डिसेंबर महिना सुरु झाला की वेध लगतात ते नव्या वर्षाचे पण ज्यांची संक्रांत पहिली आहे त्यांना नवीन वर्षाबरोबरच वेध लागतात ते काळी साडी, हलव्याचे दागिने यांचे.
माझ्या नणंद बाई हलव्याचे दगिने करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्यांना करायची खूप हौस पण आहे . माझ्या मुलीच्या बोरनहाणाच्या वेळी त्यांनी सुंदर कृष्णाची हलव्याची वाडी केली होती आणि आता त्याच मुलीचे लग्न होऊन तिची पहिली संकांत आली तेव्हाही त्या तिच्यासाठी हलव्याचे दागिने करायला तयार, आता जवळ जवळ ऐंशीच्या घरात असूनही. हलव्याचे दागिने बनवणे कौशल्याचे, कष्टाचे आणि चिकाटीचे काम आहे. पण परमेश्वर कृपेने त्यांच्याकडे अजूनही ती क्षमता अहे. पूर्वी त्या हलवा ही घरीच करीत असत. पण आता हलवा विकत आणतात. हलव्याचे सर करण्यासाठी खाली बसावे लागते आणि पाय लांब करुन पायाच्या अंगठ्यात दुपदरी दोरा धरुन त्यात हलवा जिग च्या सहायाने फिक्स करावा लागतो. त्यांनी केलेल्या दागिन्यांचा फोटो खाली देत आहे .
From mayboli
हातात बांगड्या पाटल्या तोडे, गळ्यात मंगळसूत्र, तन्मणी आणि हार, दंडात वाकी , नाकात नथ, कपाळावर बिंदी, कानात झुमके आणि कुड्या (काय हव ते घाला ), बोटात अंगठी असे सगळे दागिने त्यांनी स्वतः तयार केले होते आणि जावयांसाठी दोन पदरी हार आणि पुष्पगुच्छ (ऑरगंडीची फुलं मी नेट वर बघुन केली आणि त्यावर हलव्याचे सर सोडले त्यामुळे नंतर ही तो पुष्प्गुच्छ म्हणून वापरता आला. )
जावयांसाठी हत्ती वर हलव्याच्या गोणी ( पोती) टाकुन तो हत्ती ही जावयांना देण्याची प्रथा आहे. तो ही फोटोत दिसतो आहे. हत्तीच्या पाठीवर सजवलेली झूल घालुन त्यावर हलव्याच्या गोणी लादल्या आहेत. विविध आकाराच्या पिशव्या करुन त्यात हलवा भरुन देण्याची पद्धत आहे. त्या पिशव्या ही मी स्वतः केल्या आहेत. या सगळ्यात माझा ही वेळ छान गेला.
From mayboli
From mayboli
जावयांसाठी हलव्याने भरलेली वाटी आणि लेकीसाठी काळी साडी घ्यायलाच हवी. अशी सगळी तयारी झाली संक्रांतीच्या सणाची. लेक आणि जावई यायचे तेवढेच बाकी होते. पण कहाणीमध्ये ट्विस्ट आली. ती होती सिंगापूरला आणि ऑफिसमध्ये आयत्या वेळेस अर्जंट काम निघाल्याने तिला यायला जमणार नाही असे कळले. इकडे आम्ही सगळेच हिरमुसलो. नणंदबाईनी किती हौसेने दगिने केले होते. पण इच्छा असली की मार्ग निघतोच. ते सगळ वाण आणि दगिने घेऊन आम्हीच तिकडे जाण्याचा बेत केला पण इतके नाजुक दगिने नेणार कसे ? त्यावर ही तोडगा निघाला. पेठे सराफांकडे जाऊन मी रिकामे ज्वेलरी बॉक्स देण्याची त्यांना विनंती केली आणि नवल म्हणजे काहीही कुरकुर न करता त्यानी ते देण्याचे लगेचच मान्य केले . मग काय त्या ज्वेलरी बॉक्स मधुन ही ज्वेलरी अगदी अल्गद एक ही हलवा न पडता सिंगापूरला पोचले खरी पण एक खंत लागुन रहिली ती म्हणजे नणंद बाई काही येऊ शकल्या नाहीत तिकडे वयोमानामुळे. त्यांना फोटो वरच समाधान मानावे लागले. तो हा फोटो.
From mayboli
संक्रांतीच्या आधीच फोटो टाकला आहे कारण दागिने करण्यात जर कोणाला रस असेल तर फोटोचा उपयोग होऊ शकेल. तसेच कोणाला हलवा करायचा असेल तरी आता त्याची कृती ही दिनेश दानी दिली आहे.
सुमेधा यानी हलवा कसा तयार करतात ते दिनेशदा यांना विचारले होते. नेहमीप्रमाणे दिनेशदा यांना ते माहित होतेच त्यांनी प्रतिसादात हलव्याची अगदी परफेक्ट कृती दिली आहे. तीच खाली देत आहे. म्हणजे ती सगळ्यानाच पहिल्या पानावर दिसेल.
दिनेशदा यांनी दिलेली हलव्याची कृती :
इथे सर्वांच्या सोयीसाठी हलव्याची कृती देतोय.
एक वाटीभर साखर घेऊन त्यात वाटीभर दूध घालायचे. साखर विरघळली कि ते गरम करत ठेवायचे. उकळी आली कि मग त्यात अर्धी वाटी ताक टाकायचे. थोड्या वेळाने मळी वर येते. ती काढून टाकायची. पाक थोडा उकळून चौपदरी फडक्याने गाळून घ्यायचा. पाक शुभ्र होणे महत्वाचे आहे. हा पाक सतत गरम ठेवावा लागतो.
मग एका परातीत किंवा कढईत तीळ ( अर्धी मूठ ) भाजायला घ्यायचे. ते सतत हलवत रहायचे. त्यावर अर्धा अर्धा चमचा पाक टाकत रहायचा. तो सुकला कि परत टाकायचा. थोड्या वेळाने त्याला काटा येऊ लागतो. हे काम पहाटेच्या थंडीतच करायचे असते तर चांगला काटा येतो. परातीला पाक चिकटला तर तीळ काढून परात स्वच्छ धुवायची, पुसायची आणि परत हे काम सुरु करायचे.
तीळासोबत खसखस, वेलची दाणे, काकडीच्या बिया वगैरे पण वापरतात. रंगीत करायचा असेल तर बेसिक काटा आल्यानंतर पाकातच रंग टाकायचा. तयार हलवा थोडा वेळ उनात ठेवायचा.
बाजारी हलव्यात परात स्वच्छ करत नाहीत म्हणून त्यावर पांढरट थर दिसतो, घरचा हलवा चमकदार होतो. ( माझी आई घरी करत असे पुर्वी. )
प्राची दागिने सुरेख.
प्राची दागिने सुरेख.
प्राची खुप सुरेख..
प्राची खुप सुरेख..
मनीमोहोर मस्त केलेत दागिने
मनीमोहोर मस्त केलेत दागिने तुमच्या नणंदबाईनी.
प्राची, तुमचे ही सुरेख झालेत.
धन्यवाद अन्जू, सायू आणि
धन्यवाद अन्जू, सायू आणि नाव!
खरंतर मायबोलीकरांमुळेच हे शक्य झालं. येथील खूप जण वेगवेगळ्या कलेत निपुण आहेत. काही जण तर versatile आहेत. या सर्वांमुळेच आपण ही काही तरी करावं/करून पहावं असं वाटलं आणि हे निर्माण झालं
सुंदर झाले आहेत दागिने....
सुंदर झाले आहेत दागिने....
हे मी मझ्या पिल्लासाठी केलेले
हे मी मझ्या पिल्लासाठी केलेले दागिने...
खूप गोड दिसतायेत सर्वांचे
खूप गोड दिसतायेत सर्वांचे दागिने.
खुप सुरेख..
खुप सुरेख..
पद्मजा, खूप सुंदर दिसतेय
पद्मजा, खूप सुंदर दिसतेय तुम्ही केलेली हलव्याची वाडी. मांडणी ही सुरेखच.
पद्मजा, फारच गोड आणि क्युट
पद्मजा, फारच गोड आणि क्युट आहेत तुम्ही पिल्लासाठी केलेले दागिने.
छानच
छानच
धागा वर काढतेय ,कोणाला हवं
धागा वर काढतेय ,कोणाला हवं असेल तर उपयोग होऊ शकतो म्हणून.
Pages