
ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!
साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.
तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)
बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.
१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.
मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351
कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.
साखर??? का?
साखर??? का?
गोड बनवायला . आमची
गोड बनवायला . आमची आप्पेफॅनमेम्ब्रं गोडच खातात
.
आणि काल काहीतरी झटपट गोड बनवायचे होते.
सीमा, मस्त कृती. सशल,
सीमा, मस्त कृती.
रच्याकने, ढोकळ्याने मला कायम्म्म्म्म्म्म अपयश दिलेलं आहे 
पुढल्या वेळी साखरेऐवजी गूळ घाल. गूळाची चव एकदम खरपूस येते :आहाहा:
सशल, ढोकळ्यापेक्षा इडली कर की मग. एका स्टॅन्डात दोघे गपगार!
स्वस्ति, आता करतेच मी गोड आप्पे
पुढल्या वेळी साखरेऐवजी गूळ
पुढल्या वेळी साखरेऐवजी गूळ घाल. गूळाची चव एकदम खरपूस येते

ऐकूनच तोंडाला पाणी सुटले!
पुढल्या वेळी साखरेऐवजी गूळ
पुढल्या वेळी साखरेऐवजी गूळ घाल. गूळाची चव एकदम खरपूस येते >> हो हो हो . काल घाईघाईत केले ना
रच्याकने , उगाचच मालपोव्यांची आठवण झाली
ॲक्चुअली मलाही या मिश्रणाचे
ॲक्चुअली मलाही या मिश्रणाचे आप्पे करण्यापेक्षा उत्तप्पे जास्त सोयीचे होतील असे वाटते. आप्पेही घाणेच्या घाणे काढावे लागतात
एक घाणा एक माणूस दुसरा घाणा होईपर्यंत सहज गट्टम करतो
. उत्तप्पे केले की कसं फुगले नाही फुगले/ एका बाजूने फ्लॅट राहिले काही भानगडच नाही.
ॲक्चुअली मलाही या मिश्रणाचे
ॲक्चुअली मलाही या मिश्रणाचे आप्पे करण्यापेक्षा उत्तप्पे जास्त सोयीचे होतील असे वाटते<< असेच होतात. मी उरलेल्या पिठाचे उत्तप्पे केले होते.
आमच्या टिल्ल्याने या आप्प्प्यांना गोल्डन गुंडपंगला असे नाव स्वखुशीने दिले आहे.
Pages