लास वेगास, हॉलिवूड अन एल ए पाच ते सहा दिवसात पहाता येईल का (आणि कसे ) ?

Submitted by केदार जाधव on 4 February, 2016 - 02:59

नमस्कार ,

मी ४ मार्च ते २१ मार्च बहिणीला भेटायला अमेरिकेला येणार आहे . ती हार्टफर्डला राह्ते .
५-६ला न्युयॉर्क , अन ७ ८ ९ ला वॉशिंग्टन , फिलाडेल्फिया अन नायगारा पाहून १० -१३ बहिणीबरोबर थांबून (जमल्यास बोस्टन पाहून ) नंतर १४-१८ एल ए अन लास वेगास पहायचा विचार आहे .
मला हॉलिवूड , ग्रँड केनयन , लास वेगासचा एखादा कॅसिनो पहायचा आहे . परत १८-१९ला हार्ट्फर्ड्ला परत यायचा विचार केला आहे .
मी मामींचे सगळे धागे "कॅलिफोर्निया २०१५" वाचले . पण माझीही पहिलीच ट्रीप असल्याने अन मी तितका धाडसी/धडाडीचा नसल्याने काही शंका आहेत . कुणी मला मदत करू शकाल का ?

वाचायला काही माहित असलेल्या लिंक दिल्या तरी चालतील . नेट वर उलट सुलट माहिती वाचून गोंधळायला होतय .

१. ५ दिवस (हॉलिवूड , ग्रँड केनयन , लास वेगासचा एखादा कॅसिनो पहायला ) पुरतील का ?
२. लॉस एंजेल्सला राहिल तर इतर ठिकाणी जायला बसची सोय आहे का ?
३. हॉटेल साधारण कोणत्या रेंजची घ्यावी (ऑनलाईन अगदी ५० पासून ५०० $ पर्यंत आहेत)
४ . एखादी बघण्यासारखी गोष्ट मी मिस करत नाही ना ?
५. LA Hop On/Hop Off bus बद्द्ल ऐकल आहे , त्या चांगल्या आहेत का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आला पराग आमच्या एलएला नावं ठेवायला! Happy
एक दोन दिवसच असतील तर युनिव्हर्सल व डीस्नेमध्ये निघून जातील. कदाचित सकाळी हॉलिवुडची बस टूर घ्या. त्या बस टूरमध्ये हॉलिवूड, मलहॉलंड ड्राइव्ह्, स्टार्सची घरं, रोडिओ ड्राइव्ह व इतर शॉपिंगच्या ठिकाणांवरून फिरवून आणतात. वेळ नसेल तर इतपत फिरून एलएदर्शन होते जरा.. नंतर युनिव्हर्सलला जा. दुसर्या दिवशी जमेल तितके डिस्ने. वरीलपैकी एखादे पार्क ड्रॉप करू वेळ असेल तर ग्रिफिथ पार्क ऑब्झर्वेटरी पाहा. किंवा व्हेनीस किंवा मॅनहॅटन बीच. सॅन्ता मोनिका पिअर.. मालिबू हे पाहा.आवड असेल भरपूर म्युझिअम्स आहेत.. गेटी सेंतर किंवा लॅक्मा( लॉस एंजिलीस काउंटी म्युझिअम ऑफ आर्ट्स.) लॅक्माच्या शेजारी नव्याने रिनोव्हेट केलेले ऑटो म्युझिअम आहे. द ग्रोव्ह नावाचा सुंदर आउट्डोअर मॉल आहे तिथे चीजकेक फॅक्टरीत जेवा.बेव्हर्ली हिल्सच्या गर्द झाडी असलेल्या र्स्त्यांवरून ड्राइव्ह करा.. एलएमध्ये लोकं फक्त थ्हीम पार्क पाहायला येतात पण इतरही बरेच आहे पाहायला. पण त्यासाठी निवांत वेळ हवा. वेळ कमी असेल तर मात्र शक्य नाही.

शेवटी केदार east नि वेस्ट कोस्ट कँसल करून अलास्का किंवा मेहिको बघायला जाईल अशी पुसटशी शंका आता मनाला चाटून जातेय. Wink

शेवटी केदार east नि वेस्ट कोस्ट कँसल करून अलास्का किंवा मेहिको बघायला जाईल अशी पुसटशी शंका आता मनाला चाटून जातेय. >>> Lol हो ना. किंवा 'उर्वरित अमेरिका' मधे सुद्धा ज्या शहराचा बाफ दिसत नाही असे शोधून तेथे.

एकंदरीत
एल.ए. ला जा किंवा कॅन्सल कर.
डिसीला जा किंवा बघू पण नकोस.
बोस्टनला जा किंवा विचार पण नको करूस..
युनिवर्सलला जा नाहीतर सिंगापूरला जाऊन बघ..
...
...
अमेरिकेला ये किंवा नाही आलास तरी चालेल.. Proud

अर्र डीसीला जातोय आणि लुरे केव्हर्न्स कुणीच सजेस्ट नाही केलं? बरं नाही हं असं हे ठिकाण व्हिएमध्ये असलं म्हणून काय झालं Wink आता इतक्या लांबून हा परत इस्ट कोस्टला येणार आहे का परत?

बरं, ड्राइव्ह करत असशील तर जरा येरवाळी निघून लुरे केव्हर्न्सला जायचं, येताना शेनॅनडो पार्कातून यायचं आणि मग डीसीच्या आसपासच्या हाटलात डेरा टाकून मग कसं (आणि किती) डीसी पाहायचं ते पाहा. इफ यु आर नॉट अ म्युझियम पर्सन सगळं डीसी ड्राइव्ह थ्रु पण करू शकशील. माझ्या एका मित्राने लिटरली असं त्याच्या आईला डिसी फिरवलं आहे . ममी पती ग्यु थारू डिसी म्हणून...फुल्ल टू धम्माल Wink

असो. कंफुजन मध्ये अजून कंफुजन झालं का करून आमचं पण? गूड लक प्लानिंग Proud

अर्र...मधल्या मनोरंजक पोष्टींमध्ये तुमची पोष्ट वाचलीच नसणार मी..पण तरी असूदे आता... Happy

असामी ,

शेवटी केदार east नि वेस्ट कोस्ट कँसल करून अलास्का किंवा मेहिको बघायला जाईल अशी पुसटशी शंका आता मनाला चाटून जातेय >> Happy Happy

पण खरच धन्यवाद सगळ्यांचे . खूप चांगली माहिती.
थोड कन्फ्युजन होतय . पण काहीच माहित नसल्यापे़क्षा हे फारच चांगल आहे Happy

महिनाभर वगैरे आधी हॉटेल , विमान बुक केल्याने खूप फरक पडतो का ? ( थोडा पडण साहजिक आहे पण खूप जास्त)
की ऑन द फ्लाय बुकींग केलेल चांगल ?

एअरफेअर महिनाभर आधी चांगले मिळेल. नंतर वाढेल. ३-४ आठवडे असेपर्यंत पुढच्या काही दिवसांत चेक कर. थोडेफार रेट्स बदलतात. मात्र एकदा बुक केलेस की सहसा कॅन्सल होत नाही, बहुतांश वेळा बदलूनही देत नाहीत. साउथवेस्ट वाले फक्त देतात.

हॉटेल्स एखादे आवडले तर आधी बुक करून टाक, फक्त कॅन्सलेशन जवळजवळ आदल्या दिवशीपर्यंत चालेल असे कर. म्हणजे नंतर दुसरे चांगले सापडले तर बदलता येइल.

महिनाभर वगैरे आधी हॉटेल , विमान बुक केल्याने खूप फरक पडतो का ? ( थोडा पडण साहजिक आहे पण खूप जास्त)
की ऑन द फ्लाय बुकींग केलेल चांगल ?>>> डिपेन्ड्स अपॉन सिझन,smiley4.gif आधी बुक केल्यास स्वस्त पडेल पण लास्ट मिनिट डेअर देव्हिल असाल तर भारी डील ही मीळतात...

हो लास्ट मिनीट डील्स सुद्धा मिळतील मार्च मधे. काही बाबतीत फ्लाईट डीटेल्स पेमेण्ट केल्यावर दिसतात (प्राईसलाईन चा एक ऑप्शन). पण त्या तारखेची कोणतीही फ्लाईट चालणार असेल तर ते ही ट्राय करू शकतोस.

असं म्हणतात की ८ आठवडे आधी विमानाचे तिकीट काढावे. चांगल्या भावात मिळते.
त्यात हातात कमी दिवस असले, की शेवटच्या डीलवर विश्वास ठेऊन वाट बघणे शक्य नसते..
त्यात शेवटच्या क्षणी जरी तिकीट मिळाले तर निघण्याची वेळ, पोहोचण्याची वेळ आपल्याला आवडेल असेही नसते. तेव्हा..

जेट लॅग घालवण्यासाठी एखादा दिवस ठेवणे जरूरी आहे असे वाटते. तीन आठवड्यात तीन टाईमझोन बदलणार म्हणजे भुकेचे वेळापत्रक ... Sad

वेगासहून ग्रे हाउंड टुअर्स असतात. गाइडेड आणि रिझनेबल वाटल्या. होटलहून पिकप ड्रॉप करतात. जर खिसा हो म्हणत असेल तर एखाद्या कसिनो होटलमध्ये मुक्काम केल्यास वर्थिट! कॅनियनला हेलिराईड घ्या. लै भारी अस्तयं. जमेल तिथल्या होटलमध्ये मोफतची माहितीपत्र आणि कूपन्स असतात, ती चेक करा.

कॅसिनो साठी नेहमी खिशाला पटवावे लागते असे नाही, कधीकधी इतर हॉटेल्स इतकाच रेट असतो. :). मला अनेकदा मिळालेला आहे.

मी माझ्यासाठी एक्सपीडिया वर होतोच, त्यामुळे न राहवून चेक केले :). ८ मार्च च्या आसपास अनेक कॅसिनोज ची बरी डील्स आहेत. न्यू यॉर्क, पॅरिस, ट्रेजर आयलंड, सर्कस सर्कस, स्ट्रॅटोस्फीअर ई. यातले शेवट्चे दोन स्ट्रीप च्या प्राइम एरिया पासून थोडे लांब आहेत. सगळी फॅमिली जाणार असेल तर हे सगळे मी रेकमेन्ड करणार नाही (कारण यातील बर्‍याच कॅसिनोज चा मला स्वतःला राहण्याचा अनुभव नाही. स्ट्रॅटोस्पीअर चा आहे पण तो अनेक वर्षांपूर्वीचा, तो चांगला होता). पण एकट्या व्यक्तीला हरकत नाही.

केदार, इथेच वीणा वर्ल्ड किंवा केसरीच्या ऑफिसात जाऊन एकदा चौकशी कर. ते तुला हवी तशी ट्रिप आखून देऊ शकतील. ट्रान्सपोर्ट वगैरे करता मदत करू शकतील.

लास वेगास ते ग्रँड कॅनियनला जाण्यासाठी आम्ही वापरली ती स्वीट टूर्स घेऊ शकतोस. ते केवळ जाण्यायेण्यासाठी अ‍ॅकोमोडेट करू शकतात. बाकी तुला ग्रँड कॅनियन पार्कमधलं हॉटेल स्वतःच बुक करावं लागेल. पण फुलफ्लेज्ड टूर घेतलीस तर तुला ते देतील त्या हॉटेलात रहावं लागेल. अशी हॉटेल्स पार्क बाहेर असतात.

लास वेगासला स्ट्रिपच्या मध्यवर्ती भागात आणि हॅराजच्या जवळपासचं हॉटेल घे. बहुतेक सगळ्या एले ते लास वेगासच्या टूर बसेस हॅराजला सोडतात आणि तिथून पिकअप करतात. पण एकदा खात्री करून घे आणि मग हॉटेल बुक कर. मध्यवर्ती भागात असल्यानं आजूबाजूची हॉटेल्स चालत सहज कव्हर करू शकतो. लास वेगासमध्ये त्यांच्या बसचा पास मिळतो. १ दिवसाचा, ३ दिवसाचा असे ऑप्श्न्स असतात. तो घेतला की बसमधून हवं तेवढं फिरता येईल.

एकटा अस्ल्यामुळे बरं आहे. उठलास की चाल्लास! कॅसिनो खेळण्यात वेळ घालवायचा की कॅसिनोज, शोज बघण्यात ते मात्र ठरव. Proud

नायगारा , लिबर्टी बाई , व्हाईट हाऊस , हालिवुड केलं तर चारीधाम केल्याच पुण्य मिळतं आणि वेगसला जाउन उद्यापन करायचं Proud
कुठल्याही हॉटेलला राहिलास तरी छोट्या मिनिव्हॅन्स येऊन पिकअप करतील फक्त ड्रॉप करताना जवळपासच्या लोकशनला सोडतील.
हॉटेल स्ट्रिपच्या जवळपासच घे , स्ट्रिप वर भटकण्यात जी मजा आहे ती कॅसिनोत मशिनला चिटकुन बसण्यात नाही. Proud

१ दिवसाचा, ३ दिवसाचा असे ऑप्श्न्स असतात. तो घेतला की बसमधून हवं तेवढं फिरता येईल. >>> +१ , चिल्लर मात्र जवळ असुदे.

धन्यवाद सगळ्यांचे Happy
बाकी सगळ बुकींग बर्यापैकी झालय .
फक्त एल ए अन वेगासच्या हॉटेलचे बुकिंग राहिलय .

त्यासाठी एखादी चांगली साईट सुचवाल का ?

आणि हॉटेल रूम साधारण किती भाड (पर नाईट) असलेली घ्यावी . ?

मी १२ ला रात्री ९:३० ला एल ए ला येणार आहे अन १८ ला सकाळी ६ला परत निघणार आहे . त्यातील २ -३ दिवस वेगास मधे राहायचा विचार आहे

धन्यवाद सगळ्याना ,

नायगारा , लिबर्टी बाई , व्हाईट हाऊस , हालिवुड केलं तर चारीधाम केल्याच पुण्य मिळतं आणि वेगसला जाउन उद्यापन करायचं फिदीफिदी >> नायगारा , लिबर्टी बाई अन व्हाईट हाऊस झाल .
उद्या हालिवुड अन वेगासला निघणार .
१९ ला ब्रॉडवे अलादिन ची तिकिटही मिळाली आहेत Happy

Pages