हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
सांज ढले उत्सव मधले ना मस्त
सांज ढले उत्सव मधले ना मस्त गाणे आहे।
माझा तर परमनंट पास होणार
माझा तर परमनंट पास होणार बहुधा.. कुठलीच ऐकलेली नाहीए
मराठी गाणे सोप्पे आहे मी
मराठी गाणे सोप्पे आहे मी दिलेले...
सोप्याची व्याख्या बदलायला हवी
सोप्याची व्याख्या बदलायला हवी या धाग्यात.
जे लौकर सुटत नाही ते सोपे गाणे.
हिंट द्या की काहीतरी
हिंट द्या की काहीतरी
हिंट?
हिंट?
खरेच सोप्पंय!! हे द्वंद्व गीत
खरेच सोप्पंय!!
हे द्वंद्व गीत असून विख्यात भगिनीं पैकी एक व एक गायक ज्याने दोन अभिनय साम्राटांच्या जुगल बंदीच्या सिनेमात चित्रपट गीते गायला सुरुवात केली...
बघा केवढी हिंट दिली आता...
अरेच्चा सगळेच शांत!! ??
अरेच्चा सगळेच शांत!! ??
कठीण आहे. आणखी क्लु हवा. गायक
कठीण आहे. आणखी क्लु हवा. गायक कोण काही कळलं नाही.
कोणते अभिनय सम्राट? हिंदी कि
कोणते अभिनय सम्राट? हिंदी कि मराठी?
कळलं ६७ . त प म त द न क त ग भ
कळलं
६७ . त प म त द न क
त ग भ स म त ग द क
तुझ्या पंखावरूनिया मला तू दूर नेशील का?
पुढची ओळ मी तुझ्या बेफाम सुमनांचा मला तू गंध देशील का? अशी ऐकलीय. ती जुळत नाहीए.
रवींद्र साठे.
मराठी अभिनय सम्राटांवरून ट्यूब पेटली. इतका वेळ हिंदीतच भटकत होतो.
ओके गायक सामना मध्ये गाणी
ओके गायक सामना मध्ये गाणी प्रसिद्ध झालेला!
कुणाचे ओझे घेता घेता पटापट गम्मत ही सांगणारा!
कुणी तरी असे पटापट गाणे आमुचे ओळखेल का?
आधी दूरदर्शन मध्ये होते!
भरत बिंगो! तुझ्या गे भाव
भरत बिंगो!
तुझ्या गे भाव सुमनांचा मला तू गंध देशील का?
अशी ती ओळ आहे!
<<मी तुझ्या बेफाम सुमनांचा
<<मी तुझ्या बेफाम सुमनांचा मला तू गंध देशील का? अशी ऐकलीय. >>
--- तुझ्या गे (का बे) भाव सुमन्नान्चा मला... असे आहे
६८ हिंदी म ब च ब ब ब ब र म ब
६८ हिंदी
म ब च ब ब ब ब र
म ब प ब स स ड र
खूपच सोपं आहे.
यांची सोप्पी गाणी आम्ही
यांची सोप्पी गाणी आम्ही जन्मात कधी न ऐकलेली आहेत.
हो ना!
हो ना!
हिंट : हे प्लेबॅक यायच्या
हिंट : हे प्लेबॅक यायच्या आधीच्या काळातलं गाणं आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असणार.
६८. म ब च ब ब ब ब र म ब प ब स
६८.
म ब च ब ब ब ब र
म ब प ब स स ड र
मै बन की चिडियां बन के बन बन बन बोलुरे
मै बन का पंछी बन के संग संग डोलू रे
बहुदा बरोबर असावे!
बरोबर.
बरोबर.
ही बरीचशी गाणी ऐकलीच नाहीयेत
ही बरीचशी गाणी ऐकलीच नाहीयेत
६९ य व ग ख म त न अ व त प म त
६९
य व ग ख म त न अ
व त प म त भ अ
एक सुंदर मराठी भावगीत
ही बरीचशी गाणी ऐकलीच नाहीयेत
ही बरीचशी गाणी ऐकलीच नाहीयेत >>>
त्यामुळे मानवांच्या, धाग्याचा हेतु सफल होईल. बरीचशी सुंदर गाणी सर्वशृत होतील !:)
६९ 'या विराट गगनाखाली' असे
६९ 'या विराट गगनाखाली' असे काही आहे का? कधीतरी ऐकल्यासारखे वाटते आहे, पण शब्द ठाऊक नसावेत.
भास्कराचार्य! परफेक्ट!! बघा
भास्कराचार्य! परफेक्ट!!
बघा काही अवघड नाही द्या पुढचे कोडे आता!
या विराट गगना खाली मी तृणात निजलो आहे
वर्षाव तुझ्या प्रेमाचा मी त्यातून भिजलो आहे
अच्छा! पुढचे शब्द नव्हते बुवा
अच्छा! पुढचे शब्द नव्हते बुवा माहीत.
७०.
ग स म द व
प प ज ज ह ध
मराठी
मस्त आहे खरेच, कृष्णा.
मस्त आहे खरेच, कृष्णा.
मस्त आहे खरेच,
मस्त आहे खरेच, कृष्णा>>>
रामदास कामत ह्यांची सगळीच गाणी अप्रतीम आहेत! जरुर ऐकावी अनेकदा ऐकावी अशी!
त्यामुळे मानवांच्या, धाग्याचा
त्यामुळे मानवांच्या, धाग्याचा हेतु सफल होईल. बरीचशी सुंदर गाणी सर्वशृत होतील !स्मित >>> हो खरंच
<<रामदास कामत ह्यांची सगळीच
<<रामदास कामत ह्यांची सगळीच गाणी अप्रतीम आहेत! जरुर ऐकावी अनेकदा ऐकावी अशी! स्मित>>
----- सहमत.... "या विराट गगनाखाली... " हे गाणे मी आता ऐकतो आहे...
Pages