गेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.
आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.
तर मग आपण आपल्या कार्यक्रमामध्ये अशांना का सहभागी करून घेऊ नये ज्यांना हा अनुभवच कधी घ्यायला मिळालेला नाही आणि मिळण्याची शक्यता देखील कमीच आहे? ह्या विचारानी आम्ही उत्सवचं बोर-न्हाण सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या ‘आपलं घर’ नावाच्या अनाथाश्रमात केलं. अनाथ मुलामुलींबरोबर तिथे निराधार वृद्धांची देखील काळजी घेतली जाते.
बोर-न्हाण हा छोट्यांचा कार्यक्रम असल्यामुळे तिथल्या चौथीपर्यंतच्याच मुलामुलींना त्यात सहभागी करून घेतलं होतं. त्यातली सगळ्यात छोटी मुलगी ‘खुशी’ चार वर्षांची आहे. तिचंही बोर-न्हाण केलं. सर्व मुलांना साखरेच्या दागिन्यांचं जाम कुतूहल! डोक्यावर ओतलेली बोरं आणि चॉकलेटं गोळा करायला हीऽऽ झुंबड. मग त्यांचे खेळ घेतले. ते झाल्यावर संस्थेतल्या सर्वांनाच हॉलमध्ये बोलावलं. मग एक तासभर जादूचे प्रयोग झाले. त्यानंतर जेवण. कार्यक्रम समाप्त.
संस्थेला दिलेली देणगी हा कार्यक्रमाचा भाग न ठेवता संस्थेचे संस्थापक, संचालक अर्थात सर्वेसर्वा श्री. फळणीकर यांच्या ऑफिसमध्ये खाजगीत दिली. खरं सांगायचं तर ऑफिस खाजगी नाहीच. संस्थेचे सर्व व्यवहार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक. हे सगळं तिथली स्वच्छता, साधेपणा, टापटीप, मुलांची वागणूक आणि स्वावलंबन यातून पावलोपावली दिसून येतं.
काही वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ करण्याऐवजी ती सगळी रक्कम आम्ही ‘जनसेवा फौंडेशन’ नावाच्या अशाच संस्थेला दिली होती तेव्हां माझा तिथल्या मुलांशी संबंध आला होता तेव्हां देखील मी अशीच इंप्रेस झाले होते. मात्र मला तेव्हां असं वाटलं की ही संस्था खास चांगली आहे म्हणून इथली मुलं इतकी गुणी आहेत. आता माझ्या लक्षात आलं की कळकळीनी चालवलेल्या या सर्वच संस्था भावनिक रीत्या सक्षम अशी पिढी तयार करताहेत. मात्र आपला त्यांच्याशी संबंध नसल्यामुळे आपल्या हे लक्षात आलेलं नाही.
त्यांच्या हॉलमध्ये आम्ही फुग्यांचं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. मात्र आपल्या कामासाठी त्यांचं मनुष्यबळ वापरायचं नाही असं ठरवून आम्ही एक तास आधीच तिथे पोहोचलो. फुगे तिथेच फुगवणं जरूर होतं कारण इतका व्हॉल्यूम गाडीत मावणार कसा? मोठे फुगे तोंडानी घट्ट फुगवणं आणि त्यांची नीट गाठ मारणं सोपं नसतं. पहिली ते चौथीची मुलं हे सटासट करू शकतील यावर माझा विश्वास बसला नसता जर मी स्वतः डोळ्यांनी ते पाहिलं नसतं! अर्ध्या तासात हॉल तयार झाला!
जादुगार देखील आम्हाला डेकोरेशनला मदत करंत होते. ते मंगेश पाडगावकरांची एक कविता गुणगुणू लागले. मी मुलांना विचारलं, “ही कविता कुणाची आहे माहीत आहे का रे मुलांनो?” “होऽऽऽ” एकसुरात उत्तर. कविता त्यांच्या अभ्यासक्रमात नसूनसुद्धा त्यांना ते माहीत होतं! त्यांना हे देखील माहीत होतं की काही दिवसांपूर्वीच पाडगावकरांचं देहावसान झालं होतं! Maybe I am out of touch, आणि एकाचं कौतुक करण्यासाठी दुसर्याला खाली खेचण्याची जरूर नाही, पण मला वाटत नाही की नॉर्मल मुलांना प्रायमरीमध्ये साहित्याबद्दल इतकी माहिती असते म्हणून. (यात माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीदेखील सामील आहेतच.)
आपण या मुलांना अनाथ म्हणतो खरं, पण वस्तुस्थिती अशी आहे की आज तिथल्या प्रत्येक मुलाला वीस भावंडं, पंधरा मावशा, दहा आजोबा आणि दहा आज्या आहेत. भले त्यांच्याकडे दिवाळीत फोडायला हजारो रुपयांचे फटाके नसोत, पण तिकडे गणपती, दिवाळी, जन्माष्टमी वगैरे जितक्या जोमात साजरे केले जातात तितक्या जोरात बाहेरची मुलं करंत नाहीत. ‘जनसेवा फौंडेशन’ मध्ये लहान मुलांची काळजी घेणार्या ज्या मावशी आहेत त्या व्हील-चेअरमध्ये आहेत! त्या नेहमी म्हणतात, “मी मुलांची काळजी घेतेच कुठे? मुलंच माझी काळजी घेतात!”
अशा ठिकाणी मी जाऊन आले की मला अगदी खुजं असल्यासारखं वाटतं.
हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?
खूप छान.
खूप छान.
सुंदर
सुंदर
Farach sunder
Farach sunder Kalpana!
Shevatacha vakya chataka lavun gela!
मी_अनु, पियु,
मी_अनु, पियु, वत्सला,
धन्यवाद!
वा! कसला फास्ट प्रतिसाद देता तुम्ही!
माझा प्रतिसाद क्वचितच असतो कारण मी आणि स्वीट टॉकर बहुदा एकत्र वाचतो आणि तोच प्रतिसाद लिहितो. (कामं त्यांच्याचकडून करून घेतलेली बरी असतात.)
खूप छान लेख. अगदी
खूप छान लेख. अगदी विचारप्रवर्तक. माझ्यामते संस्कार हे ठरवून असे करावे लागत नाहीत. बहुतेक मुले आणि मोठे सुद्धा त्यांना मिळालेल्या वातावरणातून आपणहून आपसुक गोष्टी शिकतात. आईवडीलांनी आपली वर्तवनुक आणि घरातील वातावरण नीट ठेवले तरी तेवढे पुरे आहे. दरवेळी चुक बरोबरचे धडे द्यायची गरज नाही. मुले अर्धा वेळ बाहेर घालवतात. त्यांना शाळा असते. मित्रांसोबत खेळणे असते. तिथेही ती काहीनाकाही शिकतातच.
काही वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ करण्याऐवजी ती सगळी रक्कम आम्ही ‘जनसेवा फौंडेशन’ नावाच्या अशाच संस्थेला दिली होती तेव्हां माझा तिथल्या मुलांशी संबंध आला होता तेव्हां देखील मी अशीच इंप्रेस झाले होते. >> ह्या वाक्यात तुम्ही शेवट असा स्त्रिलिंगी का केला.. अशीच इंप्रेस झाले होते!!!!
किती सुंदर लिहिलंय तुम्ही
किती सुंदर लिहिलंय तुम्ही ....
आणि त्यातही प्रत्यक्ष अनुभवाचे बोल ..... फारच छान ...
अशा ठिकाणी मी जाऊन आले की मला अगदी खुजं असल्यासारखं वाटतं.>>>> हे वाचल्यावर मलाही खुजं असल्यासारखं वाटलं ....
सुंदर लेख.
सुंदर लेख.
छान लेख!!! तुम्ही तुमच्या
छान लेख!!!
तुम्ही तुमच्या नातवाचा कार्यक्रम अभिनव पध्दतीने आणि खरंच खुप चांगल्या प्रकारे पार पाडून एक चांगली दिशा दाखवलीत. तुमच्या लेखाच्या शेवटच्या वाक्याने मात्र एकदम अंतर्मुख व्हायला झालं.
बी, 'स्वीट टॉकर' आणि 'स्वीटर
बी,
'स्वीट टॉकर' आणि 'स्वीटर टॉकर' असे दोन आय डी आहेत. मिया बीवी. लेख मी उर्फ स्वीटर टॉकर उर्फ बीवीने लिहिला आहे. यात चूक नाही मात्र कित्येक वेळा कुठला आय डी उघडा आहे हे लक्षांत नसल्यामुळे प्रतिसाद देताना लिंगाचा गोंधळ होतो खरा.
छान
छान
अतिशय मस्त वाटले वाचून .
अतिशय मस्त वाटले वाचून . तुम्ही बर्याच जणांना प्रेरणा दिलीत .
सुंदर लेख. तुमचे लेख वाचयला
सुंदर लेख. तुमचे लेख वाचयला खूप आवडतात/
खुप छान.. असे काही मनात येणं
खुप छान.. असे काही मनात येणं आणि ते प्रत्यक्षात साधणं यातली दरी सांधता येत नाही.. तूम्ही ते साधलंत.
अच्छा ह्यावर उपाय म्हणून
अच्छा ह्यावर उपाय म्हणून तुम्हाला श्री स्वीट टॉकर आणि सौ स्वीट टॉकर असे बदल करता येईल.
उत्तम लेखन, सुरेख उपक्रम.
उत्तम लेखन, सुरेख उपक्रम.
स्वीटर टॉकर! स्वीट टॉकर यांचे अनुभव भन्नाट असतात, त्यांची शैलीही मस्त आहे. बट यु टेक अवे द केक!
उत्तम लेखन, सुरेख उपक्रम. >>
उत्तम लेखन, सुरेख उपक्रम. >> + १
सुंदर लेख
सुंदर लेख
छान!
छान!
खूप छान! 'हटके' कृतीशीलता
खूप छान! 'हटके' कृतीशीलता मनापासून भावली आणि ती शब्दबध्दही छान केली.
अप्रतीम अनूभव! खूप छान वाटले
अप्रतीम अनूभव! खूप छान वाटले वाचुन. आणी हृदयस्पर्शी अनूभव इथे शेअर केल्याबद्दल तुमचे खास धन्यवाद.:स्मित:
तुम्ही उभयतानी चान्गला आदर्श ठेवलात आमच्यापुढे आणी तुमच्या इतर परीचितान्पुढे.
सुरेख अनुभवकथन! शेवटचं वाक्य
सुरेख अनुभवकथन! शेवटचं वाक्य विचार करायला लावणारं आहे. एक ऐकलेली आफ्रिकन म्हण आठवली - It takes a village to raise a child!
पुनम +१
तुमचे अनुभव असेच लिहित रहा!
चांगला उपक्रम. असे काही हटके
चांगला उपक्रम.
असे काही हटके करायचे ठरवून प्रत्यक्षात आणल्याबद्दल तुम्हां उभयतांचे आणि बाळाच्या आईबाबांचे कौतुक. तुम्हां चौघेही याबाबतीत समविचारी आहात हे पाहून बरे वाटले.
इतकी अभिनव कल्पना प्रत्यक्षात
इतकी अभिनव कल्पना प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल तुम्हा दोघांचे आणि नातवाच्या आई-वडीलांचे अभिनंदन !
खूप छान .. लेख.. उपक्रम..
खूप छान .. लेख.. उपक्रम.. विचार..
शेवटचे वाक्य अगदी पटले !
प्राचि + १
प्राचि + १
सुंदर अनुभव आपल घर पण खूप
सुंदर अनुभव
आपल घर पण खूप चांगली संस्था आहे .
आम्ही एक वाढदिवस तिथे केला होता .
खुप सुंदर लेख आणि त्या हुन एक
खुप सुंदर लेख आणि त्या हुन एक खुप सुंदर आदर्श तुम्ही दिलात आम्हा सर्वांनाच !!
>>हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?<< फार योग्य आणि समर्पक प्रश्न
फ़ारच छान कल्पना! लेख हि मस्त!
फ़ारच छान कल्पना!
लेख हि मस्त!
सुंदर लेख!
सुंदर लेख!
खूप छान!
खूप छान!
Pages