बऱ्याच ठिकाणी केले आहे.
धन्स इंद्रा
धन्स इंद्रा
माटुंग्याचे मणिस कसेबसे चालू
माटुंग्याचे मणिस कसेबसे चालू आहे. >>> नाही नाही. जोरदार सुरू आहे. आम्ही देतोय की त्याला उदार आश्रय.
पोद्दार-रुईया समोरची झाडे मुद्दाम वाळवून तिथे पेंटींग केलेले दिसते. जे सद्ध्या बऱ्याच ठिकाणी केले आहे. >>> अत्यंत घाणेरडं दिसतं ते हेमावैम.
लेख चांगला आहे, पण तपशीलात
लेख चांगला आहे, पण तपशीलात काहि गफलती दिसताहेत, पुढील परिच्छेदात ठळक केलेले भाग वाचल्यास कळते.
****************
सन १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजशाही कमकुवत झाली आहे हे लक्षात घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अति उत्साहाने येथील एत्तदेशीय लोकांना अनेक प्रकारांनी छळले. अनेक देवळे भ्रष्ट केली. वंद्रापासून वसई पर्यंत अनेकांचे ख्रिस्तीकरण झाले होते. पोर्तुगीजांपासून १८ फेब्रुवारी १६६५ मध्ये इंग्रजांचा सेनापती 'हम्प्रे कुक' याने साष्टी बेटे मिळवली. त्यामुळे मुंबई चे गोवा झाले नाही. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा मुत्सद्दी पणाने राजकारण करण्याकडे विशेष दृष्टीकोन होता.
****************
इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबई ची लोकसंख्या केवळ दहा हजारांपर्यंत होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली.
स्पिनिंग फॅक्टरी येथे निघाली तेंव्हापासून मुंबई च्या लोकसंख्येत सतत वाढ होऊन ती १९२१ ते १९३१ च्या दरम्यान सुमारे ११ लाखांचे वर गेली.
साधारणपणे १८३० च्या काळात निसर्ग सौन्दर्याने नटलेले केवळ अडीच लाख लोकवस्तीचे टुमदार मुंबई शहर साडेचार चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते.
****************
मुंबईच्या मुखवट्यातला गेल्या
मुंबईच्या मुखवट्यातला गेल्या दहा वर्षातला क्रांतिकारी बदल, मला वाटतं, गिरणगांवात झाला आहे; गिरण्यांचीं धुरांडी, कामगारांच्या चाळी जावून, टोलेजंग ईमारती, मॉल्स आले. लोवर परेल, एलफिन्स्टन रोड या स्टेशनांवर चढ-उतार करणार्या पूर्वी क्वचितच दिसणार्या 'ऑफिस गोअर्स' प्रवाशांची संख्या कितीतरी पटीनी वाढलीय. त्याच्या उलट, नरिमन पॉईंट सारख्या 'ऑफिस गोअर्स'नी गजबजलेल्या भागात आतां शुकशुकाट जाणवायला लागला आहे ! गिरगांवात मात्र अधूनमधून टॉवर्स डोकं वर काढत असले, तरीही फारसा फरक जाणवत नाहीं.
मलाही लोकसंख्येच्या १८३० आणि
मलाही लोकसंख्येच्या १८३० आणि १८७५ मधल्या आकड्यंबाबत प्रश्न पडला. हे आकडे चुकीचे आहेत हे नक्की. किंवा टंकन चूक झाली असेल. विशेषत; १८७५ चा आकडा.
दुसरे म्हणजे बोरिबंदरच्या जवळ असलेला तलाव हा फणसी नसून फांसी तलाव होता.याला गिबेट तळे असेही म्हटलेले आहे. किल्ल्याबाहेरची ही जागा गुन्हेगारांना फांशी देण्याची जागा होती. इंग्लिश कागदोपत्री असलेल्या phansi ह्या इंग्लिश स्पेलिंगचा नंतर म्हणजे फांसीच्या आठवणी बुजल्यावर हे कागदपत्र वाचणार्या पुढच्या पिढ्यांकडून फनसी किंवा फणशी असा उच्चार होऊ लागला असेल,
दुसरे म्हणजे हा तलाव म्हणजेच धोबीतलाव असावा का असा प्रश्न मला नेहमी पडतो. कारण धोबी तलाव बोरिबंदर पासून मेट्रो सिनेमापर्यंत पसरलेला असण्याचे उल्लेख आहेत. धोब्यांच्या कपडे धुण्यामुळे विक्टोरिया टर्मिनसची शोभा कमी होणार शिवाय साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरणार म्हणून तो तलाव बुजवला गेल्याचेही उल्लेख आहेत. आणखी म्हणजे मला वाटते गंगाधर गाडगिळांच्या पुस्तकात १८५७ सालच्या धामधुमीच्या काळात मुंबईत चारपाच जणांकडून अयशस्वी कट रचला गेला, त्या कटवाल्यांना आताच्या आझाद मैदानात तोफ डागून ठार केले असा उल्लेख आहे.(हे पुन्हा तपासून पाहायला हवे. तोफ डागून की फास देऊन? जगन्नाथ शंकरशेठ यांच्या चरित्रातही हा उल्लेख आहे कारण या कटाला जगन्नाथ शंकरशेठ अग्रणी असलेल्या एका गुप्त गटाची गुप्त मदत अथवा फूस होती असा इंग्रजांना संशय होता.) सेन्ट ज़ेविअर कॉलेजच्या आवारात अजूनही दोन (की तीन? बहुधा दोनच) आज़ाद मैदानाच्या दिशेने तोंड करून पुरलेल्या स्थितीत आहेत.
पण एक विरोधी बाबसुद्धा आहे. धोबी तलावाच्या उत्तर टोकाला गिरगावच्या सुरुवातीला कोळीवाडी-फणसवाडीसुद्धा आहे.
<< पण एक विरोधी बाबसुद्धा
<< पण एक विरोधी बाबसुद्धा आहे. धोबी तलावाच्या उत्तर टोकाला गिरगावच्या सुरुवातीला कोळीवाडी-फणसवाडीसुद्धा आहे.>> माझा अभ्यास नाही पण बरंच आयुष्य तिथं गेलं म्हणून हा आगाऊपणा- कोळीवाडीचा संबंध तलावापेक्षां नजीकच्या समुद्राशीं असण्याची शक्यता जास्त आहे व फणसवाडीही तलावाशी संबंध लावण्याइतपत तशी धोबीतलावाच्या अगदींच जवळही नाहीं.
मुंबईला खूप वेळा जाणे होते पण
मुंबईला खूप वेळा जाणे होते पण , यावेळी कोणत्याही नातेवाईकांकडे नाही राहायचं .. मेन atraction साउथ मुंबई .. कोणी सुचवू शकेल का साउथ मुंबई (किंवा साउथ मुंबई जवळ पडेल अशी ) मधली रिझनेबल फ्यामिली हॉटेल्स .. ?
होय, भाऊ कोळीवाडीचा संबंध
होय, भाऊ
कोळीवाडीचा संबंध समुद्राशीच. पण फणसवाडी हे नेहमी फणसवाडी-कोळीवाडी असे जोडनावच ऐकले आहे. म्हणून कोळीवाडी-फणसवाडी असा जोड उल्लेख केला. शिवाय तिथे एक covel किंवा यासारख्या नावाची गल्लीसुद्धा आहे, ती कोळीवाडीच असे काही ठिकाणी आहे. वाकोला-कलिना मध्ये एक colivary आहे, तिचे स्पेलिंग आता colivery होऊन ती अगदीच परकी वाटू लागली आहे, पण मूळची ती कोळीवाडीच.
मला तर व्युत्पत्तीसंबंधी काही अफाट कल्पना सुचत असतात. पण जुन्या जमीन-महसूल दस्त-ऐवजांचा भक्कम पुरावा मिळायला पाहिजे तरच खरे. उदा. वांदर्याचे राजन हे पूर्वी खाजण असावे आणि जुन्या मराठी लेखनानुसार यातला खा हा रवा असा लिहिला जात असावा. कुणा गैरमराठी अधिकार्याने हे 'रवाजण' असे वाचून याची नोंद कागदोपत्री 'रवाजण' साठी इंग्लिशमध्ये 'ravajan' लिहिले असावे आणि मग बोलीभाषेत त्याचे राजन झाले असावे वगैरे. वांदर्यात अजूनही रानवाड, शेरली अशी गावे आहेतच.
मला मुंबईत फिरताना जुन्या दुकानांच्या जुन्या पाट्यांवर काही जुनी नावे दिसतात. पूर्वी दुकानांच्या नामफलकावर पूर्ण पत्ता असणे सक्तीचे होते. आता तसे नाही. यापुढे जुनी नावे शिल्लक राहाणार नाहीत. दादर पूर्वमधल्या खारेघाट गल्ल्या, पश्चिमेचे चिकलठण, मस्जिदचा खडक आणि भातबाज़ार, चिंचबंदर, नागदेवी स्ट्रीट, जिंजीकर लेन या प्रत्येक नावामागे एक इतिहास आहे. अशी अनेक नावे अस्तंगत होत आहेत. घोडप देव (याचा उल्लेख मुंबईच्या एका जुन्या नकाशात घोरपा देवी असा आहे, जो मला गुल्फा अथवा घोल्पादेवी या मातृदेवतेशी साम्य सांगणारा वाटतो. पण हा पूर्वी खडकदेवही होता असू शकेल) सैतानचौकी, पोयबावडी, महारबावडी(ही आता कुठे आहे?)खारी बाव असे अनेक उल्लेख, ज्याच्या मुळाशी जायला पाहिजे कोणीतरी मराठी चांगले जाणणार्याने.
होय मामी, खरच खराब दिसते ते.
होय मामी, खरच खराब दिसते ते. एका सेल्फ़ी पॉइंटला प्रसिद्धी काय मिळाली, सगळीकडेच चांगली झाडे मारून टाकली.
सगळीकडेच चांगली झाडे मारून
सगळीकडेच चांगली झाडे मारून टाकली. >>> ते सगळे रेन ट्री होते त्याच्या वर मिलीबग हा वायरस आल्याने ते सुकले... परिणामी त्यांना कापले. सायन किल्ल्या कडे जाणारा पुर्वीचा गर्द सावलीचा रस्ता कुठे आणि आताचा भकास रस्ता बघून जीव हळहळतो.
दादर पूर्वमधल्या खारेघाट गल्ल्या >> हे नक्की कुठे?
इंद्रधनुष्य, हिंदु कॉलनी.
इंद्रधनुष्य,
हिंदु कॉलनी. किंग जॉर्ज हाय स्कूल .
हीरा किती छान माहिती देतेस.
हीरा किती छान माहिती देतेस.
Pages