काही परकीय अमराठी भाषेतील शब्द आणिक त्याचा मराठी अनर्थ
खर तर सदर विषय हा लेखनाचा स्वतन्त्र विषय होऊ शकतो का ? हा खरोखरच सन्शोधनाचा विषय आहे. मला खर तर ह्या विषयाचा स्वतन्त्र ध्हगाच काढायचा होता पण ते जमल नाही त्यामुळे हा लेखन प्रपन्च.
माझ्या अमराठी भाषान्च्या कुतुहला पोटी म्हणा किन्वा नको तीथे लुडबूड करण्याच्या खोडीमूळे म्हणा (कॉलेज शब्द किड्यान्मूळे) मी काही अमराठी शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पर्देशातील काही काळाच्या वास्तव्यामधे मला काही अमराठी आणिक काही परकीय भाशीकान्शी सन्वाद साधण्याची सन्धी मिळाली. त्यातून हे जे काही शब्द आहे ते मी शिकलो.
माझ्या ट्रेनीन्गच्या काळात काही गुजराथी अशीलाबरोबर काम करण्याची सन्धी मिळाली त्यातील चुम्माळीस म्हणजे मराठीतील चव्वेचाळीस आणि पिस्ताळीस म्हण्जे मराठीतली पन्चेचाळीस ही गोष्ट मला अजूनपर्यन्त पटलेली नाहीये (हा पिस्ता मला काही पचनी पडलेला नाहीये)
तसेच गुजराथीत लिहीलेला व्याजनू खाता हा शब्द मराठीतला/ देवनागरीतला " प्यार नू खाता " असा मी वाचायचो. आणिक गुजराती लोक जात्याच 'प्रेमळ' (गुजराथी मा बोले हू प्रेम करू शू ) असल्याने मला तन्तोतन्त खरा वाटायचा.
गुजराथीतील आणि एक प्रसिद्ध शभ म्हणजे गान्डा ह्या शब्दाचा मराठीत किन्वा हिन्दीत भयानक अनर्थ होईल पण असा शब्द गुजराथीत आहे खरा.
माझ्या परदेशातील काही काळाच्या वास्तव्यात माझा काही केरळी/ मल्याळम लोकान्शी सन्बन्ध आला. असे म्हणतात की केरळी लोक एकवेळ केरळात भेटणार नाहीत पण ते जगाच्या पाठीवर दुसरी कडे कुठेही भेटतील. अशीही एक आख्यायिका आहे की नील आर्मस्ट्रोन्ग जेन्व्हा पहिल्यान्दा चन्द्रावर गेला तेन्व्हा त्याला तीथे केरळी माणसाने चहा पाजला. खरे-खोटे देव जाणे.
तर ही गुळूगुळू मुळूमुळू मल्याळम भाषेत भाताला मोरु म्हणतात ताक्/दह्याला चोरू म्हणतात (लोणच्याला बहुदा जोरू म्हणत असावेत. तशीही जोरु तिखट असतेच म्हणा)
म्हणजे आपण भातावर ताक घेतले की ते म्ह्णणार चोरुवर मोरु. आपल्याकडे म्हण आहे ना "चोरावर मोर" तिच उगम स्थान बहुदा "चोरुवर मोरु " वरून झाल असणार.
चण्याला ही मल्याळम मण्डळी म्हणतात कडलै वास्तविक कढवण्याचा आणिक चण्यान्चा काही सम्बन्ध नाही पण ह्याना कोण समजावणार आणि कुठल्या भाषेत समजावणार
आता तामिळ भाषा म्हटलीकी तोन्डत पाणी खेळवत श्वास न घेता बोलायची सवय तुम्हाला सायला पाहीजे. ह्यात क्रियापद पुरूष काही वेगळाच चालतो. पो म्हटल तर चालता हो पोहोया म्हटल तर जा आणि पोहोलामे म्हटल तर आपण निघूया (आपण दोघे किन्वा जितके असतील तितके चाल्ते होऊया थोडक्यात कटूया) म्हणजे "चालणे" हा शब्द किती चालतो बघा तामिळ भाषेत.
आता मी जर म्हटल " मिक्क णनड्री" तर तुम्हाला वाटेल मी तुम्हाला शिवी दिलीये आणि तुम्ही भा.ण्डायला याल माझ्याशी पण मी जर ह्याचा अर्थ सान्गीतला तुम्हाला की "खुप खुप धन्यवाद" तर तुम्ही गोन्धळून जाल का नाही. तसच असत ते.
एकदा अशीच गाडीत गम्मत झाली. कुण्या एका पन्जाबी माणसाला एक कुणी बिगर पन्जाबी माणसाचा छोटा मुलगा धक्का देत होता तेन्व्हा तो पन्जाबी म्हणाला " अरे ओय तेरे लोन्ढे को सम्भाल इधर उधार हिलता है " तेन्व्हा पुर्ण डब्यात जोरदार हास्य रस उसळला
ही झाली भारतीय भाषान्ची कथा. पण परकीय भाषान्ची गत काही फारशी वेगळी नाहीये. फीलीपिनो लोकान्ची तघलूक काय नावची भाषा असते त्यात शब्दान्ची थोडीशी वानवा असावी कुठच्या सुन्दर किन्वा शुभ साठी ते "मगन्धान्ग" हा शब्द वापरतात म्हणजे बघा मगन्धान्ग उमागा (शुभ सकाळ) मगन्धान्ग हापेन (शुभ सन्ध्याकाळ ) मगन्धान्ग गबी (शुभ रात्री ) सुन्दर मुलगी असली तरी मगन्धान्ग सुन्दर चित्र असल तरी मगन्धान्ग सुन्दर जेवण असल तरी मगन्धान्ग (जोर से बोलो जयमातादी. त्वमेव मगन्धान्ग त्वमेव मगन्धान्ग )
भावाला म्हणतात " कुया " आणि बहीणीला म्हणतात " आते " बहिणीला आत्या म्हणायची ही काय बर पद्धत ? आणि धन्यवाद ला म्हणतात " सलामत"
आपले शेजारी श्रीलन्कन ह्यान्ची सिन्हीली भाषा एकदम निराळी.कुणाची चौकशी करायची असेल तर ते म्हणतात " कोहमद" मग आपण जर मजेत असू तर उत्तर द्यायच "हुन्दाय" आणि यथा तथा असू तर उत्तर द्यायच "वरदग्नै" (मराठीत विचार केला तर माझ्या कडे हुन्दाय गाडी आहे मी मजेत आहे किन्वा मी मजेत नाही मला वर दे की रे ) कोथीन्बीरी ला हे लोक म्हणतात "कोत्तुमाल" गोड वाटतो पण शब्द
अरेबीक लोक कुणाची चौकशी करायची तर म्हणतात "कैफल हाल " किन्वा "कैफालिक" मग ह्याच उत्तर द्यायच " अल हमदुलील्ला असमतुल्लाह रेहेमतुला बरकातू " (ह्याचा अर्थ मी देवाच्या कृपेने मजेत आहे आणि देवाच्या दयेने माझी बरकत होईल ) हे म्हणजे मराठीत तू कसा आहेस बाबा? आस विचारल्यावर त्याला गितेतला " कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेशु कदाचन " हा श्लोक म्हणून दाखवल्यासारखा आहे. "आखुय" म्हणजे भाऊ आणिक "आख्ता" म्हणजे बहिण. लहान मुलाला गोड म्हण्याच तर वापरा "हेलुवा" पण हेच हेलुवा जर "भुनैया" आधी जोडलत तर बुरख्या आडून फटके पडतील कारण हेलुवा भुनैय्या चा अर्थ होतो फटाकडी पोरगी. त्यामुळे मग पळायची तयारी ठेवा. "बखलावा" म्हणजे मिठाई तर "बकला" म्हणजे बायकी पुरूष. त्यामुळे ख च्या ऐवजी क वापरलात तर आणिबाणी उदभवू शकते
फ्रेन्च लोकान्च इन्ग्लीश लोकान्शी अगदी वावड. ईन्ग्रजी मधले शब्द ते तोडून फोडून न्याहरीला वापरतील. आता ईन्ग्रजीत "मर्सी" म्हणजे दया पण फ्रेन्च मध्ये हाच मर्सी होतो "मेस्सी" अणिक त्याचा अर्थ होतो धन्यवाद
हे फ्रेन्चही "बॉन" शब्द कशा पूर्वीही वापरतात "बॉन जोर" (सुप्रभात) बॉन नुई (शुभ रात्री) "बॉन अपेत्ती" (तुम्हाला चा.न्गली भुक लागो आणिक चान्गले जेवण जावो ) अश्या अर्थाच मराठीतल एक " वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे " सोडल तर दुसरे काही ऐकीवात नाहीये. आहेच आपली मराठी भाषा तेवढी सबळ
मित्रानो खर तर माझे ज्ञान आणिक लेखन कौशल्य हे सर्व लिहीण्यास व्यक्त करण्यास खुप तोकडे आहे. मराठी भाषा दिनाच्या एक दिवस आधि माझ्या कडून असल काही लेखण माझ्या हातन झाल हा मी माझा देवी सरस्वतीचा माझ्यावरील आशिर्वाद समजतो आणि माझे लिखाण वाचल्या बद्दल म.ण्ड्ळी धन्यवाद, मिक्क णन्ड्री, सलामत, आणिक मेसी
लिखाण : केदार अनन्त साखरदाण्डे दिनान्क २६/०२/२०१६
चुकन्दर
चुकन्दर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मल्याळम मध्ये मळघ पोडी
मल्याळम मध्ये मळघ पोडी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एखाद्या मुलीचे चित्र उभे रहाते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण मळघ पोडी चा अर्थ आहे मिरचीची पूड
जर्मन मध्ये 'ब्लाऊ'(ब्लु)
जर्मन मध्ये 'ब्लाऊ'(ब्लु) म्हणजे 'ड्रंक' पण आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'हाटमुट वार ब्लाऊ' म्हणजे हाटमुट 'निळा' नव्हता, 'पिऊन टाईट' होता
हा हाटमुट आमच्या जर्मन क्लासाच्या पेपरांमध्ये नेहमी असायचा. 'कमल नमन कर' वगैरे सारखे कॉमन नाव.
मग ब्लाउपुंक्त म्हणजे
मग ब्लाउपुंक्त म्हणजे नीलबिंदु की पिउन टाईट होणार्यांचा अड्डा?
हा ब्रँड आहे काय? आता सर्च
हा ब्रँड आहे काय? आता सर्च केले
इथे गुज्जू कंपनीत जॉइन
इथे गुज्जू कंपनीत जॉइन केल्यावर पहिल्याच दिवशीचा बाउंसर. बहुतेक स्टाफ गुज्जूच. सकाळी सकाळी चेअरमनच्या पारशी सेक्रेटरीचा फोन. सवईप्रमाणे आगापीछा न पाहता थेट गुज्जूत सुरु " अमुक अमुक रिपोर्ट जल्दी मोकल" गुजराथी मधे 'मोकल' चा अर्थ पाठव असा होतो. आम्ही मित्रमंडळी 'मोकळा होणे' हा भलत्याच अर्थाने वापरायचो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा ब्रँड आहे काय? आता सर्च
हा ब्रँड आहे काय? आता सर्च केले
हो. कार ऑडिओ आणि जिपिएस वगैरे बनवतात.
माझ्या कार मध्ये या कंपनीचा प्लेयर होता.
अरेबीक मध्ये गाढवाला हुमार
अरेबीक मध्ये गाढवाला हुमार म्हणतात
आमचा एक अरेबीक कलीग कुमार शानू ला हुमार शानू म्हणायचा (किती चपखल ना ?
)
अरबान्च्या धार्मिक पोलीस ला
अरबान्च्या धार्मिक पोलीस ला "मुतव्वा" म्हणतात
पोलीस ईतका बेशीस्त असतो म्हटल्यावर आम्हाला मज्जा वाटायची![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरेबीक मध्ये श्लोनख : कसा
अरेबीक मध्ये
श्लोनख : कसा आहेस?
श्लोनच : कशी आहेस?
मुहिन्दीस म्हणजे ईन्जीनीयर
मुहासिब म्हणजे अकाउन्ट्ण्ट
मुदीर म्हणजे मॅनेजर
... आणि मुस्त्श्फा म्हणजे
... आणि मुस्त्श्फा म्हणजे हॉस्पीटल.. आहे ना टंग ट्विस्टर !
आमचा एक अरेबीक कलीग कुमार
आमचा एक अरेबीक कलीग कुमार शानू ला हुमार शानू म्हणायचा (किती चपखल ना ? फिदीफिदी )>>.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कुमार सानु ला गाढव का म्हणून र्हायला वो?
हिंदीतील चेष्टा म्हणजे
हिंदीतील चेष्टा म्हणजे प्रयत्न
केदारा, भन्नाट लिखा
केदारा, भन्नाट लिखा है!
पालु-दुध
आमच्या एका क्लायंटच्या एका
आमच्या एका क्लायंटच्या एका ज्येष्ठ सदस्याने माझ्या एका नवागत सहकार्याला हबीबी असे संबोधले. त्याचा अर्थ काय हे न कळल्यामुळे तो आतून टेन्शनमध्ये आला. अर्थ शोधून काढेस्तोवर त्याला चैन पडला नाही. आणि अर्थ शोधल्यावर पुन्हा टेन्शनमध्ये आला
गुगलने सांगितलेला अर्थ ("my darling" or "sweetie")
अरब अनौपचारिक बोलताना संभाषणात मोकळेपणा आलेला असेल तर सहज हबीबी असे संबोधतात. मुलींना हबीबती. पण मुलींना असे बोललेले मी ऐकले नाही. कदाचित स्त्रिया म्हणत असतील.
@ मी नताशा अहो म्हणजे गाढव
@ मी नताशा![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अहो म्हणजे गाढव ?
आणि हे बायकांना माहीत असतं ?
.
हबीबी ☺☺☺
हबीबी ☺☺☺
हबीबती म्हणजे प्रिये या
हबीबती म्हणजे प्रिये या अर्थाचा शब्द आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणिक दूध म्हणजे हलीब![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चहा म्हणजे शाय (लाजाळू नाही )
मस्कीन नाफर (डफर च्या चालीवर
मस्कीन नाफर (डफर च्या चालीवर ) म्हणजे गरीब मनूष्य आणि अरबाब म्हणजे श्रीमन्त मनूष्य
(आमच्या कोकणीत बाब म्हणजे आदरार्थी शब्द आहे )
अरेबीक भाषेत 'प' ह्या अर्थाचा
अरेबीक भाषेत 'प' ह्या अर्थाचा उच्चार नाही
आमचा बॉसचे नाव पदम होते त्याला अरेबीक लोक बदम म्हणायचे (आम्हालाही ते बदाम म्हटल्यासारख वाटायच )
अरेबीक मध्ये : शोये शोये
अरेबीक मध्ये :
शोये शोये म्हणजे पण हळू हळूहळू
मिन्नी मिन्नी म्हणजे हळूहळूच पण थोड उपरोधाने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेपाळी भाषेत अॅ व ऑ नाही
नेपाळी भाषेत अॅ व ऑ नाही त्या मुळे कॉलेज हे कलेज आणि ऑफिस हे अफिस होते
नेपाळी भाषेत अॅ व ऑ नाही
नेपाळी भाषेत अॅ व ऑ नाही त्या मुळे कॉलेज हे कलेज आणि ऑफिस हे अफिस होते <<< हिंदीत पण नसते ना? म्हणून ते बैंक औफ इंडिया लिहिलेलं असतं?
>>(आमच्या कोकणीत बाब म्हणजे
>>(आमच्या कोकणीत बाब म्हणजे आदरार्थी शब्द आहे )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बा.भ.बोरकर यांना बाकीबाब म्हणत, त्यातला बाब आत्ता कळाला, पण बाकीचे काय ?
ईंग्रजी सारख्या अतिपरीचयाने
ईंग्रजी सारख्या अतिपरीचयाने अवज्ञा झालेल्या भाषेने दाखवलेला ईंगा:
पहिल्या वहील्या नोकरीच्या ठिकाणी एकदा दारात अँब्युलन्स दिसली. जरा धाकधुकीतच एकाला काय झालं ते विचारलं. त्यावर तो अमुक तमुक 'passed out' असं सांगितलं. मी तो शब्दप्रयोग पहिल्यांदा ऐकत होतो आणी माझ्या मेंदुत ते 'passed away' असं डिकोड झालं. मला काही सुचेना. बरोबर काम करणारी एक व्यक्ती डेस्क वर मरून पडते आणी सगळे जण सहजतेनं पुन्हा कामाकडे वळतात हा मोठा धक्काच होता.
थोड्या वेळानी कुणीतरी त्या 'अमुक तमुक' ने फोन केला वगैरे सांगितलं. आता मात्र माझे डोळे पांढरे व्हायच्या बेतात आले होते. गेलेला माणुस चक्क फोन करतो हे मात्र अतीच होतं. असो. त्या प्रसंगातून 'pass out' म्हणजे अमेरिकन ईंग्रजीत चक्कर येऊन पडणे हे ज्ञान प्राप्त झालं.
कोकणी भाषेत " भायर पडलो "
कोकणी भाषेत " भायर पडलो " म्हणजे मरण पावणे (जगाच्या बाहेर पडणे)
एकदा अशीच गम्मत झाली. एक गोव्याचा मुलगा गावी गेला जाताना कम्पनी मध्ये " सोयरो भायर पडलो" म्हणून रजा सान्गून गेला
परत आल्यावर तुझा बाहेर पडलेला सोयरा परत आला का म्हणून सहकार्यानी त्याचे डोके खाल्ले
अरेबिक मध्ये "सुप्रभात" ला
अरेबिक मध्ये "सुप्रभात" ला सबाह अल खैर म्हणतात (म्हणजे तुझी काही खैर नाही)
सबाह अल खैर चे उत्तर सबाह अल नूर (म्हणजे तुझा नूर आज काही वेगळाच दिसतोय
तसेच तामीळ किन्वा मल्याळम मध्ये पार्श्वभागाला " कुन्डी" म्हणतात. मग रोपट कशास म्हणत असतील बर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त धागा..कानडीत सोनं=
मस्त धागा..कानडीत सोनं= भंगारं...लग्नात हा शब्द सारखा ऐकून एक्दम चकीतच झाले होते Lol
Submitted by श्रद्धादिनेश on 1 March, 2016 - 03:51
हि लोक सोन खरेदीला जाताना असे म्हणत असतील .. चला भंगार (सोन) खरेदीला जाऊ ... हा हा हा हा हा
Pages