काही परकीय अमराठी भाषेतील शब्द आणिक त्याचा मराठी अनर्थ
खर तर सदर विषय हा लेखनाचा स्वतन्त्र विषय होऊ शकतो का ? हा खरोखरच सन्शोधनाचा विषय आहे. मला खर तर ह्या विषयाचा स्वतन्त्र ध्हगाच काढायचा होता पण ते जमल नाही त्यामुळे हा लेखन प्रपन्च.
माझ्या अमराठी भाषान्च्या कुतुहला पोटी म्हणा किन्वा नको तीथे लुडबूड करण्याच्या खोडीमूळे म्हणा (कॉलेज शब्द किड्यान्मूळे) मी काही अमराठी शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पर्देशातील काही काळाच्या वास्तव्यामधे मला काही अमराठी आणिक काही परकीय भाशीकान्शी सन्वाद साधण्याची सन्धी मिळाली. त्यातून हे जे काही शब्द आहे ते मी शिकलो.
माझ्या ट्रेनीन्गच्या काळात काही गुजराथी अशीलाबरोबर काम करण्याची सन्धी मिळाली त्यातील चुम्माळीस म्हणजे मराठीतील चव्वेचाळीस आणि पिस्ताळीस म्हण्जे मराठीतली पन्चेचाळीस ही गोष्ट मला अजूनपर्यन्त पटलेली नाहीये (हा पिस्ता मला काही पचनी पडलेला नाहीये)
तसेच गुजराथीत लिहीलेला व्याजनू खाता हा शब्द मराठीतला/ देवनागरीतला " प्यार नू खाता " असा मी वाचायचो. आणिक गुजराती लोक जात्याच 'प्रेमळ' (गुजराथी मा बोले हू प्रेम करू शू ) असल्याने मला तन्तोतन्त खरा वाटायचा.
गुजराथीतील आणि एक प्रसिद्ध शभ म्हणजे गान्डा ह्या शब्दाचा मराठीत किन्वा हिन्दीत भयानक अनर्थ होईल पण असा शब्द गुजराथीत आहे खरा.
माझ्या परदेशातील काही काळाच्या वास्तव्यात माझा काही केरळी/ मल्याळम लोकान्शी सन्बन्ध आला. असे म्हणतात की केरळी लोक एकवेळ केरळात भेटणार नाहीत पण ते जगाच्या पाठीवर दुसरी कडे कुठेही भेटतील. अशीही एक आख्यायिका आहे की नील आर्मस्ट्रोन्ग जेन्व्हा पहिल्यान्दा चन्द्रावर गेला तेन्व्हा त्याला तीथे केरळी माणसाने चहा पाजला. खरे-खोटे देव जाणे.
तर ही गुळूगुळू मुळूमुळू मल्याळम भाषेत भाताला मोरु म्हणतात ताक्/दह्याला चोरू म्हणतात (लोणच्याला बहुदा जोरू म्हणत असावेत. तशीही जोरु तिखट असतेच म्हणा)
म्हणजे आपण भातावर ताक घेतले की ते म्ह्णणार चोरुवर मोरु. आपल्याकडे म्हण आहे ना "चोरावर मोर" तिच उगम स्थान बहुदा "चोरुवर मोरु " वरून झाल असणार.
चण्याला ही मल्याळम मण्डळी म्हणतात कडलै वास्तविक कढवण्याचा आणिक चण्यान्चा काही सम्बन्ध नाही पण ह्याना कोण समजावणार आणि कुठल्या भाषेत समजावणार
आता तामिळ भाषा म्हटलीकी तोन्डत पाणी खेळवत श्वास न घेता बोलायची सवय तुम्हाला सायला पाहीजे. ह्यात क्रियापद पुरूष काही वेगळाच चालतो. पो म्हटल तर चालता हो पोहोया म्हटल तर जा आणि पोहोलामे म्हटल तर आपण निघूया (आपण दोघे किन्वा जितके असतील तितके चाल्ते होऊया थोडक्यात कटूया) म्हणजे "चालणे" हा शब्द किती चालतो बघा तामिळ भाषेत.
आता मी जर म्हटल " मिक्क णनड्री" तर तुम्हाला वाटेल मी तुम्हाला शिवी दिलीये आणि तुम्ही भा.ण्डायला याल माझ्याशी पण मी जर ह्याचा अर्थ सान्गीतला तुम्हाला की "खुप खुप धन्यवाद" तर तुम्ही गोन्धळून जाल का नाही. तसच असत ते.
एकदा अशीच गाडीत गम्मत झाली. कुण्या एका पन्जाबी माणसाला एक कुणी बिगर पन्जाबी माणसाचा छोटा मुलगा धक्का देत होता तेन्व्हा तो पन्जाबी म्हणाला " अरे ओय तेरे लोन्ढे को सम्भाल इधर उधार हिलता है " तेन्व्हा पुर्ण डब्यात जोरदार हास्य रस उसळला
ही झाली भारतीय भाषान्ची कथा. पण परकीय भाषान्ची गत काही फारशी वेगळी नाहीये. फीलीपिनो लोकान्ची तघलूक काय नावची भाषा असते त्यात शब्दान्ची थोडीशी वानवा असावी कुठच्या सुन्दर किन्वा शुभ साठी ते "मगन्धान्ग" हा शब्द वापरतात म्हणजे बघा मगन्धान्ग उमागा (शुभ सकाळ) मगन्धान्ग हापेन (शुभ सन्ध्याकाळ ) मगन्धान्ग गबी (शुभ रात्री ) सुन्दर मुलगी असली तरी मगन्धान्ग सुन्दर चित्र असल तरी मगन्धान्ग सुन्दर जेवण असल तरी मगन्धान्ग (जोर से बोलो जयमातादी. त्वमेव मगन्धान्ग त्वमेव मगन्धान्ग )
भावाला म्हणतात " कुया " आणि बहीणीला म्हणतात " आते " बहिणीला आत्या म्हणायची ही काय बर पद्धत ? आणि धन्यवाद ला म्हणतात " सलामत"
आपले शेजारी श्रीलन्कन ह्यान्ची सिन्हीली भाषा एकदम निराळी.कुणाची चौकशी करायची असेल तर ते म्हणतात " कोहमद" मग आपण जर मजेत असू तर उत्तर द्यायच "हुन्दाय" आणि यथा तथा असू तर उत्तर द्यायच "वरदग्नै" (मराठीत विचार केला तर माझ्या कडे हुन्दाय गाडी आहे मी मजेत आहे किन्वा मी मजेत नाही मला वर दे की रे ) कोथीन्बीरी ला हे लोक म्हणतात "कोत्तुमाल" गोड वाटतो पण शब्द
अरेबीक लोक कुणाची चौकशी करायची तर म्हणतात "कैफल हाल " किन्वा "कैफालिक" मग ह्याच उत्तर द्यायच " अल हमदुलील्ला असमतुल्लाह रेहेमतुला बरकातू " (ह्याचा अर्थ मी देवाच्या कृपेने मजेत आहे आणि देवाच्या दयेने माझी बरकत होईल ) हे म्हणजे मराठीत तू कसा आहेस बाबा? आस विचारल्यावर त्याला गितेतला " कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेशु कदाचन " हा श्लोक म्हणून दाखवल्यासारखा आहे. "आखुय" म्हणजे भाऊ आणिक "आख्ता" म्हणजे बहिण. लहान मुलाला गोड म्हण्याच तर वापरा "हेलुवा" पण हेच हेलुवा जर "भुनैया" आधी जोडलत तर बुरख्या आडून फटके पडतील कारण हेलुवा भुनैय्या चा अर्थ होतो फटाकडी पोरगी. त्यामुळे मग पळायची तयारी ठेवा. "बखलावा" म्हणजे मिठाई तर "बकला" म्हणजे बायकी पुरूष. त्यामुळे ख च्या ऐवजी क वापरलात तर आणिबाणी उदभवू शकते
फ्रेन्च लोकान्च इन्ग्लीश लोकान्शी अगदी वावड. ईन्ग्रजी मधले शब्द ते तोडून फोडून न्याहरीला वापरतील. आता ईन्ग्रजीत "मर्सी" म्हणजे दया पण फ्रेन्च मध्ये हाच मर्सी होतो "मेस्सी" अणिक त्याचा अर्थ होतो धन्यवाद
हे फ्रेन्चही "बॉन" शब्द कशा पूर्वीही वापरतात "बॉन जोर" (सुप्रभात) बॉन नुई (शुभ रात्री) "बॉन अपेत्ती" (तुम्हाला चा.न्गली भुक लागो आणिक चान्गले जेवण जावो ) अश्या अर्थाच मराठीतल एक " वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे " सोडल तर दुसरे काही ऐकीवात नाहीये. आहेच आपली मराठी भाषा तेवढी सबळ
मित्रानो खर तर माझे ज्ञान आणिक लेखन कौशल्य हे सर्व लिहीण्यास व्यक्त करण्यास खुप तोकडे आहे. मराठी भाषा दिनाच्या एक दिवस आधि माझ्या कडून असल काही लेखण माझ्या हातन झाल हा मी माझा देवी सरस्वतीचा माझ्यावरील आशिर्वाद समजतो आणि माझे लिखाण वाचल्या बद्दल म.ण्ड्ळी धन्यवाद, मिक्क णन्ड्री, सलामत, आणिक मेसी
लिखाण : केदार अनन्त साखरदाण्डे दिनान्क २६/०२/२०१६
अवांतराबद्द्ल माफ करा अरे ,
अवांतराबद्द्ल माफ करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे , इथ जर्मन बोलू शकणारे बरेच आहेत वाटत ? फार छान वाटल . असा काही ग्रुप आहे का ?
मी B1 शिकतोय पण प्रॅक्टीस करायला फारस कुणी मिळत नाही
सोन्याला बंगार की काहीतरी
सोन्याला बंगार की काहीतरी म्हणतात ( लहान मुलाला आपण सोन्या म्हणतो तसं इथे बंगारू, बंगारी म्हणतात)
दिल्लीत असतांना खडीसाखर
दिल्लीत असतांना खडीसाखर आणायला दुकानात पाठवले होते मला.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
घरुन दम मिळाला होता.. खडीशक्कर म्हणायच नाही, मिश्री म्हणायच.
हिन्दी: मिसरी- खडीसाखर
मराठी: मिस्री- तंबाखू भाजुन केलेली पावडर
हिन्दी गाण्यात असतं ना
हिन्दी गाण्यात असतं ना मिसरीसा रस घोले वगैरे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिश्री नाही मिसरी!
मिश्री नाही मिसरी!
रेव्यु आममच्या भागातपण लोक
रेव्यु आममच्या भागातपण लोक अल्ला म्हणजे आले म्हणतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण पुस्तकी लोक शुंठी म्हणतात.
अल्ला म्हणजे 'नाही नाही' या अर्थाने पण!
वल्ला म्हणजे नको.
आणि गंमत इथे 'इडली' म्हणजे ठेऊ का?
म्हणजे 'फोन ईडली?' चा अर्थ 'फोन ठेऊ का? ' असा होतो.
हो मिसरी.... करते बदल.
हो मिसरी....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करते बदल.
फोन इडली
फोन इडली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो आमच्याकडे पोळ्यांच्या बाई
हो आमच्याकडे पोळ्यांच्या बाई धारवाडकडच्या आहेत त्या ईडली, माडली, असं म्हणतात. इथे ईडला, माडला असं म्हणतात. इथे माडली म्हणजे 'करू दे' ( माडी म्हणजे करा)
फोन इडली >>>
फोन इडली >>>:हाहा:
मग इडलीला काय म्हणतात?
मग इडलीला काय म्हणतात?
इडलीला इडलीच
इडलीला इडलीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपादित
संपादित
एकदा रत्नागिरीच्या एका
एकदा रत्नागिरीच्या एका मित्राला म्हट्लं 'एंजॉय माडी'
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो म्हणे मी माडी पित नाही.
रत्नागिरीत माडी म्हणजे माडापासून केलेले माईल्ड अल्कोहोलिक पेय.
रत्नागिरीत माडी म्हणजे
रत्नागिरीत माडी म्हणजे माडापासून केलेले माईल्ड अल्कोहोलिक पेय.>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मराठी/ हिंदीत तडीपार म्हणतो त्यात 'तडी' म्हणजे काय? कन्नडात तडी म्हणजे थांबा. ( wait)
कन्नडिगा, धागा हैजॅक माडोणा
कन्नडिगा, धागा हैजॅक माडोणा ??
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
आमचा एक कलिग म्हणाला, "हमारे
आमचा एक कलिग म्हणाला, "हमारे ग्वालियर के घर के गार्डन मे बहुत चुकंदर आते है"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याला म्हटले "इतने आते है तो पेस्ट कंट्रोल क्यों नही करते" तो आ वासून बघत बसला.
नंतर कळले 'आमच्या बागेत बरीच बीटरुट आली आहेत' सांगत होता
तडी देउन पार पोचवणे = तडीपार
तडी देउन पार पोचवणे = तडीपार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनु
अनु![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चुकंदर , भारीच!
चुकंदर ,
भारीच!
मित, नडी माडोमि!
मित, नडी माडोमि!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदारभाऊ, हम अब अॅनामीरा नही
केदारभाऊ, हम अब अॅनामीरा नही रहे, अनघा. हो गये है.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुज्जु शब्द वर नवरा- नवरी होऊन गेलेच आहेत. अजुन एक..
मराठीत आवड्णे - गुजरातीत येणे.
तुला पुपो बनवता येते? - तने पुपो आवडे छे?
तुला पुरणपोळी आवडते? = तने पुपो गमे छे ?
अशी मजा.
या चुकंदर चा एक किस्सा
या चुकंदर चा एक किस्सा आमच्याकडे झाला होता. >>> माझी़ कॉलेजमधे एका दिल्लीकर मुलीशी नव्यानेच मैत्री झाली होती आणि ती नव्यानेच वसईत राहायला आली असल्याने तिच्या फार ओळखी नव्हत्या. एकदा ती आमच्या घरी आली असताना आईने तिला नारळाची वडी दिली. त्यात रंग येण्यासाठी थोड बिट घातल होत त्यामुळे तीने विचारलच की, याला छान रंग आलाय, काय घातलय आणि ताईने पटकन सांगितल 'छछुंदर'.
ती 'हाय राम, ये सब भी खाते हो आप' असं म्हणून जी उसळली..... आणि आमच हसुन हसुन पोट दुखायला लागलं. आईला तिची समजूत घालायला १५ - २० मि. घालवावी लागली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आता हे चचुंदर काय असतं
आता हे चचुंदर काय असतं बा?
उंदिर का?
मराठीतली चुचूंद्री
मराठीतली चुचूंद्री![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझ्या ट्रेनीन्गच्या काळात
माझ्या ट्रेनीन्गच्या काळात काही गुजराथी अशीलाबरोबर काम करण्याची सन्धी मिळाली त्यातील चुम्माळीस म्हणजे मराठीतील चव्वेचाळीस आणि पिस्ताळीस म्हण्जे मराठीतली पन्चेचाळीस ही गोष्ट मला अजूनपर्यन्त पटलेली नाहीये (हा पिस्ता मला काही पचनी पडलेला नाहीये) >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
३७ = सुडतालीस.
४२ = चुम्माळीस नाही , चुंबाळीस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
४५ बरोबर आहे.
माझा बॉस गांडा अर्थात वेडा हा शब्द सर्रास वापरतो. आई मुलांना वेडेपणा करू नकोस म्हणून दटावताना = गांडावेडा ना करीस असे म्हणत असते. मला पहले भयंकर वाटायचे ऐकायला
भयंकर उन्हाळ्यात भर दुपारी
भयंकर उन्हाळ्यात भर दुपारी माझ्या दिल्लीकर मित्रांबरोबर संवाद - मी - कितनी गर्मी है मैं तो हैरान हो गयी! माझे मित्र - गर्मी के मौसम में गर्मी तो होगी ही, इसमें हैरानीकी क्या बात है?
मराठीत हैराण = त्रस्त
हिंदीत हैरान होना = आश्चर्यचकित होणे
हिंदितील असाच मजेदार शब्द:
हिंदितील असाच मजेदार शब्द: घडियाल.
हे असं वाटत की काही लोक पुलावरुन खाली पाण्यात सुसर पहाताहेत, तेवढ्यात एकाच्या हातातलं घड्याळ खाली पडलं. आणि तो खाली हात दाखवत 'अरे घड्याळ घड्याळ असं ओरडला!' आरडा ओरडा ऐकुन काही लोक बघायला आले, त्यात एक उत्तरेकड्चा बघायला आला आणि त्याला वाटलं सुसर दिसतेय तिला हा घड्याळ म्हणुन ओरडतोय. तो परत गेला तेव्हा त्याने लोकांना घड्याल ~ घडियाल म्हणजे काय असतं ते सांगितलं आणि सुसरीला हिंदीत घडियाल म्हणु लागले.
हिंदीतील चिडवा म्हणजे
हिंदीतील
चिडवा म्हणजे मराठीतील पोहे किंवा चिवडा
हा अपभ्रंश कोणी केला असेल बरे?
पंजाबीतील इत्थे म्हणजे
पंजाबीतील इत्थे म्हणजे मराठीतील इथे
नाल म्हणजे यात
Pages