रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सांगा. ठो ३ अभिच्या साखरपुड्यासाठी आले होते आणि लगेच परत निघणार होते. मग अण्णा गेले म्हणुन त्यांना १३ दिवस रहावं लागलं. त्यांनी एवढे कपडे आणले होते का? आणि ठोशा ने इतके ड्रेस्स कशाला आणलेले? सुषमाला दिले तिने काल ते.

मला सांगा. ठो ३ अभिच्या साखरपुड्यासाठी आले होते आणि लगेच परत निघणार होते. मग अण्णा गेले म्हणुन त्यांना १३ दिवस रहावं लागलं. त्यांनी एवढे कपडे आणले होते का? आणि ठोशा ने इतके ड्रेस्स कशाला आणलेले? सुषमाला दिले तिने काल ते. >>> काश असे लॉजिकल प्रश्न लेखकाला पडले असते Wink

कहर आहात सगळे लोक...

इथल्या कमेन्ट्स वाचुन माझी उत्सुकता एवढी वाढते की रोज मला २००-३०० एमबी खर्च करुन ऑनलाइन बघावा लागतो एपिसोड Proud

जौ दे नशिबात नसेल त्यान्च्या हे वाचणे!!>>>हो ना प्रत्येकाच्या नशीबात हास्याची कारन्जी अनूभवायला मिळतीलच असे काही नाही. ते झी वाले नाहीतरी अशा झेड मालिकाच बनवतात.

दत्ती आणि छाया च्या कटकटी मुले ठोकळी चं डोकं दुखायला लागला असेल म्हणून तिने एखादा scientific लेप लावला असेल...
ह्या सगळ्यात पूर्वा नावाची मुलगी आणि तिचे character अगदी छान जमून आलंय. अगदी अर्चिस ला आवडतात म्हणून खोबऱ्याच्या वड्या करूया म्हणते, आई ने कितीही कटकट केली तरी अगदी शांत राहते. पूर्वा ने अभिनय पण छान केलाय अगदी.

त्यांनी एवढे कपडे आणले होते का? आणि ठोशा ने इतके ड्रेस्स कशाला आणलेले? >>> २-३ ड्रेस तर आणलेच असतील तिने, आता जायच आहे म्हणुन एक घातलेला ठेऊन २ दिले शुष्षला. Happy वरुन डायलॉग काय तर 'थोडे ड्रेस देते सुषमाला' माझा नवरा बोलला, एक तर ड्रेस आहे आणि थोडे ड्रेस काय बोलते ही Proud

परवाच्या भागात जो शेवट केला सुषमाबद्दलचा त्याचं काही नामोनिशाणही नाही कालच्या भागात Uhoh डोक्यावर पडलेत का मालिका बनविणारे/लिहणारे. Angry

scintific लेप >>> Crying with Laughter

तिखटाचा लेप त्यामुळे पाणी आलय तिच्या ठोक्ळ्या सॉरी डोळ्यातुन!!!

परवाच्या भागात जो शेवट केला सुषमाबद्दलचा त्याचं काही नामोनिशाणही नाही कालच्या भागात अ ओ, आता काय करायचं डोक्यावर पडलेत का मालिका बनविणारे/लिहणारे. <<< हो न, आधी पण त्यांच्या एका खोलीला आग लागली होती (ज्यात बेरी नाना होते) त्याच्या पुढच्या भागातही आधीच्या भागाच नामोनिशान नव्हत.

कालच्या भागातला अजून एक घोळ. दत्ती किंचाळते तेव्हा कॅमेरा प्रत्येक कॅरॅक्टर वर , आणि मग प्रत्येक कॅरॅक्टर धावत घरात! ती किंचाळायच्या आधी अभिराम आणि दत्तीचा मुलगा बोलत असतात. पण दत्ती किंचाळते, तेव्हा अभिराम गाडी धुवत थांबलेल्या अर्चिस बरोबर दिसतो.

परवाच्या भागात जो शेवट केला सुषमाबद्दलचा त्याचं काही नामोनिशाणही नाही कालच्या भागात अ ओ, आता काय करायचं डोक्यावर पडलेत का मालिका बनविणारे/लिहणारे. <<< हो न, आधी पण त्यांच्या एका खोलीला आग लागली होती (ज्यात बेरी नाना होते) त्याच्या पुढच्या भागातही आधीच्या भागाच नामोनिशान नव्हत.

<<< अशा बर्‍याच गोष्टी अधांतरी सोडल्यासारख्या वाटतात. दहाव्यानंतर पिठात उलटी पावले दिसतील असे गणेश म्हणाला होता. त्याचे काय झाले???

<<< अशा बर्‍याच गोष्टी अधांतरी सोडल्यासारख्या वाटतात. दहाव्यानंतर पिठात उलटी पावले दिसतील असे गणेश म्हणाला होता. त्याचे काय झाले??? <<< आण्णा आणि ती शेवंता हातात हात घालून बागडताहेत न घरात म्हणून त्यांची पाऊल नाही उमटली. Proud Proud Proud

आम्ही शाळेत असताना 'पुढचं पाठ मागचं सपाट' असं म्हटलं जायचं पालकां कडून आमच्या अभ्यासाबाबत...
तसा काहीसं झालंय इथे रहस्य रहस्य खेळताना...इतकी रहस्य जमवली आहेत लेखकाने कि कोणती लक्षात ठेवू आणि कोणाचा पाठपुरावा करू असं झालंय Proud Proud

दहाव्यानंतर पिठात उलटी पावले दिसतील असे गणेश म्हणाला होता. त्याचे काय झाले??? >> अरे हा यार! हा तर मोठा पॉईंट होता, अख्खा एपिसोड घालु शकले असते त्यात.

पहिली ५ मि. - आज दहावे आहे, पिठात काय आलयं ते बघायच आहे' हा डायलॉग प्रत्येकाच्या तोंडी (मला मालवणी येत नाही ज्यांना येतेय त्यांनी भाषांतर करा)

पुढली ५ मि. - अभिने फोन करुन देविकाला वरचाच डायलॉग ऐकवणे, तिचे मध्येच लग्नाबद्दल विचारणे. यावर अभिने त्याचा रोज घोकत असलेला डायलॉग म्हणणे.

पुढली ५ मि - सगळेजण एकेक करुन पिठाभोवती जमणे. एकेकाचा लाँग, क्लोझ शॉट, मध्येच झाडाचा, हलत्या झोपाळ्याचा शॉट. दत्ता/दत्ती पिठावरील झाकण उचलताना.....

पुढली ५ मि - झाकण उचलल्यावर पुन्हा एकेकाचा लाँग, क्लोझ शॉट, सगळ्यांचे? एकेकाचे घाबरणे, पिठातील उलटी पावले बघुन गणेशचे बरळणे.

चला संपला एकदाचा हा भाग.

अरे हा अख्खा बाफ त्या झीटुल्यान्च्या फेसबुकावर टाका, वेडे होतील ते वाचुन.:फिदी:

निल्सन सही.:हाहा:

@निल्सन , मस्तच !! यात अजुन थोडी अ‍ॅडीशन
ठोकळी चेहर्यावरची रेश ही न हलवता ठोकळयाला म्हणेल , अरे ही अन्धश्रद्धा आहे.. आणि मला तु यात अड्कुन पडायला नको आहेस. आणि ठोकळा म्हणेल ......हॉ हॉ

जे जे दाखविले
ते ते पहावे
मागचे सगळे विसरुन जावे
ठो़कळी म्हणे>>>>>:-P :

निल्सन्,भारी.

क्लिओपात्रा >>> हॉ हॉ हॉ Proud

अरे हो, पांडु राहिला की.
पाण्डु म्हणेल आण्णा आलंय आण्णा आलंय > एकदम परफेक्ट सस्मित.

बाकी एक बाळबोध प्रश्न.. उलटी पावले म्हंजे काय?

पिठावर जे काही उमटते त्याची दिशा फिक्स असते का? जसे पुर्वेला पायाची बोटे आली पाहिजेत वै.वै. कारण दिशेनुसारच उलटसुलट असु शकते, पायाचा तळवा वर पाय खाली असे पिठात दिसेल काय Wink

पिठावर जे काही उमटते त्याची दिशा फिक्स असते का? जसे पुर्वेला पायाची बोटे आली पाहिजेत वै.वै. कारण दिशेनुसारच उलटसुलट असु शकत.. >> पणतीची ज्योत ज्या दिशेला त्याच्या विरुद्ध दिशेला पावलांची बोटे म्हणजे उलटी पावले. Happy

Pages