रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या तुमच्याकडे नाईक आयले तर त्यांका डायरेक्ट बियर द्या,कारण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

नायकांका पाण्यापासून धोको असा.

What's App वरचा पीजे.

अर अस काय करुन र्हायले तुमी लोक. पान्डु दिसलो नाय आजच्या भागात. मन्ग त्येका काय माहीत की घरला गुरव इलो? पान्डु बाहेर गेलो ता त्येका कोण सान्गणार की आज रातच्याला १२ वाजल्यानन्तर तू खय जाऊ नको आणी बाहेरुन पण येऊ नको. माका वाटता की तो आवाज देणारो ( जर दिला तर ) पान्डुच असा मा.

पांडू नाहीतर गणेश नाहीतर नाथा >> माका पण ह्याच वाटता. Happy
ता अण्णांचो फोटो ठेवलेल्या खोलीचा दार कसला खाडकन उघडला. घाबरुक झाला मा. Uhoh

आज मी शेवटचा सीन बघितला, काही फार इंटरेस्टींग नाही वाटलं, त्यापेक्षा इथल्या पोस्ट्स बेस्ट असतात. उद्या रात्री १२ चं सीन क्रीएशन चाललं होतं. फक्त ती मांजर का कोण आवाज करते तेव्हा दत्ताचा अभिनय बरा वाटला, तिला काहीतरी मारतो उचलून ते.

Strawberry Banana Milkshake ??????>>>> कित्याक ? बेरी नाना मजेत बियर पितीत.

अर अस काय करुन र्हायले तुमी लोक>>>>>>> अरे माका, टीनाचो भास झालो.बघतंय ता काय रश्मी!

काही फार इंटरेस्टींग नाही वाटलं, त्यापेक्षा इथल्या पोस्ट्स बेस्ट असतात. >>> +१

अरे बापरे, नायकांना पाण्यापासून धोका?.... मग सका-सक्काळच्या धुण्या आय मीन अंगोळ पाण्याचं काय करत असतील ते? Sad

बजने दे धडक धडक ढोल ताश धडक धडक
अन्गारा झिडकलोय गुरवानी
तडम मडक फडक झाली
चटक मटक फटक झाली
ठोकळीची बघा आता वाट लागली
तत् ता तत ता ततता
Cheerful Dancing Baby

मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा माशाबा ला बघितलय तेव्हा तेव्हा तिच्या चेहर्‍यावर "राग" हे एकच एक्स्प्रेशन दिसलय. अर्थात मी शिरेल बघत नाय. झैराती दिसतात तेवढ्यावरुन काढलेला अंदाज आहे...

काल अण्णी ठोकळी ला सासू च्या अधिकाराने ओरडली. "मी तुझी सासू आहे, माझं ऐकायचं ". अण्णीच ओरडणं अगदी जिवंत होतं. आणि चक्क ठोकळी ने तिचं ऐकलेलं दिसतंय.

सुषमा ओ देणार>>> +१११११

बजने दे धडक धडक ढोल ताश धडक धडक
अन्गारा झिडकलोय गुरवानी
तडम मडक फडक झाली
चटक मटक फटक झाली
ठोकळीची बघा आता वाट लागली >>>> Rofl

मला पण असच वाटतंय कि सुषमाच काहीतरी काळाकांडी करेल म्हणून. पण काल ते प्रोमो मध्ये दाखवलं न सगळे घरात घाबरून एकमेकांना धरून बसले होते जाम टरकायला झाल मला. (पण नेहमीप्रमाणे ठोकळी वर काहीही परिणाम नव्हता झाला ती लपटोप घेऊन बसली होती.)

Pages