कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
आजी वारकरी दिसतेय कपाळावर
आजी वारकरी दिसतेय कपाळावर बुक्का किंवा अबीर लावलेय ...
आरकुडे यांची ,दिंडी चालली चालली असेल....
मी आजी, गाठोडे आणि मागच्या
मी आजी, गाठोडे आणि मागच्या लाकडाचे फडताळ असा संदर्भ लावला, अर्थात चुकीचा पण असू शकतो
शब्दाली बरोबर पैठणी : शांता
शब्दाली बरोबर
पैठणी : शांता शेळके.
![2015_Gift_iPad.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/2015_Gift_iPad.jpg)
हे घ्या
अरे वा ! धन्यवाद संयोजक
अरे वा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद संयोजक
अरे वा. शब्दाली अभिनंदन.
अरे वा. शब्दाली अभिनंदन.
अरे वा, मस्त आहे हा खेळ !!
अरे वा, मस्त आहे हा खेळ !!
कविता क्र. ९
कविता क्र. ९
![](https://lh3.googleusercontent.com/-Pf4Vxz-KMoU/VtMX19PWlMI/AAAAAAAAT38/aIbuAcCTWvs/s800-Ic42/IMG_9810%252520copy.jpg)
मस्तच आहे हा खेळ
मस्तच आहे हा खेळ
मस्त खेळ. छान चालले आहे.
मस्त खेळ. छान चालले आहे. सर्वांचे अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो थोडे सोपे हवेत मात्र. त्या फोटो वरुन पैठणी कविता मला जन्मात ओखळता आली नसती. कमाल आहे श्बदाली.
मयेकर आणि गजाभौ फॉर्मात
मयेकर आणि गजाभौ फॉर्मात
डोंगर, नदी पण त्या नदीतल्या
डोंगर, नदी पण त्या नदीतल्या बांधकामाचा संदर्भ लक्षात येत नाहीये
डोकं चालवा लोकहो
मला 'सरिता करिते का कधी खंत'
मला 'सरिता करिते का कधी खंत' आठवतेय.
मला 'या गंगेमधी गगन वितळले'
मला 'या गंगेमधी गगन वितळले' आठवली. पण फोटोचा आणि त्या कवितेचा संबंध नसणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजुन एक खूण. बघा काही संदर्भ
अजुन एक खूण. बघा काही संदर्भ लागतोय का?
मला मिळालेल्या बक्षीसात भांग
मला मिळालेल्या बक्षीसात भांग आणि तुळस ओळखणार्या मैत्रेयी आणि साधना यांचा मोठा वाटा असल्याने एकेक पादत्राण त्यांना देतोय. शूलेसेस माझ्यासाठी ठेवल्यात.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सह्याद्री ? मला ' भव्य
सह्याद्री ?
मला ' भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा ' आठवली..
राकट देशा, कणखर देशा
राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा ?
हे क्रम बरोबर लावाल का
हे क्रम बरोबर लावाल का प्लीज?
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ८ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
माझ्यामते ८ नंतर ९ असायला हवे आणि वरची कविता ही क्रमांक १० असायला हवी. मी कितीवेळ मागचेच चित्र बघत राहिलो.
वरची कविता :
अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव
तुझ्या शिवारी जगले, हसले
कडी कपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव
हाय सोडूनी जाते आता
ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता, धरती दे गं ठाव
माझे पाय लहान आहेत हो,
माझे पाय लहान आहेत हो, पादत्राणे व्हायची नाहीत, एक लेस डिलिट तरी चालेल, गाठोडी बांधायच्या कामी येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संथ वाहते क्रुष्णामाई...
संथ वाहते क्रुष्णामाई...
जाईन दूर गावा ...
जाईन दूर गावा ...
घाटा तली वाट काय तिचा थाट
घाटा तली वाट काय तिचा थाट
चित्र नको भाव पहा
चित्र नको भाव पहा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान आहे कल्पना! मजा येतेय
छान आहे कल्पना! मजा येतेय वाचताना.पण फोटो आणि कविता यांची सांगड घालणे जरा अवघड वाटते आहे.यशस्वी स्पर्धक नक्कीच प्रशंसेस पात्र आहेत. त्यांचे अभिनंदन.पुढील कवितांबद्दल उत्सुकता वाटते आहे.
दोन्हीत पर्यावरणाचा प्रचंड
दोन्हीत पर्यावरणाचा प्रचंड र्हास दिसतोय.
पहिली मिठी नदी नाहीतर हरिद्वारची गंगा काहीही असू शकेल. दुसरे खाणकामानंतरचे अवशेष वाटताहेत.
नव्या युगाचे पाईक आम्ही -
नव्या युगाचे पाईक आम्ही - आमच्या शाळेतले गाणे आठवले
संयोजक, अजून एक क्लयु देता का ?
मला नैसर्गिक गोष्टी वापरून
मला नैसर्गिक गोष्टी वापरून केलेली सुधारणा - असे वाटत आहे
अजुन एक खूण. आता सारे
अजुन एक खूण. आता सारे सोप्पे होईल
sariva, काही फोटो सोपे
sariva, काही फोटो सोपे दिले, काही थोडे गोंधळवणारे. मायबोलीकर किती हुशार आहेत हे तुम्ही पाहिलेत ना.. काही कविता एका खूणेतच ओळखल्या आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज हृदय मम विशाल झाले त्यास
आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुनी गगन लाजले...
Pages