आमचीही रंगपंचमी (?)!!!

Submitted by अल्पना on 3 September, 2009 - 19:22

आमचीही रंगपंचमी(?)!!!

aayam_painting.JPG

नाव - आयाम
वय - १ वर्ष २ महिने
माध्यम - फिंगरपेंट्स

आईनी केलेली मदतः रुनीच्या सांगण्यावरुन आयामकढून चित्र (?) काढून घेणे. क्रेयॉन आणि फिंगरपेंट्स आणल्यावर त्याचा वापर कसा करतात हे दाखवणे. एकदा दाखवून झाल्यावर आधी क्रेयॉन्स त्याच्या हातात दिले. परंतू कागदावर पिवळ्या रंगानी दोन अन निळ्यानी एक रेघ ओढल्यानंतर त्याचा क्रेयॉन कागदावर वापरण्यातला इंटरेस्ट संपला. त्याने ते उचलून डब्यात ठेवणे अन परत जमिनीवर ओतणे हाच खेळ सुरू केला. मग त्याच्या ताब्यात कागद व फिंगरपेंट्स दिले व कॅमेर्‍यानी त्याचा खेळ शुट करत बसले. अंदाजे अर्धातास रंगात खेळल्यावर त्याला अगदी घासून- पूसून आंघोळ घालणे, त्याच्या पसार्‍याचे अन त्या वहीचे फोटो काढणे, फरशी अन चटई पुसून काढणे व सगळ्यात शेवटी काढलेल्या फोटोतुन फरशीचा भाग क्रॉप करुन चित्र अपलोड करणे एवढा सगळा माझा सहभाग.

एकूण त्याला हा खेळ आवडला. संध्याकाळी बाबा घरी आल्यावर आयामनी केलेलं पेंटीग दाखव म्हटल्यावर ती वही घेवून दाखवत होता.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच !! रंगांची जाण आहे हं त्याला.. Happy
पण खरंच एक वर्षाच्या मुलाला किती मजा आली असेल ना यात!
श्या आम्ही लहान असताना मायबोली आणि अशी स्पर्धा नव्हती! नाहीतर अमुच्या आईने सुद्धा असेच रंग दिले असते आणि फोटो टाकला असता! लक्की हो आजची मुले!! Happy

आयाम,
तू एकदम मस्त फटकारे मारले बर का रंगाचे. आता त्या उरलेल्या रंगाने घरातले काय हवे ते रंगव Happy

उरलेल्या रंगाने घरातले काय हवे ते रंगव >> Lol
मी आजच तुला लिहिणार होतो आयामचं एखादं पेंटीग का नाहीस टाकलं म्हणून.

पण खरंच एक वर्षाच्या मुलाला किती मजा आली असेल ना यात!>>> हे बाकी खर आणि महत्वाच Happy

आयाम, मस्त फटकारे मारेलेस. Happy

बाब्बो !!
काय खरं नाही अल्पना तुझं आता महिन्याच्या किराणा सामानाबरोबर कलर्स पण आणावे लागणारेत Happy

रंग भलते आवडलेले दिसतायत आयामला, मस्त फटकारे मारलेत

हाहाहाहाहा... पोराला रंग उधळू द्या हो सध्या (पुढं नको). हेच वय असं आहे की इथं त्यानं उधळलेले रंग तुमच्या-आमच्या जगण्यात आनंदच आणतात. उगाच त्या रंगांचा अर्थ वगैरे नको बॉ. कारण नसताना क्लीष्टता येते. हे रंग पाहताना समोर सव्वा वर्षाचं पोर आणा, काम खतम. बोटं कशी हळूवार फिरत असतील, हात कसा हलत असेल या कल्पनाच पुरेशा आहेत. उगाच ते चित्राचा प्रकार, रंगांची संगती वगैरे...

छान फटकारे हो !:) तोंडात बोटं नाही का घातली पण त्याने ? Happy भिंत मागणार आता रंगवायला बघ! Happy मुलांना कितीही वह्या, कागद असले तरी भिंती चितारायला जाम आवडतं. Happy

अल्पना भारीच ग ,त्याचा ही फोटु टाकायचास कि.
भाग्यश्री ला मोदक १००% बाकी तु ही एन्जॉय केल अस्णार ना ??