काही परकीय अमराठी भाषेतील शब्द आणिक त्याचा मराठी अनर्थ
खर तर सदर विषय हा लेखनाचा स्वतन्त्र विषय होऊ शकतो का ? हा खरोखरच सन्शोधनाचा विषय आहे. मला खर तर ह्या विषयाचा स्वतन्त्र ध्हगाच काढायचा होता पण ते जमल नाही त्यामुळे हा लेखन प्रपन्च.
माझ्या अमराठी भाषान्च्या कुतुहला पोटी म्हणा किन्वा नको तीथे लुडबूड करण्याच्या खोडीमूळे म्हणा (कॉलेज शब्द किड्यान्मूळे) मी काही अमराठी शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पर्देशातील काही काळाच्या वास्तव्यामधे मला काही अमराठी आणिक काही परकीय भाशीकान्शी सन्वाद साधण्याची सन्धी मिळाली. त्यातून हे जे काही शब्द आहे ते मी शिकलो.
माझ्या ट्रेनीन्गच्या काळात काही गुजराथी अशीलाबरोबर काम करण्याची सन्धी मिळाली त्यातील चुम्माळीस म्हणजे मराठीतील चव्वेचाळीस आणि पिस्ताळीस म्हण्जे मराठीतली पन्चेचाळीस ही गोष्ट मला अजूनपर्यन्त पटलेली नाहीये (हा पिस्ता मला काही पचनी पडलेला नाहीये)
तसेच गुजराथीत लिहीलेला व्याजनू खाता हा शब्द मराठीतला/ देवनागरीतला " प्यार नू खाता " असा मी वाचायचो. आणिक गुजराती लोक जात्याच 'प्रेमळ' (गुजराथी मा बोले हू प्रेम करू शू ) असल्याने मला तन्तोतन्त खरा वाटायचा.
गुजराथीतील आणि एक प्रसिद्ध शभ म्हणजे गान्डा ह्या शब्दाचा मराठीत किन्वा हिन्दीत भयानक अनर्थ होईल पण असा शब्द गुजराथीत आहे खरा.
माझ्या परदेशातील काही काळाच्या वास्तव्यात माझा काही केरळी/ मल्याळम लोकान्शी सन्बन्ध आला. असे म्हणतात की केरळी लोक एकवेळ केरळात भेटणार नाहीत पण ते जगाच्या पाठीवर दुसरी कडे कुठेही भेटतील. अशीही एक आख्यायिका आहे की नील आर्मस्ट्रोन्ग जेन्व्हा पहिल्यान्दा चन्द्रावर गेला तेन्व्हा त्याला तीथे केरळी माणसाने चहा पाजला. खरे-खोटे देव जाणे.
तर ही गुळूगुळू मुळूमुळू मल्याळम भाषेत भाताला मोरु म्हणतात ताक्/दह्याला चोरू म्हणतात (लोणच्याला बहुदा जोरू म्हणत असावेत. तशीही जोरु तिखट असतेच म्हणा)
म्हणजे आपण भातावर ताक घेतले की ते म्ह्णणार चोरुवर मोरु. आपल्याकडे म्हण आहे ना "चोरावर मोर" तिच उगम स्थान बहुदा "चोरुवर मोरु " वरून झाल असणार.
चण्याला ही मल्याळम मण्डळी म्हणतात कडलै वास्तविक कढवण्याचा आणिक चण्यान्चा काही सम्बन्ध नाही पण ह्याना कोण समजावणार आणि कुठल्या भाषेत समजावणार
आता तामिळ भाषा म्हटलीकी तोन्डत पाणी खेळवत श्वास न घेता बोलायची सवय तुम्हाला सायला पाहीजे. ह्यात क्रियापद पुरूष काही वेगळाच चालतो. पो म्हटल तर चालता हो पोहोया म्हटल तर जा आणि पोहोलामे म्हटल तर आपण निघूया (आपण दोघे किन्वा जितके असतील तितके चाल्ते होऊया थोडक्यात कटूया) म्हणजे "चालणे" हा शब्द किती चालतो बघा तामिळ भाषेत.
आता मी जर म्हटल " मिक्क णनड्री" तर तुम्हाला वाटेल मी तुम्हाला शिवी दिलीये आणि तुम्ही भा.ण्डायला याल माझ्याशी पण मी जर ह्याचा अर्थ सान्गीतला तुम्हाला की "खुप खुप धन्यवाद" तर तुम्ही गोन्धळून जाल का नाही. तसच असत ते.
एकदा अशीच गाडीत गम्मत झाली. कुण्या एका पन्जाबी माणसाला एक कुणी बिगर पन्जाबी माणसाचा छोटा मुलगा धक्का देत होता तेन्व्हा तो पन्जाबी म्हणाला " अरे ओय तेरे लोन्ढे को सम्भाल इधर उधार हिलता है " तेन्व्हा पुर्ण डब्यात जोरदार हास्य रस उसळला
ही झाली भारतीय भाषान्ची कथा. पण परकीय भाषान्ची गत काही फारशी वेगळी नाहीये. फीलीपिनो लोकान्ची तघलूक काय नावची भाषा असते त्यात शब्दान्ची थोडीशी वानवा असावी कुठच्या सुन्दर किन्वा शुभ साठी ते "मगन्धान्ग" हा शब्द वापरतात म्हणजे बघा मगन्धान्ग उमागा (शुभ सकाळ) मगन्धान्ग हापेन (शुभ सन्ध्याकाळ ) मगन्धान्ग गबी (शुभ रात्री ) सुन्दर मुलगी असली तरी मगन्धान्ग सुन्दर चित्र असल तरी मगन्धान्ग सुन्दर जेवण असल तरी मगन्धान्ग (जोर से बोलो जयमातादी. त्वमेव मगन्धान्ग त्वमेव मगन्धान्ग )
भावाला म्हणतात " कुया " आणि बहीणीला म्हणतात " आते " बहिणीला आत्या म्हणायची ही काय बर पद्धत ? आणि धन्यवाद ला म्हणतात " सलामत"
आपले शेजारी श्रीलन्कन ह्यान्ची सिन्हीली भाषा एकदम निराळी.कुणाची चौकशी करायची असेल तर ते म्हणतात " कोहमद" मग आपण जर मजेत असू तर उत्तर द्यायच "हुन्दाय" आणि यथा तथा असू तर उत्तर द्यायच "वरदग्नै" (मराठीत विचार केला तर माझ्या कडे हुन्दाय गाडी आहे मी मजेत आहे किन्वा मी मजेत नाही मला वर दे की रे ) कोथीन्बीरी ला हे लोक म्हणतात "कोत्तुमाल" गोड वाटतो पण शब्द
अरेबीक लोक कुणाची चौकशी करायची तर म्हणतात "कैफल हाल " किन्वा "कैफालिक" मग ह्याच उत्तर द्यायच " अल हमदुलील्ला असमतुल्लाह रेहेमतुला बरकातू " (ह्याचा अर्थ मी देवाच्या कृपेने मजेत आहे आणि देवाच्या दयेने माझी बरकत होईल ) हे म्हणजे मराठीत तू कसा आहेस बाबा? आस विचारल्यावर त्याला गितेतला " कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेशु कदाचन " हा श्लोक म्हणून दाखवल्यासारखा आहे. "आखुय" म्हणजे भाऊ आणिक "आख्ता" म्हणजे बहिण. लहान मुलाला गोड म्हण्याच तर वापरा "हेलुवा" पण हेच हेलुवा जर "भुनैया" आधी जोडलत तर बुरख्या आडून फटके पडतील कारण हेलुवा भुनैय्या चा अर्थ होतो फटाकडी पोरगी. त्यामुळे मग पळायची तयारी ठेवा. "बखलावा" म्हणजे मिठाई तर "बकला" म्हणजे बायकी पुरूष. त्यामुळे ख च्या ऐवजी क वापरलात तर आणिबाणी उदभवू शकते
फ्रेन्च लोकान्च इन्ग्लीश लोकान्शी अगदी वावड. ईन्ग्रजी मधले शब्द ते तोडून फोडून न्याहरीला वापरतील. आता ईन्ग्रजीत "मर्सी" म्हणजे दया पण फ्रेन्च मध्ये हाच मर्सी होतो "मेस्सी" अणिक त्याचा अर्थ होतो धन्यवाद
हे फ्रेन्चही "बॉन" शब्द कशा पूर्वीही वापरतात "बॉन जोर" (सुप्रभात) बॉन नुई (शुभ रात्री) "बॉन अपेत्ती" (तुम्हाला चा.न्गली भुक लागो आणिक चान्गले जेवण जावो ) अश्या अर्थाच मराठीतल एक " वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे " सोडल तर दुसरे काही ऐकीवात नाहीये. आहेच आपली मराठी भाषा तेवढी सबळ
मित्रानो खर तर माझे ज्ञान आणिक लेखन कौशल्य हे सर्व लिहीण्यास व्यक्त करण्यास खुप तोकडे आहे. मराठी भाषा दिनाच्या एक दिवस आधि माझ्या कडून असल काही लेखण माझ्या हातन झाल हा मी माझा देवी सरस्वतीचा माझ्यावरील आशिर्वाद समजतो आणि माझे लिखाण वाचल्या बद्दल म.ण्ड्ळी धन्यवाद, मिक्क णन्ड्री, सलामत, आणिक मेसी
लिखाण : केदार अनन्त साखरदाण्डे दिनान्क २६/०२/२०१६
साहिल्,मलाही हाच शब्द आठवला..
साहिल्,मलाही हाच शब्द आठवला..
मलै आणी बाहासा इंडोनेशिया या दोन्ही भाषेत खूप साम्य आहे आणी इंडो. मधे ही सुसू च शब्द आहे दुधाला!!
अजून ही काही गमतीदार उदाहरणं आहेत
तुम्ही = अंडा
एक लाख = जूता
नेकटाय = दासी
राजवाडा = पुरी
वेडा = गीला
बापरे इंडोनेशिया मध्ये मराठी
बापरे इंडोनेशिया मध्ये मराठी माणूस गेल्यावर भयंकर गोंधळ होत असतील.
तरी बरं पु लं नी पूर्वरंग मध्ये थोडी इन्ट्रो दिलीय
तामीळ मध्ये नाई म्हणजे
तामीळ मध्ये नाई म्हणजे कुत्रा
आणि कुद्रा म्हणजे पुतळा
आणखी एक गुजराथी भाषेची गंमत कुणी तरी सांगितली होती. एकदा काम पुर्ण झाल्यावर हाश्य हुश्य झाले. बॉसला अर्धवट मराठी येत होते. बॉस आपल्या मराठी सेक्रेटरीला म्हणाला, "आता मी नवरा झालो आणि तू नवरी झालीस"
त्याचे काय हाल झाले असतील? गुजराथीमध्ये 'नवरा' म्हणजे 'मोकळा' आणि नवरी म्हणजे 'मोकळी'.
कानडीत हत्ती म्हणजे कापूस
कानडीत
हत्ती म्हणजे कापूस
बट्टे म्हणजे कपडा
काल म्हणजे पाय
अक्की म्हणजे तांदूळ
गोदी म्हणजे गहू
शी म्हणजे गोड
खारा म्हण्जे तिखट
किवी म्हणजे कान
आमच्या ऑफिसमधे एका
आमच्या ऑफिसमधे एका उत्तरेकडच्या मुलीचे नाव आहे - शिवी. शिवशंकराची टाईप काही अर्थ आहे. पण सगळे मराठी लोक नाव वाचून्/ऐकून आधी खूप हसतात त्याची आता सवय झालीय तिला.
असमिया भाषेत तर लैच अनर्थ
असमिया भाषेत तर लैच अनर्थ होतात, सांगता न येन्यासरखे आइटम होतात! साध्या साध्या हिंदी शब्दांचे इतके अनर्थ की बास!!.
>> येस, मराठीत बाल= लहान मूल, हिंदीत बाल= केस (हेअर्स) आसामीत बाल= 'भलतीकडचेच ' केस !!::फिदी:
कानडीत हाड म्हणजे गाणं का
कानडीत हाड म्हणजे गाणं का ?
माझे आजोबा गाण्यातले पंडीत तर आजीला विशेष आवड नव्हती गाण्याची. तर त्यांच्यातला प्रेमळ संवाद ऐकलाय की तू कायम गाण्याला हाड-हाड केलंस म्हणून तुला गाणं येत नाही
रेव्यु जी.. गमतीदार आहेत
रेव्यु जी.. गमतीदार आहेत कानडी भाषेतील शब्द!!!
जकार्ताला माझी एक मैत्रीण आली होती माझ्याकडे, तेंव्हा एका रेस्टॉरेंट मधे वॉशरूम कडे गेली आणी लगेच्च सुपर कन्फ्यूज्ड होऊन परत आली.. तिकडे मेन्स टॉयलेट वर ,' प्रिया' आणी वुमन्स टॉयलेट ,'वनिता' लिहिलेले असते..
फिगर्स ही जरा स्पष्ट फरक दाखवणार्या नव्हत्या..
इंडोनेशिअन भाषेत
मॅन = प्रिया
वुमन- =वनिता
रेव्यु, शी नाही सिही म्हणजे
रेव्यु,
शी नाही सिही म्हणजे गोड. गावठी भाषेत सय्यन!
पादुकानंद, कानडीत बाला म्हणजे शेपटी.
आणखी कानडीत 'संचार' म्हणजे वाहतूक. मराठीत भूताचा वगैरे संचार असतो.
'उचित ' म्हणजे मोफत!
कुंडी म्हणजे काय ते वर लिहीलेलंच आहे.
आपला आड म्हणजे विहीर त्यांचा आड म्हणजे बोलणे/खेळणे.
) त्यांचा हाड म्हणजे गाणे गा.
आपला हाड म्हणजे शिवी (पादुकानंद मस्त देतात ही
आपला माड म्हणजे नारळाचं झाड त्यांचा माड म्हणजे मळभ.
हिंदीत मरी म्हणजे मेली आणि कानडीत पिल्लू किंवा शिष्य.
मरा म्हणजे सूप ते कुणीतरी लिहीलं आहेच.
आपलं तप म्हणजे कठिर साधना त्यांचं तप(तप्प) म्हणजे चूक.
वरती कुठल्या तरी भाषेत सायली म्हणजे वारली असं लिहीलंय तसं कानडीतही सायतु म्हणजे मेला (निदान आमच्या भागात तरी)
मस्त लेख धागा प्रतिसाद ..
मस्त लेख धागा प्रतिसाद ..
पुरूप्पू= डाळ. यावरून
पुरूप्पू= डाळ.
यावरून वांगीपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण आठवला.
मंगलोरी कोकणींत 'काका' म्हणजे
मंगलोरी कोकणींत 'काका' म्हणजे 'नंबर २' चा विधी.
इथे "पोहा " ह्या शब्दाचा अर्थ
इथे "पोहा " ह्या शब्दाचा अर्थ f*** असा होतो . . ,
मराठी आणि पोर्तुगिज भाषेत अनेक शब्द समान अर्थाचे आहेत. पण काहींचे अनर्थ सुद्धा आहेत .
सायो, कन्नडात कक्का म्हणतात
सायो, कन्नडात कक्का म्हणतात तुम्ही जे लिहिलंय त्याला!
अभ्यासा किंवा रूढी म्हणजे सवय.
आपण सण्णदिशी मारलं म्हणतो, तर इथे सण्ण म्हणजे बारके/छोटे
आणि कानडीत हसु म्हणजे
आणि कानडीत हसु म्हणजे भूक.
अन्ना म्हणजे फक्त भात.
चार दिवस अन्ना खाल्लं नाही असं कुणी सांगतं तेव्हा बाकी सगळं हादडलेलं असू शकतं, फक्त भात खाल्ला नाही.
अगदी असंच आमच्या भागातल्या हिंदीत लोक 'खाना' खाया नहीं म्हणजे भात किंवा पुलाव्/बिर्याणी असे पदार्थ खाल्ले नाहीत तर म्हणतात.
'घर जाके पानी न्हाऊं क्या ' असे विचारल्यावर , 'नको, दूधाने आंघोळ करा' असं म्हणावंसं वाटायचं.
नंतर कळलं पानी न्हाना म्हणजेच आंघोळ करणे.
यांच्या हिंदीतच 'ढोपर' शब्दाचा कानडीतल्या कुंडीसारखा होतो.
रान म्हणजे मराठीत जंगल पण उर्दूत मांड्या. 'रानां दुखती' म्हणजे मांड्या दुखत असाव्यात असा अर्थ मी 'मूर्ग ए रान' नावाच्या डीशच्या तर्काने लावला होता पूर्वी.
तेच कानडीत 'तोडी' म्हणजे मांडी.
आणि आपण तोडी म्हणजे तोडूनच टाकतो.
शी नाही सिही म्हणजे गोड.
शी नाही सिही म्हणजे गोड. गावठी भाषेत सय्यन!<<< आमच्याकडे "शीं" असा अनुनासिक उच्चार असल्यास गोड.
आड माड हाड वगैरेचे मराठीमधले ड चे उच्चार संपूर्ण आहेत तर कानडीमधेय अर्धवट आहेत आपण "अगं" मध्ये ग चा उच्चार करतो त्या टाईपमध्ये. शिवाय त्यांच्याकडे दोन ए आहेत. मेले चा साधारण उच्चार मेले आणि मॅले मधला असतो.
हुशार इल्ला म्हणजे बरे नाही. त्यालाच तमिळमध्ये वडम सरील्ला असं म्हणतात.
आणि पर्वा इल्ला (उच्चारी
आणि पर्वा इल्ला (उच्चारी पर्वागिल्ला) म्हणजे no problem

सुरुवातीला आपलं एखादं काम करायला सांगितल्यावर कुणी पर्वा इल्ला म्हटलं की वाटायचं , अरे पर्वा नाही काय, पर्वा कर ( आमच्या कामाची):D
पर्वा इल्ला! मला पण भारी
पर्वा इल्ला!
मला पण भारी उद्धट वाटायचे पूर्वी!
नंदिनी, त्या दीर्घ उच्चारामुळे आपलं आमटी सार आणि त्यांचं सा~र (सर)

सारखंच वाटतं!
कानडीत बाळीअण्णा = केळ आणि
कानडीत
बाळीअण्णा = केळ
आणि केळ = विचार (क्रि.)
मसूर = दही.
भडाभडा = लौकर.
भडाभडा माडिद, म्हणजे फाड फाड हाण असं काहीतरी वाटायचं आधी.
इथे हैद्राबादेत बरच काही
इथे हैद्राबादेत बरच काही आकारांत / उकारांत करण्याची सवय आहे.
मी हैद्राबादला आलो तेव्हा एकटा होतो. माझ्याकडे येणारी मोलकरीण, बेल दाबायची नाही. आली की साssरुsss अशा आरोळ्या ठोकायची. (हे सारु म्हणजे sir चा आकारांत+ उकारांत करुन केलेला अपभ्रंश).
माझ्याकडे एकदा पाहुणे आलेले. त्यात सारिका माझी मानलेली बहीण, लहानच होती तेव्हा तिला आम्ही सारु म्हणायचो. मोलकरीणिने आरोळ्या ठोकल्या "साssरुsss".. आणि सारिका झाली आश्चर्यचकीत, दादा हीला माझं नाव कसं माहिती, तू सांगितलं होतं का मी येणार आहे म्हणुन.
बाळे हण्णू म्हणजे केळं (
बाळे हण्णू म्हणजे केळं ( बंगळूरमधे तरी) . हण्णू म्हणजे ( पिकलेले) फळ, कायि म्हणजे कच्चे फळ.
मसूर नाही, मसरु म्हणजे दही.
केळ म्हणजे क्रि. विचार, पण केळी म्हणजे विचारा आणि केळू म्हणजे विचार ( अ.व. आणि ए.व)
ओके.
ओके.
ग्रामीण मराठीत लवकर ला
ग्रामीण मराठीत लवकर ला बिगीबिगी किंवा बेगीबेगी म्हणतात, तसं कन्नडात बेगा म्हणजे लवकर. अर्थात हे साम्य झालं, अनर्थ नाही
अगग! मज्जाच.
अगग!
मज्जाच.
मस्त लेख आणि प्रतिसाद! हा
मस्त लेख आणि प्रतिसाद! हा धागा म. भा. दि.च्या ग्रुपमध्ये हलवा ना!
मसरू म्हणजे दही. बाळीकायि
मसरू म्हणजे दही.
बाळीकायि म्हणजे कच्चे केळे. तमिळमध्ये त्यालाच वाळेकाई म्हणतात.
तमिळमध्ये पळां म्हणहे फळं. हा ळचा उच्चार थोडा वेगळा आहे. शिवाल ळ वर अनुस्वार पण आहे.
मांगा म्हणजे आंबा. अरिसी म्हणजे तांदूळ, इंग्लिश मँगो आणि राईस यावरून आले आहेत असे मध्यंतरी वाचले होते. खखोमाना.
अच्छा.. मजा मजाच आहेत की..
अच्छा.. मजा मजाच आहेत की.. छान वाटतय वाचायला..
अन्न = भात. अन वरणाला कुणीतरी वर पप्पू लिहलय. तर अन्नपप्पू = वरणभात का? म्हणजे लहान मुलाला अन्न्पप्पू आपू? असे म्हणू का? आपू = गुजराती देऊ का?
तेलुगुत अन्नम (म हलन्त)
तेलुगुत अन्नम (म हलन्त) म्हणजे भात / जेवण.
पप्पु + अन्नम = पप्पान्नम म्हणजे वरण भात.
सिंधींमधे तवा मराठीत नवरा.
सिंधींमधे तवा मराठीत नवरा.
मस्तच.
मस्तच.
Pages