आजचीच ताजी घटना. संध्याकाळची वेळ. किंचित उशीराची. ट्रेनचा जेमतेम भरलेला डबा. सारे प्रवासी आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेले. काही पेपर वाचत होते, काही मोबाईलवर लागले होते, तर काही बस्स उगाचच टिवल्याबावल्या करत होते. सारेच गर्दीत हरवलेले चेहरे. बस्स एक मुलगा सोडून.
दोनतीन ज्युनियर कॉलेजवयीन मुलांचा छोटासा ग्रूप होता. दोन मित्र शांतपणे बसलेले. आणि त्या एका उभ्या असलेल्या मुलाची टकळी चालू होती. पोरगा मराठी होता. चुरूचुरू बोलत होता. त्याच्या बडबडीची भाषा ओळखीची वाटत होती. कॉलेजच्या गप्पा, पोरींचे विषय, सरांची मस्करी, क्रिकेटच्या चर्चा रंगल्या होत्या. नव्हे तो एकटाच बोलत होता.
अचानक माझ्या समोर बसलेल्या एका माणसाला अचानक काय झटका आला देवास ठाऊक. पण वळला आणि त्याच्या मागे असलेल्या त्या बडबड करणार्या मुलाकडे बघून किंचाळला, "डू यू हॅव अॅनी प्रॉब्लेम ???"
सौथेंडीयन अॅक्सेंट !
मुलगा कावरा बावरा ..
तसा तो माणूस थ्री ईडियट्समधील वायरसच्या आवेशात पुन्हा किंचाळला, "डू यू हॅव अॅनी प्रॉब्लेम?"
मुलगा पुन्हा कावरा बावरा ..
नो प्रॉब्लेम .. नो प्रॉब्लेम ..
त्याचेही ईंग्लिश माझ्यासारखेच धन्य आहे हे मला पहिल्याच फटक्यात समजले.
"व्हाई आर यू शाऊटींग ??"
शाऊटींगचा मला माहीत असलेला अर्थ कर्रेक्ट असेल तर त्यावेळी तो माणूसच शाऊटींग करत होता.
आणि राहीला प्रश्न त्या मुलाचा तर कुठल्याही अॅंगलने त्याचे बोलणे हा गोंगाट वाटत नव्हता.
तरीही, ओके ओके .. बोलत तो मुलगा शांत झाला. बिचारा !.
त्याच्या बरोबरचे मित्रही साधेच असावे. कोणीही उलटून नडला नाही. तो माणूस मोठ्या रुबाबात पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये बिजी झाला. टिंग टिंग, टिंग टिंग. कसलासा गेम खेळत होता. विथ म्युजिक. खरे तर मला असे साऊंड ऑन ठेवून गेम खेळणार्यांची प्रचंड चीड येते. एकवेळ मोबाईलवर मोठ्या आवाजात लावलेली गाणी परवडतात. पण या विडिओगेम्सचा आवाजाने एकदा इरिटेट व्हायला सुरुवात झाली की ईरीटेट होतच राहते.
असो, तर त्यानंतर मी त्या मुलाकडे पाहिले. त्याची माझी नजरानजर झाली आणि तो ओशाळत हसला. मी सुद्धा हसलो. आता मी त्या माणसाकडे पाहिले. त्याची आणि माझीही नजरानजर झाली. त्या मुलाचे ओशाळलेपण कमी व्हावे, त्या माणसाला त्याने काही तीर मारला नाही याची जाणीव करून द्यावी, किंवा जे काही झाले ते मला रुचले नाही किमान एवढे तरी त्याला समजावे या हेतूने मी त्याच्याकडे बघून हसलो. पण जरा कुत्सितपणेच. तसा तो मलाही म्हणाला, ""व्हाई आर यू स्माईलिंग ??"
मी पुन्हा हसलो. पण आता मात्र प्रसन्नपणे हसलो. एखाद्यावर हसण्यासारखे दुसरे चिडवणे नाही जगात.
"एनी प्रॉब्लेम?" त्याने वैतागत पुन्हा विचारले.
मी माझ्या चेहर्यावरचे हास्य तसेच कायम ठेवत म्हणालो.., यूह नीड ए सायकिअॅट्रीस्ट !
- ऋन्मेष ’ -
..................
बरेच दिवस मनात होते बोलावे कोणाला तरी , आज ओठांवर आले
ज्याच्यावर तुम्ही टायपता ना
ज्याच्यावर तुम्ही टायपता ना त्याचा शोध चार्ल्स बॅबेजने लावला.
>>राज, कोण आहे चार्लस
>>राज, कोण आहे चार्लस बॅबेज?<<
अरे बाबा त्याला जरातरी भनक लागली असती कि तु त्याने बनवलेल्या काॅंप्युटरचा पुढे असा उपयोग करणार आहेस, तर त्याने शोध लावण्या ऐवजी पिठाची गिरणी टाकली असती...
नाय नाय मोजं धुवायची लॉन्ड्री
नाय नाय मोजं धुवायची लॉन्ड्री टाकली असती
ऋ.. अर्र या धाग्याचा रूख
ऋ.. अर्र या धाग्याचा रूख शेवटी तू तुझ्याकडेच वळवून घेतलास..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोकल, तो उगाच खेकसणारा माणूस.. यांचा मला झीरो अनुभव आहे म्हणून कोण कोणाला का म्हणाले यावर मी काय बोलणार.. पण पब्लिक प्लेस मधे तू सीट वर पाय ठेवतोस ??? एकदम..नो नो नो
(मला तर घरात सुद्धा कोणी टेबलावर पाय पसरवले तर न्हाईच चालत, नो वे !! )
चप्पल काढून समोरच्या सीट्वर
चप्पल काढून समोरच्या सीट्वर पाय ठेवलेले दिसले तर त्या माणसाची चप्पल दुरवर ढकलायची त्याच्या नकळत. एकदा का शोधाशोध करायला लागली की परत पाय ठेवणार नाही चप्पल काढून. आणि चप्पल घालून पाय ठेवले आणि खाली ठेवा सांगून ऐकलं नाही की पाय ढकलून द्यायचे. म्हणजे घाणेरड्या सवयी जातील.
वर्षू नील ताई (हे नील नितीन
वर्षू नील ताई (हे नील नितीन मुकेश लिहिल्यासारखे वाटतेय
)
आपल्या भावना आणि विचार समजू शकतो. आपण आपल्या जागी बरोबर आहात. पण भारतात (किंवा आमच्या मुंबईत) जितकी विविधता आहे तितकीच विषमता देखील आहे. आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर. आणि या प्रत्येक स्तरातील शिस्तीचे आणि सुसंस्कृतपणाचे निकष वेगवेगळे आहेत. तुम्हाला घरात कोणी सोफा टेबल वर पाय पसरलेले आवडत नसेल पण एखाद्याचे घरच कचराकुंडीच्या शेजारची झोपडपट्टी असेल तिथे आपण त्याच्याकडून ही अपेक्षा नाही ठेवू शकत.
वर काही जणांनी भारत विरुद्ध परदेश अशी तुलना केली आहे. जी अश्या विषयांवर होतेच. पण ज्या दिवशी त्या परदेशातील ट्रेनमधून दर दुसर्या दिवशी एक लटकलेला प्रवासी खाली पडून मरायला सुरुवात होईल, जेव्हा ती राष्ट्रीय संपत्ती ट्रेन तेथील नागरीकांचा जीव घ्यायला सुरुवात करेन, तेव्हा त्यांचे आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर किती प्रेम शिल्लक राहते हे समजेल..
आणि हो, नियमावरच बोट ठेवायचे झाल्यास दारावर लटकू नका असाही नियम आहेच. तरीही लोकं मरायला लटकतातच.
पॉलिटीशियन होशील बरं...वर्षू
पॉलिटीशियन होशील बरं...वर्षू नील यांनी अगदी स्पेसिफीक प्रश्न विचारला - पब्लिक प्लेस मध्ये सीट वर पाय ठेवतोस ??? उत्तर सरळ टाळलेस की. कचराकुंडीचा, झोपडपट्टीचा आणि तू सीटवर पाय ठेवायचा संबंध तरी काय??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या भावना आणि विचार समजू
आपल्या भावना आणि विचार समजू शकतो. आपण आपल्या जागी बरोबर आहात. पण भारतात (किंवा आमच्या मुंबईत) जितकी विविधता आहे तितकीच विषमता देखील आहे. आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर. आणि या प्रत्येक स्तरातील शिस्तीचे आणि सुसंस्कृतपणाचे निकष वेगवेगळे आहेत. तुम्हाला घरात कोणी सोफा टेबल वर पाय पसरलेले आवडत नसेल पण एखाद्याचे घरच कचराकुंडीच्या शेजारची झोपडपट्टी असेल तिथे आपण त्याच्याकडून ही अपेक्षा नाही ठेवू शकत.
सहमत... इथे प्रत्येक स्तरातल्या लोकांच्या हायजिनच्या कल्पना वेगळ्या आहेत. माझ्या बाईने निवडलेली भाजी मी परत एकदा नजरेखालुन घालुन घेते कारण तिच्या मते चांगली असलेली पाने माझ्या नजरेला किडकी दिस्सतात.
राहता राहिला सिटवर पाय ठेवायचा प्रश्न. तर असे पाय खुप जण ठेवतात. बायकांच्या डब्यात तर जास्तच. अर्थात असे पाय ठेवायला मिळणे आधी कठिण. पण घरात ओट्यासमोर २-३ तास उभे असलेल्या पायांना ट्रेनमध्ये जर जागा मिळालीच तर सिटवर ठेवल्यामुळे थोडा आराम वाटतो. डबा रिकामा असेल तर मीही ठेवते. बरे वाटते. अर्थात सिट खराब होणार नाही याची काळजी घेत मी पाय ठेवते.
मी स्वतः कधी सीट वर पाय ठेवले
मी स्वतः कधी सीट वर पाय ठेवले नाहीत(कधी इतकी रिकामी गाडी मिळालीच नाही/पाट्यांकडे लक्ष गेले नाही/पाय ठेवण्याइतका निवांतपणा प्रवासात नव्हता), पण कोणी माझ्यासमोर स्वच्छ(व्हिजीबल धूळ नसलेले/स्वच्छ मोजे असलेले) पाय सीटवर ठेवले तर मला इतके यक्क वाटणार नाही.(त्या जागेवर बसायलाही). घरी टिपॉय वर किंवा स्टूलवर पाय ठेवून बसते.पायाला बरे वाटते.(आता मला लोक सायकियाट्रिस्ट सुचवतील त्या आधी कामाला लागते
)
माझ्या आधीच्या ऑफिसमध्ये
माझ्या आधीच्या ऑफिसमध्ये माझी एक फुट रेस्ट होती. मी जेव्हा गरोदर होते तेव्हा मला ती कोणीतरी ऑफिस्समध्ये दिलेली. पण मी नंतरही ती माझ्याकडेच ठेवली.
ऑफिसची जागा एकाच इमारतीत तिनचार ठिकाणी तरी बदलली गेली. पण दरवेळी सोबत ती फुटरेस्टही हवीच हा आग्रह मी धरायचे आणि ती माझ्याबरोबर यायची. साधनाची फुटरेस्ट म्हणुन ती ऑफिसभर फेमस होती.
खुप आराम वाटायचा त्यावर पाय ठेवुन खुर्चीवर बसायला. आत्ता अचानक त्या फुटरेस्टचे आठवले
आणि पाय परत दुखायला लागले. ती असती तर आराम मिळाला असता थोडा.
नंगे पाव नंगे पाव काय लाव्लंय
नंगे पाव नंगे पाव काय लाव्लंय अनवाणी पायानी असं मराठीत म्हण बरं !
मभादि उपक्रम अजून चालू आहे अंतीम मुदत ५ तारखे पर्यंत वाढवलेली आहे
त्यात सामील हो बरं ! आणि अनवाणी पायानी केलेली भटकंती यावर लिही !
हायला! कुणी क्वचित पाय
हायला! कुणी क्वचित पाय ठेवलेल्या जागी बसायला घाण आणि यक्क वाटतं. मग सगळ्यांनी बुडं ठेवलेल्या जागी बसयला काहीच वाटत नाही का?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(मला सायकियाट्रिस्ट ची गरज नाहीये हे मला ठाउक आहे)
सस्मित
सस्मित![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी गरोदर असताना समोरची सीट
मी गरोदर असताना समोरची सीट पुर्ण रिकामी असेल तर वर पाय ठेवत असे. कारण पायाला कायम सूज आलेली असायची. अशावेळी पाय वर ठेवले की जरा बरं वाटे.
सस्मित, पाय 'मोजे न घालता'
सस्मित, पाय 'मोजे न घालता' ठेवतात, या समान परिस्थितीत बुडं ठेवली तर लोकांना जबरदस्त ऑब्जेक्शन्स असतील
आता खरंच पळते)
(मला मारु नका
अनु
अनु![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
त्या रिकाम्या सीटवर कायम
त्या रिकाम्या सीटवर कायम कोणीतरी बसलेलं आहे अस कल्पायच म्हाणजे पाय ठेवले जाणार नाहीत. आपल्या पायांच आपल्याला काही वाटत नसल तरी दुसर्यानी पाय ठेवलेल्या जागेवर बसायला नाहीआवडत. माझे पाय कितीही भरुन आले असले तरी मी वर सांगेतलेली क्ल्पना करते म्हणजे आपोआपच तो मोह टळाला जातो.
यावरुन आठवले.. अर्थात
यावरुन आठवले.. अर्थात विषयांतर आहे, तरीही...... विको टुथपेस्ट बनवणा-या पेंढारकरांचा एक लेख वाचलेला ब-याच वर्षांपुर्वी. त्यांना सुरवातीला किती धडपड करावी लागली याबद्दल त्यांनी लिहिलेले. विकोची टुथ पावडरही आहे. एका युरोपेअन का मिडल एस्टर्न अशा कुठल्यातरी मार्केटमध्ये ती जावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालु होते. तिकडच्या एका डिलरला जेव्हा त्यांनी बोटांनी पावडर दातांवर घासायची असे सांगितले तेव्हा तो म्हणाला हे तर यक्क आहे, बोट किती अनहायजिनिक असेल, ते तोंडात घालायचे? यावर पेंढारकर म्हणाले, दिवसभर तुमच्या टोयलेटमध्ये असलेले ब्रश तुम्हाला अनहायजिनिक वाटत नाही, मग तुमचे स्वतःचे बोट कसे काय अनहायजिनिक? पेंढारकर पुढे लिहिल्तात की त्यांनी ऑर्डर मिळवली त्याच्याकडुन.
सस्मित आणि अनु, भयानक आहात
सस्मित आणि अनु,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भयानक आहात तुम्ही मुलींनो!
सस्मित
सस्मित![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
यूह च मी हु च वाचतेय
यूह च मी हु च वाचतेय केव्हाच.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि मग >> हू नीडस ए सायकिअॅट्रीस्ट ! च उत्तर खालीच मिळतं !!
रु दिवा घेइलच.
वाल्क, टाल्क, लेंग्थ एकवेळ मी
वाल्क, टाल्क, लेंग्थ एकवेळ मी समजु शकते.
समजु शकते म्हणजे त्यात एल आहे म्हणुन जाउदेत चल बेनिफीट दिला.
पण यु - YOU - मधे ह कुठे आहे? यु चं युह कशाला?
आदिती +१ मलाही ते युह म्हण्जे
आदिती +१
मलाही ते युह म्हण्जे यू हे कळालं नव्हतं.
बाकी पब्लिकप्लेसवर घरच्यासारखं वागणं बिग नो नो
ऋन्मेष, छोटासा आणि छान लेख,
ऋन्मेष, छोटासा आणि छान लेख, आवडला.
बाकी पब्लिकप्लेसवर
बाकी पब्लिकप्लेसवर घरच्यासारखं वागणं>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ट्रेन, बस वैगेरे पब्लिकप्लेस मधे ऋ घरी करतो त्या काय काय गोष्टी करतोय हे इमॅजिन करुन लैच हसु आलं.
काही काही जणांचे मोज्यासहित
काही काही जणांचे मोज्यासहित आणी मोजेविरहित पदकमल आजुबाजुचे कीटक जसे की, झुरळ, माश्या, डास, चिलटे, पाली सुद्धा दुर ठेवायला मदत करता.
याबरोबरच अवांछित व्यक्तींनाही दुर ठेवण्यात त्याचा हातभार लागतो. परत ते असलेल्या जागी मंद मंद सुगंधांची बरसात होत असते, त्यामुळे त्यांच्या आजुबाजुचे कायम झिंगलेले (मदहोश) वाटतात किंबहुना ते असतातच.
कधी कधी असं वाटत की या लोकांनी जर त्यांच्या पायाची सुगंधीत प्लेट (जसा मिथुनच्या पायाचा ठसा ११,००० ला विकतात "ओ माय गॉड सारखी) विकायला काढलि तर घरातले कीटक मारायला बरं पडेल.
सिमंतिनी.. यस्स्स्स अगदी गा..
सिमंतिनी.. यस्स्स्स अगदी गा.. बघ कसं टाळ्ळं ऋ ने उत्तर द्यायचं..
जौ दिलं मी!!! ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सस्मित, अनु .. टू फनी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आणी ऋन्मेष, नुस्तं वर्षू संबोधलंस तरी चालेल रे मला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अदिती, तुमच्या ओळखीत कोणी
अदिती,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुमच्या ओळखीत कोणी सुंदर देखणी सायकॅएस्ट्रीन असेल तर सुचवा. जिथे माझे मन लागेल तिथेच मला मानसोपचाराचा फायदा होऊ शकतो. नाहीतर मी त्यालाच वेडा करून येण्याची शक्यता जास्त आहे
हा लेख वाचला आणि सहज फेबुवर
हा लेख वाचला आणि सहज फेबुवर लॉगिन केले. तिथे कोणीतरी इंग्रजीतुन एक जपानी माणसाचा किस्सा शेयर केला होता.
एक भारतीय जपानमध्ये ट्रेनमधुन प्रवास करत असतो. ट्रेन बरीच रिकामी असते म्हणून समोरच्या सीटवर पाय ठेऊन बसलेला असतो. हे बघुन एक जपानी माणूस त्याच्या समोरील सीटवरच बसतो नि त्याचे पाय आपल्या मांडीवर ठेवून घेतो.
भारतीय माणसाला अवघडल्यासारखे होते, तो जपानी माणसाला विचारतो की तुम्ही असं का करता? माझे पाय का आपल्या मांडीवर ठेऊन घेता.
तर जपानी माणूस म्हणतो, की तुम्ही आमच्या देशाचे पाहुणे आहात, तुम्हाला असं पाय ठेवायला कंफर्टेबल वाटत असेल तर खुशाल ठेवा, पण माझ्या देशाची एक सीट खराब होते. त्यामुळे मी तुमचे चरणकमल असे माझ्या मांडीवर ठेऊन घेतो जेणे करुन माझ्या देशाची सीट खराब नाही होणार आणि माझ्या देशाच्या पाहुण्याला अनकंफर्टेबलदेखील वाटणार नाही.
धन्य तो जपानी माणूस! आणि धन्य तो जपान देश!
Pages