काही परकीय अमराठी भाषेतील शब्द आणिक त्याचा मराठी अनर्थ

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

खर तर सदर विषय हा लेखनाचा स्वतन्त्र विषय होऊ शकतो का ? हा खरोखरच सन्शोधनाचा विषय आहे. मला खर तर ह्या विषयाचा स्वतन्त्र ध्हगाच काढायचा होता पण ते जमल नाही त्यामुळे हा लेखन प्रपन्च.

माझ्या अमराठी भाषान्च्या कुतुहला पोटी म्हणा किन्वा नको तीथे लुडबूड करण्याच्या खोडीमूळे म्हणा (कॉलेज शब्द किड्यान्मूळे) मी काही अमराठी शब्द आत्मसात Proud करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पर्देशातील काही काळाच्या वास्तव्यामधे मला काही अमराठी आणिक काही परकीय भाशीकान्शी सन्वाद साधण्याची सन्धी मिळाली. त्यातून हे जे काही शब्द आहे ते मी शिकलो.

माझ्या ट्रेनीन्गच्या काळात काही गुजराथी अशीलाबरोबर काम करण्याची सन्धी मिळाली त्यातील चुम्माळीस म्हणजे मराठीतील चव्वेचाळीस आणि पिस्ताळीस म्हण्जे मराठीतली पन्चेचाळीस ही गोष्ट मला अजूनपर्यन्त पटलेली नाहीये (हा पिस्ता मला काही पचनी पडलेला नाहीये)
तसेच गुजराथीत लिहीलेला व्याजनू खाता हा शब्द मराठीतला/ देवनागरीतला " प्यार नू खाता " असा मी वाचायचो. आणिक गुजराती लोक जात्याच 'प्रेमळ' (गुजराथी मा बोले हू प्रेम करू शू ) असल्याने मला तन्तोतन्त खरा वाटायचा.
गुजराथीतील आणि एक प्रसिद्ध शभ म्हणजे गान्डा ह्या शब्दाचा मराठीत किन्वा हिन्दीत भयानक अनर्थ होईल पण असा शब्द गुजराथीत आहे खरा.

माझ्या परदेशातील काही काळाच्या वास्तव्यात माझा काही केरळी/ मल्याळम लोकान्शी सन्बन्ध आला. असे म्हणतात की केरळी लोक एकवेळ केरळात भेटणार नाहीत पण ते जगाच्या पाठीवर दुसरी कडे कुठेही भेटतील. अशीही एक आख्यायिका आहे की नील आर्मस्ट्रोन्ग जेन्व्हा पहिल्यान्दा चन्द्रावर गेला तेन्व्हा त्याला तीथे केरळी माणसाने चहा पाजला. खरे-खोटे देव जाणे.
तर ही गुळूगुळू मुळूमुळू मल्याळम भाषेत भाताला मोरु म्हणतात ताक्/दह्याला चोरू म्हणतात (लोणच्याला बहुदा जोरू म्हणत असावेत. तशीही जोरु तिखट असतेच म्हणा)
म्हणजे आपण भातावर ताक घेतले की ते म्ह्णणार चोरुवर मोरु. आपल्याकडे म्हण आहे ना "चोरावर मोर" तिच उगम स्थान बहुदा "चोरुवर मोरु " वरून झाल असणार.
चण्याला ही मल्याळम मण्डळी म्हणतात कडलै वास्तविक कढवण्याचा आणिक चण्यान्चा काही सम्बन्ध नाही पण ह्याना कोण समजावणार आणि कुठल्या भाषेत समजावणार

आता तामिळ भाषा म्हटलीकी तोन्डत पाणी खेळवत श्वास न घेता बोलायची सवय तुम्हाला सायला पाहीजे. ह्यात क्रियापद पुरूष काही वेगळाच चालतो. पो म्हटल तर चालता हो पोहोया म्हटल तर जा आणि पोहोलामे म्हटल तर आपण निघूया (आपण दोघे किन्वा जितके असतील तितके चाल्ते होऊया थोडक्यात कटूया) म्हणजे "चालणे" हा शब्द किती चालतो बघा तामिळ भाषेत.
आता मी जर म्हटल " मिक्क णनड्री" तर तुम्हाला वाटेल मी तुम्हाला शिवी दिलीये आणि तुम्ही भा.ण्डायला याल माझ्याशी पण मी जर ह्याचा अर्थ सान्गीतला तुम्हाला की "खुप खुप धन्यवाद" तर तुम्ही गोन्धळून जाल का नाही. तसच असत ते.

एकदा अशीच गाडीत गम्मत झाली. कुण्या एका पन्जाबी माणसाला एक कुणी बिगर पन्जाबी माणसाचा छोटा मुलगा धक्का देत होता तेन्व्हा तो पन्जाबी म्हणाला " अरे ओय तेरे लोन्ढे को सम्भाल इधर उधार हिलता है " तेन्व्हा पुर्ण डब्यात जोरदार हास्य रस उसळला

ही झाली भारतीय भाषान्ची कथा. पण परकीय भाषान्ची गत काही फारशी वेगळी नाहीये. फीलीपिनो लोकान्ची तघलूक काय नावची भाषा असते त्यात शब्दान्ची थोडीशी वानवा असावी कुठच्या सुन्दर किन्वा शुभ साठी ते "मगन्धान्ग" हा शब्द वापरतात म्हणजे बघा मगन्धान्ग उमागा (शुभ सकाळ) मगन्धान्ग हापेन (शुभ सन्ध्याकाळ ) मगन्धान्ग गबी (शुभ रात्री ) सुन्दर मुलगी असली तरी मगन्धान्ग सुन्दर चित्र असल तरी मगन्धान्ग सुन्दर जेवण असल तरी मगन्धान्ग (जोर से बोलो जयमातादी. त्वमेव मगन्धान्ग त्वमेव मगन्धान्ग )
भावाला म्हणतात " कुया " आणि बहीणीला म्हणतात " आते " बहिणीला आत्या म्हणायची ही काय बर पद्धत ? आणि धन्यवाद ला म्हणतात " सलामत"

आपले शेजारी श्रीलन्कन ह्यान्ची सिन्हीली भाषा एकदम निराळी.कुणाची चौकशी करायची असेल तर ते म्हणतात " कोहमद" मग आपण जर मजेत असू तर उत्तर द्यायच "हुन्दाय" आणि यथा तथा असू तर उत्तर द्यायच "वरदग्नै" (मराठीत विचार केला तर माझ्या कडे हुन्दाय गाडी आहे मी मजेत आहे किन्वा मी मजेत नाही मला वर दे की रे ) कोथीन्बीरी ला हे लोक म्हणतात "कोत्तुमाल" गोड वाटतो पण शब्द

अरेबीक लोक कुणाची चौकशी करायची तर म्हणतात "कैफल हाल " किन्वा "कैफालिक" मग ह्याच उत्तर द्यायच " अल हमदुलील्ला असमतुल्लाह रेहेमतुला बरकातू " (ह्याचा अर्थ मी देवाच्या कृपेने मजेत आहे आणि देवाच्या दयेने माझी बरकत होईल ) हे म्हणजे मराठीत तू कसा आहेस बाबा? आस विचारल्यावर त्याला गितेतला " कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेशु कदाचन " हा श्लोक म्हणून दाखवल्यासारखा आहे. "आखुय" म्हणजे भाऊ आणिक "आख्ता" म्हणजे बहिण. लहान मुलाला गोड म्हण्याच तर वापरा "हेलुवा" पण हेच हेलुवा जर "भुनैया" आधी जोडलत तर बुरख्या आडून फटके पडतील कारण हेलुवा भुनैय्या चा अर्थ होतो फटाकडी पोरगी. त्यामुळे मग पळायची तयारी ठेवा. "बखलावा" म्हणजे मिठाई तर "बकला" म्हणजे बायकी पुरूष. त्यामुळे ख च्या ऐवजी क वापरलात तर आणिबाणी उदभवू शकते

फ्रेन्च लोकान्च इन्ग्लीश लोकान्शी अगदी वावड. ईन्ग्रजी मधले शब्द ते तोडून फोडून न्याहरीला वापरतील. आता ईन्ग्रजीत "मर्सी" म्हणजे दया पण फ्रेन्च मध्ये हाच मर्सी होतो "मेस्सी" अणिक त्याचा अर्थ होतो धन्यवाद Happy
हे फ्रेन्चही "बॉन" शब्द कशा पूर्वीही वापरतात "बॉन जोर" (सुप्रभात) बॉन नुई (शुभ रात्री) "बॉन अपेत्ती" (तुम्हाला चा.न्गली भुक लागो आणिक चान्गले जेवण जावो ) अश्या अर्थाच मराठीतल एक " वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे " सोडल तर दुसरे काही ऐकीवात नाहीये. आहेच आपली मराठी भाषा तेवढी सबळ

मित्रानो खर तर माझे ज्ञान आणिक लेखन कौशल्य हे सर्व लिहीण्यास व्यक्त करण्यास खुप तोकडे आहे. मराठी भाषा दिनाच्या एक दिवस आधि माझ्या कडून असल काही लेखण माझ्या हातन झाल हा मी माझा देवी सरस्वतीचा माझ्यावरील आशिर्वाद समजतो आणि माझे लिखाण वाचल्या बद्दल म.ण्ड्ळी धन्यवाद, मिक्क णन्ड्री, सलामत, आणिक मेसी

लिखाण : केदार अनन्त साखरदाण्डे दिनान्क २६/०२/२०१६

विषय: 
प्रकार: 

मस्त लिहिलंय.
मराठी भाषेतले शब्द आणि त्याचे इतर भाषेतले अनर्थ -

माझ्या नैनितालच्या कलीगने सांगितल की त्यांच्याकडे भेल म्हणजे ढुंगण. Happy मग आम्ही भेल मागवली की मला हसु यायंच.
तामिळ कलीग म्हणे त्यांच्या कडे कुंडी म्हणतात. Happy

चार दिवसापूर्वीचीच गोष्ट. "कलेवर रेस्टॉरंट” असा बोर्ड मागे गेला आणि, " हे कसले नाव? कुणाची कलेवरं शिजवुन खाउ घालतात" असे विचार मनात येउन गेले. मग जरा वेळाने पुढे एक मोठा बोर्ड होता. इंग्रजीत आणि स्थानिक दोन्ही भाषेत. त्यावरील दोन शब्दांनी माझे लक्ष वेधले. स्वाईन कलु? ... ओह फ्लु! फ आहे हा! म्हणजे मागे गेले ते फ्लेवर रेस्टॉरंट होते तर!
अशी गुजराती लिपीची मजा.

पार्लेश्वर पोस्ट हापिसाच्या लायनीत खुप वर्षांआधी एक बंगला होता कल्पवृक्ष नावाचा...त्या गुज्जु लिपी मुळे मी तो नेहमी डल्पवृक्ष वाचला आहे. Lol

जर्मन व डच ह्या भाषा एकमेकींच्या अगदीच जवळच्या आहेत, परंतु त्या मधे पण असे साधर्म्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले बरेच शब्द आहेत. उदा: kochen = to cook [German] kochen = to purchase [Dutch] जर्मन मधे Ich habe gekocht म्हण्ट्ले तर त्याचा अर्थ मी जेवण बनविले, किंवा शब्दशः मी [काहितरी] शिजविले असा होतो. Ik heb gekocht असे डच मधे म्हण्ट्ले तर मात्र त्याचा अर्थ मी विकत घेतले असा होतो.

@ mi_anu Genau !!!

it's die Kommode = chest of drawers, dresser छोटेखानी कपाट

तामिळ कलीग म्हणे त्यांच्या कडे कुंडी म्हणतात>> कानडीतही कुंडीच. यावरून भयंकर जोक्स घडलेत आमच्याकडे!

तमिळमध्ये पाल= दूध. अवल= पोहे, पुरूप्पू= डाळ.

आणि जर्मनीत प्रवासाच्या तिकीटाला fahrkarte उच्चार ऐकताना ’फार कारटं". याचीही गंमत वाटली.

इथे एखाद्या भाषेतले शब्द आणि त्या श्ब्दातले इतर भाषेतले अनर्थ अभिप्रेत आहे ना? उदा. मी आणि नंदीनीने दिलेला प्रतिसाद.

लोक स्पेलिंगा / लिपी काय लिहतात?

जर्मन मध्ये ग्लेट्सं म्हणजे टक्कल.
असेच काहीतरी बोलण्याचा जर्मन क्लास चालू होता आणि मी टिचर ला 'बरेच ग्लास फुटले' साठी 'ग्लेटसं' फुटले वापरला होता.
समान शब्द नाही पण अमुक माणूस् 'क्रँक'(आजारी) आहे ऐवजी 'कापुट'(खराब होणे, बिघडणे) आहे असे वापरलेले बरेचदा आठवतेय Happy

परराज्यातले लोक पुण्यात येतात. भाजी, फळे यांची मराठी नावं माहीत नसतात. एकदा एक बंगाली सहकारी मंडई जवळ केरसुणी विकणा-या बायकांकडे झाडू बघत असताना केरसुणी / झाडू साठी त्याने अज्ञानाने बंगाली शब्द वापरल्याने आणि त्याचा मराठी / हिंदी अर्थ अनर्थकारी असल्याने अनावस्था प्रसंग ओढवला होता. हा सहकारी अतिशय भोळसट आहे हे माहीत असल्याने त्याने मुद्दामहून केलेले नाही हे माहीत होते.

माझी एक कलिग होती " सायली" . एक एम्पी वाला कलिग तिला नेहमी शैली म्हणायचा .
कारण त्यान्च्याकडे "सायली" म्हणजे डेड.

असमिया भाषेत तर लैच अनर्थ होतात, सांगता न येन्यासरखे आइटम होतात! साध्या साध्या हिंदी शब्दांचे इतके अनर्थ की बास!!.

बंग भाषेत ही अश्या बर्याच गमती आहेत... आपल्या कडे खोका म्हणजे box; परंतु बाबुमोशायांच्या भाषेत "খোকা" खोका म्हणजे मुलगा Lol

मलेशियन भाषेत बरेच मराठी शब्द आहेत जसे की पुस्तक, भय, भाषा, बंदर (पोर्ट), खुर्ची .....

पण ते लोक दुधाला सुसु म्हणतात.

मलेशियात/ सिंगापुर मध्ये चहा प्यायला गेलो तर टेह (किंवा चा ) म्हटल तर काळा चहा आणुन देतात. म्हणुन टेह सुसु म्हणाव लागत. अश्यावेळी विचार येतो जर तिकडे नवीन मराठी मुलगा कामाला लागला तर कपात काय असेल.

Pages