रीत नाही (साती)

Submitted by साती on 3 August, 2011 - 10:07

वागणे शिस्तीत नाही
ही जगाची रीत नाही

धून वाटे ऐकलेली
ओळखीचे गीत नाही

चुंबताना ओठ माझे
कापले किंचीत नाही

यायचे कोठे भुतांनी
एक येथे शीत नाही

नाविकाने का मलाही
घेतले होडीत नाही

हाल हे व्हावे तुझेही
मी कधी चिंतीत नाही

द्यायची दाने कुणाला
'तो' कधी मोजीत नाही

राक्षसांवर कृष्ण हल्ली
चक्र ते फिरवीत नाही

एवढेसे सत्यदेखिल
या तुझ्या साक्षीत नाही

वाजवीचे बोलताना
घोळ मी घालीत नाही

भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धन्यवाद सगळ्यांना!

मानव, इथल्या गझलाज्ज्ञांनी इथे एक तरही उपक्रम आयोजित केला होता.
त्यात कैलास गायकवाड, बेफिकीर इत्यादी गझलज्ञ मंडळी एक एक ओळ देऊन मग भाग घेणार्‍यांनी ती ओळ येईलशी गझल लिहायची.
आणि कुणाची तरही हे ओळखायला कंसात आपलं नाव लिहायचं अशी पद्धत होती.

(नंतर हे प्रकरण इतकं वाढलं की आता तडका/फुबा दिसतात तितके पहिलं पानभरून आमच्या तरहीच्या तर्‍र्‍याच दिसायला लागल्या. लोक वैतागू लागले. मग ते प्रकरण बंद झाले हळुहळू! Wink )

Pages