रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काल कैत्री मळवट भरलेला दाखवला ना शेवटी?
तुमच्या इतके "सू़क्ष्मपणे/बारकाईने" नै बघत आम्ही.... त्यामुळे एन्जॉय करतो... Happy

मला आधी वाटल की ठोकळी कुठेतरी धडपडली ( हे कोणी पाहिले नसावे ) आणी मग तिने कपाळाला टेन्गुळ आले म्हणून रक्तचन्दनाचा लेप लावला असावा.:फिदी: ( मी मध्येच पाणी प्यायला किचनमध्ये गेल्याने माझे काही सन्वाद मिसले)

अण्णाना भोवळ.:खोखो:

कोणी नीट बघीतल का की मळवट फासल्यावर कपाळावर शेवटी लेप लावतात तशी किनार येत नाही. तो मळवट कमी आणी लेप जास्त वाटत होता.

सामी मला खात्री आहे, त्या मॉडरेटरने हि लिंक ब्लॉक केली असली तरी तो स्वतः गुपचूप येऊन इथे वाचत असेल आणि खदाखदा हसत असेल.

ठोक्ळीने शेवन्ता समोर खुर्चीत बसुन शान्तचित्ताने लावुन घेतलाय रक्तचन्दनाचा सैन्टीफीक लेप ... म्हणुन तर तीला धक्का नै बसला..मस्तपैकी आरशात स्वतःच ठोबाड निरखल तिने Biggrin

ती छाया काहीतरी उचकपाचक करत होती कोठीघरात, तिथेच कुंकवाचा डबा पडला असेल. ही काहीतरी घ्यायला वाकली असेल अंधारात आणि लागले कपाळाला. तिला असे झाले असेल कुठून आले स्वयंपाकघरात.

पुढली ५ मि - झाकण उचलल्यावर पुन्हा एकेकाचा लाँग, क्लोझ शॉट, सगळ्यांचे? एकेकाचे घाबरणे, पिठातील उलटी पावले बघुन गणेशचे बरळणे. << Rofl

पण काही म्हणां हं, सिरीयल मस्त चालली आहे.... शेवटी कोकणांतल्या भुतांवर आहे .. कोकणातली भूताखेतां पण "स्पेशलच" अस्तात. "चाणाक्ष' अस्तात.... Proud

कालच्या भागाचा मागच्या आठवड्यापासुन केवढा डान्गोरा पिटला होता. वाटले होते नक्कीच काहीतरी भयानक दिसले असणार.
आणि बघितले तर काय ठोकळीचा मळवट!!

दत्ती मनापासुन वाईट नाहीये, अण्णींनी तांदुळ दे माधवबरोबर तर म्हणे कोकमं पण देते. मला आवडली. >>>

भगवती, ते अशा टोनमध्ये होतं ' तांदुळ कशाला फक्त, कोकमं पण आहेतच की घरातली, घेऊन जा फुकट्यांनो.

अण्णींनी तांदुळ दे माधवबरोबर तर म्हणे कोकमं पण देते>>>>>>> तांदूळ देताना पडलेला चेहरा नाही पाहिला का? कोकमं पण देते म्हणताना उपरोधाने म्हणते.

पण तरी दत्ती मनाने वाइट नाही वाट्त. पुर्वा खरंच छान मुलगी आहे.
दत्ता पण अर्चिस वर माया करतो. पुर्वा त्याला आंबोळी चट्णी देते आणि ठोशा रागवते तेव्हा तो मुद्दाम अजुन दे गो त्याला असं म्हणतो. अशी माण्सं आहेत. घरी आजुबाजुला पाहिलीत. Happy

पूर्वा बद्दल अनुमोदन . अतिशय गोड मुलगी वाटली .
कोणी नीट बघीतल का की मळवट फासल्यावर कपाळावर शेवटी लेप लावतात तशी किनार येत नाही. तो मळवट कमी आणी लेप जास्त वाटत होता. >> मी बघितलं ना Happy . लेपच होता तो .
ती सुशल्या , ठोशाला वर येताना बघून घाबरते , तेव्हा मला वाटलं - हीला तिच्या रूपात कोणीतरी दूसरच दिसत की काय .. Sad . असेलही कदाचित . ती सुशल्या एक्दम छुपी रुस्तम आहे

हो, या घरातील माणसं black & white नाही आहेत. आपल्या सारखी आहेत grey shade वाली. दत्तीचं वागणं पटतं, पूर्वा सारख्या मुलीही पाहिल्या आहेत आणि माधव सारखे हो हो करणारे पण पाहिले आहेत. अभिरामचा ही दत्ता वर राग आहे पण तोही लग्नावरुन, पण तो गणेशला दत्ता दत्तीची बाजू समजावून सांगतो. छायाही वाईट नाही आहे, फक्त आपलं दु:ख कुरवाळत बसली आहे म्हणून तशी आहे.

या घरातील माणसं black & white नाही आहेत. आपल्या सारखी आहेत grey shade वाली >>> ९९% सहमत. १% भुतासाठी राखीव, तो/ती असेल black shade Proud

हो, या घरातील माणसं black & white नाही आहेत. आपल्या सारखी आहेत grey shade वाली. दत्तीचं वागणं पटतं, पूर्वा सारख्या मुलीही पाहिल्या आहेत आणि माधव सारखे हो हो करणारे पण पाहिले आहेत. अभिरामचा ही दत्ता वर राग आहे पण तोही लग्नावरुन, पण तो गणेशला दत्ता दत्तीची बाजू समजावून सांगतो. छायाही वाईट नाही आहे, फक्त आपलं दु:ख कुरवाळत बसली आहे म्हणून तशी आहे.>>>>>>>>> अनुमोदन.

प्राची नाईस पोस्ट. ह्यापैकीच कोणी घडामोडी करत असेल फसवण्यासाठी, तर मात्र निल्सन म्हणाल्या तसं १ टक्का राखीव त्यासाठी.

मालिका लेखकांना बहुतेक short term memory loss झाला आहे म्हणून आग लागली त्याच पुढच्या भागात काही नाही , पिठावर पावल त्याचही काही नाही , सुशल्याच माडीवरून वर खाली येण त्याचही काही नाही कालच्या भागात , आता ठोशाचा मळवट पण विसरून आज दुसरच काही असणार आहे .

ठोशाचा मळवट पण विसरून आज दुसरच काही असणार आहे >> बहुतेक हो, आत्ता प्रोमो पाहिला तर तो गुरव येऊन रात्री १२ ला कोणतरी दार वाजवेल, ओळखीच्या माणसाच्या आवाजात हाक मारेल पण तुम्ही दार उघडु नका म्हणून सांगताना दाखवलाय. आजचा भाग याच्यावरच असणारे. Happy

रश्मीतै नाराज दिसतात. माझं नावनाही घेतलं त्यांच्या विनोदाची तारीफ केली तरी. विपूला उत्तर नाही कै नाही. भूताने धरलं तर नाही ?

त्या 'एक्सॉरटीस्ट ' शिणुमातल्या मुलीचे हाल होतात तसे आता ठोकळीचे होणार ! भूत आता तेका धरतेलो .. सोडूक नाssssssssssssssय !

माझा डाऊट 'नाथा' वर आहे, तेच करतेला ह्ये सगला ...

ज्याच्यावर संशय नाही असा म्हणजे ठोकळाच !

तोच असेल सगळ्याच्या मागे. ठोकळीच्या नकळत पेंटब्रश खेळलेला दिसतोय. ती झोपेतून उठून तरातरा चालत किचन मधे गेली असणार. दत्ती कामात गुंग. दत्ता बाहेर विचारात गुंग. अभिराम देवकीच्या स्वप्नात दंग. ज्यु. दत्ता गव्हाचे दाणे पसरण्यात गुंग . कुणाला पत्ताच लागला नसेल.

इतकी वर्षे फक्त हो हो हो करताना मारल्या गेलेल्या इच्छांचं भूत मानगुटीला बसून त्याच्याकडून हे सगळं करवून घेत असेल.

काल ठोकळी किचनमधे येते खीर किंवा तिखटाचा शिरा करायला तेव्हा तिचे सांगावेसे वाटले बये आधी ते केस करकचून बांध. केवढे ते फलकारे मारत चाललं होतं डबे शोधणं Proud

>>>>> आधी ते केस करकचून बांध. केवढे ते फलकारे मारत चाललं होतं डबे शोधणं... >>>>

असे केस मोकळे सोडून हिंडले की भुताने धरलेच म्हणून समजा ...

Pages