कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
कविता १- खुण पहिली
कविता १- खुण पहिली
![pangal1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/pangal1.jpg)
ती एक पक्षीण आकाशवेडी ... हि
ती एक पक्षीण आकाशवेडी ...
हि कविताच आठवली ...माहीत नाही बरोबर की चूक
पान, मूळ, पक्षी? कुठली कविता
पान, मूळ, पक्षी? कुठली कविता बरं ही??
पिंपळपानाचा फोटो फारच आवडला.
पिंपळपानाचा फोटो फारच आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गजानन, कविता ओळखा
गजानन, कविता ओळखा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान आहे उपक्रम. फोटोवरुन
छान आहे उपक्रम.
फोटोवरुन कविता ओळखायची, म्हटले तर एकदम सोप्पे, म्हटले तर आव्हानात्मक. फोटो दिलाय तो कवितेत लिहिलेल्या शब्दांचा जशाचा तसा आहे की कवितेत जी भावना व्यक्त केलीय, ज्याबद्दल बोलले गेलेय त्या गोष्टीं फोटोतुन व्यक्त केल्यात हे ओळखणे जमले तर अर्धी बाजी जिंकल्यासारखी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विनार्च चांगला प्रयत्न. आठवा
विनार्च चांगला प्रयत्न. आठवा आठवा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
निष्पर्ण तरू असे शब्द असलेली
निष्पर्ण तरू असे शब्द असलेली कविता आहे का?
भरत मयेकर .. निष्पर्ण तरुचा
भरत मयेकर ..
निष्पर्ण तरुचा ऋतू गेल्यानंतरचे वर्णन आहे कवितेत
"कणखर देशा, काटेरी देशा," ती
"कणखर देशा, काटेरी देशा," ती कविता का?
वसंत ऋतु वरची कविता.
वसंत ऋतु वरची कविता.
वसंत ऋतू आला.. (ही कविता आहे
वसंत ऋतू आला..
(ही कविता आहे का माहित नाही, पण सिनेमातलं गाणं आहे. ज्यात सुरुवातीला आला.. आला हे शब्द नंतर कोकीळेचा आवाज आणि नंतर वसंत ऋतू आला ह्या ओळी आहेत )
शोभा१... प्रयत्न करा अजुन.
शोभा१... प्रयत्न करा अजुन. जवळ आहात
मित, येउ द्या अजुन. फारच जव्ळ
मित, येउ द्या अजुन. फारच जव्ळ आहात. अजुन एक प्रयत्न. वसन्त, कोकिळ... जमतय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविता १- खुण दुसरी
कविता १- खुण दुसरी
![](https://lh3.googleusercontent.com/-7_vHrF7burQ/VtEyCIltkmI/AAAAAAAATuk/cPWnx5A5CUI/s800-Ic42/marathi%252520bhasha%252520divas%252520kavita%2525201%252520hint%2525202.png)
श्रावणमासी हर्ष, मानसी हिरवळ
श्रावणमासी हर्ष, मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.
वसंत ऋतुत तू श्रावण कुठून
वसंत ऋतुत तू श्रावण कुठून आणलास गं ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हि चित्र पण १ ल्या एकाच
हि चित्र पण १ ल्या एकाच कवितेशी संबंधीत आहेत का?
वसंत ऋतुत तू श्रावण कुठून
वसंत ऋतुत तू श्रावण कुठून आणलास गं ? >>>>>>..अग, हे दुसरं चित्र बघून श्रावण आठवला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहुतेक असावे. कारण अजुन
बहुतेक असावे. कारण अजुन पहिली कविता सोडवली नाहीय, त्यामुळे तिच्याचसाठी क्लु येत राहणार ना?
श्रावणात बहावा???
श्रावणात बहावा??? निसर्गचक्र बदलतेय पण अजुन इतकेही बदलले नाहीय गं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो. दुसरी खुण
हो. दुसरी खुण
वैशाख मासी वासंतिक समय
वैशाख मासी वासंतिक समय शोभला
आम्रासव पिऊनी गान करीती कोकिळा
कविता नाही आठवत पण हे गाण
कविता नाही आठवत पण हे गाण मात्र आठवल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हासत वसंत ये वनी, अलबेला, हा
प्रियकर पसंत हा मनी, धरणीला, हा
घनवनराई, बहरुनि येई
कोमल मंजुळ कोयल गाई
आंबा पाही फुलला, हा
चाफा झाला पिवळा, हा
(No subject)
अशी निळी टिकली नका हो देऊ,
अशी निळी टिकली नका हो देऊ, ते पण काव्यच आहे की![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आला वसंत देही, मज ठावूकेच
आला वसंत देही, मज ठावूकेच नाही
कवयित्री इंदिरा संत. आता ओळखा
कवयित्री इंदिरा संत.
आता ओळखा
आला शिशिर संपत, पानगळती
आला शिशिर संपत, पानगळती सरली
ऋतुराजाची चाहूल झाडेवेलींना लागली .....
रैना!! अगदी बरोब्बर उत्तर!!
रैना!! अगदी बरोब्बर उत्तर!! तोंड गोड करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages