तुला काय करायचेय मित्रा ..
किस्सा - १
मागच्याच आठवड्यातील गोष्ट.
सध्या कामाचे शेड्यूल गंडले असल्याने खाण्यापिण्याचे फार हाल चालू आहेत. रोजच बाहेर खावे लागते. बहुतांश वेळा एकटेच जावे लागते. त्या दिवशीही गेलेलो. एकटे गेले की नेमके काय खायचे हा प्रश्न असतो. माझ्यापुरता तो मी ‘मसाला डोसा’ असे उत्तर देऊन सोडवतो. नेहमीप्रमाणेच मेनूकार्ड उगाचच चाळल्यासारखे केले आणि आधीच मनात ठरवल्याप्रमाणे एक आरएमडी (रवा मसाला डोसा) ऑर्डर केला. जेवणाची वेळ असल्याने हॉटेल भरलेलेच होते. लोक वेटींगला होते. अश्यात मी एकटा जीव चार माणसांचे टेबल अडवून बसलो होतो. एक माणूस माझी परवानगी मागायची औपचारीकता निभावत समोर येऊन बसला. मी देखील तो अगोदरच स्थानापन्न झाला असूनही मोठ्या मनाने त्याला परवानगी देऊन टाकली. तसे तो ओळखीच्या माणसांना बघून हसतात तितके ऊग्र हसला. मी सुद्धा त्याच ईंटेन्सिटीचे हास्य परत केले. बहुधा इथेच चुकी झाली असावी. त्या हास्याला पकडूनच त्याने माझ्याशी संवाद सुरू केला. फार काही नाही, बस ईकडच्या तिकडच्या गप्पा.
थोड्याच वेळात माझा रवा मसाला आला. आणि मी नेहमी सारखे डाव्या हातात काटा आणि उजव्या हातात चमचा याची मनोमन उजळणी करत डोश्यावर तुटून पडलो. दोनचार घास नाही खाल्ले ते समोरच्या माणसाला उगाचच ठसका लागला. म्हणाला, "काटा चमच्याने खाण्यात मजा नाही. सरळ हाताने खायचे."
मी म्हटलं बर्रं .. उद्यापासून खातो हाताने. आता तसाही चमचा उष्टा केलाच आहे.
तरीही स्वारी हाताने खाल्यास अन्न कसे अंगाला लागते आणि मनाला खाल्ल्याचे समाधान मिळते हे उगाळत बसली होती.
ईतक्यात त्याचीही ऑर्डर आली. मेदूवडा मागवला होता त्याने. सांबार मे डुबो के.. मी मनोमन म्हटले अब आया ऊंट पहाड के नीचे. अपेक्षेप्रमाणे त्यानेही काटाचमच्यानेच खायला सुरुवात केली. आता माझी वेळ होती. त्याचे कान खायची.
"खरे तर हे हाताने खायला जास्त मजा येते"
"काय? हे, वडासांबार? पण हे कसं खाणार हाताने?"
"सिंपल आहे, मस्त कुस्करायचे सांबारमध्ये आणि डाळभाताचे घास खातो तसे ओरपायचे" मी एक किळसवाणी अॅक्शनही करून दाखवली.
"नको, चमचाच बरा आहे याला"
"अहो खाऊन तर बघा" ..
"नको!.. पुढच्या वेळी बघूया"
"मी दाखवू का कुस्करून?" .. (का माझ्या नादी लागलास? भोग आता आपल्या कर्माची फळे)
"नको, राहू द्या. चूक झाली माझी, तुम्ही खा तुम्हाला हवे तसे.." .. (फार लवकर आले हे वाक्य. मीच जास्त आक्रमकपण दाखवला की काय असे मला वाटू लागले)
"ओके!" मी विषय संपवला !
..................................................................................
किस्सा - २
दाढी करायचा मला ईतका वैताग येतो की बरेचदा हा पुरुषाचा जन्म नकोसा वाटतो. तरी एक बरे आहे की वाढलेली दाढी मला शोभते छान. त्यामुळे पुरुषार्थाचा दागिना म्हणून मिरवू शकतो. पण ती देखील एका मर्यादेबाहेर अस्ताव्यस्त वाढली तर करावीच लागते. कारण एमएनसीत काम करत असल्याने अगदीच साधू महाराज नाही बनता येत.
एका शनिवारी दुपारी हलक्या गर्दीची वेळ साधत दोन महिन्यांची उतरवायला गेलो. लगेचच नंबर लागला. खुणेनेच गाल सफाचट करायला सांगितले. पण तरीही त्या कलावंताला प्रश्न पडलाच.
"पुरा उडाना है?" .. हे विचारताना त्याच्या चेहर्यावर असे आश्चर्य होते जणू काही मी त्याला माझी मानच कापायला सांगत आहे.
"हा पुरा उडाना है"
"मूछ रखनी है?"
"नही"
"रख लो, अच्छी दिखेगी"
"मुझको तो नही रखनी. तुम को रखनी है तो काट के रख लो"
एवढे तिरसट बोललो मी, तरी तो थांबणारा नव्हताच. उलट त्याच्यातील तिरसटपणालाही मी जागे केले.
"निकालनी ही थी तो फिर बढाई क्यू ईतनी? तीन चार दिन बाद या हफ्ते मे एक बार तो दाढी बनानी चाहिये. अभी दो महिनेकी एकसाथ करोगे तो जलेगा, कटेगा, लगेगा.."
"बोअर होता है दाढी करनेको" .. मी निर्वाणीचे म्हटल्यासारखे म्हटले. (खरे तर सलूनमध्ये जायलाही बोअरच होते मला. आणि हा आणखी बोअर करत होता)
"उसमे क्या बोअर होना. मै दिनमे पचास दाढी बनाता हू.. सोचो मुझे कितना बोअर होना चाहिये" .. (फालतू विनोद)
तुला काय करायचेय मित्रा ? .. मी मनोमन म्हणालो
आणि प्रत्यक्षात तोडक्यामोडक्या हिंदी मे बोल्या,
"तुमको क्यू बोअर होगा. तुमको दाढी करनेका पैसा मिलता है. मुझको उलटा देना पडता है."
हा विनोद नव्हता. तरीही तो हसला. पण नशीब बोलायचे थांबला.
..................................................................................
- किस्सा ३ -
ट्रेनमधील किस्सा.
तासाभराचा प्रवास म्हटले की मोबाईलवर टाईमपास लागतोच. कधी व्हॉटसप, कधी मायबोली, कधी गाणी कधी गेम्स. त्या दिवशी कधी नव्हे ते फेसबूक चालू होते. शेजारची व्यक्ती नेहमीसारखेच डोके खुपसत होती.
चेहर्याने चाळीशीचे गृहस्थ दिसत होते. आणि एकंदरीतच फेसबूकचा फ देखील त्यांना माहीत नसावा असे वाटत होते. कदाचित म्हणूनच कुतूहलाने डोकावत असावेत. पण ते कुतूहल साधेसुधे कुतूहल नव्हते हे ते पचकल्यावर समजले.
"आजकालच्या सगळ्या मुलांना वेड लावलेय या ऑर्कुट-फेसबूकने" .. (ऑर्कुट बंद झालेय केव्हाचेच हे त्यांच्या गावीही नव्हते)
बोलण्याचा टोन जनरल विधान केल्यासारखाच होता. पण मी समोर फेसबूक उघडून बसलेलो असताना ते विधान मलाही थेट लागू होत होतेच. काय बोलणार अश्यावेळी,
"हो खरेयं. पण ट्रेनच्या प्रवासात तेवढाच टाईमपास होतो. मी सुद्धा तेवढ्यापुरतेच वापरतो." .. मी स्वत:च्या वागणूकीचे(!) समर्थन केले
"वाचन करायचे त्यापेक्षा. चार पुस्तके वाचायची. तेवढेच ज्ञान वाढते." .. (आता हा थेट सल्ला मलाच होता. त्यामुळे ‘तुला काय करायचेय मित्रा’ असे अखेर माझे झालेच)
"ते ही खरंय. पण माझे डोकं गरगरते ट्रेनबसमध्ये वाचन केल्याने."
"मग ईश्वराचे नामस्मरण करायचे. चित्त शांत राहते. एकाग्रता वाढते."
"हो, पण त्यासाठी देवावर जरा तरी विश्वास हवा. आणि विश्वास ठेवायला देव प्रत्यक्षात असायला हवा. कधीतरी दिसायलाही हवा."
आता मात्र ते सद्सद्गृहस्थ विंचू चावल्यासारखे माझ्याकडे बघू लागले. आणि मी मोठ्या आशेने त्यांच्या पुढच्या चेंडूची वाट पाहू लागलो. कारण आता मी त्यांना माझ्या होमपीचवर घेऊन आलो होतो.
पण खरोखरंच देव असावा. जो त्यांच्या मदतीला धावून आला. त्यांचे स्टेशन आले आणि ते उतरले.
......
मी घरी आलो. झी सिनेमावर कर्ज चित्रपट चालू होता.
तिथून रिशी पकूर ओरडला, "क्या तुमने कभी किसी से प्यार किया है??"
ईथून मी ओरडलो, "तुला काय करायचेय मित्रा...
आईवडील माझ्या चेहर्याकडे बघतच राहिले. आणि मी मान खाली घालून बेडरूमच्या दिशेने चालू पडलो.
.........................................................................................
हे सारे गेल्या महिन्याभरात माझ्याशी घडलेले किस्से. आणखी जुनेपुराणे आठवले वा नवीन घडले तर भर टाकतो सावकाश.
तोपर्यंत तुमच्याशी देखील असे ‘तुकाकमि’ किस्से घडले असतील तर झरूर शेअर करा.
- कु ऋ
(आता, मी जर इथे पहिली कमेंट
(आता, मी जर इथे पहिली कमेंट अशी टाकली, की, "अरे, तू परत आलास?!!!" तर नक्कीच तू म्हणशील, "तुकाकमि")..
असो, मजा आली तिन्ही किस्से वाचतांना...
.
.
भुत भुत पळा पळा ऋन्मेऽऽष च
भुत भुत पळा पळा ऋन्मेऽऽष च भुत आलय
हर्शल, हाहा असाच विचार
हर्शल, हाहा असाच विचार माझ्याही मनात आलेला. पण नाही म्हणणार तसे काही. कारण हे http://www.maayboli.com/node/57688
प्रांजल तुम्हीही वाचा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
वेलकम बॅक मित्रा !! छान
वेलकम बॅक मित्रा !!
छान लिहिले आहेस, आमचे पण शेअर करतो किस्से....
मी पुण्यनगरीत रहात असल्याने माझ्या जवळ किति असतील हे किस्से ह्याचा अंदाज बांध
मस्त किस्से आहेत. आणि लिहीलेत
मस्त किस्से आहेत. आणि लिहीलेत पण छान!
बायदवे, अखेरच्या निरोपावरुन परत आलास ते बघून छान वाटले.
मजा आली वाचताना. माझा प्रवास
मजा आली वाचताना.
माझा प्रवास "तुला काय करायचंय" विचारण्यावरून असं विचारलं जाण्याच्या शक्यतेकडे चाललाय असं एकदा जाणवलं. आता ब्रेक लावायला जमतं.
तिथून रिशी पकूर ओरडला, "क्या
तिथून रिशी पकूर ओरडला, "क्या तुमने कभी किसी से प्यार किया है??"
ईथून मी ओरडलो, "तुला काय करायचेय मित्रा...>>> फिस्सकन ह्सू आलं !
सगळे किस्से आवडले.
मस्त लिहिलं आहे. हसु आलं
मस्त लिहिलं आहे. हसु आलं नक्कीच.
न्हाव्याकडचा किस्सा जास्तच मजेशीर होता.
ऋ, कालच तुझी आठवण आली होती
ऋ, कालच तुझी आठवण आली होती टिव्ही बघताना .. न्युज होती की स्वजो ने स्वतःची ब्रॅंड सुरु केली म्हणे शाखा सारखी (तात्या विंचुचे बाहुले विकेल बहुतेक ) .. मग आठवलं की तु माबो संन्यास घेतलास तर धागा येणार नाही .. आज लॉगिन केल्यावर पहिल्या पानावर तु!
वरचे किस्से वाचते आता!
चनस, कशाला स्वजो टाकला
चनस,
कशाला स्वजो टाकला इथं..
मस्त किस्से आहेत रे ऋन्मेष.. छान लिहिलयं..
मस्त किस्से..
मस्त किस्से..
मस्त किस्से पण तिनच का? अजुन
मस्त किस्से पण तिनच का? अजुन हवे होते.
छान किस्से. मद्रासमध्ये खरंच
छान किस्से.
मद्रासमध्ये खरंच असा वडासांबार आणि दोसा सुद्धा त्यावर सांबार ओतून कुस्करुन कालवुन सांबार ओरपत हाताने खातात. भात कालवुन खाल्यासारखे, पण खुप पातळ.
छान! ऋन्मेऽऽष, मनातल सहि सहि
छान!
ऋन्मेऽऽष, मनातल सहि सहि उतरवता येते तुम्हाला!
मस्त रे. मजा आली. न्हाव्याचा
मस्त रे. मजा आली. न्हाव्याचा किस्सा मस्त.
काल तुझी आठवण आलेली. 'मै तेरा होय रे जबरा हाय रे जबरा फॅन हो गया' गाणं बघुन
भारी लिहिलंय नेहमी प्रमाणेच
भारी लिहिलंय
नेहमी प्रमाणेच
टीना .. अगं काल आठवण आली
टीना .. अगं काल आठवण आली म्हणुन लिहलं ना मी .. बघ सस्मितने पण लिहलयं
ऋन्मेऽऽष, मनातल सहि सहि
ऋन्मेऽऽष, मनातल सहि सहि उतरवता येते तुम्हाला! >>> यामुळेच तर ऋ आवडता आहे आमचा
अजुन भर घाल किस्स्यांमध्ये ऋन्मेष, मस्त आहेत सगळे.
प्रसन्न समजू शकतो. मागे
प्रसन्न
समजू शकतो. मागे दोनतीन वर्षांपूर्वी पुण्यात काही कामानिमित्त फक्त एका दिवसापुरतेच जाणे झाले होते .. त्या एका दिवसातही 'मुंबई पुणे मुंवई' नावाचा स्वतंत्र लेख पाडायची ताकद आहे
सस्मित, चनस,
मला ती स्वजोची न्यूज आणि ते गाणेही ठाऊक नाहीये. गेला काही काळ एकंदरीतच सोशलसाईट न्यूज टीव्हीपासून दूर् होतो. पण बातमीत दम असेल तर ती माबोवर कुठेतरी झळकायलाच हवी. प्रत्येक माबोकरापर्यंत पोहोचायलाच हवी.
प्रसन्न फिदीफिदी समजू शकतो.
प्रसन्न फिदीफिदी
समजू शकतो. मागे दोनतीन वर्षांपूर्वी पुण्यात काही कामानिमित्त फक्त एका दिवसापुरतेच जाणे झाले होते .. त्या एका दिवसातही 'मुंबई पुणे मुंवई' नावाचा स्वतंत्र लेख पाडायची ताकद आहे >>>>>>
समस्त मायबोलीतर्फे प्रसन्न यांचा जाहीर निषेध.
मानव पृथ्वीकर.. ईटरेस्टींग
मानव पृथ्वीकर.. ईटरेस्टींग नाव..
येस्स. माझा एक सौथेंडीयन मित्र खायचा तसे. हॉटेलमध्ये नाही तर त्याच्या रूमवर तो मला ईडलीवडा पार्टी द्यायचा तेव्हा. हाताचा तळवाही मस्त रंगायचा आणि त्यावरून मी त्याला खूप चिडवायचो..
ये भाव. ये बात कुछ हजम नही
ये भाव. ये बात कुछ हजम नही हुयी. मी लिहिलेल्या गाण्याशी ढेर्या स्वजोचा काही सं बंध नाहीये. ते गाणं श श श शाखाच्या नव्या फॅन सिनेम्यातलं आहे. तुला अजुन माहित नाही? छ्या.
सस्मित ते गाणे माहीत नाही. पण
सस्मित ते गाणे माहीत नाही. पण फॅनचे असावे अशी कल्पना आली. स्वजोची न्यूज ती ब्रांडवाली म्हणालो मी.
बाकी गेल्या महिन्याभरापूर्वी मी रोज फॅन आणि रईसचे काय अपडेट आले हे यू ट्यूबवर बघायचो. पण सध्या लॅपटॉप आणि नेट पासून अजूनही दूर आहे. आता ही मोबाईल पुरताच सुरू झालोय.
सस्मित ते गाणे माहीत नाही. पण
सस्मित ते गाणे माहीत नाही. पण फॅनचे असावे अशी कल्पना आली. स्वजोची न्यूज ती ब्रांडवाली म्हणालो मी.
बाकी गेल्या महिन्याभरापूर्वी मी रोज फॅन आणि रईसचे काय अपडेट आले हे यू ट्यूबवर बघायचो. पण सध्या लॅपटॉप आणि नेट पासून अजूनही दूर आहे. आता ही मोबाईल पुरताच सुरू झालोय.
मी घरी आलो. झी सिनेमावर कर्ज
मी घरी आलो. झी सिनेमावर कर्ज चित्रपट चालू होता.
तिथून रिशी पकूर ओरडला, "क्या तुमने कभी किसी से प्यार किया है??"
ईथून मी ओरडलो, "तुला काय करायचेय मित्रा... >>> हे आवडलं
(अवांतर - माझ्या'शी' घडलेले किस्से हिंदीतून मराठीत शद्बश: भाषांतर तू का करतोस रे, मित्रा? )
मस्त लिहीलयस रे. आणि येलक्म
मस्त लिहीलयस रे.
आणि येलक्म बॅक ऋ बाळा. येऊ देत आता नवनवीन धागे.
ललिताप्रिती, माझ्याशी चुकीचा
ललिताप्रिती,
माझ्याशी चुकीचा शब्द आहे का.. माझ्यासोबत हवे होते का.. प्लीज कर्रेक्ट पुढच्या वेळी लक्षात ठेवेन
.
.
माझ्याशी नाही की माझ्यासोबत
माझ्याशी नाही की माझ्यासोबत नाही. माझ्याबाबत घडलेले किस्से.
Pages