सामाजिक उपक्रम २०१६ - पुर्वतयारी

Submitted by सुनिधी on 17 January, 2016 - 23:28

नमस्कार,

मायबोलीवरील सामाजिक उपक्रमाच्या पहिल्या आवाहनाची वेळ झाली आहे.
हा उपक्रम यंदाही केला जाईल व याकरता स्वयंसेवक हवे आहेत.

उपक्रमातील सर्वच सहभागी स्वयंसेवकांना पुढील कामे करावी लागतात :

१. आपली ईमेल्स नेहमी पहाणे व उपक्रमासंबधी इथे अथवा ईमेलने आलेल्या सर्व प्रश्नांना वेळेवर उत्तर देणे.

२. देणगीदारांची यादी व देणगीच्या रकमा यांची लगेच योग्य जागी नोंद करणे व इतर स्वयंसेवकांना देखील लगेच ती माहिती पुरवणे.

३. उपक्रमाच्या कामाच्या ठराविक पायर्‍या असतात. ती कामे वेळेवर पार पाडणे.

४. प्रत्येक स्वयंसेवकाला एका संस्थेची जबाबदारी दिली जाते. ती पूर्णपणे सांभाळणे (गरज लागेल तशी मदतीला इतर स्वयंसेवक आहेतच!)

५. सर्वात महत्त्वाचे काम आर्थिक गणिते बरोबर ठेवणे.

ही व अजून काही कामे करावी लागतील.

उदाहरणार्थ,

~ देणगीसाठी नियोजित संस्थांसंबंधी सर्व आवश्यक माहिती संस्था प्रतिनिधींकडून गोळा करणे व गरजेनुसार लोकांना (देणगीदारांना) तशी माहिती पुरविणे.

~ संस्था व देणगीदार यांच्यात समन्वय साधणे.

~ संस्थेने देणगीतून घेतलेल्या वस्तूंची किंवा केलेल्या कामाची शहानिशा करून त्याची योग्य प्रकारे नोंद ठेवणे (जसे की छायाचित्रे, पावत्या, आभारपत्र वगैरे) व देणगीदारांपर्यंत ती माहिती पोचविणे.

~ उपक्रमातील स्वयंसेवकांच्या संपर्कात राहाणे, एकमेकांशी व नियुक्त संस्थांशी संवाद साधत राहाणे व उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहाणे.

यासाठी सुरुवातीला जास्त काम नसेल. परंतु देणग्या येऊ लागल्यानंतर मात्र स्वयंसेवकांनी सतर्क राहाणे अपेक्षित आहे व प्रत्येक टप्पा वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.

तसेच वेळेवर माहितीची देवाणघेवाण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि त्याहून जास्त गरजेचे आहे.

स्वयंसेवकांना ईमेल्स, एक्सेल शीट्स, व्हॉट्सप व स्काईप यांसारख्या सुविधा वापरता येणे हीदेखील या कामातील एक महत्त्वाची गरज आहे.

तर उत्साही मंडळींनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी.

मनापासुन आभार.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद. विश्या, महेन्द्र व गायत्री, तुमचे ईमेल आयडी, स्काईप आयडी व व्हाट्सप साठी योग्य तो फोन नंबर संपर्कातुन पाठवु शकाल काय.
ईमेलनी विचारणा केलेल्या मायबोलीकरांनी कृपया ईमेल पहावे, उत्तर दिले आहे.

स्पॉक, काय असते, आम्ही सर्वात जास्त त्या मार्गेच बोलतो कारण व्हाट्सप ने फटाफट संपर्क करता येतो. मेल्स नजरचुकीने वाचायची रहातात पण याचे तसे होत नाही. २-५ वाक्ये असतील तर मेल लागत नाही पण मोठा संदेश असेल तर मात्र ईमेल वापरतो.
पुर्वा धन्यवाद.