रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेरीनाना जातील असं नाही वाटत, उलट ते सुधारत जातील, आता आवाज खणखणीत झालाय.

ठो ठो नाही जाणार मुंबईला, ती ठोकळी मेन हिरवीण आहेना, तिच सगळं शोधणार आहेना, सायंटीफिकली प्रुव करणार आहेना, भुतं नसतात ते.

आता तिच्याकडे बघुन मला तिच माणसातील भुत वाटते, ती वेगळी गोष्ट Wink . बहुतेक माझ्या नजरेतला दोष असेल.

काल गणेशला बाहेर जाण्यापासून थांबण्यासाठी दत्ती रडत असताना, तिच्या मदतीला कोणीही उठलं नाही.
ठोकळी कडून अपेक्षाच नाहीत, पण आर्चिस असं बाहेर गेला असता तर ही शांत बसली असती का?
ठोकळा एकाच जागी बसून हाताने 'थांब,' 'राहू दे, 'असु दे' ची अ‍ॅक्शन करत असतो.. अभिराम , अर्चिसही नुसतेच डोळे मोठे करून पहात होते.. Uhoh

आता आज काय तर ठो१ म्हणणार 'हिच्या तोंडुन चुकुन निघुन गेलं..!"

ठोकळी हुशार कमी मग्रुरच जास्त वाटते, एवढे सांगतात आहे दार उघडू नका, ओ देऊ नका तरी विचारते कोण आहे. बर दत्ता निघाला जायला तरी थांबविले नाही कि मी उघडते दार. काय ग बाई!

कसली सायंटिस्ट आहे ह्याचा उलगडा नाही केला >>>>मला तर आता ठोकळीचाच संशय यायला लागलाय. Uhoh Proud
सगळ हिच्यासोबतच कसं घडतंय. (म्हणजे ज्याचा या सगळ्यावर विश्वास नाही त्यासोबतच सारं घडतय)
१. समुद्रावरून घरी येताना ती हिरवा शालु/हिरव्या चुड्यावालीच भेटण.
२. कोणीतरी गळा दाबत असल्यासारखं वाटण
३. स्वयंपाकघरात मळवट भरणं

आठवा मराठी चित्रपट "हा खेळ सावल्यांचा" शेवटच्या सीनमध्ये "नरसुच्या भूताला" पकडल्यावरही "देवघरातुन ऐकु येणारे श्लोक" Proud

दार उघडल्यावर कोण ती वाईट शक्ती घरात येणार होती ना? पण नंतर दत्ताने बाहेर जाऊन येऊन दार बंद करुन घेतल्यावर बेरी नाना बोलतात.. "गे बाय अंगणात का उभी? घरात ये, घरात ये. " (काल बेरी नाना काय बोलत होते ते स्पष्ट ऐकू आलं, नैतर कळायचचं नाय काय ते. )

बेरी नानांचा पण हात असू शकतो या सगळ्यात भुताला घरात ये, घरात ये म्हणून आग्रह करतात, काय माणूस हायत कि काय? Wink

काल गणेशला बाहेर जाण्यापासून थांबण्यासाठी दत्ती रडत असताना, तिच्या मदतीला कोणीही उठलं नाही.
ठोकळी कडून अपेक्षाच नाहीत, पण आर्चिस असं बाहेर गेला असता तर ही शांत बसली असती का?
ठोकळा एकाच जागी बसून हाताने 'थांब,' 'राहू दे, 'असु दे' ची अ‍ॅक्शन करत असतो.. अभिराम , अर्चिसही नुसतेच डोळे मोठे करून पहात होते. >> + १
वर ठोकळीने 'काय कटकट आहे' चा लुक दिला तिच्याकडे पाहून.

पावणेबारा वाजता दारं बंद करायचं सुचतं दत्ताला. त्यासाठी पण गडी लागतो. भूतं टायमिंगची पक्की असतात यावर विश्वास दिसतोय.

भूतं टायमिंगची पक्की असतात यावर विश्वास दिसतो>>चला म्हणजे किमान भूतं वेळ पाळतात भारतात , ही गोष्ट त्यांच्यापासून शिकण्यासारखी आहे..

भूतं टायमिंगची पक्की असतात यावर विश्वास दिसतो>>चला म्हणजे किमान भूतं वेळ पाळतात भारतात , ही गोष्ट त्यांच्यापासून शिकण्यासारखी आहे.. >>
नाय ते ५ मिनिटं उशिरा आलं. लवकर येणार नाय यावर विश्वास असणार त्याचा. Happy

नाय ते ५ मिनिटं उशिरा आलं. लवकर येणार नाय
यावर विश्वास असणार त्याचा.>>> म्हणजे भूताला पण भारतीय प्रमाण वेळ लागू होते

लोकसत्तामधला लेख एकदम मस्त आहे. तिथे कुठे प्रतिक्रीया देण्याची सोय नाहीये. नुसत्यात स्मायलीज आहेत.

पण ते घर भारीये. आता मालिकेत अशा भयानक पद्धतीने दिसले नसते तर मला रहायला नक्कीच आवडले असते. मला गावाकडची घरे फार आवडतात. त्यातल्या त्यात कोकणातली.

आता मालिकेत अशा भयानक पद्धतीने दिसले नसते तर मला रहायला नक्कीच आवडले असते >>>> किमान इथे बॅकस्टेजवाली मंडळी यशस्वी झाली म्हणायची..

त्या घराबद्दल व्हॉट्सॅप वर एक मेसेज आला. तो इथे पेस्ट्च होत नाहिये.
तो वाडा कुडाळ मधला आहे. भिकाजी शेटकर यांचा दीड्शे वर्षापूर्वीचा.
महानंदा चित्र्पटात पण म्हणे या वाड्याचे शूटींग आहे.

काल ते सर्वानी मिळुन एकत्र झोपायची तयारी, अन्थरूण घालणे , तु ईथे झोप हे पान्घर वैगरे.. खुप मस्त वाटले. साधेपणा रीलेट झाला..

बाकी गण्या चा खुप राग आला : :राग:. आई बाप साग्तायेत येवढे तर कशाला जायचे... आणि तो ट्कलासा अन्धारात उभा माणुस आधी मला अण्णान्चे भुत वाट्ला होता!!:G

ठोकळी हुशार कमी मग्रुरच जास्त वाटते, एवढे सांगतात आहे दार उघडू नका, ओ देऊ नका तरी विचारते कोण आहे. बर दत्ता निघाला जायला तरी थांबविले नाही कि मी उघडते दार. काय ग बाई! >> +१११

ठोकळी हुशार कमी मग्रुरच जास्त वाटते, एवढे सांगतात आहे दार उघडू नका, ओ देऊ नका तरी विचारते कोण आहे. बर दत्ता निघाला जायला तरी थांबविले नाही कि मी उघडते दार. काय ग बाई! >>>> मला अंदाज होताच ओ देउ नका म्हटल तरी ही शाबाच ओ देणार, पण दत्ता येवढा जीवावर उदार व्हायला निघालाय तरी ही गप्पच?.. कमाल आहे Uhoh

ठोकळी हुशार कमी मग्रुरच जास्त वाटते, एवढे सांगतात आहे दार उघडू नका, ओ देऊ नका तरी विचारते कोण आहे. बर दत्ता निघाला जायला तरी थांबविले नाही कि मी उघडते दार. काय ग बाई! >>>>+१

आणि तो गणेशा जायला निघालाय ती दती एवढी धरतेय त्याला जाउ नको म्हणतेय तर एकही जण उठुन त्याला अडवत नाही? माई? माधव? ठोशा नैतर अभिराम तरी?

आणि दार आधीच लाउन घ्यायच ना. पावणे बाराला का ते? कुठल्या गावी माण्सं पावणे बारा-बारा पर्यंत जागे असतात दार उघडं ठेउन?
आम्ही गावी जातो तर आक्ख्या वाडीत आमच्याच घरी आवाज असतो रात्री. बाकी सगळी वाडी साडे नौ - दहाला सामसुम गपगार.

कुडाळ तालुक्यातील आकेरी गावात या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. भिकाजी बाबाजी शेटकर यांचा हा वाडा, स्वातंत्र्यपूर्व काळात सुमारे दिडशे वर्षांपूर्वी तो बांधण्यात आला आहे. शेटकर यांच्या तिसर्या पिढीकडे हा वाडा असून यापूर्वी काशिनाथ घाणेकर यांची प्रमुख भुमिका असलेला महानंदा या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले आहे. माझे मित्र कला दिग्दर्शक रविकिरण शिरवलकर, विजय पालकर आणि मी अलिकडेच या चित्रीकरण स्थळी जाऊन आलो. मालिकेत भयानक वाटणारा हा वाडा खुपच मजेशीर आहे. विहिरीत २ फुटापेक्षा जास्त पाणी नाही. या वाड्यालगत आकेरी गावकरी यांची खुप घरे आहेत. त्यामुळे तुम्ही येथे भुतावळ शोधायला गेलात तर हाती काहीही लागणार नाही.....

>>> @अंजली_१२ - हाच ना मेसेज ?

कोकणात जाणं येणं असतं. संध्याकाळी सहा पर्यंत जेवणाची ~ओर्डर द्यायला लागते. आठ वाजेपर्यंत गेलं तर ठीक नाहीतर निरोप येतात बंद करायचंच्य म्हणून. नऊ नंतर रस्ते ओस पडतात.

दत्ताने संध्याकाळी ६लाच दाराला आतमधून कुलूप लावून किल्ली स्वतःच्या खिशात टाकून द्यायची. हाकानाका. जा म्हणावे सुसल्या कुठे जातीस तिकडे. Proud

कुठल्या गावी माण्सं पावणे बारा-बारा पर्यंत जागे असतात दार उघडं ठेउन?
आम्ही गावी जातो तर आक्ख्या वाडीत आमच्याच घरी आवाज असतो रात्री. बाकी सगळी वाडी साडे नौ - दहाला सामसुम गपगार. >>>> एकदम करेक्ट..

दत्ताने संध्याकाळी ६लाच दाराला आतमधून कुलूप
लावून किल्ली स्वतःच्या खिशात टाकून द्यायची.
हाकानाका. जा म्हणावे सुसल्या कुठे जातीस तिकडे.>> अहो ६ला बंद करून कस चालेल ? सुसल्याच जाऊ द्या पण सू ला तर बाहेर जाव लागणारच ना . त्यात भीतीने त्याची प्रवृत्ती जास्त होते .

Pages