
ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!
साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.
तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)
बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.
१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.
मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351
कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.
तोपर्यन्त, दीमा. चटणी ची
तोपर्यन्त, दीमा. चटणी ची रेसिपी द्याच इकडे.
<<
१-१ मोठा चमचा हरभर्याची डाळ व उडिद डाळ
कढीपत्ता १ काडी (८-१० पाने)
२ मोठे कांदे लांब चिरून.
३ सुक्या लाल मिर्च्या.
२ चिमूट जिरं.
हे सगळे थेंबभर तेलावर खरपूस भाजून घेणे.
यात चमचाभर चिंचेचा कोळ, मीठ, वाटण्यापुरते पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेणे.
आमच्या घरी ही 'आप्प्यांची चटणी' याच नावाने ओळखली जाते. या चटणीशिवाय मला आप्पे खाल्ल्यासारखं वाटत नाही. मी ४-५ वीत असताना मंजेश्वर अशा आड(?)नावाचे एक 'मद्रासी' कुटुंब आमच्याकडे भाड्याने रहात होते. त्या काकूंनीच मातोश्रींना आप्पे अन ही चटणीही शिकवलेली होती. बिडाचा जड लोखंडी आप्प्यांचा तवाही त्यांनीच आणून दिला होता.
ही चटणीसारखी बोटाने चाटून न खाता, भाजीच्या प्रमाणात खावी असा प्रघात आहे.
चटणीसाठी डाळी भिजवून
चटणीसाठी डाळी भिजवून वाटायच्या असतील ना?
नाही. कच्ची डाळ, डायरेक्ट
नाही. कच्ची डाळ, डायरेक्ट भाजायची आहे तेलावर. खरपूस भाजली गेली पाहिजे. कचवट चव लागायला नको.
चला या चटणीच्या निमित्ताने
चला या चटणीच्या निमित्ताने मिक्सर दुरूस्त करून आणायला मुहूर्त लागेल..
चटणीच्या रेस्पिबद्दल धन्यवाद
चटणीच्या रेस्पिबद्दल धन्यवाद
उद्याचा हाच बेत. आप्पे आणि
उद्याचा हाच बेत. आप्पे आणि दिमांची चटणी! ही चट्णी एकदा खाल्ली होती. पन रेसिपी विचारायचा राहुन गेल होत.
दिमा ताट अगदी काळजीपुर्वक कट करुन फोटो टाकताहेत
वॉव सो फास्ट!!!दीमा,
वॉव सो फास्ट!!!दीमा, धन्यवाद!!!! या चटणीला वरून फक्त हिंग्+मोहर्या+करीपत्ता ची फोडणीही छान लागेल(बहुतेक)
अरे वा मस्त चट्णी आहे
अरे वा मस्त चट्णी आहे दिडमांची. पण कडिपाल्याचा दुष्काळ असतो घरी, तशीच करू का?
दिमा ताट अगदी काळजीपुर्वक कट
दिमा ताट अगदी काळजीपुर्वक कट करुन फोटो टाकताहेत स्मित
<<
मूळ फोटो मार्कांसाठी काढलेला नव्हता.
तशीच करू का?
<<
हो. चांगली लागते.
ही चटणी पुर्ण विसरली गेली
ही चटणी पुर्ण विसरली गेली होती. फार यम्मी लागते. आणि खरंच भाजीच्या quantity मधे खाल्ली जायची. आम्हाला पण आमच्या तामिळ शेजार्'याने शिकवली होती. फक्त एकच फरक होता रेसिपी मधे म्हणजे - चिंचेच्या कोळाऐवजी चिंचेचे तुकडे वापरले जायचे. बाकी गोष्टींबरोबर परतुन, मग चटणी मधे बारीक पेस्ट व्हायची.
ब्रेफासाठी आप्पे बनु घातले आहेत. चटणीसाठी वेळ नाही. पण आता चटणी ऐवजी केचप आवडणार नाही.
100झाले की
100झाले की
I too made it for breakfast.
I too made it for breakfast. Very tasty. Used masala oats one packet.
दीमा, नोटेड.
दीमा, नोटेड.
आप्पे, चवीला छान पण एका
आप्पे, चवीला छान पण एका बाजुने फ्लॅट झाले होते. वरची बाजु फ्लॅट राहिली. मग उलटल्यावर ती फ्लॅट बाजु खोलगट भागाला चिकटत नाही, त्यामुळे शिजले तरी त्या बाजुला गोल्डन कलर नाही आला. (Prestige चा नॉन स्टीक पॅन वापरलं. तेल वापरलं नाही त्यामुळे कलर फार ग्रेट आला नाही. नीट कुक झाले होते नक्की. )
आप्पे एका बाजुने गोल आणि दुसर्या बाजुने फ्लॅट, असंच असतं नेहमी? कि माझं काही चुकलं होतं? मी बर्याच वर्षांमधे खाल्ले नाहीत आणि पाहिले ही नाहीत.
मनिमाऊ, आप्पे सेमिसर्क्युलरच
मनिमाऊ, आप्पे सेमिसर्क्युलरच होतात, एक बाजू फ्लॅटच होते, पण जितकं पीठ घातलं आहे त्याच्या दीडपट ते दुप्पट तरी फुगायला हवं. आप्पे खालून खरपूस झाले, की वरची फ्लॅट बाजू उलटवायची. ती कमी वेळ ठेवायची आचेवर. थोडक्यात, तुझं बरोबर होतं (बहुतेक)
दीमा, चटणी मस्त वाटतेय. कच्च्याच डाळींबद्दल मी साशंक आहे जरा, पण एकदा करून बघेन थोडी.
बर आपल्याकडे 'खास डोसा व इडलीच्या चटण्या' असा धागा आहे. ही आप्प्यांची चटणी आहे. पण डोसा, इडल्यात खपेल. जनहितार्थ http://www.maayboli.com/node/53911 इथेही ही चटणी न्याल का?
आप्प्यांचं पीठ
आप्प्यांचं पीठ आप्पेपात्राच्या खळग्यांत काठोकाठ भरलं तर एका बाजूने चपटे होत नाहीत. उलटल्यावर खालची बाजू अधांतरी राहिली तरी उष्णतेने ती थोडीतरी फुगतेच. अगदी गोल चेंडू नाही झाला तरी चपटे नाही राहात.
मी परवा करून पाहिले. घरच्या
मी परवा करून पाहिले. घरच्या आप्पेफ्यानक्लबाने आवडीने खाल्ले.
मी जाड (कच्चा) रवा घातला होता. त्याऐवजी बारीक रवा (आणि जेवढ्यास तेवढा) घालून पहावा असा विचार आला. तसेही करून बघणार आहे.
मनिमाऊ, मी केलेले आप्पेही एका बाजूने फ्लॅट झाले होते.
घरच्या आप्पेफ्यानक्लबाने
घरच्या आप्पेफ्यानक्लबाने आवडीने खाल्ले.>> हुश्श!
रव्या जेवढ्यास तेवढा घातला तर मला वाटतं की रवा फुलायला वेळ द्यावा लागेल, तासभर तरी आणि त्यात काहीतरी आंबट पदार्थ घालावा लागेल फुगण्यासाठी. यात ओट्स जास्त असल्याने हा प्रकार 'झटपट' प्रकारात मोडतो.
केश्वि, आप्पे फ्लॅट नाहीत अगदी, तरी जरासेच फुगतात, २० डिग्रीपर्यंत साधारण.
पुनम आणि ललिता, थॅक्स !
पुनम आणि ललिता, थॅक्स ! हुश्श झालं वाचुन कि आप्पे पुर्ण गोल होणं अपेक्षित नव्हतंच.
चव मस्त होती आणि शिजले पण व्यवस्थित होते. पॉरिज खावुन वैतागलेल्या जीवांना हा झटपट आणि चविष्ठ प्रकार अगदीच दिलासा देणारा आहे.
अश्विनी, मी खळगा अर्धाच भरला होता, तो पीठ शिजताना फुगल्यावर ३/४ पेक्षा जास्त भरला गेला. पुढच्या वेळेस बॅटर पुर्ण भरुन पाहीन.
पुनम, थोडंसं बॅटर उरलं होतं, नविन प्रयोग म्हणुन आजच्या ब्रेफाला त्याच्या दोन इडल्या केल्या. गरम असताना स्टीकी होत्या. कोमट झाल्यावर तसं वाटलं नाही आणि मसाला इडलीची चव आवडली.
आप्पे फ्लॅट नाहीत अगदी, तरी
आप्पे फ्लॅट नाहीत अगदी, तरी जरासेच फुगतात, २० डिग्रीपर्यंत साधारण.>>>>
पाकशास्त्रात डिग्री हा शब्द मला आजवर तापमाना संदर्भाने वाटलेला... आजकाल भौमितिय संदर्भाने पण येऊ लागलाय तर!
पॉरिज खावुन वैतागलेल्या
पॉरिज खावुन वैतागलेल्या जीवांना हा झटपट आणि चविष्ठ प्रकार अगदीच दिलासा देणारा आहे. >> यु सेड इट! याच गरजेतून या रेसिपीचा शोध लागलेला आहे
कृष्णा
माझे पण आप्पे फुगले नाहीत. पण
माझे पण आप्पे फुगले नाहीत. पण चव चांगली होती. फक्त करायला थोडा जास्त वेळ लागत होता नॉर्मल आप्प्यांपेक्षा.
कच्च्याच डाळींबद्दल मी साशंक
कच्च्याच डाळींबद्दल मी साशंक आहे जरा
<<
डाळी भाजीयच्या आहेत.
दीमा, मी केली चटणी, झटपट आणि
दीमा, मी केली चटणी, झटपट आणि अतिशय चविष्ट. घरी अगदी आवडली. अर्थात आप्पे पण फार आवडले.
पूनम मी केले आप्पे. मस्त
पूनम मी केले आप्पे. मस्त झाले, आवडले.
पाककृती आवडली. सोपी आणि
पाककृती आवडली. सोपी आणि पौष्टिक! आज करणार आहे.
मेरा आप्या फूग्या च नही मी
मेरा आप्या फूग्या च नही
मी कच्चा च रवा घातला होता , पीठ चन्गले १ तास ठेवले होते...पीठ फुग्या,आ प्प्या च न ही फूग्या
मला वाटते, सोड्या शिवाय होनार नाही नीट...
ट्युलिप,
ट्युलिप, धन्यवाद!
*
>>
उद्याचा हाच बेत. आप्पे आणि दिमांची चटणी!
<<
झालं! माझी चटणी उडणार तर.
तुम्ही करता हो सर्वांची
तुम्ही करता हो सर्वांची चट्णी. तुमची करायची कोणालाय बिशाद?
अप्पे इथेही हीट्ट झाले.
मी या पिठाचे आप्पे करण्याऐवजी
मी या पिठाचे आप्पे करण्याऐवजी धिरडी घातली. छान झाली तीही. अगदी झटपट होणारा पदार्थ आहे. धन्यवाद पूनम!
Pages