
लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)
माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.
तर,
टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :
टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :
दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.
सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)
चव पाहून मीठ घालून मिक्स करा.
वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.
ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.
फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :
पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.
माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.
कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.
आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.
फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.
भाजका टो चा पण सालसा करतात
भाजका टो चा पण सालसा करतात की.
भाजी नसेल तर टोमॅटो ची भाजी करतो आम्ही. जे जास्त चांगला दिसतय. आजच करणार. कांदा भाजायचा नाहीये पण लसुन भाजल तर चालेल का?
मस्तच! फोटोला १०० पैकि ११०
मस्तच!
फोटोला १०० पैकि ११० मार्क, चिप्स,स्कुपस बरोबर पण छान लागेल.
दीमा, पाकृ बेश्ट दिसतेय.
दीमा, पाकृ बेश्ट दिसतेय. फोटोंना पैकीच्या पैकी मार्क्स.
तेरा नंबर आयेगा.... >>> आधीचे बारा कुठे आहेत?
Masta aani sopa prakar
Masta aani sopa prakar distoy. Nakkee Karun khain.
Photo, pa kru, presentation 10/10!!!
Tumachee murga massallam khunavatey pan ajun yog aala nahee.
भारी पाककृती आणि फोटो. अमितव
भारी पाककृती आणि फोटो.
अमितव

छानै रेसिपी.. चटपट आणी
फोटो मस्त आलेत. पटकन होइल अशी
फोटो मस्त आलेत. पटकन होइल अशी रेसिपी. चॉपिंग बोर्ड्ला भाज्या चिरल्याचे हिरवे, लाल डाग नाहीत त्यावद्द्ल अभिनंदन. व्हेज पदार्थ असल्याने करुन बघता येइल, नवा पदार्थ आहे. पैकीच्या पैकी मार्क
वाह.. मस्त फोटो आहेत!! टोमॅटो
वाह.. मस्त फोटो आहेत!! टोमॅटो भाजणे अवघड वाटेल गॅसवर, म्हणून जमेल की नाही माहित नाही. एनाराय पब्लिक ओव्हन मध्ये फॉईलमध्ये गुंडाळून बेक केले तर होतील का टो भाजके? वांगी करतात ना अशी?
रच्याकने, राजसी ह्यांची चक्क देवनागरीत पोस्ट!
अरे वा! छान छान रेसिपी. आम्ही
अरे वा!
छान छान रेसिपी.
आम्ही दुप्पट लसूण आणि मिरच्या घेऊन करू.
फोटोचे पूर्ण मार्क्स!
कापोचेंची आयडिया लक्षात ठेऊन नाजूक पांढरी 'दाखवायची' भांडी वापरलेली दिसतायत.
याच किचनचा कट्टापण दिसत नाही आहे.
(मागच्या आणि या रेसिपीची तुलना करता आणि यावेळी पदार्थांच्या हाताळणीतील आणि फोटोंतला सराईतपणा पाहता , यावेळी शेफ आणि फोटोग्राफर यांचे रोल्स एक्सचेंज झालेले दिसतायत.
)
वांग्याचं भरीत करताना आम्ही
वांग्याचं भरीत करताना आम्ही लसूण आणि मिरच्यापण चुलीत भाजून घेतो. त्यानं चव अजून खुलते. इथेही लसूण मिरची भाजून घेतली तर मस्त चव येईल.
(No subject)
चांगली आहे पाकृ
चांगली आहे पाकृ
एक नंबर हो दिमा!!! आम्ही
एक नंबर हो दिमा!!!
आम्ही पोळी ला पोळीच म्हणतो +१००!!
पाककृती मस्त आहे. फोटोपण छान
पाककृती मस्त आहे. फोटोपण छान आहेत.विशेषतः वरून तिसरा, एकदम बार्बेक्यू टोमॅटोसारखा वाटतोय.
मार्कः ९/१० (१ मार्क वाईट अक्षरासाठी कापलाय)
थ्यांक्यू ऑल प्रतिसाद व
थ्यांक्यू ऑल प्रतिसाद व मार्कदाताज.
*
रेस्पी छोटी अन मोस्टली क्लीन हातांनी करता येण्यासारखी असल्याने फोटोग्राफर मीच अन बनवणाराही मीच.
*
लसूण भाजला तर चालेल. छान लागतो.
कांदा भाजल्यावर मऊ, स्लिपरी अन गोडसर होतो. चव बदलते. नीट चिरताही येत नाही. तेही करुन चुकलोय एकदा.
करण्यासारखी आहे! फोटो जबराट
करण्यासारखी आहे! फोटो जबराट आलेत. मिरच्या तुम्हाला आणि त्या सुरीला घाबरून एकमेकींना मिठी मारून बसल्यात.
१०० पैकि ११० मार्क.
१०० पैकि ११० मार्क.
लय भारी. पयला फोटू लाजवाब!
लय भारी. पयला फोटू लाजवाब! तयारी करून परीक्षेला उतरलात ते दिसतय. टोमॅटोची भाजी करण्यापेक्षा हेच भारी लागेल.
दिले दिले , पुर्ण मार्क दिले.
दिले दिले , पुर्ण मार्क दिले. झकास!!!!
मस्त न सोप्पी रेसिपी ..
मस्त न सोप्पी रेसिपी ..
मिरच्या तुम्हाला आणि त्या
मिरच्या तुम्हाला आणि त्या सुरीला घाबरून एकमेकींना मिठी मारून बसल्यात.>>>>>:हाहा: आशुडीका जवाब नही!
यावेळी अत्यंत दुरदृष्टी
यावेळी अत्यंत दुरदृष्टी वापरुन स्वतःचे ग्लोव्हावगुंठीत हातही फोटोत न दाखवल्याचे जाणवते.
चॉपिंग बोर्डाला डाग नाहीत म्हणजे भाज्या दुसरीकडे कापून या चॉपिंग बोर्डावर फोटो करता ठेवल्या असाव्यात.
("दया, लगता है खून किसी दुसरी जगह हुवा है और लाश को यहां डाला गया है..जरुर कुछ तो गडबड है!")
छान रेसीपी व फोटो. साल्सा
छान रेसीपी व फोटो. साल्सा सारखेच वाट्ते आहे. वीकांताला करून ठेवण्यासारखे आहे.
केसाळ हात नाहीत फोटोत ते मस्त. फोटो पैकी च्या पैकी मार्क.
ऊफ ... फोटो भारीयेत!
ऊफ ... फोटो भारीयेत!
वा वा!! सुंदर फोटो! हे
वा वा!! सुंदर फोटो!
हे टोमॅटोचं भरीत ब्रेडबरोबर खायला लय भारी लागतं.
छान पाकृ आणि फोटोही. केसाळ
छान पाकृ आणि फोटोही.
केसाळ हात नाहीत फोटोत ते मस्त.>>>>>>>> +१
वेटींग फॉर टर्की रेसीपी.
या पाकृ नन्तर आपला नम्बर
या पाकृ नन्तर आपला नम्बर येणार म्हणून टर्की जाम टरकली असणार.:फिदी::दिवा:
अरे वा! सोप्पी वाटतेय पाकृ.
अरे वा! सोप्पी वाटतेय पाकृ. करून बघेन एकदा.
सगळ्या कमेंटस
ह्या वेळी खूप काळजीपुर्वक
ह्या वेळी खूप काळजीपुर्वक फोटो काढलेले दिसतायत
पैकीच्या पैकी मारकं.
झटपट पाककृती आहे
टर्की म्हणजेच बटेर का?
वा वा झकास पाकृ... करुन बघणेत
वा वा झकास पाकृ... करुन बघणेत येईल..
Pages