मूग डाळ - १ वाटी
आलं १/२ इंच
कोथिंबीर
कोबी - उभा कापून - १ वाटी
गाजर किसून - १/२ वाटी
सिमला मिरची - उभी कापून - १ वाटी - घरी नव्हती म्हणून नाही घातली.
पनीर - ३/४ वाटी किसून
चिंच - खजूर चटणी
आमचूर पावडर
हिरवी चटणी/ शेजवान चटणी - काहीही आवडीनुसार - मी काही घातले नाही यावेळेस.
मीठ
पूर्वी पनीर चिल्ला खायचे चाटच्या दुकानात - अनेकदा. तेव्हा सहज मिळत असल्याने मनात आलं की जाऊन हादडायचा एवढंच करायचे. आता अधून-मधून त्याची आठवण येते तर इथे कुठे मिळत नाही, म्ह्णून नेट वर शोधा-शोध केली. पनीर चिल्ला म्हणून अनेक रेसिपी आहेत पण त्यात चिल्ल्यात - म्हणजे बाहेरच्या डोसा- घावन प्रकारात फक्त पनीर घातलंय. मी खाल्लेल्ल्या प्रकारात आत कोबी,गाजर,पनीर etc stir fry करून आत stuff करून कहि चटण्या, आमचूर पावडर वगैरे घालून एक चमचमीत chat item बनवलेला असायचा. (हे मी मागे माबो वर लिहीलेलं).
म्हणून मग मी हा प्रकार करून बघितला. मस्त झाला. असाच असायचा का तो प्रकार हे आता खरं तर आठवत नाही. पण जे झालं प्रकरण तयार ते आवडलं. हेल्थी पण आहे. त्यामुळे आणखी आनंद!
तर चिल्ल्याकरीता :
१ वाटी मूगडाळ भिजत घालणे - ३-४ तास. (हा वेळ कृतीच्या वेळात धरलेला नाही.) मग मिक्सर मधून थोडे पाणी घालून वाटून घ्यावी. वाटताना थोडं आलंही घालावं. डोश्याला करतो तितकी कंसिस्टंन्सी! त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून मिश्रण तयार करून घ्यावे.
आतल्या सारणाकरीता :
कोबी, सिमला मिरची पातळ - उभी चिरून आणि गाजर किसून अगदी थोड्या तेलावर मीठ घालून ५ मिनीटे स्टर-फ्राय करून घ्यावे.
पनीर किसून घ्यावे.
चटण्या हव्या त्या प्रमाणात एकत्र करून त्यात आमचूर पावडर मिसळून घ्या.
आता तवा तापवून घ्यावा.
थोडे तेल लावून मूगडाळीच्या पीठाचा पातळ डोसा करून घ्यावा. उलटून एखाद मिनीट ठेऊन परत परतावा.
आता आच थोडी कमी करून डोश्यावर मध्यभागी परतलेल्या भाज्या, त्यावर चटणी मिश्रण आणि वर किसलेला पनीर भुरभुरवा.
डोश्याची गुंडाळी करून डिशमध्ये काढा.
गरमा-गरम खा! यम्मी!
मूगडाळीच्या जागी सालासकट मूगडाळ, आख्खे मूग हे ही वापरता येऊ शकेल. नेक्स टाईम वो प्रयोग करके देखेगा.
अरे वा .. छान आहे रेसिपी ..
अरे वा .. छान आहे रेसिपी ..
नुसती मूगडाळ चिकटत नाही का? (फोटोत कास्ट आयर्न वापरल्यासारखं वाटतंय?)
मी चिल्ला हा प्रकार मायबोलीकर र्म्द कडून ऐकला पहिल्यांदा .. तीने त्यात रवा असल्याचं सांगितलेलं आठवतंय ..
तो सुजी का चिल्ला, सशल! मला
तो सुजी का चिल्ला, सशल! मला वाटतं चिल्ला हा शब्द उत्तर भारतीय वापरत असावेत - धिरडं या प्रकारासाठी.
ही पाकृ मस्त दिसतेय. करून पाहायला हवी.
छान पाकृ. करुन बघेन
छान पाकृ.
करुन बघेन
वॉव..मस्तं दिस्तोय चिल्ला..
वॉव..मस्तं दिस्तोय चिल्ला.. गोल्डन, कुरकुरीत!!
वॉव! सही दिसताहेत. करुन
वॉव! सही दिसताहेत. करुन खाणार
पनीर ऐवजी कोणते चीज वापरता येइल?
मस्त दिसतं आहे!
मस्त दिसतं आहे!
मस्त दिसतोय चिल्ला. मला वाटलं
मस्त दिसतोय चिल्ला. मला वाटलं तिखट लागलं म्हणून "चिल्लाने के वास्तेवाला" कुठला प्रकार असेल.
सध्या मूग माझा सांगाती असल्याने नक्की करून पाहिल लेस मिर्ची
मुगाची धिरडी मस्त खुटखुटीत
मुगाची धिरडी मस्त खुटखुटीत होतात की, सशल. चिकटत नाहीत अजिबात.
रेसिपी मस्त आहे! पनीर म्हटल्यावर माझी मुलं खातील नक्की:)
सशल, अजिबातच चिकटत नाहीत
सशल, अजिबातच चिकटत नाहीत मुगाची धिरडी. मी हिरवी सालासकट मूगडाळ घेते. आमच्याकडे हे फार आवडत नाही. त्यात वरून त्यांना पनीर वगैरे घालून नटवायचं म्हणजे पण ट्राय मारायला हवा एकदा.
सशल, अजिबात चिकटले नाहीत.
सशल, अजिबात चिकटले नाहीत. साधा नाॅन-स्टिक डोश्याचा तवा वापरलाय. कास्ट आयर्न नाही.
तयार चिल्याचा फोटो भारी
तयार चिल्याचा फोटो भारी आलाय.
मुगाच्या धिरड्यांवर मेक्सिकन फोर चीज नावानं जे ग्रेटेड चीज मिळतं ते फार मस्त लागतं.
मस्त दिसतोय! पनीरच्या नावाने
मस्त दिसतोय! पनीरच्या नावाने पोराच्या पोटात भाज्या घालता येतात का बघते...
नाही चिकटत का? थँक्यू .. मी
नाही चिकटत का? थँक्यू .. मी कधीच केली नव्हती .. आता हे असं करून बघेन ..
कसली भारी दिसतायत
कसली भारी दिसतायत फोटोमध्ये.
करतो वेळ मिळाला की.
मस्त दिसतोय चिल्ला
मस्त दिसतोय चिल्ला एकदम.
रायगड, हे प्रकरण कुठे खायचीस तू?
वा... चिल्ला पुर्वी आग्र्याला
वा... चिल्ला पुर्वी आग्र्याला खाल्ला होता. तेंव्हाच हे प्रकरण आवडले होते.
हा फोटो एकदम यम्मी....... तोंपासु!!!!
करणार आणि खाणार.... इकडे सांगणार.........
मस्त दिसतयं! सगळं साहित्य
मस्त दिसतयं! सगळं साहित्य आहेच घरी.. विकांताला प्रयोग करेन
आडो, हा प्रकार डोंबिवलीला
आडो, हा प्रकार डोंबिवलीला फडके रोडवर एक चाटवाला होता त्याच्याकडे असायचा. डोंबिवलीकर सांगू शकतील अजून आहे का तो चाटवाला आणि तिथे मिळतो का हा प्रकार अजून ते!
मोकीमी, आग्र्याला मस्तच मिळत असणार.
अच्छा, फडके रोडवर खायचीस कां?
अच्छा, फडके रोडवर खायचीस कां? एम.आय.डी.सी मध्ये पण एका ठिकाणी खूप मस्त मिळायचा. माझी मैत्रिण वेस्टहून यायची केवळ तो खायला एम.आय.डी.सी.त.
कसला भारी दिसतोय तो चिल्ला.
कसला भारी दिसतोय तो चिल्ला. डायरेक्ट फोटोतून उचलून मटकवावासा वाटतोय.
आमच्या घरातले इतर दोन नग गयेगुजरे आहेत. त्यांना हे पेसरट्टू, धिरडी वगैरे प्रकार आवडत नाहीत. असं स्टफ करुन दिलं तर आवडेल का बघायला हवे. सुचलेच नव्हते कधी सो ह्या आयडियाबद्दल धन्यवाद:)
मस्त, करुन बघणार.
मस्त, करुन बघणार.
मस्त दिसतं आहे..... नक्की
मस्त दिसतं आहे..... नक्की करणार.
मस्त दिसतोय व्हेज पनीर
मस्त दिसतोय व्हेज पनीर चिल्ला!
मस्त रेसिपी, एकदम यम्मी
मस्त रेसिपी, एकदम यम्मी .......
मस्त दिसतंय हे, मी करणार.
मस्त दिसतंय हे, मी करणार. पनीर ऐवजी टोफू सहज खपेल यात आणि आणखी पौष्टिक!
मस्त दिसतोय! नक्की पाहायला
मस्त दिसतोय! नक्की पाहायला हवं करून
भारी आहे प्रकरण
भारी आहे प्रकरण
चान आहे चिल्ला. गुजराथे लोक
चान आहे चिल्ला. गुजराथे लोक ही धिरड्याला चिल्ला म्हणतात. बेसन चिल्ला इ. मै. च्या डब्यात खाल्ल्य.
हा प्रकार वजा पनीर - चीज स्वता:साठी करून पहाते अन खाते.
मस्त दिसतयं प्रकरण.. नाव जाम
मस्त दिसतयं प्रकरण.. नाव जाम आवडलं.. चिल्ला
मुगाचे पोळे केले जातात.एवढे
मुगाचे पोळे केले जातात.एवढे पातळ नाही होत.पण सारणाची कल्पना झकास.
Pages