काही परकीय अमराठी भाषेतील शब्द आणिक त्याचा मराठी अनर्थ
खर तर सदर विषय हा लेखनाचा स्वतन्त्र विषय होऊ शकतो का ? हा खरोखरच सन्शोधनाचा विषय आहे. मला खर तर ह्या विषयाचा स्वतन्त्र ध्हगाच काढायचा होता पण ते जमल नाही त्यामुळे हा लेखन प्रपन्च.
माझ्या अमराठी भाषान्च्या कुतुहला पोटी म्हणा किन्वा नको तीथे लुडबूड करण्याच्या खोडीमूळे म्हणा (कॉलेज शब्द किड्यान्मूळे) मी काही अमराठी शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पर्देशातील काही काळाच्या वास्तव्यामधे मला काही अमराठी आणिक काही परकीय भाशीकान्शी सन्वाद साधण्याची सन्धी मिळाली. त्यातून हे जे काही शब्द आहे ते मी शिकलो.
माझ्या ट्रेनीन्गच्या काळात काही गुजराथी अशीलाबरोबर काम करण्याची सन्धी मिळाली त्यातील चुम्माळीस म्हणजे मराठीतील चव्वेचाळीस आणि पिस्ताळीस म्हण्जे मराठीतली पन्चेचाळीस ही गोष्ट मला अजूनपर्यन्त पटलेली नाहीये (हा पिस्ता मला काही पचनी पडलेला नाहीये)
तसेच गुजराथीत लिहीलेला व्याजनू खाता हा शब्द मराठीतला/ देवनागरीतला " प्यार नू खाता " असा मी वाचायचो. आणिक गुजराती लोक जात्याच 'प्रेमळ' (गुजराथी मा बोले हू प्रेम करू शू ) असल्याने मला तन्तोतन्त खरा वाटायचा.
गुजराथीतील आणि एक प्रसिद्ध शभ म्हणजे गान्डा ह्या शब्दाचा मराठीत किन्वा हिन्दीत भयानक अनर्थ होईल पण असा शब्द गुजराथीत आहे खरा.
माझ्या परदेशातील काही काळाच्या वास्तव्यात माझा काही केरळी/ मल्याळम लोकान्शी सन्बन्ध आला. असे म्हणतात की केरळी लोक एकवेळ केरळात भेटणार नाहीत पण ते जगाच्या पाठीवर दुसरी कडे कुठेही भेटतील. अशीही एक आख्यायिका आहे की नील आर्मस्ट्रोन्ग जेन्व्हा पहिल्यान्दा चन्द्रावर गेला तेन्व्हा त्याला तीथे केरळी माणसाने चहा पाजला. खरे-खोटे देव जाणे.
तर ही गुळूगुळू मुळूमुळू मल्याळम भाषेत भाताला मोरु म्हणतात ताक्/दह्याला चोरू म्हणतात (लोणच्याला बहुदा जोरू म्हणत असावेत. तशीही जोरु तिखट असतेच म्हणा)
म्हणजे आपण भातावर ताक घेतले की ते म्ह्णणार चोरुवर मोरु. आपल्याकडे म्हण आहे ना "चोरावर मोर" तिच उगम स्थान बहुदा "चोरुवर मोरु " वरून झाल असणार.
चण्याला ही मल्याळम मण्डळी म्हणतात कडलै वास्तविक कढवण्याचा आणिक चण्यान्चा काही सम्बन्ध नाही पण ह्याना कोण समजावणार आणि कुठल्या भाषेत समजावणार
आता तामिळ भाषा म्हटलीकी तोन्डत पाणी खेळवत श्वास न घेता बोलायची सवय तुम्हाला सायला पाहीजे. ह्यात क्रियापद पुरूष काही वेगळाच चालतो. पो म्हटल तर चालता हो पोहोया म्हटल तर जा आणि पोहोलामे म्हटल तर आपण निघूया (आपण दोघे किन्वा जितके असतील तितके चाल्ते होऊया थोडक्यात कटूया) म्हणजे "चालणे" हा शब्द किती चालतो बघा तामिळ भाषेत.
आता मी जर म्हटल " मिक्क णनड्री" तर तुम्हाला वाटेल मी तुम्हाला शिवी दिलीये आणि तुम्ही भा.ण्डायला याल माझ्याशी पण मी जर ह्याचा अर्थ सान्गीतला तुम्हाला की "खुप खुप धन्यवाद" तर तुम्ही गोन्धळून जाल का नाही. तसच असत ते.
एकदा अशीच गाडीत गम्मत झाली. कुण्या एका पन्जाबी माणसाला एक कुणी बिगर पन्जाबी माणसाचा छोटा मुलगा धक्का देत होता तेन्व्हा तो पन्जाबी म्हणाला " अरे ओय तेरे लोन्ढे को सम्भाल इधर उधार हिलता है " तेन्व्हा पुर्ण डब्यात जोरदार हास्य रस उसळला
ही झाली भारतीय भाषान्ची कथा. पण परकीय भाषान्ची गत काही फारशी वेगळी नाहीये. फीलीपिनो लोकान्ची तघलूक काय नावची भाषा असते त्यात शब्दान्ची थोडीशी वानवा असावी कुठच्या सुन्दर किन्वा शुभ साठी ते "मगन्धान्ग" हा शब्द वापरतात म्हणजे बघा मगन्धान्ग उमागा (शुभ सकाळ) मगन्धान्ग हापेन (शुभ सन्ध्याकाळ ) मगन्धान्ग गबी (शुभ रात्री ) सुन्दर मुलगी असली तरी मगन्धान्ग सुन्दर चित्र असल तरी मगन्धान्ग सुन्दर जेवण असल तरी मगन्धान्ग (जोर से बोलो जयमातादी. त्वमेव मगन्धान्ग त्वमेव मगन्धान्ग )
भावाला म्हणतात " कुया " आणि बहीणीला म्हणतात " आते " बहिणीला आत्या म्हणायची ही काय बर पद्धत ? आणि धन्यवाद ला म्हणतात " सलामत"
आपले शेजारी श्रीलन्कन ह्यान्ची सिन्हीली भाषा एकदम निराळी.कुणाची चौकशी करायची असेल तर ते म्हणतात " कोहमद" मग आपण जर मजेत असू तर उत्तर द्यायच "हुन्दाय" आणि यथा तथा असू तर उत्तर द्यायच "वरदग्नै" (मराठीत विचार केला तर माझ्या कडे हुन्दाय गाडी आहे मी मजेत आहे किन्वा मी मजेत नाही मला वर दे की रे ) कोथीन्बीरी ला हे लोक म्हणतात "कोत्तुमाल" गोड वाटतो पण शब्द
अरेबीक लोक कुणाची चौकशी करायची तर म्हणतात "कैफल हाल " किन्वा "कैफालिक" मग ह्याच उत्तर द्यायच " अल हमदुलील्ला असमतुल्लाह रेहेमतुला बरकातू " (ह्याचा अर्थ मी देवाच्या कृपेने मजेत आहे आणि देवाच्या दयेने माझी बरकत होईल ) हे म्हणजे मराठीत तू कसा आहेस बाबा? आस विचारल्यावर त्याला गितेतला " कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेशु कदाचन " हा श्लोक म्हणून दाखवल्यासारखा आहे. "आखुय" म्हणजे भाऊ आणिक "आख्ता" म्हणजे बहिण. लहान मुलाला गोड म्हण्याच तर वापरा "हेलुवा" पण हेच हेलुवा जर "भुनैया" आधी जोडलत तर बुरख्या आडून फटके पडतील कारण हेलुवा भुनैय्या चा अर्थ होतो फटाकडी पोरगी. त्यामुळे मग पळायची तयारी ठेवा. "बखलावा" म्हणजे मिठाई तर "बकला" म्हणजे बायकी पुरूष. त्यामुळे ख च्या ऐवजी क वापरलात तर आणिबाणी उदभवू शकते
फ्रेन्च लोकान्च इन्ग्लीश लोकान्शी अगदी वावड. ईन्ग्रजी मधले शब्द ते तोडून फोडून न्याहरीला वापरतील. आता ईन्ग्रजीत "मर्सी" म्हणजे दया पण फ्रेन्च मध्ये हाच मर्सी होतो "मेस्सी" अणिक त्याचा अर्थ होतो धन्यवाद
हे फ्रेन्चही "बॉन" शब्द कशा पूर्वीही वापरतात "बॉन जोर" (सुप्रभात) बॉन नुई (शुभ रात्री) "बॉन अपेत्ती" (तुम्हाला चा.न्गली भुक लागो आणिक चान्गले जेवण जावो ) अश्या अर्थाच मराठीतल एक " वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे " सोडल तर दुसरे काही ऐकीवात नाहीये. आहेच आपली मराठी भाषा तेवढी सबळ
मित्रानो खर तर माझे ज्ञान आणिक लेखन कौशल्य हे सर्व लिहीण्यास व्यक्त करण्यास खुप तोकडे आहे. मराठी भाषा दिनाच्या एक दिवस आधि माझ्या कडून असल काही लेखण माझ्या हातन झाल हा मी माझा देवी सरस्वतीचा माझ्यावरील आशिर्वाद समजतो आणि माझे लिखाण वाचल्या बद्दल म.ण्ड्ळी धन्यवाद, मिक्क णन्ड्री, सलामत, आणिक मेसी
लिखाण : केदार अनन्त साखरदाण्डे दिनान्क २६/०२/२०१६
धमाल लिहीले आहेस केदार. हे
हे म्हणजे मराठीत तू कसा आहेस बाबा? आस विचारल्यावर त्याला गितेतला " कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेशु कदाचन " हा श्लोक म्हणून दाखवल्यासारखा आहे. >>> हे सर्वात भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलंय... हिंदी भाषेतील
मस्त लिहिलंय...
हिंदी भाषेतील यातायात, चेष्टा, यात्रा याचे पण मराठीतील अर्थ वेगळेच आहेत.
इंग्रजी आपल्या सरावाची पण तिच्यातही जसे लिहिले तसे उच्चारले जात नाही. पोर्तुगीज भाषेत काही श्ब्दांची स्पेलिंग्ज तिच असली तरी उच्चार वेगळे आहेत. नॉर्माल, पर्तीक्यूलार, क्रिमे वगैरे शब्दांशी जुळवून घेणे कठीण जाते.
मस्त धागा! हसून हसून वाट
मस्त धागा!
हसून हसून वाट लागली.
आपण मराठीत वापरलेला तू आणि
आपण मराठीत वापरलेला तू आणि हिंदीतला तू यात बरात फरक आहे. आपण सरसकट हिंदीतही तू म्हणतो. बर्याच हिंदी लोकांना तो अपमानास्पद वाटतो. तुम म्हणा किंवा आप. आमच्या चंदीगड हापिसात मराठी लोक जायला लागल्यावर तिकडचे लोक धड बोलायलाच तयार नव्हते. हे सगळे महाराष्ट्रीय लोक उद्धट व मॅनरलेस आहेत असे सगळीकडे पसरलं होतं. मॅनेजमेंटला एक सभा घ्यावी लागली होती सर्व मराठींची ज्यात तू, तुम व आप यातला फरक सांगावा लागला.
भंजाळायला होतंय
भंजाळायला होतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदा इंदूर पुणे गाडीत
एकदा इंदूर पुणे गाडीत होर्तो. धुळ्यावरून गाडी निघाल्यावर तिकीट काढताना मराठी प्यासेण्जर आणि एम पीचा कंड्क्तर यांची कशा वरून तरी जुंपली. पाशिंजर मैने तुमको बोला था. तुमको पैसा दिया था असे काहीतरी बोलत होता. मूळ विषय बाजूला पडून कंडक्टर म्हणाला 'जरा भी बात करनेकी तमीज नही है, तुम तुम करके उद्दंडतासे बात करता है. ' वास्तविक तो तुम्ही या अर्थाने च तुम तुम म्हणत होता.
गोव्यात स्थानिक भाषेत
गोव्यात स्थानिक भाषेत आदरार्थी बहुवचन नाही, पण भायेल्ल्या लोकांशी बोलताना ते तूम्ही या अर्थाने आपण हा शब्द योजतात. त्यानेही अनर्थ होतो.
बाईक स्पेअर पार्ट्स याचे भाषांतर बायकांचे पार्ट्स तर मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स चे भाषांतर भायेल्ल्या भानगडीचो मंत्री असे होते.
इथे आफ्रिकेत, खास करुन केनयात वयस्कर स्त्रीला मामा म्हणतात. तर पुरुषाला मझे म्हणतात.
छान लिहीलय.... अशाच
छान लिहीलय....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशाच स्वरुपाचा लेख जुन्या माबोवरही होता ना? बहुतेक दिनेशनी लिहिले होते? मला फारच पुसटसे आठवतय...
हे जर्मन लोक शुभ सकाळ ला
हे जर्मन लोक शुभ सकाळ ला म्हणतात गुट्टन मॉग्गन (हे बाळाला बाळगुटी दिल्यासारख वाटत
)
अग्ग्ग्ग्ग केदार !!! मुळात
अग्ग्ग्ग्ग केदार !!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मुळात जर्मन भाषेत कंठव्य [throttle] sounds फार जास्त आहेत, त्या मुळे सगळी भाषा अशी ख, ग, च अश्या sounds नी भरल्या सारखी वाटते.
केदार ’वास माखन झी?’ (आपण
केदार![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
’वास माखन झी?’ (आपण काय करता?) हे सुद्ध असंच गमतीदार वाटत.
छान मनोरंजन करणारा
छान मनोरंजन करणारा धागा.
आमच्या शेजारी आणि विभागात सुध्दा तेलगू कुटुंबे आहेत ते भाताला बुवा म्हणणात आणि डाळीला पप्पू. बुवा तिन्नवा किंवा तिन्नवा याचा अर्थ होतो जेवलास का?
त्याच्यांत असे कोणी तिन्नवा म्हटले की आम्ही सत्तावीस म्हणतो.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आमचे एक नातेवाईक होते त्यांची
आमचे एक नातेवाईक होते त्यांची बायको जपानी आहे.
ते म्हणत जपानीमधे "अहो" म्हणजे गाढव. त्यामुळे मराठी बायका नवर्याला मोठ्या प्रेमाने "अहो" म्हणतात
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बादवे: ह्या वास माखन झी ?
बादवे: ह्या वास माखन झी ? [तुम्ही काय करता?] वरुन आठवलेली गम्मत....पार्ल्याला रहात असताना आम्च्या बिल्डींग मधे गुज्जुभाईंचाच गोतावळा जास्त. आमच्या मजल्यावर आम्हीच काय ती तीन मराठी कुटुंब [त्या पैकी एक म्हणजे प्रख्यात संवादिनीवादक दादा वालावलकर
] आमच्या शेजारची छोटी गुज्जु कन्यका मला नेहमी विचारायची...तमारा दादा शु करे छे ?? तेव्हा मला प्रचंड हसु यायचे ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हा हा :स्मितः अॅना मीरा कुठे
हा हा :स्मितः
अॅना मीरा कुठे आहे ती गुजराथीतली गमती जमती सान्गू शकेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्याकडे मार्जार कुलातील
आपल्याकडे मार्जार कुलातील नराला बोका म्हणतात, पण बेंगाली मधे বোকা बोका म्हणजे बावळट किंवा मुर्ख आणि सगळ्यात मोठी गम्मत म्हणजे हा बोका आलय मात्र जॅपनीझ ばか बाका वरुन त्या बाका चा अर्थ ही moron किंवा stupid असाच आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पंजाबी कुडी: मुलगी कानडी कुडी
पंजाबी कुडी: मुलगी
कानडी कुडी : पी
मराठी कुडी : शरीर
कानडीत (कुडी)न प्याल्यामुळे पंजाबी मुलीचे (कुडी) मराठी शरीर (कुडी) अचेतन झाले.
मराठी काका : चुलता पंजाबी
मराठी काका : चुलता
पंजाबी काका : लहान भाऊ
तमीळ कक्का : शी शी
कानडी ऊरु : गाव कूडा :
कानडी
ऊरु : गाव
कूडा : सुध्दा
मात्रा: फक्त
अल्ला: आले
रेव्यु, मराठी कुडी म्हणजे
रेव्यु, मराठी कुडी म्हणजे शरीर .प्राण नव्हे. कुडीतून प्राण मुक्त होतात.
पादुका नन्द संपादित
पादुका नन्द
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपादित केले
धन्यवाद
>कानडीत (कुडी)न प्याल्यामुळे पंजाबी मुलीचे (कुडी) मराठी शरीर (कुडी) अचेतन झाले>>
अल्ला- आले? कन्नडात? Ginger
अल्ला- आले? कन्नडात? Ginger (आले) ला शुंटी/ठी म्हणतात, अल्ला म्हणजे नाही. इल्लापेक्षा थोडी वेगळी अर्थच्छटा आहे अल्लाची.
हिंदीत कुल्ला करना म्हणजे चूळ
हिंदीत कुल्ला करना म्हणजे चूळ भरताना तोंडात पाणी खुळखुळवणे.
मराठीत सगळ्यांना माहीत आहेच.
धारवाड बेळगाव ची कानडी आणि
धारवाड बेळगाव ची कानडी आणि बंगलोरची कानडी बरीच वेगळी आहे
बेळगाव कानडीत अल्ला म्हणजे आले
बेळगाव कानडीत अल्ला म्हणजे
बेळगाव कानडीत अल्ला म्हणजे आले<< बेळगावचे माहित नाही पण धारवाडकडे आम्ही सुंठीच म्हणतो.
अल्ला म्हणजे ना, नाही. वावे म्हणते तसं इल्लापेक्षा थोडं वेगळं वापरतात.
अल्ला म्हणजे आले>> बेंगलोर,
अल्ला म्हणजे आले>> बेंगलोर, कारवार, हुबळी सगळीकडचे कानडी ऐकलं आहे. पण अल्ला म्हणजे आले हे नाही ऐकलं कधी.
वावे म्हणते तसं इल्लापेक्षा थोडं वेगळं वापरतात.>> +१
मस्त धागा..कानडीत सोनं=
मस्त धागा..कानडीत सोनं= भंगारं...लग्नात हा शब्द सारखा ऐकून एक्दम चकीतच झाले होते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सोन्याला भंगार म्हणतात,
सोन्याला भंगार म्हणतात, रद्दीला हिरे किंवा पैसे म्हणतात का?
साबांना विचारावं लागेल
साबांना विचारावं लागेल
हाल्=दुध
मा बो करांनो आले म्हणजे
मा बो करांनो
आले म्हणजे अल्ला हा वाक्प्रचार आहे
Ginger meaning and translation in Malayalam, Tamil ...
pachakam.com/GlossaryDetail/Ginger=134
Ginger meaning and translation in Malayalam, Tamil, Kannada, Telugu, Hindi, ... Telugu Allam / Allamu / Sonthi; Kannada Shunti / Alla / Ashi Shunti / Ardraka ...
Pages