कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
अखेर! अभिनंदन रैना.
अखेर!
अभिनंदन रैना.
कविता: २ खूण :१
कविता: २
खूण :१
रैना, सही!
रैना, सही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन रैना. मला तर ही कविता
अभिनंदन रैना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तर ही कविता माहीत पण नव्हती
रैना, सॉलीड पाठ आहेत
रैना, सॉलीड पाठ आहेत तुला कविता. आधीच्या एका प्रयत्नात दिलेली पण सुंदर होती.
रैना, अभिनंदन! ही कविता
रैना, अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही कविता आम्हाला नव्हतीच.
दुसरी कविता आली.. ओळखा..
दुसरी कविता आली.. ओळखा.. ओळखा..
अर्रे.. धन्यवाद लोकहो आणि
अर्रे.. धन्यवाद लोकहो आणि संयोजक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
औदुंबर आहे का ? पण त्यात फेसाळत्या लाटा नाहीत.
ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
ओ संयोजक, आमच्या जमान्यातल्या
ओ संयोजक, आमच्या जमान्यातल्या कविता द्या कि हो!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नाही..
नाही..
शोभा, हि कविता नक्की आठवेल
शोभा, हि कविता नक्की आठवेल तुम्हाला..
तिसर्या फोटोत घर पान्यामंदी
तिसर्या फोटोत घर पान्यामंदी दिसतंय पण ती कविता असेलसे वाटत नाही.
मानव, बरोबर चालला आहात.. अजून
मानव, बरोबर चालला आहात.. अजून आठवा..
मी डोलकं रं, डोलकं रं, डोलकं
मी डोलकं रं, डोलकं रं, डोलकं रं दर्याचा राजा. पण हे गाणं आहे.
ही घ्या दुसरी खूणः
ही घ्या दुसरी खूणः
अगं काही काही गाणी आधी
अगं काही काही गाणी आधी कविताच असतात.... नंतर त्याचे गाणे होते.
पण तो समुद्र वाटत नाहीय. उफाळलेली नाहीतर पूरग्रस्त नदी वाटतेय.
उसळलेल पाणी, पाण्यातल
उसळलेल पाणी, पाण्यातल मोडकळलेल घर पाहुन मला 'मोडला नाही कणा' आठवतेय.
'गंगामाई पाहूणी आली, गेली घरट्यात राहून'
ज्जे ब्बात स्निग्धा! बरोबर
ज्जे ब्बात स्निग्धा! बरोबर उत्तर! घ्या तुमचं बक्षिस..
अभिनंदन स्निग्धा!
स्निग्धा, अभिनंदन! ही कविता
स्निग्धा, अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही कविता पण आम्हाला नव्हती!
ओह, धन्यवाद
ओह, धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शोभा मला पण नव्हती गं
शोभा मला पण नव्हती गं
कविता क्र. ३ खूण - १
कविता क्र. ३
खूण - १
शोभा१ स्निग्धा अभिनंदन.
शोभा१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्निग्धा अभिनंदन. खुप जलद ओळखलेत.
खुप जलद ओळखलेत.>>>>>.हुषार
खुप जलद ओळखलेत.>>>>>.हुषार आहे ती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविता क्र. ३ आली सुद्धा! ओळखा
कविता क्र. ३ आली सुद्धा! ओळखा बरं..
वा वा रैना, स्निग्धा हे
वा वा रैना, स्निग्धा
हे होकायंत्र आहे का? कोलंबसाचे गर्वगीत? खूप लांबवर फेकतोय.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वा वा रैना, स्निग्धा हे
वा वा रैना, स्निग्धा
हे होकायंत्र आहे का? कोलंबसाचे गर्वगीत? खूप लांबवर फेकतोय.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे
अक्षांशाचे रेखांशाचे
उभे आडवे गुंफुन धागे?
वा! भरत मयेकर, किती पटकन
वा! भरत मयेकर, किती पटकन ओळखलंत!
हार्दिक अभिनंदन!!
Pages