ओट्सचे आप्पे

Submitted by पूनम on 12 January, 2016 - 04:38
oats aape
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे Proud त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!

साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.

तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)

बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! Happy मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.

क्रमवार पाककृती: 

१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.

oats appe.png

मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351

वाढणी/प्रमाण: 
२१
अधिक टिपा: 

कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.

माहितीचा स्रोत: 
टीव्हीवरचा रेसिपी शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन प्रतिसादकांचे आभार Happy

बहुतांश लोकांना रेसिपी आवडते आहे हे पाहून छान वाटतंय. चव आवडली असेल, पण आप्पे फुगत नसतील तर मला वाटतं पुढच्या वेळी दह्यात पीठ भिजवावं किंवा खायचा सोडा घालावा. याने नक्कीच फुगतील.

दीमांची चटणी मलाही करायची आहे Proud

ओटस ऐवजी काही पर्याय आहे का? Happy हा प्रश्न बाकी होता की Wink
दीमांची तेलावर परतलेल्या डाळींच्या चटणीबरोबर आप्पे करणार आहे तर सुचवा ना काहीतरी..

दीमांच्या चटणीसाठी डाळी मंद आचेवर निवांत भाजणे इज द की. खरपूस भाजणे हा सुगरनपणा ज्याला जमतो त्याला ती चटनी परफेक्ट बनवता येईल. इतरांनी मद्रासी शेजारी अथवा कलिग्ज आहेत का याचा शोध घ्यावा.

फार आवडलाय हा प्रकार. खरंच झटपट होतात आणि मस्त लागतात. थँक्स पूनम. मंडळींना खायची फार घाई झाल्याने घाईत फोटो काढला. डोसे आणि आप्पे लोण्यासोबत बेस्ट लागतात.

rsz_oats_appe.jpg

आज केलेले.
पीठ २ तास भिजत घातले होते , पण तरीही आप्पे फुलले नाहीत . थंडीमुळे असतील कदाचित.
मी गूळ घालून केले , कारण घरचा आप्पेफॅन गोडच खातो .
चव मस्त झाली होती. पूढच्या वेळी दही टाकून बघेन.

आज परत आप्पे केले, पण बरोबर दीमांची चटणीही केली! ऑस्सम चव दीमा! त्या परतलेल्या डाळींचा मस्त खरपूस वास येतो चटणीला! फारच आवडली. थँक्स अ लॉट या चटणीच्या कृतीसाठी.

मस्त रेस्पी पूनम, थॅंक यू.
दीमा, आप्प्यांची चटणी या नावाने नवी रेस्पी पोस्टाल का प्लीज?
प्रतिसादकांनाही थँक यू. मल्टीपरपज पीठ दिस्तयं. एकदा आप्पे कधी इडली, दोसेही करता येतील म्हणजे.

पूनम, आप्पे फारच मस्तं झालेत. चवीला फार आवडले. तुझ्या टिपांनुसार कांदा, दही आणि इनो फ्रुट सॉल्ट घातलं. आतून हलके आणि वरून छान कुरकुरीत झाले आहेत. आधी पोटभर खाऊन घेते. फोटो नंतर टाकेन.

सोपा आणि पटकन होणारा पदार्थ आहे. त्यामुळे वरचेवर करता येईल. पाककृतीसाठी धन्यवाद!

दीमा, अंजली, धन्यवाद!

क्वेकरचे 'क्विक वन मिनिट' ओट्स आणि दीपचा भाजलेला उपमा रवा घेतला. १० मिनिटांचा स्टँडिंग टाइम विसरून गेले. मिश्रण तयार केल्याकेल्या आप्पे घातले. पण कच्चं लागलं नाही. पुढल्यावेळी किमान १० मिनिटंतरी भिजू देईन.

मस्त पाकृ. घरात आप्पेपात्र आहे आणि सॅम्स क्लबमधून घेतलेला भला थोरला ओट्सचा पुडका (क्वेकर ओट्स) Happy आता रोज आप्पे सुरू करतो

ह नवा हिट्ट पदार्थ करोन बघणार. दही, कांदा घालायचा विचार आहे पण नो सोडा/इनो.

मृण्मयी, फोटो काय देखणा आहे.
ही रेसिपी खरच सोपी वाटते आहे.

मृण्मयी, फारच मस्त फोटो !

मी आत्तापर्यंत तीनदा केले. समहाऊ डाळी-पोह्यांच्या आप्प्यांना येतो तसा ( किंवा दीमा आणि तुझ्या फोटोत दिसतोय तसा ) एकसारखा सोनेरी रंग ह्या आप्प्यांना येत नाहीये. का ते माहीत नाही.

चवीला मात्र फार सुरेख होतात. शिवाय वरुन कुरकुरीत असले तरी आतून ओलसर असतात, कोरडे होत नाहीत. परवा मुलाला डब्यात दिले तर संध्याकाळी डब्यातले उरलेले दोन गार आप्पेही छान लागले. परफेक्ट फॉर टिफीन ! ह्यावेळी मी कांदा आणि इनो घातला होता. दही/ताक नाही.

आप्यांचं माबोवर पेव फुटलंय, म्हणून इतके दिवस वाचलीच नाही ही कृती. एकदम सोप्पी आहे आणि फोटो पण यम्मी, नक्की करणार.
पण मरो ते अप्पे... सुरुवातीची रवा चर्चा कसली भयानक आहे. डोळ्यातून पाणी आलं. आणि पाकृ उघडल्याचं सार्थक झालं.

ओहह.. हे खरेच ओटसचे आप्पे आहेत.. मला वाटलेले ओटस सोबत खायचे आप्पे आहेत.. जसे ती आप्प्यांची चटणी असते

सही दिसताहेत पण .. Happy

मृण्मयी, साती, सुरेख फोटो. साती,मी केलेली चटणी जराशी ओलसर झाली होती.
नवीन प्रतिसादकांचे आभार! Happy

Pages