नमस्कार ,
मी ४ मार्च ते २१ मार्च बहिणीला भेटायला अमेरिकेला येणार आहे . ती हार्टफर्डला राह्ते .
५-६ला न्युयॉर्क , अन ७ ८ ९ ला वॉशिंग्टन , फिलाडेल्फिया अन नायगारा पाहून १० -१३ बहिणीबरोबर थांबून (जमल्यास बोस्टन पाहून ) नंतर १४-१८ एल ए अन लास वेगास पहायचा विचार आहे .
मला हॉलिवूड , ग्रँड केनयन , लास वेगासचा एखादा कॅसिनो पहायचा आहे . परत १८-१९ला हार्ट्फर्ड्ला परत यायचा विचार केला आहे .
मी मामींचे सगळे धागे "कॅलिफोर्निया २०१५" वाचले . पण माझीही पहिलीच ट्रीप असल्याने अन मी तितका धाडसी/धडाडीचा नसल्याने काही शंका आहेत . कुणी मला मदत करू शकाल का ?
वाचायला काही माहित असलेल्या लिंक दिल्या तरी चालतील . नेट वर उलट सुलट माहिती वाचून गोंधळायला होतय .
१. ५ दिवस (हॉलिवूड , ग्रँड केनयन , लास वेगासचा एखादा कॅसिनो पहायला ) पुरतील का ?
२. लॉस एंजेल्सला राहिल तर इतर ठिकाणी जायला बसची सोय आहे का ?
३. हॉटेल साधारण कोणत्या रेंजची घ्यावी (ऑनलाईन अगदी ५० पासून ५०० $ पर्यंत आहेत)
४ . एखादी बघण्यासारखी गोष्ट मी मिस करत नाही ना ?
५. LA Hop On/Hop Off bus बद्द्ल ऐकल आहे , त्या चांगल्या आहेत का ?
पाच दिवसात लास वेगस, लॉस
पाच दिवसात लास वेगस, लॉस एंजल्ज़ आणि ग्रँड कानियन जरा महत्वाकांक्षी प्लॅन आहे. पण तरीही doable आहे. मी तुम्हाला सजेस्ट करीन एखादा चांगला टूर घ्या. टूर्स चे खूप ऑपशन्स तुम्हाला इंटरनेट वर मिळतील. पहिलीच ट्रिप असल्यामुळे टूर चा पर्याय तुम्हाला सोपा जाईल. म्हणजे हॉटेल्स, ट्रॅन्स्पोर्टेशन चा विचार करावा लागणार नाही.
धन्यवाद पद्मावति , चेक करतो
धन्यवाद पद्मावति , चेक करतो , मला हव तस कॉम्बिनेशन आहे का ?
एखादी माहित असलेली लिंक असेल तर द्याल का ?
मी तिथे गेले होते त्याला बरीच
मी तिथे गेले होते त्याला बरीच वर्षे झाली आणि आम्ही ड्राइव केले होते( बरेच दिवस हाताशी होते) त्यामुळे टूर्स ची नावं मला खरंच कल्पना नाही. पण तरीही मला काही माहिती कळली तर सांगते नक्की.
न्यूयॉर्क ला ब्रॉड वे थिएटर
न्यूयॉर्क ला ब्रॉड वे थिएटर चा अनुभव घे च
वेगस ला लहानश्या ( ६ सीटर) विमानातून ग्रेंड कॅनियन ची उडती सफर पण मजेदार आहे. या विमानाच्या खिडक्या चक्क उघड्या असतात.
एल ए ला युनिवर्सल स्टूडियो ला जरूर दे भेट . आम्ही पण ड्राईव करूनच गेलो होतो. त्यामुळे टूर्स ची कल्पना नाही तितकीशी.
check this:
check this: http://www.viator.com/Los-Angeles/d645-ttd
or search for Chinese tour companies...they r cheap and cover a lot in few days....
केदारदा इथे बघ
केदारदा इथे बघ http://www.taketours.com/usa/
गोगांनी मस्त माहिती दिलीय - http://www.maayboli.com/node/53600
टेक टूर्स चांगला ऑप्शन आहे
टेक टूर्स चांगला ऑप्शन आहे पण ९० टक्के चिनी सहप्रवासी असतीलत्/तुम्ही http://www.lassentours.com/ यांची सुध्दा घेवू शकता.
दोन्ही चंगले आहेत .पण हा सुध्दा चिनी ~ओपरेटरआझे. माहिती सर्व इंग्रजीत देतात
लासन चा आमच्या नातेवाईकांचा
लासन चा आमच्या नातेवाईकांचा अनुभव आहे. एल ए वरून २-३ दिवसांच्या ट्रीप साठी हरकत नाही. बरेचसे चायनीज असतात हे खरे आहे. पण व्हेजी पर्याय असतात असे ऐकले आहे.
स्वतः गाडी चालवणार नसाल तर अशी टूर घेणे हा चांगला पर्याय आहे. ५ पैकी बहुधा दोन रात्री या टूर मधूनच हॉटेल आपोआप मिळेल.
एकूण ५ दिवस टाईट आहे, पण जमू शकेल.
केसरी किंवा इतर कोणाची जर मिळाली तर तेही बघ, इथे जॉइन करायला.
ते कॅनियन वर फिरून येणारे विमान व्ह्यूज चांगले देते पण प्रवास खूप 'जिटरी' असतो. विमान सतत हलते. ज्यांना गाडी लागते किंवा रोलर कोस्टर्स आवडत नाहीत त्यांना अजिबात कम्फर्टेबल वाटणार नाही. वेगास वरून सुद्धा १-२ दिवसांच्या कॅनियन टूर्स मिळतात.
एक प्लॅन असा करू शकशील - दोन रात्री एले, दोन वेगास व एक पूर्ण दिवसाची किंवा दोन दिवसांची कॅनियन टूर वेगास वरून.
वेगास ला मात्र कॅसिनो हॉटेल्स
वेगास ला मात्र कॅसिनो हॉटेल्स ची डील्स शोध. व्हेनेशियन, आरिया, एमजीएम, कॉस्मोपोलिटन, मिराज, न्यू यॉर्क, पॅरिस, सीझर पॅलेस यातले काही मिळते का आधी बघ. बरोबर लहान मुले असतील तर सर्कस सर्कस हा चांगला पर्याय आहे. अनेकदा या हॉटेल्स ची डील्स चांगली मिळतात. आणि आजूबाजूला सहज फिरता येते त्यामुळे 'वर्थ' आहे.
मुळात वेगास आणि लॉस एंजलिस ही
मुळात वेगास आणि लॉस एंजलिस ही लांब असलेली २ शहरे आहेत.
वेगासला २ दिवस आणि लॉस एंजलिसला तीन दिवस किंवा उलट असा कार्यक्रम करता येईल.
एकदा वेगासला राहिलात की एक काय चार पाच कॅसिनो बघता येतील.
तिथून निघणार्या बस टूर घेऊन ग्रांड कॅनियनला जाऊन रात्री परत येता येईल. ( १ दिवस कॅसिनो, १ दिवस कॅनियन).
बाकी बरीच माहिती मी वरच्या लिंक वर टाकलेली आहेच.
गोगांनी सांगितले ते बरोबर
गोगांनी सांगितले ते बरोबर आहे. बरोबर लहान मुले असतील तर वेगास नि पर्यायाने कॅनियन कटाप करून लॉस एंजलिस मधेच डिस्ने नि युनिव्हर्सल करा, हवे असेल तर सॅण डियागो ला जाऊन सी वर्ल्ड, नि सफारी, झू बघता येईल. लहान मुले नसतील तर ग्रांड कॅनियन ची दिवसाची टूर घ्या (विमान प्रवासाबाबत फा ने लिहिलेले अचूक आहे) नि उरलेले दिवस जीवाचा वेगास करा
धन्यवाद सगळ्यांचे . चेक
धन्यवाद सगळ्यांचे .
चेक करतो
मी एकटाच येत आहे . त्यामुळे हेक्टीक शेड्युलही चालेल
असामी +१ सॅन डियोगो , मग एले
असामी +१ सॅन डियोगो , मग एले आणि शेवटी लास वेगास कर , लास वेगस मधले रात्रीचे शो बघायला मात्र विसरु नकोस
खालच्या लिंकमधला शो आम्ही
खालच्या लिंकमधला शो आम्ही बघितला होता .. मस्त होता
https://m.vegas.com/shows/production/le-reve-las-vegas/
मी एकटाच येत आहे >> मग
मी एकटाच येत आहे >>
मग वेगासला जा.
भारतीय लायसन्स असेल तर तुला कार रेन्ट करता येईल. त्यामुळे ते आण. आणि इन्शूरंस घे.
वेगास - ग्रॅड कॅनियन ड्राईव्ह कर. ( ड्राईव्ह आवडत असेल तर मजा येईल) मध्येच हुवर डॅम आहे. तिथे ३० एक मिनिटे.
बोस्टनला वगैरे का जात आहेस? डीसीला पण थरारक असे काही नाही. हार्टफर्ड वरून २ दिवस फार झाले. न्यु यॉर्क मध्ये मात्र २ दिवस ठेव.
२ दिवस डीसी ( मी तर ड्रॉप करेन)
२ दिवस न्युयॉर्क
३ दिवस वेगास ( त्यातील १ डे साउथ रिम ग्रँड कॅनियन)
आणि जर LA करायचे असेल तर ( पार्कांसहित ) मग ३ ते ४.
डीसीला कपिटॉल, मोन्युमेंट्स
डीसीला कपिटॉल, मोन्युमेंट्स आणि म्युझियम्स बघण्यासारखी आहेत. सगळी एकाच ठिकाणी असल्याने एका दिवसात करून होतील.
Lincoln memorial
Washington memorial
Capitol
Air and Space Museum
Museum of natural history ही तर चुकवू नकाच. White House बहुतेक बाहेरूनच बघावे लागेल. holocaust museum ही बघण्यासारखे आहे,
जर अजून एखादा दिवस असेल तर Virginia मधे Luray Caverns या पाताळी गुहा बघण्यासारख्या आहेत. Baltimore मधले Aquarium ही चांगले आहे.
बोस्टन कटाप करुन ते दिवस
बोस्टन कटाप करुन ते दिवस वेगास-एल ए ला द्या, आमच्या इथे फार काही नाही युनिव्हर्सिटि -म्युझियम शिवाय
धन्यवाद केदार , चीकू
धन्यवाद केदार , चीकू ,प्राजक्ता ,
बोस्ट्न ड्रॉप
वेगस-ग्रॅंड कॅन्यन ड्रायविंग
वेगस-ग्रॅंड कॅन्यन ड्रायविंग डिस्टंस ४-४.५ तास आहे, वन वे. जाउन-येउन एका दिवसात ग्रॅंड कॅन्यन म्हणजे भोज्ज्याला शिवुन येण्यासारखं आहे. वेळेचं बंधनच असेल तर वाटेवरचा स्कायवाॅक बघुन त्यावरच समाधान मानता येइल...
न्यूजर्सीत फेमस तसं काही नाही
न्यूजर्सीत फेमस तसं काही नाही पण तरी नमुने चिक्कार आहेत बघण्यासरखे.
मी एकटाच येत आहे >> फिदीफिदी
मी एकटाच येत आहे >> फिदीफिदी मग वेगासला जा. >> *फक्त* राहिले तात्या :D. केदार लक्षात ठेव, what happens in Vegas, stays in Vegas
डीसी पण ड्रॉप कर. फार तर वनडे
डीसी पण ड्रॉप कर. फार तर वनडे ट्रिप मार आणि पांंढरे घर बघून घे. ( दुरूनच)
हो. "फक्त" राहिले. पण बायकापोरं हा बाफ वाचत आहेत म्हणून ९८गिरी केली नाही.
राज पहाटे लवकर निघुन रात्री
राज पहाटे लवकर निघुन रात्री उशीरा पोहोचलं तर व्यवस्थित होतं , पण टुरच घ्या , मस्त झोप होईल बसमध्ये. पण अख्खा दिवस जाईल .
एक रात्र तरी पार्क मध्ये
एक रात्र तरी पार्क मध्ये रहावे (खाली उतरायचं असेल तर जास्त), सनसेट-सनरायज बघता येइल. आता कॅन्यन एक पटेल स्पाॅट म्हणुन बघायचा असेल तर गोष्ट वेगळी...
मी म्हणेन एकटा येत असशील तर
मी म्हणेन एकटा येत असशील तर एल.ए. ड्रॉप कर. युनिव्हर्सल आणि डिस्नेत जाणार नसशील तर एल.ए. बोर आहे! (आणि हे दोन बघायचं असेल तर फ्लॉरीडा बेटर आहे..) हॉलिवुडच्या पाटीपाशी फोटो काढणं फार काय भारी नसतं. तुला हवं तर तुला फोटोशॉप करून देईन.
डायरेक्ट वेगसला फ्लाय कर आणि वाचलेल्या दिवसांमध्ये बॉस्टन बघ. एमआयटीमध्ये वगैरे जाऊन ये. खूपच भारी वाटतं !!!!!
पुरेसा गोंधळ वाढला असेल आणि अजून काही माहिती हवी असेल तर मेल कर.
चिकू, तुमच्या डीसीच्या लिस्ट
चिकू, तुमच्या डीसीच्या लिस्ट मधलं सगळं चागलं आहे, पण एका दिवसात कसं होईल? जवळ असलं तरी आत गेलं की बघण्यात वेळ जाणार ना!!! बरं, डीसीला गेलास तर पायाचे सगळे तुकडे शोधून बरोबर घेऊन जारे पुढे.
धन्यवाद सगळ्यांचे वेगास अन
धन्यवाद सगळ्यांचे

वेगास अन कानियान नक्की करतो मग. त्यावर तर सगळ्याच एकमत दिसतय .
६ दिवस आहेत मॅक्स वेस्ट कोस्टला . २ दिवस वेगास अन २ दिवस कानियान करूनही १-२ दिवस मिळतील .
होपफुली मग डिस्ने किंवा युनिवर्सल बघेन . हे बर पडेल का ?
मी म्हणेन एकटा येत असशील तर
मी म्हणेन एकटा येत असशील तर एल.ए. ड्रॉप कर.>>> +१ जर डिसनी करणार नसेल तर. फ्कत युनिव्हर्सल साठी एवढा खर्च आणि वेळ घालवण्यापेक्षा बोस्ट्न किंवा आजुन काही तरी बघा.
युनिव्हर्सल सिंगापुर मध्ये पण बघु शकतात . तिकिटाचे दर निम्मे आहेत आणि भारतापासुन जवळ असल्याने फॅमिली बरोबर जाउ शकता.
डायरेक्ट वेगसला फ्लाय कर आणि
डायरेक्ट वेगसला फ्लाय कर आणि वाचलेल्या दिवसांमध्ये बॉस्टन बघ. एमआयटीमध्ये वगैरे जाऊन ये. खूपच भारी वाटतं !!!!! >> +१. Boston ला typical Patel नाहित पण एकंदर downtown, freedom trail , MIT, Harvard Square हा भाग मस्त आहे hang out करायला. तुला तसे आवडत असेल तर नक्की कर. नाहितर तेच दिवस DC मधे घालव. वेगास ला तुझी कितपत इच्छा आहे ह्यावर हवे तेव्हढे दिवस घालवता येतील.
ओके बोस्ट्न इज बॅ़क . तसही
ओके

बोस्ट्न इज बॅ़क . तसही बोस्ट्न बाकी कशाच्या मधे येत नाहीये. ते २ दिवस (वीकेंड) बहिणीबरोबर थांबणार होतो . आता दोघेही बोस्ट्न ला जाऊ
Pages