रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही आत्ताचा प्रोमो पाहीला का ??? दत्ता दार उघडताना दाखवलाय
खिक्क! कोणीतरी घरातलाच सदस्य बाहेर राहिला वाटतं! Wink

>>दत्ता-दत्ती, ठोकळा-ठोकळी<<
हा धागा जानीच्या धाग्याचा रेकॉर्ड मोडणार बहुतेक.

बॅक ग्राऊंड म्युझिक थोडे बंद ठेवायाला हवे होते, त्या म्युझिक मुळे दारावर मारलेल्या थापा नीट ऐकायलाच आल्या नाही , सगळा थरार घालवला .. फुस्स !

अ‍ॅड सुरु व्हायच्या आधी 'काही क्षणात ...'" म्हणून पुढे काय होणार ते दाखवून सगळे 'इलेमेंट ऑफ सरप्राईज' / सस्पेन्स घालवून टाकत आहेत ..माठ लोकं आहेत ..

एवढं दार ठोठावून बाहेर कोणीच नव्हतं !! Sad
शेवटी ते बेरीनाना कोणालातरी आत ये सांगत होते ना, आणि मग दिवे गेले, तेव्हा कोण किंचाळलं?

अरे आज बघितला, काय ते काही घडलंच नाही, लास्ट बेरीनाना ये ये म्हणाले, त्यांनाच दिसतंय कोणीतरी. बाकी दत्ता बेस्ट अभिनय, एकदम सहज.

त्यापेक्षा इथल्या भुत स्मायली मजा आणतात.

ठोकळी मात्र ठोकळीच रहाणार, काय वेरिएशन्स नाहीतच. पहील्या दिवशी जो टोन तोच आताही.

बाकीचे बरा अभिनय करतायेत, पहील्या दिवसापेक्षा. काहीजण चांगला करतायेत, ठोकळीला कधी सुर गवसणार.

येप्प! ठोकळी एवढे सगळे लोक टेन्स असतानाही लॅपटॉप बडवत होती, बहुतेक मायबोलीवरच्या प्रतीक्रिया वाचत असेल.:खोखो:

इतक्या दिवसान आजचो भाग जरा बरो होतो.दत्ती,दत्ता,सासुबाय यांची कामा सुरेख होतसंत.ठो ठो ची नेहमीची बोंब. सुषमा एकदम मॉड झाला

ती जर मायबोलीवरच्या प्रतिक्रीया वाचत असेल तर नाही हसणार, ती तुम्हा सगळ्यांची अंधश्रद्धा आहे म्हणेल.

ठोकळीच्या आवाजातले सूक्ष्म चढ उतार नाहीत का जाणवले ? कुठे गेल्या जाणिवा नेणीवा ? कि दत्तीच्या अभिनयाचा भूकंप आल्यावरच जाग्या होणार त्या ?

ठो चा क्लास नासीर, ओम पुरी , शबानाचा आहे. अभिनयाचं प्रदर्शन करत फिरत नाही ती. वेळप्रसंग आल्यावर राखून ठेवलेलं धन काढणार बाहेर काटकसरीने. दत्तीला सगळं उधळून द्यायची सवय असल्याने मरमर अभिनय करून पण गरीब ते गरीबच !!

सुशल्या ला ड्रेस फिट्ट बसला कि अगदी..जणू काही तिचाच आहे....
दत्ती,दत्ता,सासुबाय यांची कामा सुरेख होतसंत.ठो ठो ची नेहमीची बोंब>>>११११

सुषमाचा घरातूनच कुठल्या तरी चोर दरवाजाने घराबाहेर पडण. ती आणि नाथ दोघ मिळून सगळ्यांना घाबरवत नाहीत ना ? ठोशाचा मळवट Lol
पण भूतावारा विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे अशी दोन्ही पात्र असल्यानेच रंगणार मालिका. ठो ठो मुंबईला गेले कि कशी रंगणार मालिका ?

ठोकळा ठोकळी जर मुंबईला गेले तर मालिका पुढे नाही जाऊ शकत. ह्या मालिकेचा पायाच भुतावर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे ह्यावर आधारित आहे. ते जर मुंबईला गेले तर सगळेच भुतावर विश्वास ठेवणारे उरतील.

Pages