ऋषीमुनीशी साधर्म्य दाखवणारे ऋन्मेष असे माझे नाव आहे, पण आहे पक्का मी नास्तिक.
हि झाली प्रस्तावना. आता किस्सा झेला !
गर्लफ्रेंडची वाट बघत पार्कातल्या गुर्हाळात बसलो होतो. जवळच मध्यमवयीन गृहस्थांचा एक कट्टा भरला होता. विषय चालू होता क्रिकेटचा. पण संदर्भ वेगळा. जवळच्याच एका शिवमंदीराच्या आवारात ट्वेंटी-२० आशिया चषकातील भारत-पाक सामन्याचे थेट प्रक्षेपण एका पडद्यावर दाखवले गेले होते. तसेच त्यानंतर रविवारचा भारत-बांग्लादेश सामनाही रंगला होता. यावर त्या लोकांचा कडाडून आक्षेप होता, त्यामुळे वातावरण थोडे तापले होते.
"क्रिकेटचे सामने ही काय मंदीरात दाखवायची गोष्ट आहे का?"
"मंदीराचा विश्वस्त क्रिकेटचा फॅन असणार?"
"पण तरीही काहीही करणार का? अक्कल नको का त्याला? एवढीच हौस होती तर मैदानात दाखवायचे होते ना सामने"
"नाही तर काय, क्रिकेट म्हणजे काय एवढी महत्वाची गोष्ट आहे का? बिनडोकपणा नुसता.."
एकंदरीत असे सुविचार हवेत उधळले जात होते. माझ्यामते असे विचार पेन्शनर कट्ट्यालाच शोभावेत, पण ते सारेच तिशीच्या वरचे आणि चाळीशीच्या आतले वाटत होते. म्हणून आधी त्यांचे विचार ऐकून अंमळ गंमत वाटली. पण जेव्हा क्रिकेट खेळाची आवड असणार्यांचा उल्लेख त्यांनी बिनडोक असा केला, तेव्हा मात्र कोणीतरी मलाच बिनडोक म्हणतेय आणि आजूबाजूचे माना डोलावत आहेत असे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.
आतापर्यंत मी (ऊसाचा) रस घेत त्यांची चर्चा ऐकत होतो हे एव्हाना काही जणांच्या लक्षात आले होते. वरील ‘बिनडोक’ शब्दफेकीनंतर त्यापैकी एकादोघांनी मी आता मान डोलावून सहमती दर्शवेन या आशेने माझ्याकडे पाहिले. आणि इथेच ते चुकले.
"आजही तिथे बरीच गर्दी आहे ना. लोकांना रांगा वगैरे लावल्या आहेत. कालच्या मॅचच्या हायलाईटस दाखवत आहेत का?" .. मी गोलंदाजीला ऊतरलो. आणि पहिलाच गुगली टाकला.
"छे छे, आज महाशिवरात्रीचा उत्सव आहे." त्यांच्यातील एकजण म्हणाला.
"हम्म, पण काही लोकांना ‘हा’ बिनडोकपणा वाटतो." ... आणि ही थेट बॉडीलाईन गोलंदाजी.
आमच्या घरी आजच्या दिवशी सर्वांचाच महाशिवरात्रीचा उपवास असल्याने माझी देखील खिचडीवरच बोळवण झाली होती. त्यातील शेंगदाणे अजूनही माझ्या पोटात खदखदत होतेच. एवढेच नव्हे तर ऑफिसमध्येही लंच टेबलवर आठपैकी सात डब्यात खिचडीच होती.. आणि आठव्या डब्यात रताळे!
बस्स याच राग आणि दुख, अश्या संमिश्र भावनेच्या भरात मी वरचे भावना दुखावणारे वाक्य फेकले. जे समोर बॉम्बसारखे जाऊन पडले. पस्तिशीचे लोकं मिळून जेव्हा पंचविशीच्या तरुणाला मारतील तेव्हा कोणीही मदतीला धावून येणार नाही याची कल्पना मला आली आणि मी तिथून काढता पाय घेणार ईतक्यात,
"काय बिनडोकपणा वाटतो यात तुम्हाला? कुठे काही लांडीलबाड्या करण्यापेक्षा लोकं जमताहेत, आपले सण साजरे करताहेत यात काय वाईट आहे?" .. माझ्या आवडीच्या चर्चेचे आमंत्रण आले.
"एक्झॅक्टली!, कुठे काही लांडीलबाड्या करण्यापेक्षा चार लोकं एकत्र जमून खेळाचा आनंद लुटताहेत, यात तरी मग काय गैर आहे?"
"लांडीलबाड्यांचाच खेळ आहे तो. सारे आधीच ठरलेले असते. बघणारे तेवढे मुर्ख. आणि त्यावर तावातावाने चर्चा करणारे आणखी मुर्ख" ... क्रिकेटवर होणारी सर्वात स्वस्त, किफायतशीर आणि टिकाऊ टिका !
"तसे म्हणाल तर मग या जगात देवाच्या नावावर सर्वाधिक लांडीलबाड्या होत असतील" .. मी !
हा "लांडीलबाड्या" शब्द ज्याने सुरुवातीला उच्चारला त्याला ‘मॅन ऑफ द लेख’ पुरस्कार द्यायला हवा. बराच वेळ हा शब्द आमच्या चर्चेत फिरत होता.
"देवावरच्या श्रद्धेने विश्वास मिळतो, समाधान मिळते, आयुष्य जगण्याची ताकद येते..." ... त्यांनी उच्चारलेले नेमके शब्दप्रयोग मला आता आठवत नाहीत, पण असेच काहीसे टिपिकल होते.
"असो, तुम्हा नास्तिक लोकांना हे समजणार नाही" ... मला नास्तिक घोषित करून त्यांनी चर्चेचा फोकस सेट करायचा प्रयत्न केला पण,
"मी नास्तिक नाही, आस्तिकच आहे. फक्त माझी श्रद्धा, माझा विश्वास त्या मंदिरातल्या देवावर नाही ईतकेच...
आणि हो, क्रिकेट बघणार्यांना आनंद, समाधान, आयुष्य जगण्याची उर्जा वगैरे सारे काही मिळते. पण ही गोष्ट क्रिकेट न आवडणार्यांना समजणार नाही .."
.......
इथून पुढे काल्पनिक वाक्ये पेरत लेख पुर्णत्वाला नेता आला असता, किंबहुना आणखी पुढे संभाषण वाढले असते तर ते कसे झाले असते याचा कल्पनाविस्तार करता आला असता, पण तुर्तास जेवढे घडले तेवढेच लिहिले.
तेव्हा ही चर्चा नाईलाजाने इथेच थांबवावी लागली कारण तितक्यात माझी गर्लफ्रेंड हजर झाली. मी अचानक साप बघितल्यासारखा शांत झालो. पण त्या लोकांच्या चेहर्यावरचे भाव पाहता ईथे काय घडले असावे हे ती समजून गेली. काहीही चौकशी न करता सरळ माझ्यावतीने त्यांची माफी मागून मला तिथून घेऊन गेली. पण गंमत बघा. एक अलौवकीक योगायोग म्हणजे ती माझ्यासाठी म्हणून खास डबा भरून त्यांच्या घरची साबुदाण्याची खिचडीच घेऊन आली होती... आणि मग काय, त्यापुढचा नाईलाज सांगायची गरज पडू नये. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला मला महिलाशक्तीची प्रचिती घ्यायची नव्हती. खाल्ली बकाबक ..
- नाऋ
खाल्ली बकाबक ..>>> बरं
खाल्ली बकाबक ..>>> बरं केलंस.
हे असं कधीही, कुठेही, कुणालाही नडतोस का तु? कंट्रोल मजनु कंट्रोल.
नाऋ >>> याचा फुल्लफॉर्म काय
नाऋ
>>>
याचा फुल्लफॉर्म काय घ्यावा? नालायक ऋन्मेश , नास्तिक ऋन्मेश, नामधारी ऋन्मेश, की अजुन काही.?
लोकांनो फुल्ल्फॉर्म काय असेल सांगा
नास्तिक ऋ
नास्तिक ऋ
नाही नेहमीच नाही. पण मला कोणी
नाही नेहमीच नाही. पण मला कोणी आपली तत्वे ईतरांवर लादलेली आवडत नाही.
अरे! ते कुठे कुणावर तत्व लादत
अरे! ते कुठे कुणावर तत्व लादत होते.
प्रत्येक माणसाला त्याच्यासारखा न वागणारा बिन्डोकच वाटत असतो हा प्रॉब्लेम आहे.
<< एकंदरीत असे सुविचार हवेत
<< एकंदरीत असे सुविचार हवेत उधळले जात होते. माझ्यामते असे विचार पेन्शनर कट्ट्यालाच शोभावेत,>> बर्याच पेन्शनर कट्ट्यावर खरंच काय काय विचार व विषय चालतात याचा जरा कानोसा घ्या; कशी विकेट गेली आपली तें कळणारही नाहीं तुम्हाला !
कशी विकेट गेली आपली तें
कशी विकेट गेली आपली तें कळणारही नाहीं तुम्हाला ! >> तिथे "अनुभवी" असतात
खाल्ली बकाबक .. >> हे बेस.
खाल्ली बकाबक ..
>>
हे बेस. सगळीक्डे जाउन खाउन यावे. फुक्ट ते पौष्टीक ह्या न्यायाने.
सस्मित, विचार तर लादत होते.
सस्मित, विचार तर लादत होते. त्यांच्या हातात असते तर कृतीही केली असती. ज्याने कोणी ते क्रिकेट प्रक्षेपणाचे आयोजन केले त्याला शिक्षाही केली असती.
भाऊ, छान विषय. एखाद्या अनुभवी व्यक्तीने 'पेंशनर कट्ट्यावरच्या गंमतीजमती' असा धागा काढावा अशी माझी फार इच्छा आहे. कारण माझ्यासाठी ती वेगळीच दुनिया आहे. कारण त्यांच्या जवळपास गेलो तर आमच्यात नक्की वैचारीक वाद होणार या भितीने आजवर लांबच राहत आलोय.
मुर्दाड असतात ओ ही पारंपारिक
मुर्दाड असतात ओ ही पारंपारिक आस्तिक लोकं.
परंपरेशी तडजोड करत नाहीत आणि वरून दुसर्यालाच हिणवून मोकळे होतात.
लांडीलबाडी ला वेगळाच संदर्भ
लांडीलबाडी ला वेगळाच संदर्भ आहे रे, इथे लिहिला तर आणखीन वाद होतील.
दिनेशदा पण जागवलेली उत्सुकता
दिनेशदा पण जागवलेली उत्सुकता मेल मेसेज कुठेतरी शमवा..
परधर्मीयांसंबंधित आहे का..
हो बहुतेक. दिनेश्दा सांगितील
हो बहुतेक. दिनेश्दा सांगितील का तुझ्या विपुत?
काय सस्मित, मी काय असहिष्णु
काय सस्मित, मी काय असहिष्णु आहे का
रुनम्याचा धागा आणि
रुनम्याचा धागा आणि दुर्लक्षित! :(:-(:अरेरे: धागा वर आणण्यासाठी फक्त!
.
.
<< कारण त्यांच्या जवळपास गेलो
<< कारण त्यांच्या जवळपास गेलो तर आमच्यात नक्की वैचारीक वाद होणार या भितीने आजवर लांबच राहत आलोय.>> माझे बरेच मित्र माझ्यापेक्षां वयाने खूपच लहान आहेत व कोणताही विसंवाद न होतां वैचारिक चर्चाच नव्हे तर , चेष्टामस्करीही छान होते; << "नाही तर काय, क्रिकेट म्हणजे काय एवढी महत्वाची गोष्ट आहे का? बिनडोकपणा नुसता..>> व << मुर्दाड असतात ओ ही पारंपारिक आस्तिक लोकं.>> या दोन्ही वृत्ती म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात मला व त्यावरून 'जनरलायझेशन' करणं अनुचित .
भाऊ, ते मुर्दाड वाले भडक
भाऊ, ते मुर्दाड वाले भडक वाक्य आहे. तसे लिहिण्यामागे विशेष हेतू असावा
क्रिकेट असो वा देव. सगळीकडे
क्रिकेट असो वा देव. सगळीकडे "आमच्या भावनेचा प्रश्न" करण्यात आपण सगळे फारच अग्रेसर आहोत. तिथेच तर खरी मेख आहे. म्हणूनच तर नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत आणि कलाकारापासून खेळाडूपर्यंत सर्वांची मंदिरे या देशात उभी केली जातात. कारण "प्रश्न भावनेचा असतो". फक्त वैज्ञानिकाचेच मंदिर उभे करायचे काय ते बाकी आहे.पण यथावकाश ते सुद्धा होईल. त्यामुळे, अजून काही वर्षांनी "प्रकाश किरण सरळ रेषेत जातात हे चुकीचे आहे" असे कोणी म्हटले आणि त्यावरून दंगल उसळली तर नवल वाटू नये.
वैज्ञानिकांचे मंदीर का एवढे
वैज्ञानिकांचे मंदीर का एवढे धक्कादायक वाटत आहे. वैज्ञानिक सुद्धा मंदीरातल्या देवावर विश्वास ठेवतात की. स्वताच्या बुद्धीसामर्थ्याने आखलेल्या योजना यशस्वी व्हाव्यात म्हणून मंदीरात साकडे घालतात की. ज्या गोष्टीची उकल आपल्या बुद्धीला होत नाही त्या मागे देव असतो, आणि जर एखादा चांगला योगायोग घडला तर तो देव घडवतो या तत्वाला जगभरात मान्यता आहे.