कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
मला भुईकमळ यांचं बरोबर
मला भुईकमळ यांचं बरोबर वाटतंय.
फुलराणी : बालकवी
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे गावी गाणी
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फ़ुलराणीला
हिरवे-पिवळे तुरे उन्हाचे
हिरवे-पिवळे तुरे उन्हाचे खोविलेस केसांत उगा का ?
वार्याचे हळु पीस फिरवुनी उसळ्यास हिरव्या लहरी का ?...
अभिनंदन भुईकमळ श्रावणमासी
अभिनंदन भुईकमळ
श्रावणमासी हर्ष मानसी - बालकवी

आहा … . काय मस्त गिफ्ट !
आहा … . काय मस्त गिफ्ट !
कविता क्र. ८
कविता क्र. ८

झाडाचे नाव ओळखावे लागेल का?
झाडाचे नाव ओळखावे लागेल का?
"ते फूल अफूचे होते - गदिमा
"ते फूल अफूचे होते - गदिमा ?"
हळुवार नखलिले फूल, ज्यातून उमलली भूल, मी वेडी जाणत नव्हते, ते फूल अफूचे होते
झाडाचं नाव ओळखलं तर काही तरी
झाडाचं नाव ओळखलं तर काही तरी खूण नक्की सापडेल. बघा सापडतंय का?
मस्तच!!!! धम्माल चालली आहे
मस्तच!!!!
धम्माल चालली आहे इथे
maitreyee तुम्ही जवळ आहात.
maitreyee तुम्ही जवळ आहात. चालवा डोकं.
गणपत वाणी बिडी पिताना
गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी;
जिप्सी या झाडाचे नाव
जिप्सी या झाडाचे नाव काय.....मला ती तम्बाखु वाटली.
अरे वा.. अजुन सुरू आहेच का...
अरे वा.. अजुन सुरू आहेच का...
व्वा, मैत्रेयीने लिहिलेली
व्वा, मैत्रेयीने लिहिलेली कविता मस्त आहे
मस्त मजा येतेय या खेळात.
मस्त मजा येतेय या खेळात.
मरजुआना सारखी दिसतीये
मरजुआना सारखी दिसतीये
पुढची खूण
पुढची खूण

मर्जुआना म्हणजे?? मराठीत काय
मर्जुआना म्हणजे?? मराठीत काय म्हणतात??
भांग गं साधना..
भांग गं साधना..
ते तंबाखूचे झाड नाही तरीही एक
ते तंबाखूचे झाड नाही तरीही एक तर्क-
तंबाखूची रसाळ पोथी अपेक्षित आहे का?
तंबाखुवरच अडकुन पडलो तर
तंबाखुवरच अडकुन पडलो तर तुळशीचे काय? तीही आहे म्हणजे तिचाही रोल आहेच ना काहीतरी.
जोगिया : भांगेत पेरुनी तुळस
जोगिया : भांगेत पेरुनी तुळस परतला शाम
'भांगेत तुळस उगवावी तशी..''.
'भांगेत तुळस उगवावी तशी..''. अशी एखादी ओळ असेल कवितेत.
वरील विधान मी जोगियाच्या संदर्भात केलेले नाही क्रुपया गैरसमज नसावा.
अरे वा ...मयेकर .
अरे वा ...मयेकर .
ज्जे बात.. भरत यांच्यासाठी
ज्जे बात.. भरत यांच्यासाठी एजोटाझापा.

तुम्हाला ही (स्वस्त झालेली) पादत्राणे.
वा भरत, जोगिया ऐकायला हवा.
वा भरत, जोगिया ऐकायला हवा. घरकुल चित्रपट आठवला.
कविता क्र. ९
कविता क्र. ९

एक वाटतेय पण, नसेलही ते असे
एक वाटतेय पण, नसेलही ते असे वाटतेय. गाणं
पाऊल थकले, माथ्यावरती जड झाले ओझे. ही दुसरी ओळ वाटतेय त्या गाण्याची पण त्याची पहिली ओळ ह्या चित्राशी जमतेय असं वाटत नाही.
आजी, गाठोडे, विसावा ??
आजी, गाठोडे, विसावा ??
मला एकदम शांता शेळकेंची पैठणी
मला एकदम शांता शेळकेंची पैठणी कविता आठवली
Pages