क्वेकर ओटमिलः- दीड वाटी
तान्दूळ पिठः- पाउण वाटी
थालिपिठ भाजणी:- २-३ टेबलस्पुन( माझ्याकडे केप्र होती म्हणून ती वापरली.)
काकडी:-- एक साल काढुन किसुन
कोथिबिरः- मुठभर धुवुन बारिक चिरुन
दही:- एक चमचा पिठ भिजवायला, बाकी आवडेल तस थालिपिठाबरोबर
हळद्,मिठ,तिखट,तिळ्,धना-जिरा पावडर.
ओटमिलला चविश्ट करुन खायला अजुन एक पाकक्रुती, ओटमिल मधे तान्दुळ पिठ ,भाजणी ,किसलेली काकडी कोथिबिर, एक चमचा दही आणी हळद्,मिठ,तिखट,तिळ्,धना-जिरा पावडर. कालवावे, (केप्रच्या भाजणित काही वेळेस हे सगळ आधिच असत त्याप्रमाणे जिन्नस अॅडजेस्ट करावे.) १०-१५ मिनिट मुरु द्यावे, यावेळेत पिठ जरा कोरडे वाटले तर काकडिचे किसुन काढलेले पाणि घालावे, अनवधानाने फेकुन दिले असेल तर साध्या पाण्यचा हात लावुन सारखे करुन घ्यावे, नेहमीसारखी थालिपिठ लावावी... असल्यास घरचे लोणी, नसेल तर दही,लोणच, चटणी आवडेल त्यासोबत खावी.
अगो कि मन्जुडीची काकडीच्या थालिपिठाची क्रुती होती त्यात बदल करुन पौष्टीक करायचा प्र्यत्न!
१) काकडीने जरा गोडसर चव येते ती नको असेल तर कान्दा किसुन्/बार्रिक चिरुन घालता येइल
२) काकडी घातल्याने अगदी कोरडी होत नाहीत थालिपिठ
३) यासोबत व्हेजी क्रिम चिझ छान लागते.
छान... कसेही खा पण ओट्स खा
छान... कसेही खा पण ओट्स खा
अरे वा! मस्त दिसतंय थालिपीठ
अरे वा! मस्त दिसतंय थालिपीठ
मस्त दिसतंय एकदम.
मस्त दिसतंय एकदम.
मस्तच दिसतंय ताट. करुन
मस्तच दिसतंय ताट. करुन पाहणार.
मस्त वाटतंय. नक्की करून बघेन.
मस्त वाटतंय. नक्की करून बघेन.
मस्तच.
मस्तच.
वा काय सुंदर बनवलस थालिपिठ
वा काय सुंदर बनवलस थालिपिठ अगदी व्यवस्थि गोल, मधोमध एक खळ आणि त्याबाजूला पाच खळ!! चवीला अगदी खंग्री झालं असेल नक्की.
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय थालिपीठ.
काकडीऐवजी/ किंवा बरोबर कांदा, कोबी, मेथी, कांदापात, पालक, गाजर असं बरंच काही बाही घालता येईल यात.
तांदुळाच्या पीठासाठी गिल्ट फ्री पर्याय काय असू शकेल?
अगोने लिहिलंय गं सफरचंदाचं थालिपीठ.
मस्त दिसतयं
मस्त दिसतयं
छान दिसतयं,. मी उद्या लाल
छान दिसतयं,. मी उद्या लाल भोपळा घालुन करुन बघते.
धन्यावाद सगळ्याना! भाजणी
धन्यावाद सगळ्याना! भाजणी ,तान्दूल पिठाने कुरकुरित आणि खमन्ग दोन्ही चवी साधल्या जातात. मन्जु म्हणतेय तस बाकिचे ऑप्शन घालुन पण करता येतिल.
तान्दुळ पीठाला पर्याय मला सुचत नाहीये, ज्वारिच पिठ वैगरे ट्राय करता येइल(भाजणित असेल पण भाजणि अगदी चविपुरतिच वापरलिय)... पण ते नो कार्ब्ज होइल का याची काही आयडिया नाही.
Thalipith made with oatmeal
Thalipith made with oatmeal only do taste good. The batter should be little loose.
मला साहित्याच्या प्रमाणावरून
मला साहित्याच्या प्रमाणावरून दोनच थालिपिठे हे जरा व्यस्त वाटत आहे. चुभुदेघे
वाटी छोटी आहे ! साधारण
वाटी छोटी आहे ! साधारण मेजरिन्ग कपाचा अर्धा कप एवढी
फोटो छान आहे ..
फोटो छान आहे ..
येव्हड्या साठी तांदुळ पिठ
येव्हड्या साठी तांदुळ पिठ आणायला नको वाटतय. ज्वारी पिठाचे करुन बघेन.
आता इतक्यातच करून खाल्ल. छान
आता इतक्यातच करून खाल्ल. छान झालं. मी नेहमीच्या भाजणीतच रोल्ड ओट्स घातले. तांदळाचं पीठ अजिबात नाही घातलं.