आज आपण दाब चिंगरी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'दाब'म्हणजे नारळ आणि 'चिंगरी'म्हणजे कोळंबी. नारळात शिजवलेली कोळंबी.
साहित्यः
शहाळे - २
कोळंबी - ५०० ग्रॅम
कांदा - २ लांब चिरुन
काजु - ७ - ८
खसखस - २ चमचे
मोहरी - २ चमचे
हिरवी मिरची - ३
लसुण - ३-४ पाकळ्या
आल्याचा छोटा तुकडा
मोहरीचे तेल - २ चमचे
पंचफोराण - २ चमचे (मेथी, जीरे, कलौंजी, मोहरी,बडिशेप यांचे मिश्रण)
कणिक - १ वाटी
मिठ चवीनुसार
कृती:
१. दोन्ही शहाळ्यांमधील पाणी ग्लासात काढुन घ्यावे व दोन्ही शहाळ्यांची मलई काढुन घ्यावी. शहाळे कापुन घेताना नारळवाल्याकडुन त्याचे वरचे झाकण सुद्धा मागुन घ्यावे.
२. एका पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेले आले, लसुण व कांदा टाकुन ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
३. कांदा परतल्यावर त्यात काजु, भिजवलेली मोहरी व खसखस टाकुन परतावे.
४. ह्या मिश्रणात थोडी मलई टाकुन मिक्सरवर मऊसर वाटुन घ्यावे. वाटताना पाण्याची गरज वाटल्यास शहाळ्याचे पाणी वापरावे.
५. एका बाऊलमधे कोळंबीला थोडी हळद व हिंग चोळुन घ्यावे.
६. पॅनमधे मोहरीचे तेल गरम करावे व कोळंबी टाकुन २ मिनिटे परतुन लगेच बाऊल मधे काढुन घ्यावी.
७. ह्या बाऊलमधे वाटलेले मिश्रण, उरलेली मलई, हिरवी मिरची, मिठ व एक चमचा मोहरीचे तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.
८. हे तयार झालेले मिश्रण दोन्ही नारळामधे भरुन त्याला वरुन झाकण लावावे.
९. ह्यामधुन वाफ बाहेर पडु नये म्हणुन कणकेने सील करावे. त्यास वरती पंचफोरण लावावे.
१०. ओव्हन २०० degree Celsius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
११. ह्या ओव्हनमधे दोन्ही नारळ ठेवुन ३० मिनिटे शिजवुन घ्यावेत.
१२. जेवायला बसतानाच नारळ उघडुन दाब चिंगरी गरम भात किंवा तांदुळाच्या भाकरी सोबत serve करावे.
मस्तच! काय छान पदार्थ आहे.
मस्तच! काय छान पदार्थ आहे.
व्वा !! मस्त दिसतेय रेसिपी!
व्वा !! मस्त दिसतेय रेसिपी! बरीच खटपटीची आहे मात्र
वॉव, मस्त प्रकरण आहे की.
वॉव, मस्त प्रकरण आहे की.
नेहेमीप्रमाणे सुरेख फोटो ..
नेहेमीप्रमाणे सुरेख फोटो ..
रेसिपीही ईंटरेस्टींग दिसत आहे फक्त मोहोरी चा एव्हढा वापर कितपत आवडेल पर्सनली ते कळत नाही ..
नारळावर जी कणिक लावली आहे "दम" टाईप त्यावर पंचफोरन लावण्यामागे काय उद्देश असेल? त्याचा फ्लेवर उतरत असेल का रिझल्टींग डिश मध्ये?
मस्त रेसिपी. बरीच उठाठेव
मस्त रेसिपी. बरीच उठाठेव आहे पण.
तोंपासु प्रकरण वाटतंय. भरपूर
तोंपासु प्रकरण वाटतंय. भरपूर खटाटोप आहे मात्र!
>> नारळावर जी कणिक लावली आहे
>>
नारळावर जी कणिक लावली आहे "दम" टाईप त्यावर पंचफोरन लावण्यामागे काय उद्देश असेल? त्याचा फ्लेवर उतरत असेल का रिझल्टींग डिश मध्ये?>> +१
Jahabaharee!!! Jagunantar
Jahabaharee!!!
Jagunantar aata tumachach number!
सगळ्यांना थँक्स. हो जरा
सगळ्यांना थँक्स.
हो जरा खटपटीची आहे पाकृ पण कधीतरी सुट्टीच्या दिवशी करायला मजा येते.
>>
नारळावर जी कणिक लावली आहे "दम" टाईप त्यावर पंचफोरन लावण्यामागे काय उद्देश असेल? त्याचा फ्लेवर उतरत असेल का रिझल्टींग डिश मध्ये?>> नाही.. त्याचा फ्लेवर काही येत नाही. मी ते फक्त सजावटीसाठी म्हणुन लावले होते. serve करताना नारळ घेउन जातो, तेव्हा छान दिसते.
मस्त आहेत फोटो आणी क्रुती
मस्त आहेत फोटो आणी क्रुती सुधा!
मस्त पाकृ दिसतेय.. आवडली..
मस्त पाकृ दिसतेय.. आवडली..
वॉव..कसली ऑसम दिसतीये
वॉव..कसली ऑसम दिसतीये रेसिपी.. भारीच खटपट आहे. मी केली तर मायनस करीन खटपटी ची स्टेप
(मी बिग फॅन आहे सरसों च्या तेलातली माछेर झोल ची )
सायो ने विचारलेला प्रश्न माझ्याही मनात आला ,पण तू लगेचच एक्स्प्लेन केलंयस.
मस्त दिसतेय रेसिपी. बराच वेळ
मस्त दिसतेय रेसिपी. बराच वेळ नावावरून काय असेल ते नक्की कळत नव्हतं म्हणून उघडून पाहिलं नव्हतं
हे असंच्या असं रेडीमेड कुठच्या रेस्टाँ. मध्ये मिळतं का?
मस्त प्रकार !
मस्त प्रकार !
मस्त दिसतेय प्रकरण, एकदम
मस्त दिसतेय प्रकरण, एकदम exotic. करून पाहणार नक्कीच.
गेल्या आठवड्यात एका बंगाली नातलगासमवेत बॉंग अड्ड्यावर जेवायला गेलो असताना या डिशची चर्चा झाली. त्यांच्या मेन्यूवर हि डिश होती.
जबरदस्त!! फोटोही खूपच सुंदर
जबरदस्त!! फोटोही खूपच सुंदर नेहमीप्रमाणेच....
ह्या वाटणात मी मिक्स भाज्या घालेन.
जबरी पाककृती!!! आणि फोटो
जबरी पाककृती!!! आणि फोटो सुध्दा खुप सुंदर.
ऑस्सम! वेगळीच पाकृ. बघायला
ऑस्सम!
वेगळीच पाकृ. बघायला मजा आली. खायला आणखी येईल
काय जबरदस्त दिसतेय..य्म्म्म..
काय जबरदस्त दिसतेय..य्म्म्म..
भारी! नेहेमी प्रमाणे फोटो
भारी! नेहेमी प्रमाणे फोटो एकदम प्रो आहेत...
अहा! याची चव अफाट लागत असणार
अहा! याची चव अफाट लागत असणार !
मस्त रेसिपी. आम्ही आयती
मस्त रेसिपी. आम्ही आयती मिळाली तर खाणार.
धन्यवाद. वेका.. मी आता
धन्यवाद.
वेका.. मी आता जानेवारीत भारतात गेले होते, तेव्हा आम्हि सी वुड्स ला एक बंगाली रेस्टॉरंट आहे, तिथे खाल्ला होती हि पाकृ. तेव्हा मला चव आवडली म्हणुन पाकृ शोधुन ट्राय केली.
वॉव !!! मस्त ..
वॉव !!! मस्त ..
जबरदस्त दिसत्येय.
जबरदस्त दिसत्येय.
भारी !!! एक नंबर !!! साळवी
भारी !!! एक नंबर !!!
साळवी मॅडम्..पुस्तक काढाच आता एक
लै भारी त्या राज कचोरी नंतर
लै भारी
त्या राज कचोरी नंतर थेट इथेच आलो
म्हटले काय प्रकरण आहे हे दाब चिंगरी पहावे तर बापरे . पण ते कोळंबी आमी खात नाही ना दुसर काही टाकता येईल काय?
अवघड प्रकरण आहे पण बघायला,
अवघड प्रकरण आहे पण बघायला, वाचायला मजा आली.
लागणारा वेळ पाच मिनीटे असं लिहून आमच्या सारख्या नवशिक्यांना आशा दाखवू नका हो.
केवढी टेम्प्टिंग डीश आहे.
केवढी टेम्प्टिंग डीश आहे. मस्त यम्मी फोटोज. खानदानाला इम्प्रेस करण्यासाठी रविवारी लंच मधे बनवण्यात येइल. फोटो नक्की टाकणार.
लागणारा वेळ बदलली आहे. साधारण
लागणारा वेळ बदलली आहे. साधारण १ तास लागतो.
कोळंबी खात नसल्यास तुम्ही पनीर किंवा मिक्स व्हेजीटेबल्स किंवा ओल्या काजुचे गर वापरु हे करु शकता.
Pages