तोंडाची दुर्गंधी - उपचार

Submitted by मालकंस on 7 September, 2009 - 03:38

तोंडाचि दुर्गंधी फारच विचित्र प्रकार आहे.
१) हे नुसत दात स्वच्छ न घासण्याशी संबधित आहे का?
२) या व्यतिरिक्त आजुन काही कारणं आहेत का ?
३) याच्यावर काही रामबाण उपाय आहे काय?
३) आणि स्वतःच्या तोंडाची दुर्गंधी येते की नाही हे कसे तपासावे ?

पुण्या मुंबईत कुठे उपचार घेता येतो ते क्रूपया सांगावे!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरड्यांच्या रोगानेसुध्दा तोंडाला दुर्गंधी येते.. पायोरिया की काय म्हणतात बहुधा त्याला.
हा प्रश्न वेगळा बीबी काढून का पण? आरोग्याच्या बीबी वर विचारा की. (असेल तर असा बीबी.:) )

मुख दुर्गन्धी ही प्रत्येक वेळी तोंडात असलेल्या इम्प्युरिटीज मुळेच येते असे नाही. कान्दा लसूण , इत्यादी अ‍ॅरोमॅटिक पदार्थ खाल्यानन्तर त्यातील घटक रक्तातून अभिसरित होऊन फुफ्फुसातून उच्छ्वासातून उत्सर्जित केले जातात . अल्कोहोलचा देखील वास येतो तो रक्तातून सर्क्युलेट होऊन आलेले अल्कोहोल चा अंश श्वासातून बाहेर टाकला जातो त्याचा असतो. तोंडात राहिलेल्या नव्हे. मसाले वगैरे अ‍ॅरोमॅटिक पदार्थामुळे श्वासास वास येतात. घामास देखील याच कारणामुळे विविध वास येतात. मसाले कांदा लसूण असे पदार्थ वर्ज्य करोन केवळ फलाहार घेतल्यास वास नष्ट होतात.

जास्त चहा कॉफी पिउन पण येते. / क्रॅश डायेट मुळे ही. पान व तंबाखू, सिगरेट यात भयानक केमिकल्स असतात.
त्याना ओरल कॅविटीत काही स्थानच नाही. ते नाजुक पान मस्तानी ने खाणे वेगळे व नाक्यावर्ला पानवाला जे काही विकतो ते वेगळे. वेलची वगैरे दुर्गन्धी मास्क करू शकतात पण मूळ कारण दूर करू शकत नाहीत. तिथे दंतवैद्यच पाहिजे.

हूड यान्स अनुमोदन. बीअर ब्रेथ हे एक वाइट प्रकरण आहे. बटाटावडा ब्रेथ पण I make aromatic profiles of everyone I meet because it is my line of work. That is why perfume blenders dont smoke or eat spicy food.

आणि स्वतःच्या तोंडाची दुर्गंधी येते की नाही हे कसे तपासावे ?

तोंडाजवळ तळहात नेऊन तोंडानी श्वास सोडा म्हणजे समजते स्वतःचे स्वत:ला.

तसेच ईथे जरी माहिती मिळाली तरी कुठल्याही दंतवैद्याला जाऊन भेटा.

शरीरातील PH बदलांमुळे येते हि दुर्गंधी
यामागे अनंत करणे आहेत. काही उदाहरणे;
१. दातात अन्न कण साठून कुजणे
२. मुळातच कमी हायजीन - दात न घासणे / नीट न घासणे
३. काही Uncontrolled sugar वाल्यांनाही हा प्रोब्लेम फारच तीव्रतेने जाणवतो. केवळ - असह्य (इतरांना)
किटोसीस चा वास वेगळा असतो. आणि हा वेगळा.
४. अपचन
५. दारू ( गावठी )

उपाय-
१. खूपच वाटल्यास मिठाने आणि कडुलिंब याची पूड करून त्याने दात घासावेत.
२. खूप वेळ तोंड बंद ठेवून काम करणार्यांनी ; लवंग / शुगर--फ्री चुईंग गम / वेलची दातात ठेवावी.
३. अरबट- चरबट खाऊ नये.

बर्‍याच जणांना हा प्रॉब्लेम असतो - त्यांना स्वतःला हे कळतही नाही.

नुसत्याच खाण्याच्या, पिण्याच्या, चघळण्याच्या सवयी सोडून इतरही अनेक कारणे असतात - मा बो वरील जाणकार डॉक्टर्स इथे काहीच कसे सांगत नाहीयेत ????

प्रत्येक खाण्यानंतर तोंडात पाणी घेऊन ते दातावर प्रेशर येईल अशा पद्धतीने ( दात दुखतील अशा तर्‍हेने खूप जास्त प्रेशर नव्हे ) खळखळून चूळ भरावी, जेणे करुन दातात अडकलेले/ साठलेले अन्नकण बाहेर निघतील. नाहीतर ते कुजुन वास येणारच.

आणी पोट साफ जरी नसेल तरी वास येतोच तोंडाला, त्यामुळे जीभ पण साफ करावी.

तोंड कोरडे राहात असल्याने ( जर शरीरास आवश्यक पाण्याची मात्रा न मिळाल्यास ), आणी काही बोलतच असतो आपण त्यामुळे कोरड्या तोंडात हवा शिरत राहुन तोंड आणखीनच कोरडे पडते आणी मग सुद्धा अशी दुर्गंधी येऊ शकते, पाणी आवश्यकतेपेक्षा थोडे जास्तच प्यावे रोज नियमित .. . .. .

प्रीती तुमच्या प्रश्णावर पूर्वी ईथे चर्चा झाली होती.
http://www.maayboli.com/node/2501?page=18
आता साधारण अडीच वर्षांची असेल ना मुलगी? अजूनही दात घासायला वगैरे त्रास देतेय का? तिला समजेल अशा पद्धतीने एखादी गोष्ट रचून तिचं सहकार्य मिळतंय का पहा दात, जीभ घासताना. फिंगर ब्रशचा उपयोग करून पाहिला होतात का? किंवा तिचा दात घासायचा ब्रशच हलक्या हाताने जीभ घासायला वापरून पाहिलात का? प्रत्येक वेळी खाऊन झाल्यावर खळखळून चूळ भरली जाते का? पाण्यात खेळायला आवडत असेल तर मेस अप करू दे थोडं. एखादी चांगली सवय लावायची असेल तर थोडी खेळत खेळत काय हरकत आहे?
जर मागे डिस्कस केलेले सर्व उपाय करूनही कायम दुर्गंधी येत असेल तर एकदा तिच्या डॉक्टरलाही विचारून पहा.