Submitted by webmaster on 2 June, 2008 - 01:22
य र ल व श ष स पासून सुरू होणारे शब्द
या अगोदरचं हितगुज इथे पहा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
य र ल व श ष स पासून सुरू होणारे शब्द
या अगोदरचं हितगुज इथे पहा
वाव, मस्त
वाव, मस्त चर्चा आहे म्हणजे माहितीप्रद. आवडली. मला असा एखादा शब्द अडला तर कुठे विचारायचे तेही कळले.
साधना.
चिनॉक्स्,ध
चिनॉक्स्,धन्यवाद ही माहीती दिल्याबद्दल. मला २-३ दिवस अजिबात वेळ नव्हता त्यामुळे मी ते पुर्ण नाही वाचल. आज शांतपणे सगळ वाचल्.
इस्कॉनवाले भक्तीभावाने मंत्र म्हणत असतात्.त्यामुळे त्यातुन मंत्राची महती सांगताना थोडफार पुढे मागे होउ शकत.म्हणुन म्हटल की सांगणारा इस्कॉनवाला नव्हता.
आरे काय
आरे काय पान्डित्यपुर्ण भाण्डतात रे तुम्हि ?
वा मजा आली आणि बरिचशी माहिती ही मिळाली.
चिनॉक्स या
चिनॉक्स या शब्दाचा अर्थ व मुळ काय आहे??????
चिन्या, तुल
चिन्या,
तुला माझ्या idचा अर्थ हवा आहे का?
तो चिनुक्स आहे, चिनॉक्स नाही..
खरा शब्द आहे chinook (चिनुक)..
ही रेड इंडीयन्सची एक अतिशय शांतताप्रिय आणि नाचगाण्यात रमणारी जमात आहे. त्यावरूनच fighter helicopters च्या एका प्रकाराचे नावसुद्धा chinook असे ठेवले गेले.
माझा id याच chinookचा अपभ्रंश.
आल
आल लक्षात्.धन्यवाद
चिनुक्स तु
चिनुक्स तु बाय चान्स IIT (p) मध्ये होतास का? काल माझ्या मित्रासोबत गप्पा मारताना त्याने चिन्मय दामले ह्या त्याच्या मित्रा बद्दल सांगीतले. मला वाटल कदाचीत तो तु असावास.
जुन्या
जुन्या मायबोलीवर कुठेतरी राधा आणि अनय या शब्दांबद्दल चर्चा वाचल्याचं आठवतं आहे. तो दुवा सापडला नाही, पण याबद्दल थोडी माहिती वाचनात आली.
'राध्' असा संस्कृत धातू आहे. एक अर्थ 'प्रसन्न करणे'. 'राधा' या शब्दाचा अर्थ 'राधित म्हणजे प्रसन्न करणारी'.
राधेचा उल्लेख महाभारतात कुठेच नाही. डॉ. भांडारकरांच्या मते राधा ही आभीर जातीची असून, पुढे आर्यांशी संबंध आल्यावर तिला दैवत्व लाभले. पद्म, नारद, देवीभागवत इ. पुराणांत राधेचे उल्लेख आहेत. पण 'कृष्णाची प्रिया' या अर्थी राधेचा उल्लेख हाल सातवाहनाच्या 'गाहासप्तसई'मध्ये झाला आहे. पुढे ९व्या शतकातील आनंदवर्धनाच्या 'ध्वन्यालोक' व त्रिविक्रमभटाच्या 'नलचंपू' या ग्रंथांत राधा-कृष्ण यांच्या शृंगाराचे वर्णन आले आहे. १२व्या शतकातील जयदेवाच्या 'गीतगोविंदामुळे' राधा दैवत म्हणून सर्वसामान्यांमध्ये पूजली जाऊ लागली.
दक्षिण भारतात इ.स. २-३ या काळात लिहिल्या गेलेल्या वाङ्मयात 'नप्पिनै' नावाच्या 'आवडत्या गोपीचा' उल्लेख येतो. तीच ही उत्तरेतील राधा असावी.
इ.स. ५-९ व्या शतकांतील आळवार संत स्वतःला कृष्णाची नायिका समजत असत. त्यांच्यात 'कुरवैकूत्तू' हे रासलीलेशी साधर्म्य असणारे नृत्य प्रचलित होते. नप्पिनै-कृष्णाच्या शृंगाराची वर्णनं करणारी जवळजवळ ४००० पदं या संतांनी लिहीली.
बंगाल्यांच्या मते राधा ही दुर्गेचा अवतार आहे. ब्रह्मवैवर्तपुराणात तसा उल्लेख आहे.
या सगळ्या ग्रंथांमध्ये राधेचा विवाह रापाण/रायाण/अयनघोष यांच्याशी झाल्याचं लिहिलं आहे. पण मजा म्हणजे रापाणाचा विवाह राधेच्या सावलीशी झाला, आणि खरी राधा कृष्णाच्या हृदयात जाऊन बसली, असंही पुढे लिहिलं आहे.
अनयाचा उल्लेख यांपैकी एकाही ग्रंथात नाही. 'अनय' या शब्दाचा अर्थ 'आजारपण' अथवा 'जुगार खेळताना वापरलेले फासे' असाही होतो.
नाही म्हणाला तमिळ वाङ्मयात अनय नावाच्या एका गुराख्याच्या कथा लोकप्रिय आहेत. हा बासरी उत्तम वाजवायचा. एकदा शंकराने त्याला दर्शन दिले होते, अशी काहिशी ही कथा.
मात्र राधेच्या संदर्भात अनय कुठेही नाही.
नारदभक्ति
नारदभक्तिसूत्रांमध्ये पण गोपिकांचा उल्लेख येतो (यथा व्रजगोपिकानाम ||) पण राधेचा उल्लेख नाही.
महाराष्ट्रातल्या संतपरंपरेमध्ये सुद्धा राधेचा उल्लेखदेखील तसा अपवादानेच येतो. एक प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज सोडले तर राधेचा उल्लेख तसा जवळजवळ नाहीच.
राधा आणि अनय यांची ही पूर्ण कथा मध्वसंप्रदायातून पुढे चालत आली असावी असाही एक कयास आहे.
नसे राऊळी
नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी
यातिल "राऊळी"चा अर्थ काय आहे?
महाराष्ट्
महाराष्ट्रातल्या संतपरंपरेमध्ये सुद्धा राधेचा उल्लेखदेखील तसा अपवादानेच येतो. एक प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज सोडले तर राधेचा उल्लेख तसा जवळजवळ नाहीच.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले...
ह्या व अशा अनेक मधुरा भक्तीच्या रचनात राधेचा उल्लेख आढळ्तो.................
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
०
०
"vaikhari " mhanaje kaay ?
"vaikhari " mhanaje kaay ?
वैखरी = भाषा
वैखरी = भाषा
लोकहो, येथील संवाद
लोकहो, येथील संवाद unformatted असल्याने नंतर वाचायला त्रास होतो. प्रश्न विचारणारा किंवा उत्तर देणारा किंवा एखादा स्वयंसेवक नंतर ती माहिती येथे टाकु शकेल का:
http://en.wiktionary.org/wiki/Category:Requests_for_etymology_%28Marathi%29
या पेक्षा सुयोग्य जागा असल्यास संकल्प, चिनूक्स वा इतर जाणकारांनी सांगावी.
धन्यवाद ,
धन्यवाद , चिनूक्स.....
"ग्यानबाची मेख " हा शब्दप्रयोग कसा प्रचारात आला ?
"वैखरी" म्हणजे "वाणी".
"वैखरी" म्हणजे "वाणी".
IndoEuropean उगमामुळे
IndoEuropean उगमामुळे संस्क्रुत आणि English मध्ये अनेक समानार्थी आहेत.
अंत = end
मातर = Mother
पितर = Father
भ्रातर = Brother
वयम = we
युयम = you (m काढुन टाका)
त्वम = Thou (m काढुन टाका)
मानव = man
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे
मला एक modern /catchy अस नाव
मला एक modern /catchy अस नाव हव आहे. ते एक cosmetic cum general clinic असनार आहे
Indo-European भाषेत जसे
Indo-European भाषेत जसे Sanskritodbhav shabd khup aahet tasech, East Asea madhehi... Bangkokche airport Swarnbhumi, Indonesiachi airline- Garuda, Indonesian languagelahi te Bahsa asach mhantat, Raja, Surya ase kityek Sanskrutodbhav shabd aajhi prachalit ahet, dharm jari Islam asal tari nav matr Sanskrut madhun aaleli ahet, Bali, Yogyakarta- (Jogyakarta nr active volcano -mt. Merapi)
parva sahaj manat aal... English madhla Progeny ha shabd Sanskrutshi sambadhit asaava ka? Praja.... prajanan...
मला असलेल्या तीन शंका १
मला असलेल्या तीन शंका
१ सविता हे मुलीचे नाव असू शकते का ?
२ अजय आणी अजेय या पैकी योग्य कोणते ?
३ अनिकेत चा अर्थ काय ?
अनिकेत म्हणजे, ज्याचे एकच घर
अनिकेत म्हणजे, ज्याचे एकच घर नाही, म्हणजे ज्याचे हे विश्वच घर आहे तो. चु भु घ्या द्या
'अजेय' हे बरोबर.
'अजेय' हे बरोबर.
सविता मुलीचे नाव का नसावे?
सविता मुलीचे नाव का नसावे? सविता म्हणजे सूर्य ना?
..
..
हो, पण उदा. सूर्यासारखी
हो, पण उदा. सूर्यासारखी तेजस्वी.. असं?
सवितृ हे मूळ रूप ना? (बुद्धीला इ.) चेतना देणारी जी देवता/शक्ती ती सविता नाही का?
पण शब्दरत्नाकरात आणि मोल्सवर्थमधे सविता शब्द पुल्लिंगी दिला आहे खरा.
भा रा तांब्यांच्या 'मावळत्या
भा रा तांब्यांच्या 'मावळत्या दिनकरा...' मधे सुद्धा (सूर्याचा) "सवित्या" असा पुल्लिंगी उल्लेख आहे बहुधा.
मला असलेल्या तीन शंका १ सविता
मला असलेल्या तीन शंका
१ सविता हे मुलीचे नाव असू शकते का ?
हे मुलीचे नाव असु शकते कारण स्वाती यांनी म्हटल्याप्रमाणे मुळ शब्द सवितृ म्हणजे propagator of energy ज्यावरुन सविता आला आहे आणि नाव देण्यासाठी पुर्वापार संस्क्रुत चे नियम पाळलेच पाहिजेत असे नाही.
२ अजय आणी अजेय या पैकी योग्य कोणते ?
इथेपण पुर्वापार संस्क्रुतनुसार अजेय योग्य पण अजय नाव सोपे जाईल आणि मराठीत योग्यही असेल.
३ अनिकेत चा अर्थ काय ?
अनिकेतन चा अर्थ आरती म्हणते तसा विश्वच घर आहे तो होतो पण संस्क्रुतमध्येही अनिकेत नाव रुढार्थाने वापरतात.
विजय या तुमच्या शंका आहेत की परिक्षा पहात आहात
अजुन काही misunderstood नावे
दुर्योधन = difficult warrior
दु:शासन = difficult to punish
ही चांग्ल्या अर्थाची नावे आहेत पण
त्याचा अर्थ
दुर्योधन = bad warrior
दु:शासन = bad governor
असा बरेचजण घेतात.
नीता नाव माहित आहे पण हे अनिता नाव आप्ल्याकडे ग्रीकांकडुन आले, ते कसे काय याचे मला कौतुक वाटते.
दुर्योधन = bad
दुर्योधन = bad warrior
दु:शासन = bad governor
असा बरेचजण घेतात.>>> हो मलाही नेहमी आश्चर्य वाटायचे की ते पुढे वाईट निघाले ते ठीक आहे, पण जन्मल्यावर अशी नावे कशी ठेवली असतील :). या माहितीबद्दल धन्यवाद.
Pages