रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ठोकळा ठोकळी आणि दत्ता दत्तीला घेऊन बिग बजेट हिंदी सिनेमा काढूयात वर्गणी काढून.
भाऊबळी ! >> ह्यां बरां ! सगळेच हंय काय काय पचकतहत, पण बळी देतास मात्र माझ्या एकट्याचोच !!! Wink

वकीलकाका खरेच वकील वाटतायत. ताकास तूर लागू देत नाहीत. कालच्या सीनमुळे छान एस्टॅब्लिश झाली त्यांची भूमिका.
काल भांडीकुंडीच्या खेळासारखे सगळे पटापट डॉक्यूमेंट्स शोधायला लागतात आणि एक मिनीटात सापडले नाहीत म्हणून निराश होऊन चहाही पितात. दत्तीची अशी कावळ्यासारखी नजर असताना आण्णांची काय हिंमत फडताळात डॉक्यूमेंट ठेवायची? Lol
काल छायाने पण सुंदर काम केले डोळ्यात पाणी आणून आणि तिला माईंनीही छान साथ दिली. ठोकळी हावभाव बदलायचा आटोकाट प्रयत्न करत होती पण टाईमआऊट झाला. Proud

आणि सगळ्या भावांनी एकत्र या असे माईंनी सांगितल्यावर ठोकळी म्हणे माधव आजारी असला तरी मी आहे ना! यात दोन शक्यता दिसतात -
१. इंजेक्शन न देता येणारा डॉ गुपचूप सांगून गेला की इन्हें दवा की नहीं दुवा की जरूरत है.
२. ठोकळीचा समज आहे की माई पत्ते खेळायला बोलवतायत भावांना की बदली भिडू म्हणून ती खेळू शकेल.

कालच्या भागात वकील आधी फी निश्चित करून मगच कामं करतो हे दाखवलं. त्यावरून वकीलाने अण्णांकडून फी वसूल केली असेल आणि आता इस्टेटीत डल्ला मारता येतो का याची चाचपणी चालू असावी. कालचा बेरकीपणा चांगला दाखवला. कालची सिच्युएशन प्रत्यक्षात असेल तर असा वकील नाईकांना दाद लागू देणार नाही. अण्णा इतके बेरकी होते तर वकीलाचा अदमास कसा नाही आला ? कागदपत्रं त्याच्याकडे कशाला ठेवली असतील ?

वकील सहा वाटे देतात तर ते आनंदाने घ्यावेत. आपल्याकडे कागदपत्रं नसताना त्यांच्याशी वाकड्यात गेल्यास ठेंगा मिळेल. या जमिनी हडपलेल्या असल्याने चोराच्या लंगोटीसारखी गत होणार आहे. ( शिरेलीत कुणासा ठाऊक !)

गुरवाच्याच गुहेत शिरून त्याला चॅलेंज करत्येय ना ती; शिवाय, छाया, सुसल्या [ सॉरी, सुषमा], अभिराम ह्येंका सपोर्ट देताहा ना ती; घोवाकय संभाळून घेताहा ना ती; नका हो तिला असं 'ठोकळी' , 'ठोकळी' म्हणून हिणवूं !! Wink

भाऊ
अभिनयसम्राट वगैरे सारखा खिताब आहे हो तो ! तिच्या अभिनयगुणांचा गौरव आहे तो.
त्या पात्राला कुठे कोण बोलतंय ?

<< कालच्या भागात वकील आधी फी निश्चित करून मगच कामं करतो हे दाखवलं >> ती वकीलीची 'फी' नाय हो; तां 'सेटलमेंट'चां कमिशन ! गुरव असली गिर्‍हायकां वकीलाकडे आणता, ह्यां दाखवचां होता बहुतेक. अण्णा आणि वकीलाच्ये असलेच काय तरी धंदे असतले, जमिनी हडप करूंच्ये !!

कापोचेजी, मला एवढंच सुचवायचं होतं कीं हे वकीलसाहेब वकीली न करतां अशींच पटवापटवीचींच कामं गुरव, अण्णा अशांच्या संगनमतानं करत असावेत.

ह्म्म... आता वाचले सगळे प्रतिसाद.
आपल्याला आलेला संशय माईला आत्ता आलाय.. कि येवढे धड्धाकट अण्णा अचानक गेले या मागे नक्किच गौड्बंगाल आहे... ते क्से गेले ते आपल्याला शिरेल संपताना समजेल वाटतं..!

सगळ्यानी एकत्र येउ, ही माझी पण फँमिली आहे वैगरे म्ह्णणारी ठोकळी काल मला तरी आवडली .

आणि काल त्या गुरवानी जमिनीत नारळ पुरुन काय केले?
बेरीनानांची अमॄतवाणी पण नै समजली..प्लिज एक्स्प्लेन!!!

ठोकळी हावभाव बदलायचा आटोकाट प्रयत्न करत होती पण टाईमआऊट झाला. >> Lol

आणि सगळ्या भावांनी एकत्र या असे माईंनी सांगितल्यावर ठोकळी म्हणे माधव आजारी असला तरी मी आहे ना! यात दोन शक्यता दिसतात -
१. इंजेक्शन न देता येणारा डॉ गुपचूप सांगून गेला की इन्हें दवा की नहीं दुवा की जरूरत है.
२. ठोकळीचा समज आहे की माई पत्ते खेळायला बोलवतायत भावांना की बदली भिडू म्हणून ती खेळू शकेल.>>>>>>>>>>>>>>>>>> Rofl

तुमचांय कोण सुसलां - बिसलां असलांच भायेर, तर आत्तांच आणा घरांत;
घरकामाक कोण पोरग्यां मिळणांहा नाय हा माकां !!
susalyaa.JPG

Praj_n धन्यवाद Happy

अरे हे नाईक लोक किती चहा पितात? त्यांचं चहा घेणं बघून इथे मला पित्त झालं.

रच्याकने, दत्ताची बायको दत्ती, अण्णाची अण्णी मग माधवची बायको म्हणजे निलीमाला माधवी म्हणायला हवं. बाकी माधवाचा घाबरटपणा बघून मला वाटतं त्यालाच निलीम म्हणायला हवं.

वकिल आणी गुरव नारळ का पुरत होते?

बाकी अभिरामने बहुतेक 'The Secret' वाचलं असावं. म्हणून परिक्षा व्हायच्या आधीच तो पोस्टींग वगैरे बद्दल बोलतोय. कोकणात पाहुणे आले की नुस्ता चहा देतात? किमान मारी, ग्लुको अशी बिस्किटं तरी द्यावीत सोबत. आणि एवह्ढ्या उन्हातून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि पाणी द्यायचं सोडून पित्त वाढवणारा चहा? शोनाहो!

<< अरे हे नाईक लोक किती चहा पितात? >> नाईक लोकच नाय हो, कोकणातल्या सगळ्याच घरांत एका चूलीवर चायसाठीचां पाणी दीसभर उकळतच असता !
<< पाणी द्यायचं सोडून पित्त वाढवणारा चहा? >> अहो, घरीं इलेल्या कोकणी माणसाक जर चाय नाय दिलो, तरच त्येचां पित्त खवळता ! Wink
चाय आणि मासे हे खूपच जिव्हाळ्याचे गोष्टी आसत कोकण्यांसाठी; त्येच्यावर जरा जपूनच बोला !! Wink

<< अरे हे नाईक लोक किती चहा पितात? >> नाईक लोकच नाय हो, कोकणातल्या सगळ्याच घरांत एका चूलीवर चायसाठीचां पाणी दीसभर उकळतच असता ! + १

भाऊकाका व्यंगचित्र लय भारी.

स्वप्ना. कोकणात गुळ्-पाणी पहिल्यांदा द्यायची पद्धत आहे. इथे दाखवलं नसलं तरी, मग चहा देतात थोड्या वेळाने.

कोकणांत चहाप्रकरण चालूच असतं, लोकप्रिय आहे चहा.

सगळीकडे बदनामी करत फिरतील, की चहा सुद्धा नाय पाजला अशी असतात..>> +१ Biggrin
आम्ही कोकणी लोकां बाहेर कोणाकडे गेलाव नि त्यांनी चाय नाय पाजल्यानी तरी पण असाच म्हणताव मग स्वतःच्या घरी आलेल्या पावण्याक चायशिवाय कसां पाठवूचा. Wink

कोकणात किमान चहा तरी देतातच. Proud बिस्कीटं खारी वगैरे ऐपतीप्रमाणे पण अगदी गरीबाच्याही घरी गेलं की कोपभर चाय समोर ठेवलीच जाते.

Pages