डाब चिंगरी (नारळात शिजवलेली कोळंबी)

Submitted by मृणाल साळवी on 29 February, 2016 - 15:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

आज आपण दाब चिंगरी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'दाब'म्हणजे नारळ आणि 'चिंगरी'म्हणजे कोळंबी. नारळात शिजवलेली कोळंबी.

साहित्यः

शहाळे - २
कोळंबी - ५०० ग्रॅम
कांदा - २ लांब चिरुन
काजु - ७ - ८
खसखस - २ चमचे
मोहरी - २ चमचे
हिरवी मिरची - ३
लसुण - ३-४ पाकळ्या
आल्याचा छोटा तुकडा
मोहरीचे तेल - २ चमचे
पंचफोराण - २ चमचे (मेथी, जीरे, कलौंजी, मोहरी,बडिशेप यांचे मिश्रण)
कणिक - १ वाटी
मिठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

कृती:

१. दोन्ही शहाळ्यांमधील पाणी ग्लासात काढुन घ्यावे व दोन्ही शहाळ्यांची मलई काढुन घ्यावी. शहाळे कापुन घेताना नारळवाल्याकडुन त्याचे वरचे झाकण सुद्धा मागुन घ्यावे.

p1

२. एका पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेले आले, लसुण व कांदा टाकुन ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
३. कांदा परतल्यावर त्यात काजु, भिजवलेली मोहरी व खसखस टाकुन परतावे.

p2

४. ह्या मिश्रणात थोडी मलई टाकुन मिक्सरवर मऊसर वाटुन घ्यावे. वाटताना पाण्याची गरज वाटल्यास शहाळ्याचे पाणी वापरावे.

p3

५. एका बाऊलमधे कोळंबीला थोडी हळद व हिंग चोळुन घ्यावे.
६. पॅनमधे मोहरीचे तेल गरम करावे व कोळंबी टाकुन २ मिनिटे परतुन लगेच बाऊल मधे काढुन घ्यावी.

p4

७. ह्या बाऊलमधे वाटलेले मिश्रण, उरलेली मलई, हिरवी मिरची, मिठ व एक चमचा मोहरीचे तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.

p5p6

८. हे तयार झालेले मिश्रण दोन्ही नारळामधे भरुन त्याला वरुन झाकण लावावे.

p7

९. ह्यामधुन वाफ बाहेर पडु नये म्हणुन कणकेने सील करावे. त्यास वरती पंचफोरण लावावे.

p8p9

१०. ओव्हन २०० degree Celsius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
११. ह्या ओव्हनमधे दोन्ही नारळ ठेवुन ३० मिनिटे शिजवुन घ्यावेत.

p10

१२. जेवायला बसतानाच नारळ उघडुन दाब चिंगरी गरम भात किंवा तांदुळाच्या भाकरी सोबत serve करावे.

p11p12p13

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहेमीप्रमाणे सुरेख फोटो .. Happy

रेसिपीही ईंटरेस्टींग दिसत आहे फक्त मोहोरी चा एव्हढा वापर कितपत आवडेल पर्सनली ते कळत नाही ..

नारळावर जी कणिक लावली आहे "दम" टाईप त्यावर पंचफोरन लावण्यामागे काय उद्देश असेल? त्याचा फ्लेवर उतरत असेल का रिझल्टींग डिश मध्ये?

>>
नारळावर जी कणिक लावली आहे "दम" टाईप त्यावर पंचफोरन लावण्यामागे काय उद्देश असेल? त्याचा फ्लेवर उतरत असेल का रिझल्टींग डिश मध्ये?>> +१

सगळ्यांना थँक्स.
हो जरा खटपटीची आहे पाकृ पण कधीतरी सुट्टीच्या दिवशी करायला मजा येते.
>>
नारळावर जी कणिक लावली आहे "दम" टाईप त्यावर पंचफोरन लावण्यामागे काय उद्देश असेल? त्याचा फ्लेवर उतरत असेल का रिझल्टींग डिश मध्ये?>> नाही.. त्याचा फ्लेवर काही येत नाही. मी ते फक्त सजावटीसाठी म्हणुन लावले होते. serve करताना नारळ घेउन जातो, तेव्हा छान दिसते.

वॉव..कसली ऑसम दिसतीये रेसिपी.. भारीच खटपट आहे. मी केली तर मायनस करीन खटपटी ची स्टेप Wink
(मी बिग फॅन आहे सरसों च्या तेलातली माछेर झोल ची Happy )
सायो ने विचारलेला प्रश्न माझ्याही मनात आला ,पण तू लगेचच एक्स्प्लेन केलंयस.

मस्त दिसतेय रेसिपी. बराच वेळ नावावरून काय असेल ते नक्की कळत नव्हतं म्हणून उघडून पाहिलं नव्हतं Wink

हे असंच्या असं रेडीमेड कुठच्या रेस्टाँ. मध्ये मिळतं का? Proud

मस्त दिसतेय प्रकरण, एकदम exotic. करून पाहणार नक्कीच.

गेल्या आठवड्यात एका बंगाली नातलगासमवेत बॉंग अड्ड्यावर जेवायला गेलो असताना या डिशची चर्चा झाली. त्यांच्या मेन्यूवर हि डिश होती.

धन्यवाद. Happy

वेका.. मी आता जानेवारीत भारतात गेले होते, तेव्हा आम्हि सी वुड्स ला एक बंगाली रेस्टॉरंट आहे, तिथे खाल्ला होती हि पाकृ. तेव्हा मला चव आवडली म्हणुन पाकृ शोधुन ट्राय केली.

लै भारी
त्या राज कचोरी नंतर थेट इथेच आलो
म्हटले काय प्रकरण आहे हे दाब चिंगरी पहावे तर बापरे . पण ते कोळंबी आमी खात नाही ना दुसर काही टाकता येईल काय?

अवघड प्रकरण आहे पण बघायला, वाचायला मजा आली.
लागणारा वेळ पाच मिनीटे असं लिहून आमच्या सारख्या नवशिक्यांना आशा दाखवू नका हो. Happy

केवढी टेम्प्टिंग डीश आहे. मस्त यम्मी फोटोज. खानदानाला इम्प्रेस करण्यासाठी रविवारी लंच मधे बनवण्यात येइल. फोटो नक्की टाकणार.

Happy

लागणारा वेळ बदलली आहे. साधारण १ तास लागतो.
कोळंबी खात नसल्यास तुम्ही पनीर किंवा मिक्स व्हेजीटेबल्स किंवा ओल्या काजुचे गर वापरु हे करु शकता.

Pages