पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाला तीळकुठ करता येता का?

तीळ्कुटच हवाय ना.तीळ कोरडेच भाजून घ्यायचे आणि थोडे थंड झाल्यावर बारिक करायचे मिक्सरमधून.

ति़खट नाही का घालायच?

तीळ कोरडेच आणी थोडे भाजायचे नाही तर कुटाला कडवट चव येते.

आता इथेच लिहायचं का रेसिपींबद्द्ल? कि तो जुना बीबी चालु आहे?

इथे जी तीळाची चटणी दिलीय ती नकोय मला. कोकणात बनवतात तस तीळ्कुठ हवय.

कुणाला दावणगिरी डोसा कसा तय्यार करतात हे , माहिती आहे का ?

@leenas
हो इथे लिहा. हळूहळू जुने विभाग इथे आणतो आहोत.

फणसाचे लोणचे कसे करायचे?

कच्चा फणस घेऊन त्याचे चौकोनी बारिक तुकडे करून, ते तळुन घेतात ( तुकडे करताना अर्थातच साल, गाभा वगैरे काढून टाकायचा ) मग हे तूकडे तेलात मंद आचेवर तळून घ्यायचे. आणि मग नेहमीप्रमाणे लाल मसाला व लिंबूरस घालून लोणचे करायचे.
कारवारी पद्धतीत, कैर्‍या मिठाच्या पाण्यात बूडवून ठेवतात. मग ते मिठाचे पाणी थोडे आटवून त्यात लाल मिरच्या व हिंग वाटतात. या कैरीच्या लोणच्यातच फणसाचे तळलेले तूकडे घालतात.
पण अगदी वैयक्तिक मत द्यायचे तर हे लोणच्यातले फणसाचे तूकडे चवीला काहि खास लागत नाहीत.

इथे frozen कच्च्या फणसाच्या आठळ्या मिळतात. त्याची भाजी कशी करता येईल ? normal केली तर चिकटगोळा होईल का ?

असामी त्या फ्रोझन आठळ्या अत्यंत वाइट लागतात, कार्डबोर्ड चे तुकडे फ्रीझ करून त्याची भाजी केलीस तरी बरी लागेल कदाचित Lol मी त्या आठळ्या आणून त्यांची दोन प्रकारे भाजी करुन पाहिलेय. काहीच चव नाही शिवाय ते फ्रीझ करून थॉ केल्याने Texture पण वेगळंच लागतं. आणल्याच असशील तर कॉम्पोस्ट कर सरळ Happy

शोनूला अनुमोदन. मला आठळ्या नुसत्यासुद्धा मिठासोबत उकडून खायला आवडायच्या. आता त्याला पर्यात म्हणून रोस्टेड चेस्टनट्स खाते. Happy
.
बाकी असाम्या, तुझा स्वयंपाकाच्या बा.फ. वरचाच फक्त वावर वाढलाय की actual स्वयंपाकघरातला पण? का? Proud

धन्यवाद दिनेशजी

ए, इथे टीपी करु नका. अजून 'कोकणात करतात ते तीळ्कूट' आणि 'दावणगिरी डोसा' या कृती यायच्या आहेत. तिथे लक्ष जात नाही.
आणि रेसिप्या इथे अज्जिब्बात टाकायच्या नाहीत. 'नवीन पाककृती' लिन्क वापरुन लिहायच्या. मग त्या नंतर नीट सापडतील.
(हे मला मिलिंदाने नाही सांगितले लिहायला, मीच लिहीले आहे. ~D)

नारळाचं दूध कसं मिळवतात?
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

इथे नव्हती झाली का चर्चा, नारळाच्या दूधाची ?
दूधासाठी नारळ बघून घ्यावा लागतो. फार कोवळा असेल तर दूध निघत नाही आणि जून असेल तरी निघत नाही. अर्थात नारळ फोडल्यावरच ते कळते.
खोबरे ओलसर असते त्या नारळाचे दूध चांगले निघते.
नारळ खोवून घ्यायचा. उत्तम नारळाचे दूध नुसते खोबरे हाताने पिळून निघते, पण
तितका ताजा नारळ बाजारात येत नाही.
या खोबर्‍यात अर्धा कप कोमट पाणी घालून तो मिक्सरमधे वाटायचा. मग गाळणीवर तो चोथा टाकून पिळून घ्यायचा. हे घट्ट दूध असते. खूप वेळा पाककृतीत नारळाचे दोन प्रकारचे दूध वापरायचे असते. तर हे घट्ट दूढ वेगळे ठेवायचे.
मग त्या चोथ्यात कपभर कोमट पाणी घालुन परत वाटायचे, असे आणखी एकदा करायचे. यावेळी निघते ते पातळ दूध.
साधारणपणे पदार्थ शिजताना पातळ दुध घालतात आणि पदार्थ शिजला कि दाट दूध घालतात. दाट दूध घातल्यावर पदार्थ उकळायचा नसतो.
सोलकढी सारख्या प्रकारात, दोन्ही प्रकारचे दूध एकत्र करायचे असते.
दाट दूध फ्रीजमधे ठेवले तर वर साय जमा होते. ते कोकोनट क्रीम. काही थाई पदार्थात ते लागते. पण सहसा दूध ताजेच करायचे असते. फ्रीजमधे ठेवले कि वर दाट साय येते आणि खाली पाणी उरते.
कोकणात बर्‍याच वेळा ताज्या दूधाला पर्याय म्हणून नारळाचे दूध वापरतात. हे दूध वापरून शिकरण वगैरे करता येते.
काहि पदार्थात ताजे दूध वापरणे शक्यच नसते पण तशी चव अपेक्षित असते त्यावेळी हे दूध वापरतात. उदा. पाठारे प्रभू लोकांचे, अननसाचे सांबारे.
टिनमधे दोन्ही प्रकारचे दूध मिळते. नेसले ची नारळाच्या दूधाची पावडरही मिळते.

धन्यवाद!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

कुणाला आंध्रा स्टाईल भाज्या किंवा सांबार कश्या करायच्या हे माहीत आहे का? त्या इतक्या झणझणीत असतात, त्याच्या फोडणीत काय काय घालायचे हे सांगितले तरी चालेल.

असामी, तुला फणसाच्या आठळ्यांचीच भाजी हवीय की फणसाची चालणार आहे?

अग इथे frozen फणसाच्या आठळ्या नि frozen कच्चा फणस पण मिळतोय. तर त्यांच्याबद्दल विचारत होतो कारण मला दोन्ही चिकटगोळा होतील असे वाटतेय.

पण तू कॅन्ड फणस का नाही वापरत? भाजीच करायची आहे नं?

मिनोती, हा ब्लॉग तुझाय होय. मला माहित नव्हतं. भरपूर कलेक्शन आहे रेसिपीचं.

मिनोती कराडकर प्रश्न असा होता की frozen असल्यामूळे भाजी चिकटगोळा होईल असे वाटत होते तर कोणाला अनुभव आहे का. Canned वापरतो एरवी, पण frozen without preservatives आहे म्हणून हि उठाठेव.

Proud बरं झालं क्लिअर केलंस. नाहीतर किती पोस्ट येऊन पडल्या असत्या.

असाम्या, तुझ्या वयोगटातले भारतीय पुरुष एकटे किचनमधे फणसाची भाजी करतात का, हा खरा प्रश्न आहे. ती उत्तम होते की नाही यावर नंतर बोलू. Proud

करत असतील एकटे, पण एकट्यानेच संपवावी लागते का हा त्याहूनही महत्त्वाचा नाही का प्रश्न?
माझ्या अनेक प्रकारांचा असाच अंत होतो नेहेमी. सर्वे फूडा कुकस्य पोटम आश्रयंति Proud

तुझ्या वयोगटातले भारतीय पुरुष एकटे किचनमधे फणसाची भाजी करतात का, हा खरा प्रश्न आहे. >> सगळ्या posts मधे मी कुठेतरी प्रथमपुरुषी एकवचनी शब्दप्रयोग केलाय का ? Lol

Pages

Back to top