Submitted by साती on 3 August, 2011 - 10:07
वागणे शिस्तीत नाही
ही जगाची रीत नाही
धून वाटे ऐकलेली
ओळखीचे गीत नाही
चुंबताना ओठ माझे
कापले किंचीत नाही
यायचे कोठे भुतांनी
एक येथे शीत नाही
नाविकाने का मलाही
घेतले होडीत नाही
हाल हे व्हावे तुझेही
मी कधी चिंतीत नाही
द्यायची दाने कुणाला
'तो' कधी मोजीत नाही
राक्षसांवर कृष्ण हल्ली
चक्र ते फिरवीत नाही
एवढेसे सत्यदेखिल
या तुझ्या साक्षीत नाही
वाजवीचे बोलताना
घोळ मी घालीत नाही
भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वाजवीचे बोलताना घोळ मी घालीत
वाजवीचे बोलताना
घोळ मी घालीत नाही>>> आवडला.
सुबक गझलरचना!
छान
छान
सुरेख्....छान .
सुरेख्....छान .
खूप छान .
खूप छान .
मस्त!
मस्त!
साती, ग़ज़ल आवडली. मस्त कल्पना.
साती,
ग़ज़ल आवडली. मस्त कल्पना. दोन शायराचे शेर योगायोगाने सारखे आले तर त्याला "शेर टकराना" असे म्हणतात. याच तरहीत मी ग़ज़ल लिहिली आहे. त्यातील एक शेर हुबेहुब नसला तरी आपल्या एका शेराशी मिळता जुळता आहे. आज मी ती ग़ज़ल प्रकाशित करीत आहे. याला निव्वळ योगायोगच म्हणावे. दुसरे काय?
फक्त शेवटचे दोन ठीक वाटले...
फक्त शेवटचे दोन ठीक वाटले...
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना.
आनंदयात्री,शिकतेय मी, जमेल हळूहळू.
निशिकांत, माझंहि असंच होतं,मी तरही टंकण्यापूर्वीच कुणीतरी मला सुचलेलं लिहून मोकळं होतं.
"ग्रेट पिपल थिंक अलाईक "
द्यायची दाने कुणाला 'तो' कधी
द्यायची दाने कुणाला
'तो' कधी मोजीत नाही
>> सुंदर..!
गझल मस्त. मक्ता
गझल मस्त.
मक्ता जबरी...
आवडली.
साती, भांडणे करतील
साती,
भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही>>>>>
हे बाकी खरेच आहे. कविता आवडली.
भांडणे करतील का, ते
ज्यांस साती भीत नाही
छे बुवा! आम्ही तर न भांडता जुळवूनच घेऊ!!
कापले किंचीत नाही ....व्वा
कापले किंचीत नाही
....व्वा
द्यायची दाने कुणाला 'तो' कधी
द्यायची दाने कुणाला
'तो' कधी मोजीत नाही
राक्षसांवर कृष्ण हल्ली
चक्र ते फिरवीत नाही
एवढेसे सत्यदेखिल
या तुझ्या साक्षीत नाही
वाजवीचे बोलताना
घोळ मी घालीत नाही
भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही>>>>व्वा. मस्तच.
छान जमली आहे.
छान जमली आहे.
परत एकदा सगळ्यांना
परत एकदा सगळ्यांना धन्यवाद.
नरेंद्रकाका, मला ओळखलेत वाटतं,
मी माईल्ड झालेय हल्ली मनोगतापेक्षा.
मस्तच
मस्तच
खूप मस्त झाली आहे गझल. खूप
खूप मस्त झाली आहे गझल.
खूप आवडली.
आवडली.
आवडली.
छान! भांडणे करतील त्यांना
छान!
भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही >>> हे खुप आवडले.
अय्यो, पाच वर्षांनी गझल वर
अय्यो, पाच वर्षांनी गझल वर आली.
धन्यवाद मयुरी, सकुरा!
धन्यवाद भुंगा, प्राजु.
मस्तच सहज झालीय रचना छान
मस्तच
सहज झालीय रचना छान
भांडणे करतील त्यांना सांग
भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही> :-ड छान!
मस्तच..
मस्तच..
भांडणे करतील त्यांना सांग
भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही
हेह्हे
भांडणे करतील त्यांना सांग
भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही
पंचवार्षिक योजनेतून धागा वर
पंचवार्षिक योजनेतून धागा वर काढण्यात आला
अशा छान-छान रचना अजुन आहेत का
अशा छान-छान रचना अजुन आहेत का ?
पंचवार्षिक योजनेतल्या पण चालतिल.
मस्त लिहिलेय गझल सातीताई...
मस्त लिहिलेय गझल सातीताई...
मला यातलं जास्त काही समजत
मला यातलं जास्त काही समजत नाही पण आवडलं वाचायला
छानच जमलीय. शिर्षका मध्ये
छानच जमलीय.
शिर्षका मध्ये साती हे, ही गझल तुमच्या स्वत:बद्दल आहे म्हणुन की अजून काही अर्थ आहे त्यात.
Pages