हेल्थी भी, टेस्टी भी - पनीर- व्हेजिटेबल्स चिल्ला

Submitted by रायगड on 17 February, 2016 - 17:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मूग डाळ - १ वाटी
आलं १/२ इंच
कोथिंबीर

कोबी - उभा कापून - १ वाटी
गाजर किसून - १/२ वाटी
सिमला मिरची - उभी कापून - १ वाटी - घरी नव्हती म्हणून नाही घातली.
पनीर - ३/४ वाटी किसून

चिंच - खजूर चटणी
आमचूर पावडर
हिरवी चटणी/ शेजवान चटणी - काहीही आवडीनुसार - मी काही घातले नाही यावेळेस.

मीठ

क्रमवार पाककृती: 

पूर्वी पनीर चिल्ला खायचे चाटच्या दुकानात - अनेकदा. तेव्हा सहज मिळत असल्याने मनात आलं की जाऊन हादडायचा एवढंच करायचे. आता अधून-मधून त्याची आठवण येते तर इथे कुठे मिळत नाही, म्ह्णून नेट वर शोधा-शोध केली. पनीर चिल्ला म्हणून अनेक रेसिपी आहेत पण त्यात चिल्ल्यात - म्हणजे बाहेरच्या डोसा- घावन प्रकारात फक्त पनीर घातलंय. मी खाल्लेल्ल्या प्रकारात आत कोबी,गाजर,पनीर etc stir fry करून आत stuff करून कहि चटण्या, आमचूर पावडर वगैरे घालून एक चमचमीत chat item बनवलेला असायचा. (हे मी मागे माबो वर लिहीलेलं).

म्हणून मग मी हा प्रकार करून बघितला. मस्त झाला. असाच असायचा का तो प्रकार हे आता खरं तर आठवत नाही. पण जे झालं प्रकरण तयार ते आवडलं. हेल्थी पण आहे. त्यामुळे आणखी आनंद!

तर चिल्ल्याकरीता :

१ वाटी मूगडाळ भिजत घालणे - ३-४ तास. (हा वेळ कृतीच्या वेळात धरलेला नाही.) मग मिक्सर मधून थोडे पाणी घालून वाटून घ्यावी. वाटताना थोडं आलंही घालावं. डोश्याला करतो तितकी कंसिस्टंन्सी! त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून मिश्रण तयार करून घ्यावे.

आतल्या सारणाकरीता :

कोबी, सिमला मिरची पातळ - उभी चिरून आणि गाजर किसून अगदी थोड्या तेलावर मीठ घालून ५ मिनीटे स्टर-फ्राय करून घ्यावे.

पनीर किसून घ्यावे.

चटण्या हव्या त्या प्रमाणात एकत्र करून त्यात आमचूर पावडर मिसळून घ्या.

आता तवा तापवून घ्यावा.
थोडे तेल लावून मूगडाळीच्या पीठाचा पातळ डोसा करून घ्यावा. उलटून एखाद मिनीट ठेऊन परत परतावा.
आता आच थोडी कमी करून डोश्यावर मध्यभागी परतलेल्या भाज्या, त्यावर चटणी मिश्रण आणि वर किसलेला पनीर भुरभुरवा.

chilla1.jpg

डोश्याची गुंडाळी करून डिशमध्ये काढा.

chilla2.jpg

गरमा-गरम खा! यम्मी!

chilla3.jpg

वाढणी/प्रमाण: 
हेल्थी पदार्थ आहे, असं म्हणून हाणायचं!
अधिक टिपा: 

मूगडाळीच्या जागी सालासकट मूगडाळ, आख्खे मूग हे ही वापरता येऊ शकेल. नेक्स टाईम वो प्रयोग करके देखेगा.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे. हेल्दी.

डोंबिवलीत midc एरियात कावेरी दुकानाबाहेर मिळतो असा, त्याला पनीर चाट म्हणतात. बीट, उकडलेला बटाटा, कांदा पण असतो कोबी गाजरासोबत, सिमला मिरची नसते. फार टेस्टी असतो. आम्ही जातो खायला अधून मधुन पण बाहेरचा डोसा बेसनचा असतो. हा मुगाचा आहे हे छान.

मस्तच...

आज करत आहे.....

मी अख्खे मुग घेतले. त्याला मोड आणले. पिठात थोडा रवा घातला आहे. झाले की फोटो टाकते.....

मस्त प्रकार. मी बहुतेक पनीर पण भाज्याबरोबर परतुन घेणार म्हणजे नीट मिसळेल , चवीत सारखेपण यायला. इथे तोफु वापरुन पहायला हरकत नाही.

मी करून पाहीला २-३ वेळा...मस्त झाला हा प्रकार...!!
वन-डीश-मिल साठी चान्गला ऑप्शन आहे हा

आठ दिवसांपुर्वीच खाल्ला MIDC कावेरी इथे. ह्यावेळी त्याला विचारलं, पीठ कुठलं वापरता? मुगडाळीचे म्हणाला. मागे एकाने बेसन सांगितलं होतं.

वा! स्वप्नाली धन्स! हो, वन डीश मिल ला चांगला आहे हा आॅप्शन!!

अंजू, कावेरीकडे खाल्ला पाहिजे एकदा!! चटणी कुठली घालतो तो???

कावेरी म्हणजे आईच्या घरापासून अगदी ५ मिनिटांवर. पण मी कधीच काही खाल्लं नाहीये तिथे समहाऊ. काऊंटर पलिकडे जो काही सांडलेल्या पदार्थांचा राडा बघितला मागे एकदा, तेव्हापासून तिथे काही खायची इच्छाच झाली नाही माझी कधी. दृष्टीआड सृष्टी म्हणतात तेच खरं.

मी जागनाथकडे खाल्लंय हे प्रकरण पूर्वी.

रायगड, मी ही करून बघितला मागे. सारणात तिखटपणा हवा असं वाटलं होतं मला कारण टोटल ब्लँड लागत होता आणि गाजराला पाणीही सुटलं खूप. चिल्लाच्या ऐवजी अगदीच कल्ला झाला Proud इम्प्रूव्ह करून करेन परत एकदा आता हे प्रकरण.

Pages